Sunday, 24 July 2022

 राज्यात पूरपरिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ आणि एसडी एसडीआरएफच्या 14 टीम तैनात.

     मुंबई,दि.24 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थीती बाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत.

   मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण-२,कोल्हापूर-२,सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ टीम तैनात आहेत.

           नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती.

            राज्यात एक जून पासून आज पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत.४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे

            राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.

 एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये


            मुंबई, दि. 24 सोलापूर - गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

            अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

            अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.


0000


 

Day विशेष


 

बाजार

 








 

मनकी बात खबर

 







भवताल अजिंठा लेणी

 

सहा चित्रांचा गिलावा पडला, एकाचा का नाही??
- अजिंठ्यातील रहस्ये उलगडण्याची संधी

इसविसन ४६७. अजिंठ्यातील एकही लेणं पूर्ण झालं नव्हतं. तरीही बौद्ध भिक्खू या खोल्यांमध्ये वास्तव्याला यायला सुरुवात झाली. पण या खोल्यांना दारे नव्हती. आजूबाजूला घनदाट जंगल होते. उंदीर, साप, विंचू, वाघ हे मुक्त संचार करत असणार. त्यामुळे आतून कडी लावून दार बंद करता येणे अत्यावश्यक होते. उत्साहाच्या भरात लेणीचे हे काम झाले खरे, पण दारे लावण्याची बाब ही बाब कोणाच्या लक्षातच आली नव्हती. यावर उपाय सापडला ४६८ मध्ये. काय होता तो उपाय...??
...
अजिंठ्यातील लेणे क्रमांक २. त्याच्या छतावर प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत अजिंठ्याची सर्वाधिक सुंदर आणि लक्षवेधी अशी सात वर्तुळांची मालिका रंगवली आहे. यातले वैविध्य, नाजूक कलाकुसर आणि रंगसंगती अचंबित करणारी आहेत. या वर्तुळांच्या केंद्रस्थानी छिद्रे आहेत आणि छिद्रांच्या अवतीभवतीचा गिलावा आहे. इथल्या सात पैकी सहा वर्तुळांच्या भोवतीचा गिलावा पडलेला आहे. पण शेजारच्या लेणे क्रमांक १ मध्ये मात्र छतावरचा गिलावा अखंड आहे, कुठेही बारकासा टवकाही गेलेला नाही... असे का??
...
घारापुरीची प्रसिद्ध लेणी. ती आठव्या शतकातील असल्याचे मानले जात होते. पण हे कोणी व कसे ठरवले? अजिंठ्यात ‘पर्शियन एम्बसी’ या नावाने ओळखले जाणारे भित्तीचित्र आहे. या ऐतिहासिक पर्शियन शिष्टमंडळाची तारीख इसविसन ६२५ अशी ज्ञात असल्यामुळे अजिंठा लेण्यांचा काळ सातवे शतक, असे विद्वानांचे मत होते. पण नंतर हे चित्र म्हणजे पर्शियन एम्बसी नव्हे हे पुरातत्वज्ञांना जाणवू लागले, डीटर श्लिंगलॉफ या जर्मन विद्वानाने हा (गैर)समज पूर्णपणे निकालात काढला... हे नेमके कसे घडले??

...अजिंठा लेणीत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत. ती समजून घेतली तर अजिंठा लेणी लक्षात येईल आणि तिचा नेमका अर्थही समजेल.
ती समजून घेण्याची संधी भवताल उपलब्ध करून देत आहे. म्हणूनच, २००० वर्षे जुनी लेणी उलगडणारी इको-टूर...
...अजिंठा लेणीत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत. ती समजून घेतली तर अजिंठा लेणी लक्षात येईल आणि तिचा नेमका अर्थही समजेल. ती समजून घेण्याची संधी भवताल उपलब्ध करून देत आहे. म्हणूनच, २००० वर्षे जुनी लेणी उलगडणारी भवताल इको-टूर...
नावनोंदणीसाठी लिंक=
#बॅच १ : २० - २१ ऑगस्ट २०२२(शनि-रवि)
#बॅच २ : २३ - २४ ऑगस्ट २०२२(मंगळ-बुध)
एकूण जागा: २० प्रति बॅच
मार्गदर्शक:
(अजिंठा लेणींच्या ज्येष्ठ अभ्यासक)
(अजिंठ्यातील चित्रांचे अभ्यासक)
संपर्कासाठी :
bhavatal@gmail.com / 9545350862
(माहिती संदर्भ : शुभा खांडेकर)

--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Featured post

Lakshvedhi