Tuesday, 19 July 2022

Bhavatal-माणदेश

 टप्प्याटप्प्याने आकसलेल्या माणदेशातील पावसाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४६)

माणदेश म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या हद्दीवरील कमी पावसाचा प्रदेश. अतिशय कमी पाऊस, रखरखीत प्रदेश, तरीही स्वतंत्र ओळख असलेला! चपळ बैलाचे खिलार हे प्रसिद्ध वाण इथलेच. खरंतर हा महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त प्रदेशाचा प्रातिनिधिक भाग. इतर प्रदेशात पाऊस बदलला, तसाच तो माणदेशातही. तिथे दर दहा वर्षांनी पाऊस आकसत गेला, माणूसही बदलला. त्यामुळे सर्वच गोष्टींवर झालेले परिणाम तिथे पाहायला मिळत आहेत. तिथं नेमकी कशी परिस्थिती बदलली आहे, याचीच ही गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Mandesh-Rain

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४६ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com


इतरांसोबत शेअरही करा.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


मतदार id

 मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी1 ऑगस्ट पासून विशेष मोहीम

- मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर.

            मुंबई, दि. 19 : मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी विद्यमान मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

            या विशेष मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6ब द्वारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांनी सांगितले.

            मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांनी दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.

            मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीतजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.

000



जत्रा

 श्री गुंडी जत्रेनिमित्त राज्यपालांची राजभवनातील देवी मंदिरात आरती.

            मुंबई, दि. 19 : कोरोनामुळे दोन वर्षांच्या अवकाशानंतर यंदा होत असलेल्या राजभवनातील प्राचीन श्रीगुंडी देवीच्या यात्रेनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज देवी मंदिरात जाऊन भाविकांसमवेत श्री गुंडी देवीची आरती केली.


            यावेळी दर्शनासाठी विविध भागातून आलेल्या कोळी बांधवांनी पारंपरिक नृत्य केले.


            अनेक दशकांची परंपरा असलेली ही जत्रा कोरोनामुळे दोन वर्षे झाली नव्हती.


००००


 


Governor Koshyari visits Annual Jatra at Raj Bhavan's Sri Gundi temple

            Mumbai, 19th July : Governor Bhagat Singh Koshyari performed arti at the historic Sri Gundi Devi Mandir in the Raj Bhavan complex on the occasion of the Annual Jatra.

            The traditional jatra which has a long history is being held after a gap of Two years.

            Members of the fishermen community visited the temple from different parts of the city and performed a traditional dance on the occasion.

000

Full पाखरू


 

लाडाची सासुरवाडी

 






 

नियमावली शुल्क

 Continue     ....        ...प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे आवश्यक असून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.

            कार्यक्रमाच्या नियोजित तारखेच्या कमीत कमी 21 दिवस आधी अर्ज संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. अर्ज उशीरा प्राप्त होऊन नियोजित तारीख उपलब्ध असल्यास 1 लाख रुपये इतके जलद शुल्क आवेदकांना भरावे लागतील. शासकीय आस्थापनांचे आणि दुतावासांचे अर्ज 15 दिवस आधी संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे. जाहिराती व व्यावसायिक प्रसिद्धी यासाठी गेट वे ऑफ इंडियाचे छायाचित्र किंवा चिन्ह वापरणे हे व्यावसायिक चित्रीकरण समजले जाईल. पूर्व परवानगी आणि 1 लाख रुपये एवढे स्वामित्वधन न भरता असे छायाचित्र किंवा चिन्ह वापरले गेल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल. कोणताही धार्मिक विधी, राजकीय स्वरुपाचे कार्यक्रम अथवा विवाह सोहळे यासाठी सदर स्मारकाचा वापर करता येणार नाही. स्मारक परिसरात सोमवार ते शुक्रवार या दिवशी कार्यक्रमास परवानगी देण्यात येईल. शासकीय कार्यक्रम वगळता इतर कुठल्याही कार्यक्रमास शनिवार आणि रविवार या दिवसांकरिता परवानगी देण्यात येणार नाही, स्मारक परिसर फक्त पर्यटकांकरिता खुले असेल.

            परवानगी ज्या दिवसासाठी आणि कारणासाठी मागितली आहे त्याच दिवसासाठी आणि त्याच कारणासाठी परवानगी देण्यात येईल. कार्यक्रमाचा दिवस आणि कारण बदलल्यास पुन्हा संचालनालयाकडे नव्याने अर्ज करुन परवानगी घेणे आवश्यक राहील. नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य अपरिहार्य कारणांमुळे स्मारक परिसर उपलब्ध होऊ न शकल्यास संस्थेस कार्यक्रम आयोजनासाठी दुसरी पर्यायी तारीख उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न संचालनालयामार्फत करण्यात येईल. आयोजक संस्थेने प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्याची पूर्वसूचना 12 दिवस अगोदर दिल्यास शुल्काची 50 टक्के रक्कम परत करण्यात येईल अन्यथा शुल्काची रक्कम परत करण्यात येणार नाही. ध्वनीप्रदुषणाबाबत शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमांचे पालन बंधनकारक असेल. याबाबत नियमभंग, गुन्हा दाखल होणे अथवा न्यायालयीन दावा दाखल झाल्यास कार्यक्रमाचे आयोजन करणारी संबंधित संस्था जबाबदार असेल.


००००





Featured post

Lakshvedhi