Friday, 22 July 2022

तंबाखू बंद

 तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारणास प्रोत्साहन नको

आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून शासनाच्या सर्व विभागांना सूचना.

            मुंबई, दि. 22 : सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादक कंपन्या तसेच त्यांचे प्रायोजकत्व घेणाऱ्या कंपन्या/संस्थामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांत शासकीय कर्मचारी व शासनाच्या अधिपत्याखालील संस्थांनी सहभागी होवू नये, असे आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांचे सहसंचालक आरोग्य सेवा (असंसर्गजन्य रोग) तथा राज्य नोडल अधिकारी (राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) आयुक्तालय, मुंबई यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

            परिपत्रकात म्हटले आहे की, युनायटेड किंगडमस्थित सेंटर फॉर रिसर्च ॲण्ड एज्युकेशन (सी. एच. आर. ई.) ही संस्था फाऊंडेशन फॉर स्मोक फ्री वर्ल्ड (एफ. एस. एफ. डब्ल्यू) या संस्थेसमवेत कर्करोग जनजागृतीबाबतचे शिबिर देशाच्या काही भागात राबवित आहे. तथापि, एफ.एस.एफ.डब्ल्यू ही संस्था इलेक्ट्रॉनिक निकोटीन डिलीव्हरी सिस्टम (इ. एन. डी. एस.) चे उत्पादन करते. त्याकरीता इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे सुटे भाग तयार करण्यासाठी प्रोत्साहित करते. याकरीता जगातील तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणारी फिलीप मॉरिस इंटरनॅशनल (पी. एम. आय.), ही कंपनी एफ.एस.एफ.डब्ल्यू या संस्थेस निधी पुरविण्याचे काम करते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व शासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालय, संस्थांनी तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होवू नये. त्यांनी देऊ केलेल्या शिष्यवृत्ती, बक्षिसे, भेटवस्तू स्वीकारु नयेत. असे करणे केंद्र सरकारच्या सिगारेट व अन्य उत्पादने (कोटपा) कायदा 2003 च्या कलम 5 च्या उपकलम 5.3 चे उल्लंघन असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

            एफ. एस. एफ. डब्ल्यू. या संस्थेसोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीसोबत कॉर्पोरेशन सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सी.एस.आर.) अंतर्गत कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत व इतर कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असेही परिपत्रकात नमूद आहे.


000




 





आला आला गणराज

 गणेशोत्सवदहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या एक खिडकीद्वारे मिळणार

नोंदणी शुल्कहमी पत्राची अट शिथिल

 

            मुंबई, दि. 21 :- गणेशोत्सवदहीहंडी  आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण - उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावेत यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

            सार्वजनिक गणेशोत्सवमोहरमदहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवदही हंडी हे सण उत्साहानेजल्लोषात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल. सर्वं मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच समाज प्रबोधनसामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेशोत्सवदहीहंडीमोहरम या सणाच्या काळात राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

            गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने करावी. याबरोबरच कोकणात जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात एस. टी. बसेस उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

            गणेशोत्सव मंडळांना नवीन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देण्याबरोबरच नोंदणी शुल्क माफ करण्याचे तसेच गणेशोत्सव काळात पोलीस विभागाकडून घेण्यात येणारे हमीपत्र देखील न घेण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

            गणेशोत्सव हा दरवर्षी सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत. मात्र प्रशासनाने नियमांचा अवास्तव बाऊ न करता मंडळाना सहकार्य करावे.

            संपूर्ण राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. तसेच जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            मुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणे तसेच विसर्जन मार्गांवर पुरेश्या वीज पुरवठ्याची व्यवस्था असावी. तसेच यंदा मूर्तीच्या उंचीवरची बंधने उठवली आहेत. तसेच मूर्तिकारांच्या सर्वं समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून मुंबईतील मूर्तीकारांना मूर्तींशाळांसाठी जागा निश्चित करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याबरोबरच मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी दिले.

            पीओपीच्या मूर्तींबाबत निर्णय घेण्यासाठी एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असूनत्यामध्ये एमपीसीबीनिरीआयआयटीएनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल असेही त्यांनी सांगितले.

            गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनीप्रदूषण तसेच इतर काही गुन्हे नोंदवले गेले असतीलते काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी. तसेच गणेशोत्सव मंडळांसाठी पूरस्कार योजना सुरु करण्याच्या अनुषंगाने योग्य ते धोरण निश्चित करण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच दहीहंडी उत्सव साजरा करताना न्यायालयाने लहान गोविंदाबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गणेश पर्व हे महत्त्वाचे आहे. हे पर्व उत्साहात साजरे करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. ज्या काही अडचणी असतील त्या परस्पर सहकार्याने सोडवाव्यात  असेही त्यांनी सांगितले.

            पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या तयारीचे सादरीकरण केले.

            या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवगृह विभागाचे अपर मुख्य सचिव मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव संजय सक्सेना, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, एम.एम.आर.डी.ए आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे तसेच मूर्तीकार संघटनेचे प्रतिनिधी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




 



 

हर घर तिरंगा

 घरोघरी तिरंगा उपक्रम समन्वयाने यशस्वी करा

मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना.

            मुंबई, दि. 21 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) उपक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रधान सचिव नंदकुमार, प्रधान सचिव मनीषा वर्मा, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, प्रधान सचिव सोनिया सेठी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, सचिव सुमंत भांगे, सचिव रणजित सिंह देओल, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.

             सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयात, आस्थापनामध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व इमारती, अधिकारी, कर्मचारी वसाहतीत तिरंगा फडकवला जाईल याबाबतची तयारी केली जावी, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

            घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत जाणीव जागृती करावी. लोकांना उपक्रमाबाबत माहिती व्हावी यासाठी विविध माध्यमांतून माहिती शिक्षण संवाद उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

            घरोघरी तिरंगा उपक्रमाचे समन्वयक आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या तयारीबाबत सादरीकरण केले.

            विभागाच्या जिल्हा आणि प्रादेशिक स्तरावरील कार्यालयात तिरंगा फडकवला जावा. शालेय शिक्षण, सहकार, महसूल कृषी विभागाने अधिक प्रभावीपणे उपक्रमाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, असे सांगितले.

            सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या नियोजन बाबत माहिती दिली. त्यांनी उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या जिंगल्स आणि क्रिएटीव्ह याबाबत माहिती दिली.

            यावेळी एसटी महामंडळाचे कार्यकारी संचालक शेखर चन्ने, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग, आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.

**

Thursday, 21 July 2022

मेरा bharat mahan

 


अंतर निरंतर

 शेवटी अंतर तेवढचं राहीलं !

🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं..., ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं... 

मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...

     😢 शेवटी अंतर तेवढच राहीलं 😪

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...

मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.

       😢 शेवटी अंतर तेवढच राहिलं 😪


🦢🦢🦢🦢🦢🦢🦢

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची... 

मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...

   😢 शेवटी अंतर तेवढच राहिलं 😪

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?

आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.

 😢 शेवटी अंतर तेवढच राहिलं 😪

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत...

  😢 शेवटी अंतर तेवढंच राहीलं 😪

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं... 

आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावल्या 

  😢 शेवटी अंतर सारखच राहतं...😪

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा 

  😢 शेवटी अंतर सारखंच राहतं... 😪

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

_आता कळलं...हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं जसा आहे, तसाच राहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही..._

म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हंटले होते ,

ठेविले अनंते तैसेचि राहावे, 

चित्ती असू द्यावे समाधान ...

🌻🌼🌻🌼🌻🌼🌻

मित्रांनो खूष रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जिवन खुप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद उपभोगा. 

कुणाचं *दुसऱ्याचे पाहून* आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.

Featured post

Lakshvedhi