Wednesday, 20 July 2022

थोडेसे खाजवा की

 *भूलथापांना बळी पडून कोठेही आपले पैसे गुंतवू नका, आधीच विचार करा*

------------------------

मैत्रेय... धनादेश Bounce, मालकाला अटक !

😫

पियरलेस... पत्ताच नाही !

😵

कल्पवृक्ष... अचानक बंद पडलं ! ४०० कोटी बुडले

😲

Venus life ... मालिक तुरुंगात  लौक रस्त्यावर, सगळे बुडाले !

🙄

Per Day Cash... नुसत्या थापा !

😖

संचयनी... लोकांचे पैसे बुडाले..!

😢

KBC... मालक पैसे घेऊन सिंगापूरला फरार !?

😭

रायसोनी मल्टीस्टेट ... १२ संचालक तुरुंगात सोसायटी बंद खातेदार बुडाले! तशा अनेक मल्टीस्टेट सोसायटी बुडण्याच्या मार्गावर.. 

😥

Imu egg yojna. पैसे घेऊन मालक फरार !

😳

Japan Life गादी... पैसे गेले अन् गादीवर झोपच नाही लागली !!

🙄

पर्लस्... भांगू पळाला.. एजंट लपून बसले. गुंतवणूकदार हवालदिल !

😧

Swadeshi... माणसे नाही भेटली !

😰

RCM... दुकानं बंद पडली !

😲

Netsurf... होते काही तरी ??

😖

Noni... बळजबरी लोकांना आजारी म्हणायचे !

😫

Pan Card Clubs... धनादेश BOUNCE ? मालक स्वर्गवासी गेले. एकुण एक गुंतवणूकदार बुडाले.

😖

समृद्ध जीवन... FRAUD मुळे मालकाला अटक ! हजारो करोड बुडाले. 

😢

सहारा  investment... मालक ४ वर्षे तुरुंगात. लोक स्मशानात. 

😧

सिट्रस- व्टिंकल... गोयेंका गायब, कंपन्याची नावे बदलून लुटालुट सुरुच आता बंद पडले, पैसे गेले सर्व गेले इत्यादी इत्यादी !

😳😳😳

मूर्ख बनवणारे हजारो आपणच, 

मूर्ख बनणारे लाखो आपणच,

कमी श्रमात अधिक पैसे कमविण्याचा शॉर्ट-कट मार्ग हवाय ना सगळ्यांना, 

म्हणुन वेगवेगळ्या नावाने दरवर्षी येणाऱ्या मार्केटींग कंपन्या मल्टीस्टेट सोसायट्या  यांची खुप मोठी यादी आहे मित्रांनो !


ही सर्व धोखाधडी चालू असते, चालूच राहणार नवीन-नवीन नावाने.. नवीन बनावट चेहऱ्याने...!! 

पुर्वीच्या प्लांटेशन कंपन्या प्रमाणे आता कॉईनच्या नावे हजारो कंपन्या आल्या आहेत. 

रोज कोणीतरी कॉईन काढतो बघता बघता  ४८ तासात त्या कॉईनचा दर डबल होतो. अवघ्या २ दिवसात झाले तुमचे पैसै डबल.. 


*बिचाऱ्या सरकारी बँका 11 वर्षे घेतात दुप्पट द्यायला पोस्ट विभाग 12 वर्षे घेते.. इथे मात्र केवळ 2/3 वर्षात तुमचे पैसै दुप्पट ...*  अरे थोडं तरी डोकं चालवा. आपला घामाचा पैसा कुठेही गुंतवून आपली फसवणूक करुन घेऊ नका. 


कारण प्रत्यक्षात काहीच नाही आभास फक्त. 

व्हर्चुअल करंन्सी, डिजिटल पेमेंट, मायनींग, मोठे उच्चार, केवळ मोठी नावं, मात्र शुध्द फसवणूक.. 


*माणसाची स्वत:ची लालची वृत्ती व असलेला हव्यास त्याला स्वत:लाच फसवते.* 


आपल्या लोकांचे अज्ञान व आर्थिक अंधश्रध्दा याला कारणीभूत असली तरीसुद्धा आपल्याच देशबांधवांना फसवणारे महाठक याला जबाबदार आहेत ! 

*बऱ्याच वेळा फसवणारे लोक आपल्यातलेच, मित्र-मैत्रिणी, गावातलेच, नात्यातलेच, ओळखीचे किंवा सलगी करून परिचय करून घेणारे असतात. आपल्याकडील पैसा लुबाडून नेला जाईपर्यंत, ते आपल्याला परके वाटतच नाहीत, शंका येत नाही आणि तिथेच आपली फसगत झालेली असते.*


आपल्या पैश्यांची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

आपल्या कुटुंबासाठी कमविलेले मेहनतीचे पैसे कुणा फसव्या माणसाकडे जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

आर्थिक बाबींचे आकलन करावे, असल्या फालतू स्किमचा सखोल अभ्यास करावा, त्याच व्यवसायातील इतर चार जाणकारांना विचारावे, विचार करण्यास वेळ घ्यावा आणि मग निर्णय घ्यावा. 


*नकार द्यायला घाबरू नये.*


 कुठलीही कंपनी असो, त्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्हच्या सुटाबुटातल्या मँनेजरच्या भूल- थापांना, लबाड भाषेला, बडेजाव-झगमगाटाला, फाईव्ह स्टार मधल्या मिटिंगला व अत्यंत खोट्या आश्वासनांना बळी पडू नये.


शेवटची महत्वाची एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा


जो कुणी बिना मेहनत शिवाय पैसे देतो म्हणतो,किंवा मिळतात म्हणतो

 तेथे नक्कीच धोका आहे हे ओळखा

बगर श्रम केल्याशिवाय या जगात काही मिळत नाही तेव्हा भ्रमात न राहता आपल्या मेहनतीचा पैसा लुटल्या जाणार नाही ते बघा,समोरचा धोका ओळखा व अश्या लोकांपासून व कम्पण्या पासून लगेच सावध व्हा


*⚔️*सत्यमेव जयते*⚔️ *

 सांगली, पालघर जिल्ह्यांसाठी पालक सचिवांची नियुक्ती.

            मुंबई, दि. 20 : पालघर आणि सांगली जिल्ह्यांसाठी पालक सचिव पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास आणि पालघर जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

पुरस्कार

 आतांबर शिरढोणकर आणि संध्या रमेश माने यांना

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

            मुंबई, दि. 20 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2019-20 आणि सन 2020-21 या वर्षाचा हा पुरस्कार अनुक्रमे आतांबर शिरढोणकर आणि संध्या रमेश माने यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Bhavatal विदर्भ

 पूर्व विदर्भातल्या हरवलेल्या नक्षत्रं-पावसाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४७)

पूर्व विदर्भ म्हणजेच झाडीपट्टी. तिथं उत्तम झाडी आणि घनदाट वने. तिथे भरपूर पाऊस पडतो, त्याच वेळी कडक उन्हाळा आणि कडाक्याची थंडीसुद्धा असते. या प्रदेशातील पावसामध्ये अनेक बदल झाले आहेत. इथल्या पावसाची ओळख एक म्हणजे नक्षत्रावर पडणारा पाऊस! जुने लोक अजूनही त्याची आठवण सांगतात. पण हा पाऊस गेल्या काही दशकांमध्ये बदलत गेला. आता तो कायमचाच हरवून गेला. अशा पूर्व विदर्भातील पावसाच्या बदलाची ही गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/East-Vidarbha-Rain

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४७ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

-


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Chess

 


पुरस्कार

 सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण.

            मुंबई, दि. 20 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुरस्कार आणि वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

            राज्य सांस्कृतिक पुरस्कारांतर्गत तमाशा लोककला पुरस्कार देण्यात येणार असून “पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर” असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. किर्तन/ समाजप्रबोधन पुरस्कार दिला जाणार असून “ह.भ.प. शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव” असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना आता “राजर्षी शाहू महाराज” वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजना म्हणून ओळखली जाईल.


००००

Gst

 अन्नधान्य खाद्यपदार्थ व गुळ इत्यादी वस्तू वरील नवीन लावलेला जीएसटी मागे घेण्याची आमची मागणी कायम : ललित गांधी.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची केंद्र व सर्व राज्य सरकार सरकारांकडे मागनी.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्याने आकारणी केलेल्या अन्नधान्य, खाद्यपदार्थ इत्यादी वस्तू वरील जीएसटी संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण केले आहे. या स्पष्टीकरणाचे आम्ही स्वागत करतो. मात्र हे केवळ वित्त मंत्रालयाच्या 13 जुलै च्या आदेशामधील संदीग्धतेवर त्यांनी दिलेले स्पष्टीकरण आहे.

नॉन ब्रांडेड अन्नधान्य, खाद्यपदार्थ तसेच गुळ यावर नव्याने लावलेला पाच टक्के जीएसटी रद्द करावा ही आमची मागणी कायम असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रि अँड एग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.


नवीन कर आकारणी अन्यायकारक असून सामान्य माणसाचे बजेट बिघडणार आहे. त्याचबरोबर छोट्या व्यापाऱ्यांना या कर विषयक पूर्तता करताना दमछाक होणार आहे. असे सांगून ललित गांधी पुढे म्हणाले की जीएसटी ची करप्रणाली मुळातच अतिशय क्लिष्ट आहे, नवीन आकारणी यातील क्लिष्टता वाढवून भ्रष्टाचाराला आमंत्रण देणारी अशी ठरणार आहे. सध्याच्या काळात खाद्यपदार्थ असतील अन्नधान्य असेल या सगळ्या वस्तू आरोग्याच्या दृष्टीने पॅक करूनच विकाव्या लागतात. व्यापाऱ्यांनी या सुट्ट्या विकल्या की पॅक करून विकल्या हे नेमके ठरवणार कोण हाही मोठा प्रश्न यातून निर्माण होणार आहे.


25 किलो पेक्षा कमी वजनाच्या वस्तूवर कर आणि 25 किलो पेक्षा जास्त वजनाच्या वस्तूवर कर नाही हे धोरण नेमके कशासाठी राबवले जाते हे समजून येत नाही. सामान्य माणूस कमी वस्तू खरेदी करत असतो त्याने मात्र कर द्यायचा, आणि जास्त प्रमाणात वस्तू खरेदी करणाऱ्याला करमाफी असे धोरण सरकार कसे काय राबवू शकते हा आमच्या समोरील प्रश्न आहे. राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था या नात्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ची केंद्र सरकारला व या निर्णयात सहभागी असणाऱ्या सर्वच राज्य सरकारांना आग्रह पूर्ण विनंती आहे की हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा आधीच अडचणीत असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना नव्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. आणि मग आंदोलनाशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उरत नाही असे सांगून ललित गांधी यांनी सरकारने हा कर मागे घेण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी केली.

Featured post

Lakshvedhi