मातीचा गंध हरवलेल्या,
मराठवाड्याच्या पावसाची गोष्ट !
(भवतालाच्या गोष्टी ४५)
एखादा ‘ठोक्या पाऊस’ पडला की जमिनीची तहान भागायची. पडलेलं पाणी वाहू लागायचं. दिवसातून चार वेळा लेंडया, ओढे यांना अचानक पूर यायचा. या पुरात काट्या, कुपाट्या, बेसावध जनावरं अन् माणूस वाहत जायचा. कंदील अन् टेंभे घेवून सारा गाव पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आकृती काठाकाठाने शोधत फिरायचे. चार - दोन दिवस पुराच्या गोष्टी रंगायच्या. ‘ओढ असणारा तो ओढा’ हे त्यावेळी पटायचे. गोदामाय पैठणपासून ते नांदेडपर्यंत ओसंडून वाहायची. तेरणा - मांजरा यांसह अनेक लहान मोठ्या नद्यांना भरते यायचे. ते पार उन्हाळ्यापर्यंत नद्यांचा ओलावा टिकून राहायचा... आता मात्र स्थिती झपाट्याने बदलली आहे. आम्ही आमची पिके बदलली. १९७२ साली दुष्काळ पडला. तेंव्हा पाणी होतं, पण खायला अन्न नव्हतं. आता स्थिती विरुद्ध आहे.
मराठवाड्याचा पाऊस नेमका कसा बदललाय, याचीच ही गोष्ट!
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Marathwada-Rai
(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४५ वी गोष्ट.
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment