Saturday, 23 July 2022

समारंभ

नमस्कार मंडळी, . शुक्रवार दिनांक 22/07/2022 रोजी आपल्या *महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था ली. मुरुड* च्या *नामफलकाचे अनावरण* सायंकाळी ठिक 6.30 वाजता संस्थेच्या कार्यालयाजवळ .. संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मुरूड माळी समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय *श्री. प्रमोदजी भायदे* यांच्या हस्ते हे अनावरण आले. 🙏🙏............. अजित जगन्नाथ गुरव........... अध्यक्ष.. महात्मा फुले ना.सह.पतसंस्था म.मुरूड,व इतर मान्यवर , पदाधिकारी यांचे उपस्थित संपन्न झाला. 


 




Friday, 22 July 2022

 दिलखुलास’ कार्यक्रमातविवेक भिमनवार यांची मुलाखत.

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे महाव्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 23 जुलै व सोमवार दि. 25 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


भारतीय चित्रपटसृष्टीच्या यशात दादासाहेब फाळके चित्रनगरीचे मोलाचे योगदान आहे. मुंबईसारख्या शहरात 521 एकर क्षेत्रावरील या चित्रनगरीत एकाच छताखाली सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्नशील आहे. चित्रनगरीच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि कलात्मक करण्याच्यादृष्टीने कोणते प्रयत्न होत आहेत याविषयी सविस्तर माहिती महाव्यवस्थापकीय संचालक श्री. भिमनवार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.


000

स्पेशल बात me

 एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट,

एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदी

 

            मुंबई, दि. 22 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत लागू करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त, संजय लाटकर यांनी कळविले आहे.

            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.  

            या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

           

000


कामगार सुरक्षा

 व्यावसायिक सुरक्षाआरोग्य व कामाच्या स्थितीच्या नियमाचे प्रारूप प्रसिद्ध

----

आक्षेप किंवा सूचना कळविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

 

            मुंबईदि. 22 : महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षाआरोग्य व कामाची स्थिती (कामगारनियम 2022 चा मसुदा आणि महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षाआरोग्य व कामाची स्थिती (कारखाने व इतर बंदरेनियम, 2022 चा मसदा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये दि. 18 जुलै 2022 रोजी अधिसचनव्दारे प्रसिद्ध करण्यात आलेल आहे.

            या अधिसचनव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्यांबाबत 45 दिवसांच्या आत हरकती तसेच सचना योग्य समर्थनासह मागविण्यात येत आहेत. मसदा नियम हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ कायदे व नियम या पर्यायाखाली www.maharashtra.gov.in आणि www.mahakamagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आलेल आहे.

महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षाआरोग्य व कामाची स्थिती (कामगारनियम 2022 च्या कामगार नियम प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या कामगार आयुक्तमहाराष्ट्र राज्यकामगार भवन, 4 था मजलासी 20, ई ब्लॉकबांद्रा संकुलवांद्रे (पूर्वमुंबई 400051 यांच्याकडून किंवा mahalabourcommr@gmail.com या ईमेलवर स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षाआरोग्य व कामाची स्थिती (कारखाने व इतर बंदरेनियम, 2022 बाबतचे आक्षेप किंवा सूचना संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, 5 वा मजला, सी 20, ई ब्लॉकबांद्रा संकुलवांद्रे (पूर्वमुंबई 400051 यांचे कडून किंवा dirdish.mum-mh@gov.in या ईमेलवर स्वीकारण्यात येणार आहेत.

            कालावधी समाप्त होण्यापूर्वी प्रारुपांच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संघटनेकडून प्राप्त होणारे असे आक्षेप किंवा सूचनाराज्य शासनाकडून विचारात घेण्यात येतीलअसे कामगार आयुक्त कार्यालयाने कळविले आहे.

000

                                                                          

वऱ्हाडातील रंग भवताल

 वऱ्हाडातील रंगपालटणाऱ्या पावसाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ४८)

 

वऱ्हाड अर्थात पश्चिम विदर्भया भागाचे शेतीशी घट्ट नातेपरिणामीहे नाते पावसाशीत्याच्या बांधल्या जाणाऱ्या आडाख्यांशी आणि प्रत्यक्ष येणाऱ्या अनुभवांशीसुद्धा! पण आता पावसाचे रूपच बदलले आहेपूर्वी सलग येणारा झडीचा पाऊस हमखास असायचाआता तो गेला तो गेलाचसोबत लोकांचा पावसावरचा भरवसाही संपलाआता त्याने रंग पालटले आहेतवऱ्हाडातील पाऊस नेमका कसा बदललाययाबाबत जनसामान्यांच्या निरीक्षणांसह सांगतलेली ही गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/West-Vidarbha-Rain

 

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४८ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com



सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी

मनुष्यबळाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन.

            मुंबई, दि. २१ : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र प्र. सुरवसे यांनी दिली. ही माहिती मुदतीत भरण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

            सेवायोजना कार्यालय कायदा १९५९ अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस सादर करणे बंधनकारक आहे. सर्व आस्थापनांकडून १०० टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांना यापूर्वीच यूजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या http://mahaswayam.gov.in संकेतस्थळावर लॉगिन करावे व कायद्याचे अनुपालन करावे, असे आवाहन केले आहे.

            यासंदर्भात माहितीसाठी mumbaicity.employment@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालय, श्रेयस चेंबर्स, १ ला माळा १७५, डि.एन. रोड, फोर्ट मुंबई – ४००००१ या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००

Featured post

Lakshvedhi