सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 9 July 2022
जलतरण
मा.खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसा निमित नागोठणे येथे भरविण्यात आलेल्या भव्य जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत माणगाव तालुक्यातील कुमार ललित कदम रौप्य पदक मिळवून सन्मानित .ललित कदम हा जिल्ह्यातील लहान वयोगटातील उत्कृष्ट जलतरणपटू समजला जातो मागील तीन महिन्यात त्याने रत्नागिरी ,पुणे ,मुबई अशा ठिकाणाहून प्रथम तीन क्रमांकाची मानांकित पदके मिळवून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.वयाच्या सातव्या वर्षापासून तो जलतरण क्षेत्रात सराव आणि प्रशिक्षण घेत आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्री.दत्ता तरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार ललित सद्या प्रशिक्षण घेत आहे.आज देखील त्याने आपल्या कौशल्याची चुणूक या स्पर्धेत दाखवून दिली आहे.या प्रसंगी विधान परिषद आमदार मा.अनिकेत भाई तटकरे, रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती ताई तटकरे तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीतीत हा कार्यक्रम संपन्न झाला .
आई डे केअर
*आई डे केअर संस्था पेणमधील विद्यार्थ्याची आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
दि. ८ जुलै रोजी आई डे केअर संस्थेमध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.संस्थेच्या विद्यार्थीनी आनंदाने त्यात सहभाग घेतला
त्यातील दोन विद्यार्थ्यांना विठ्ठल - रखुमाईचा वेश,मुकुट,अलंकार घालून सजविण्यात आले . इतर विद्यार्थ्यांनी दिंडी मध्ये विठ्ठलाच्या भजनाच्या तालावर नृत्य केले. विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेऊन दिंडीमध्ये सहभाग घेतला. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. प्रेमलता पाटील संस्थेचे सल्लागार श्री अविनाश ओक उपस्थित राहुन विध्यार्थीचा आनंद द्विगुणित केला. प्रमुख पाहुणे व विशेष शिक्षक तसेच संस्थेच्या कर्मचारी वृंद यांनी दिंडीमध्ये फेर धरून मुलांचा आनंद द्विगुणित केला. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून विठ्ठलरुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले, त्यांनतर विठ्ठलाचे भजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिंडीचे पूर्ण आयोजन विशेष शिक्षक श्री सिद्धांत मात्रे आणि विशेष शिक्षिका सौ.धनश्री कडू यांनी केले
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.
समृध्दी
देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही
- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8: महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत ‘संकल्प से सिध्दी’ (नवा भारत, नवे संकल्प) परिषद आज सकाळी हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भारताच्या येणाऱ्या पुढच्या 25 वर्षात नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे जसे संतांची आणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी सुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षात समृध्दी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वात मोठा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा बोगदा बांधण्यात आल्याने आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरुन ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरणावर भर देण्यात येणार आहे.
आपण मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात उद्योजकांना भेटत असून येणाऱ्या काळात कौशल्य विकास, कृषी या क्षेत्रास महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी या उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे
देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई - पुणे एक्सप्रेस वे, तसेच महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल यामुळे महाराष्ट्राला एक गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहेत. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जा उत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तरतर वरळी सी लिंकला नरीमन पॉईट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरु करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांना बंगळूरुशी जोडणारे आणि पुणे ते औरंगाबाद हे महामार्ग करण्याचे नियोजन सुरु असून राज्य शासनाने या महामार्गावरील जमिन अधिग्रहणाचे काम तत्काळ सुरु करावे असेही श्री. गडकरी म्हणाले.
मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरती
महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचणे यावर भर देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे काम असेल किंवा महाराष्ट्रात आणि मुंबईत मेट्रो सेवा सुरु करणे, बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सुरु केले तर मुंबई हा देशाशी जोडला जाण्यास महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्ग हा 700 किमी असून केवळ 9 महिन्यात राज्य शासनामार्फत जमिन अधिग्रहण करण्याचे काम सुरु करण्यात आले. येणाऱ्या काळात पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मिती आणि वापर यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणा
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनसुध्दा येणाऱ्या काळात नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने कसे पूर्ण होईल यासाठी काम करीत आहे. वेगवेगळया शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याबरोबरच मुंबई मेट्रोचे कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर असेल. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नविनताभिमुख बाबी एकत्र करुन 2030 पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत
या कार्यक्रमात बोलताना श्रीमती लेखी म्हणाल्या की, भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व आजच्या पिढीला समजावे यासाठीच केंद्र शासनाकडून आजादी का अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. देशाने गेल्या 75 वर्षांत वेगवेगळया क्षेत्रात केलेली प्रगती ही महत्वपूर्ण आहेच, पण येणाऱ्या 25 वर्षात कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष देणे आवश्यक ठरेल याबाबतही नियोजन करणे शक्य होणार आहे
याच कार्यक्रमात सीआयआयचे पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमाची आणि परिषदेचे महत्व अधोरेखित के
०
विधान परिषद
महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांना शपथ
मुंबई, दि. 8 :- महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.
दहा सदस्यांना शपथ
नवनिर्वाचित सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
यावेळी विधानसभेचे सदस्य चंद्रकांत पाटील, कालिदास कोळंबकर, मंजुशा गावित, विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री अनिल परब, अभिजित वंजारी, निलय नाईक, मनिषा कायंदे, विधानसभा माजी सदस्य तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधानसभा माजी सदस्य राज के.पुरोहित, विधानपरिषद माजी सदस्य चंद्रकांत रघुवंशी, शिवाजी दौंड यांच्यासह दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य तसेच विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी उपस्थित होते.
****
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...















