सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 16 July 2022
रद्द नगरपरिषद निवडणूक
निवडणुका रद्द झालेल्या नगरपरिषदांची जिल्हा व वर्गनिहाय नावे: ‘अ’ वर्ग : जळगाव- भुसावळ. पुणे- बारामती. सोलापूर- बार्शी. जालना- जालना. बीड- बीड आणि उस्मानाबाद- उस्मानाबाद.
‘ब’ वर्ग: नाशिक- मनमाड, सिन्नर व येवला. धुळे- दोंडाईचा वरवाडे व शिरपूर वरवाडे. नंदुरबार- शहादा. जळगाव- अमळनेर व चाळीसगाव. अहमदनगर- कोपरगाव, संगमनेर व श्रीरामपूर. पुणे- चाकण व दौंड. सातारा- कराड व फलटण. सांगली- इस्लामपूर व विटा. सोलापूर- अक्कलकोट, पंढरपूर व अकलूज. कोल्हापूर- जयसिंगपूर. औरंगाबाद- कन्नड व पैठण. बीड- अंबेजोगाई, माजलगाव व परळी- वैजनाथ. लातूर- अहमदपूर. अमरावती- अंजनगाव.
‘क’ वर्ग: नाशिक- चांदवड, नांदगाव, सटाणा व भगूर. जळगाव- वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा व यावल. अहमदनगर- जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता व राहुरी. पुणे- राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड व शिरूर. सातारा- म्हसवड, रहिमतपूर व वाई. सांगली- आष्टा, तासगांव व पलूस. सोलापूर- मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा व सांगोला. कोल्हापूर- गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व वडगांव. औरंगाबाद- गंगापूर व खुलताबाद. जालना- अंबड, भोकरदन व परतूर. बीड- गेवराई व किल्ले धारूर. उस्मानाबाद- भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग, उमरगा, परांडा व तुळजापूर. लातूर- निलंगा व औसा. अमरावती- दर्यापूर. बुलढाणा- देऊळगावराजा.
नगरपंचायती: अहमदनगर- नेवासा. पुणे- मंचर व माळेगाव बुद्रुक. सोलापूर- अनगर.
शिष्यवृत्ती
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" साठी25 जुलैपर्यंत अर्जाची मुदत.
मुंबई, दि. 14 : मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" करिता दि. २५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मार्दीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून "साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती" करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ०३ ते ०५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, २ छायाचित्र, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपला पूर्णपत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), मुंबई गृहनिर्माणभवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, बांद्रा (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर दि. २५ जुलै, २०२२ पर्यंत अर्ज करावा, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय मुंबई शहर उपनगर यांनी कळविले आहे.
**
नाट्य
22 व्या भारत रंग महोत्सवात ‘आज़ादी श्रृंखले’ अंतर्गत मुंबईत 5 नाटके2
नाटके मराठीत.
नवी दिल्ली : राष्ट्रीय नाट्य शाळेच्यावतीने, आज़ादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘आज़ादी श्रृंखला’ या संकल्पनेवर 16 जुलैपासून 22 वा भारत रंग महोत्सव सुरू होणार आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबईत एक-एक मराठी नाटक सादर करण्यात येईल. 22 व्या भारत रंग महोत्सवातंर्गत ‘आज़ादी श्रृंखला’ या संकल्पनेवर एकूण 30 नाटके 8 भाषेत 6 विविध राज्यांतील शहरात सादर होणार असल्याची माहिती संचालक डॉ.रमेश चंद्र गौर यांनी राष्ट्रीय नाट्य शाळेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यामध्ये दिल्ली येथे 16 ते 20 जुलै 2022 पर्यंत एकूण 5 नाटके सादर केली जातील. मराठी भाषेतील ‘द प्लान’ हे नाटक 20 जुलै रोजी दिल्लीतील कमानी सभागृहात सायंकाळी 7 वाजता सादर केले जाईल.
9 ते 13 ऑगस्टपर्यंत मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी या सभागृहामध्ये एकूण 5 नाटके सादर केली जातील. यामधील 12 ऑगस्ट रोजी सादर होणारे ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक हे मराठीत असणार आहे. 9 ऑगस्टला ‘आय एम सुभाष’, 10 ऑगस्टला ‘गांधी आंबेडकर’, 11 ऑगस्टला ‘ऑगस्ट क्रांती’ 13 ऑगस्टला ‘रंग दे बंसती चोला’ ही चार नाटके हिंदीत असणार आहेत.
14 ऑगस्टला आज़ादी श्रृंखलेचा समारोपीय कार्यक्रम नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे होणार आहे.
याशिवाय 21 ते 25 जुलै दरम्यान भुवनेश्वर(ओडीसा), 26 ते 30 जुलै दरम्यान वाराणसी (उत्तर प्रदेश), 31 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत अमृतसर (पंजाब), 5 ते 8 ऑगस्ट या दरम्यान बंगळूर (कर्नाटका) येथे नाटक सादर होणार आहेत. या नाटकाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायकांचा परिचय करून देण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. गौर यांनी यावेळी सांगितले.
0000000
सूचना : सोबत छायाचित्रे आणि दिल्ली तथा मुंबई सादर होणा-या नाटकांचे वेळापत्रक जोडले आहे.
Friday, 15 July 2022
वसंत वैभव
नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तउद्या 'वसंत वैभव' कार्यक्रमाचे आयोजन.
मुंबई, दि. 14 :- नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कला आणि कार्यावर आधारित 'वसंत वैभव' या विशेष कार्यक्रमाचे उद्या, दि. १५ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 'वसंत वैभव' हा कार्यक्रम उद्या, १५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. वसंत कानेटकर हे लोकप्रिय नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि थोर विचारवंत होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात कथा- कादंबऱ्या लिहिल्या. 'वेड्याचं घर उन्हात' या पहिल्याच नाटकापासून त्यांना लोकप्रियता मिळाली आणि पुढे तब्ब्ल ४३ नाटके त्यांनी लिहिली. प्रेक्षकांनी या सर्वच नाटकांना भरभरुन प्रतिसाद दिला. त्यांच्या अनेक नाटकांचे हजारोंपेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत.
ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. 'वसंत वैभव' या कार्यक्रमाची संकल्पना वैजयंती आपटे यांची असून, लेखन व दिग्दर्शन रवींद्र खरे यांचे आहे. या कार्यक्रमात चारुदत्त आफळे, अभय जबडे, नितीन कानेटकर, विजय काळे, अविनाश ओगले, राहुल गोळे, सिंध्दार्थ कुंभोजकर, राकेश घोलप, नरेंद्र वीर, गौरी पाटील, गौरी रत्नपारखे, चारुलता पाटणकर यांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर करणार आहेत.
'वसंत वैभव' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून या कार्यक्रमाचा जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
