Thursday, 14 July 2022

राष्ट्रपती

 राष्ट्रपती निवडणूक 2022

राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक

            मुंबई, दि. 13 : भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरिता निवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी श्रीमती दीपाली मसीरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            महाराष्ट्र विधानभवन, मुंबई येथे होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात श्रीमती मसीरकर ह्या दिनांक 17 जुलै रोजी दुपारनंतर मुंबईत येत असून त्या निवडणूक तयारीच्या कामकाजाची पाहणी करतील.

            या निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाने आवश्यक सामग्री जसे मतपेटी, मतपत्रिका, पेन आदी साहित्य दिनांक 12 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई येथे पाठविले आहे. हे सर्व साहित्य विधानभवनातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

000



 

Wednesday, 13 July 2022

भवताल.ठोक्या पाऊस

 मातीचा गंध हरवलेल्या,


मराठवाड्याच्या पावसाची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी ४५)

एखादा ‘ठोक्या पाऊस’ पडला की जमिनीची तहान भागायची. पडलेलं पाणी वाहू लागायचं. दिवसातून चार वेळा लेंडया, ओढे यांना अचानक पूर यायचा. या पुरात काट्या, कुपाट्या, बेसावध जनावरं अन् माणूस वाहत जायचा. कंदील अन् टेंभे घेवून सारा गाव पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आकृती काठाकाठाने शोधत फिरायचे. चार - दोन दिवस पुराच्या गोष्टी रंगायच्या. ‘ओढ असणारा तो ओढा’ हे त्यावेळी पटायचे. गोदामाय पैठणपासून ते नांदेडपर्यंत ओसंडून वाहायची. तेरणा - मांजरा यांसह अनेक लहान मोठ्या नद्यांना भरते यायचे. ते पार उन्हाळ्यापर्यंत नद्यांचा ओलावा टिकून राहायचा... आता मात्र स्थिती झपाट्याने बदलली आहे. आम्ही आमची पिके बदलली. १९७२ साली दुष्काळ पडला. तेंव्हा पाणी होतं, पण खायला अन्न नव्हतं. आता स्थिती विरुद्ध आहे.

मराठवाड्याचा पाऊस नेमका कसा बदललाय, याचीच ही गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Marathwada-Rai

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४५ वी गोष्ट.

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com


इतरांसोबत शेअरही करा.



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Owooo owoo 3


 

महत्वाचं

 जर आपल्या कडे कुठला आंतरराष्ट्रीय कॉल आला आहे, ज्यात दर्शविलेले नंबर भारतीय आहे किंवा कोणताही नंबर दर्शविलेला नाही, तर कृपया ह्याची माहिती DoT टोल फ्री नंबर 1800110420/1963 वर द्यावी.

बाजार शिक्षणाचा


 

गुरु वंदन

 🙏🙏गुरू वंदन🙏🙏

        माझ्या आयुष्यात तुमच्या सारख्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी काही ना काही चांगले शिकलो आहे.

     तुमच्या असण्याने मला आयुष्याचा अर्थ कळला.

      त्या प्रत्येक लहान, मोठ्या व्यक्तीला ज्यांच्या कडून मला ज्ञान मिळाले त्यांना आजच्या या गुरुपौर्णिमे च्या पवित्र दिवशी त्रिवार दंडवत.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गुरुवर्य



Featured post

Lakshvedhi