Saturday, 9 July 2022

समृध्दी

 देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही

- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 8: महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत ‘संकल्प से सिध्दी’ (नवा भारत, नवे संकल्प) परिषद आज सकाळी हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. 

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भारताच्या येणाऱ्या पुढच्या 25 वर्षात नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे जसे संतांची आणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी सुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षात समृध्दी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वात मोठा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा बोगदा बांधण्यात आल्याने आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरुन ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरणावर भर देण्यात येणार आहे.

            आपण मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात उद्योजकांना भेटत असून येणाऱ्या काळात कौशल्य विकास, कृषी या क्षेत्रास महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी या उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे

देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही

            केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

            महाराष्ट्र राज्य रस्ते‍ विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई - पुणे एक्सप्रेस वे, तसेच महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल यामुळे महाराष्ट्राला एक गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहेत. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जा उत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

            महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तरतर वरळी सी लिंकला नरीमन पॉईट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरु करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांना बंगळूरुशी जोडणारे आणि पुणे ते औरंगाबाद हे महामार्ग करण्याचे नियोजन सुरु असून राज्य शासनाने या महामार्गावरील जमिन अधिग्रहणाचे काम तत्काळ सुरु करावे असेही श्री. गडकरी म्हणाले.

मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरती

            महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचणे यावर भर देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे काम असेल किंवा महाराष्ट्रात आणि मुंबईत मेट्रो सेवा सुरु करणे, बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सुरु केले तर मुंबई हा देशाशी जोडला जाण्यास महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्ग हा 700 किमी असून केवळ 9 महिन्यात राज्य शासनामार्फत जमिन अधिग्रहण करण्याचे काम सुरु करण्यात आले. येणाऱ्या काळात पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मिती आणि वापर यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणा

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनसुध्दा येणाऱ्या काळात नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने कसे पूर्ण होईल यासाठी काम करीत आहे. वेगवेगळया शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याबरोबरच मुंबई मेट्रोचे कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर असेल. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नविनताभिमुख बाबी एकत्र करुन 2030 पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत

            या कार्यक्रमात बोलताना श्रीमती लेखी म्हणाल्या की, भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व आजच्या पिढीला समजावे यासाठीच केंद्र शासनाकडून आजादी का अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. देशाने गेल्या 75 वर्षांत वेगवेगळया क्षेत्रात केलेली प्रगती ही महत्वपूर्ण आहेच, पण येणाऱ्या 25 वर्षात कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष देणे आवश्यक ठरेल याबाबतही नियोजन करणे शक्य होणार आहे

            याच कार्यक्रमात सीआयआयचे पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमाची आणि परिषदेचे महत्व अधोरेखित के

विधान परिषद

 











महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांना शपथ

            मुंबई, दि. 8 :- महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित झालेल्या दहा सदस्यांचा शपथविधी, प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला.

दहा सदस्यांना शपथ

            नवनिर्वाचित सदस्य रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.


            यावेळी विधानसभेचे सदस्य चंद्रकांत पाटील, कालिदास कोळंबकर, मंजुशा गावित, विधानपरिषद सदस्य तथा माजी मंत्री अनिल परब, अभिजित वंजारी, निलय नाईक, मनिषा कायंदे, विधानसभा माजी सदस्य तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विधानसभा माजी सदस्य राज के.पुरोहित, विधानपरिषद माजी सदस्य चंद्रकांत रघुवंशी, शिवाजी दौंड यांच्यासह दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य तसेच विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव राजेश तारवी उपस्थित होते.


****



 

मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन

संचालक संजय धारूरकर यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक संजय धारूरकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर  शनिवार दि. 9 जुलै व सोमवार 11 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.  वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहेतर काही नद्या आता पात्राबाहेर वाहू लागल्या आहे. काही दरडी कोसळून घाटरस्ते बंद पडण्याच्या घटना घडतात. या काळात राज्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात संचालक श्री. धारूरकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

००००

आपत्ती व्यवस्थापन

 कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

            मुंबई, दि. ८ : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे.

            कोंकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या इशारा पातळी पेक्षा खाली वाहत आहेत. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नसून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक तैनात करण्यात आली आहे.

           ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७६.४ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ च्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

          मुंबई गेल्या २४ तासात कुलाबा येथे ५२.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफ च्या एकूण ५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

       रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७७.९ मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील १९६८ कुटुंब म्हणजे एकूण ३६४९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात ११ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ५ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७१.५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी व राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता दि. ०९ जुलै २०२२ रोजी पर्यंत बंद करण्यात आला आहे व वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील २८८ कुटुंब म्हणजे एकूण ९६५ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात १२० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ६ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफ च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२७.० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक एनडीआरएफ ची टीम तैनात करण्यात आली आहेत,

        पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे.

        कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १९ मिमी. पाऊस झाला असून, सद्यस्थिती मध्ये पूर परिस्थिती नाही.पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ३९.६ फुट असून इशारा पातळी ३९ फुट एवढी आहे. पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता एनडीआरएफ च्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

        राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत.

         राज्यातील पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच १५ तुकड्या तैनात केल्या आहे.     राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात    मुंबई (कांजूरमार्ग १ घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड - महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२,कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूणमुंबई (कांजूरमार्ग १ घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड - महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२,कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)  च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या

     मुंबई -३,पुणे-१, नागपूर-१ अशा एकूण ५  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२,नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या  

            राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात  येत आहे


                                                 


विद्यापीठ

 जागतिक पातळीवरील शैक्षणिक उंची गाठण्यासाठी मुंबई विद्यापीठाने वाटचाल करावी

      - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

विद्यापीठाच्या चार शैक्षणिक इमारतींचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन 

            मुंबई, दि. 8 : जागतिक पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून शैक्षणिक उंची गाठण्यासाठी वाटचाल करण्याचा दृढ निश्चय मुंबई विद्यापीठाने केला पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

            मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात नवीन परीक्षा व प्रशासकीय भवनज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चार इमारतींचे  उदघाटन  राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकरप्र. कुलगुरू  प्रा. रवींद्र कुलकर्णीप्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील  उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणालेजागतिक पातळीवर होणारे शैक्षणिक बदल यावर संशोधन करून भारताने वाटचाल करावी.भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच येथील संस्कृतीचे वेगळेपण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अनेक देशांनी  मान्य केला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

            विद्यापीठामध्ये कार्य करताना अडचणी आणि तक्रारी याकडे लक्ष न देता विद्यापीठासाठी आपण काय करतोय आणि विद्यापीठ आपल्याला काय देते याचा आपण विचार करून कार्य केले तर यश नक्कीच मिळेलअसेही राज्यपालांनी सांगितले.

            मुंबई विद्यापीठामध्ये अनेक नामवंत विद्यार्थी तयार झाले आहेत. विद्यापिठाचे नामवंत विद्यार्थी नोबेल पुरस्कारापर्यत पोहोचले पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी सर्वांनी कार्य करावे असेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

            कुलगुरू श्री.पेडणेकर म्हणालेविद्यापीठासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन परीक्षा व प्रशासकीय भवनज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चार इमारतींचे  उदघाटन करण्यात आले. भविष्यातील डिजिटल ग्रंथालयाचा अभ्यास करून अद्ययावत अशी ग्रंथालयाची इमारत उभारण्यात आली आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही नवीन वसतीगृह इमारत बांधण्यात आली आहेत.

            मुंबई विद्यापीठाची व्याप्ती मोठी असूनही सात जिल्ह्यांमध्ये आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नयेयासाठी प्रयत्न  आणि दुसऱ्या बाजूला परीक्षा वेळेत घेणेनिकाल वेळेत जाहीर करणे  हे एक मोठे आव्हान विद्यापीठांसमोर होते. या काळात प्राध्यापककर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले म्हणून हे शक्य झाले. जागतिक पातळीवरील शैक्षणिक बदल आणि काळाची गरज लक्षात घेऊन  विद्यापीठांची शैक्षणिक वाटचाल झाली पाहिजे असेही श्री. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन

            ही इमारत परीक्षा विभागासाठी बांधण्यात आली असून सात मजल्याची आहे.  या इमारतीमध्ये कुलगुरूप्र. कुलगुरूसंचालक यांचे कार्यालय असून परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये असणार आहेत.

ज्ञानस्रोत केंद्रग्रंथालय भवन

            तळमजल्यासह दोन मजल्याची ही इमारत ग्रंथालयासाठी बांधण्यात आली आहे. पर्यावरण पूरक खेळती हवा असणारी अशी ही इको फ्रेंडली इमारत बांधण्यात आलेली आहे. हे ग्रंथालय भविष्यात डिजिटल ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल.

मुलींचे वसतिगृह

            विद्यानगरी परिसरात सात मजल्याचे मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आले असून यामध्ये 72 खोल्या आहेत यात 144 विद्यार्थिनींची व्यवस्था केली जाणार आहे. या वसतिगृहबहुउद्देशीयहॉलग्रंथालयव्यायामशाळालॉन्ड्रीकॅन्टीनटिव्ही रूम आदी सुविधा असतील.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह

            सहा मजली या वसतिगृहात एकूण 85 खोल्या असून यामध्ये 146 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.  या वसतिगृहातबहुउद्देशीयहॉलग्रंथालयव्यायामशाळालॉन्ड्रीकॅन्टीनटिव्ही रूम आदी सुविधा असतील.

000000

 

'Name MU International Students Hostel after Veer Savarkar'

- Governor Bhagat Singh Koshyari

 

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today urged the vice chancellor of the University of Mumbai to name the newly created International Students' Hostel of the University after Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. The Governor also expressed the hope that an International Sports Complex will be sanctioned to the University shortly.

      Governor Koshyari, who is also the Chancellor of public universities in Maharashtra was speaking after inaugurating the new building of the International Students' Hostel at the University's Kalina Campus in Mumbai on Friday (8 July). The Governor also inaugurated the buildings of the New Examination Building, Knowledge Resource Centre and the Girls' Hostel on the occasion. 

      The Governor said the University of Mumbai was founded in the year 1857, the year India fought its first war of Independence against the colonial rulers. Stating that it was Veer Savarkar who had described uprising against the British as the 'First War of Independence', the Governor said naming of the International Students Hostel after Veer Savarkar will enhance the respect for India in the heart and minds of the students.

      Mentioning that the University of Mumbai had produced a galaxy of towering leaders in the past, he appealed to the University to raise its standards once again and produce Nobel laureates.

      The Governor said the University must strive to promote research, innovation, incubation and entrepreneurship in today's world. He added that apart from education, the University must imbibe the values of Sanskriti and Sanskar to students. 

      Vice Chancellor of the University Suhas Pednekar, Pro VC Ravindra Kulkarni, Deans, faculty and students were present.

      The International Students' Hostel has a capacity of accommodating 146 students while the Girls' Hostel has a capacity of 144 students.

*****


000000

'Name MU International Students Hostel after Veer Savarkar'

- Governor Bhagat Singh Koshyari.

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today urged the vice chancellor of the University of Mumbai to name the newly created International Students' Hostel of the University after Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar. The Governor also expressed the hope that an International Sports Complex will be sanctioned to the University shortly.

      Governor Koshyari, who is also the Chancellor of public universities in Maharashtra was speaking after inaugurating the new building of the International Students' Hostel at the University's Kalina Campus in Mumbai on Friday (8 July). The Governor also inaugurated the buildings of the New Examination Building, Knowledge Resource Centre and the Girls' Hostel on the occasion. 

      The Governor said the University of Mumbai was founded in the year 1857, the year India fought its first war of Independence against the colonial rulers. Stating that it was Veer Savarkar who had described uprising against the British as the 'First War of Independence', the Governor said naming of the International Students Hostel after Veer Savarkar will enhance the respect for India in the heart and minds of the students.

      Mentioning that the University of Mumbai had produced a galaxy of towering leaders in the past, he appealed to the University to raise its standards once again and produce Nobel laureates.

      The Governor said the University must strive to promote research, innovation, incubation and entrepreneurship in today's world. He added that apart from education, the University must imbibe the values of Sanskriti and Sanskar to students. 

      Vice Chancellor of the University Suhas Pednekar, Pro VC Ravindra Kulkarni, Deans, faculty and students were present.

      The International Students' Hostel has a capacity of accommodating 146 students while the Girls' Hostel has a capacity of 144 students.


****


 

जाणता राजा

 मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश.

वाहनचालकांचा खोळंबा नको.

            मुंबई, दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गीकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

            याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत.

            यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

            मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्त्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भूमिका आहे.

................

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्

रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा

            मुंबई, दि. ८ : - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल.

            शनिवार ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूर कडे प्रयाण. पंढरपूर येथे रात्री ११.३० वा. आगमन व शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आयोजित 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' कार्यक्रमाच्या समारोपास उपस्थिती.

 रविवार १० जुलै रोजी मध्यरात्री २.३० ते पहाटे ४.३० श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी उपस्थिती.

पहाटे ५.३० वा. विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन.

पहाटे ५.४५ वा. नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सकाळी ११.१५ वा. शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्हयातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणास उपस्थिती.

सकाळी ११.४५ वा. पंचायत समिती पंढरपूर येथे 'स्वच्छता दिंडी' समारोपास उपस्थिती. दु. १२.३० वा. पक्ष मेळाव्यास उपस्थिती.

दुपारी ३ वा. मोटारीने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायं. ४.३० वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व ठाण्याकडे प्रयाण.

00000




 



      - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी



पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 77 वा वर्धापन दिन सोहळा

 

            मुंबईदि 8 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांचा नव्या पिढीने इतिहास वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्‍था जीवित ठेवून त्या टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक शासनाची आहे. राज्यातील महापुरुषांचा इतिहास लाभलेल्या संस्था टिकविण्यासाठी राज्य सरकारही संस्थांना सहकार्य करेलअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील दीक्षांत सभागृहात राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या उपस्थितीत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 77 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होतोयावेळी श्री. कोश्यारी बोलत होते. या सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेविधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

            राज्यपाल म्हणाले कीदेशात अनेक महापुरुष निर्माण झाले आहेत. या महापुरुषांचा इतिहासविचार समाजात रुजविण्यासाठी अनेक संस्था कार्य करीत आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी स्थापित केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा समावेश आहे. अशा संस्थांच्या माध्यमातून मुलांना महापुरुषांचा इतिहासत्यांचे विचार आणि जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याची गरज असून या नव्या पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरलोकमान्य टिळकस्वामी विवेकानंद अशा अनेक महापुरुषांचा इतिहास वाचावा. जेणेकरुन देशभरात नवी ताकद निर्माण होऊन देश पुढे जाईल. पीपल्स एज्युकेशन सोसायटी निश्चितच आपल्या कार्यातून देश निर्माण कार्य करेल आणि यापुढेही संस्था टिकून ठेवली जाईल. संस्थेपुढे येणाऱ्या समस्या राज्य सरकार आणि संस्था एकमेकांच्या सहकार्याने सोडविल्या जातील. आगामी काळात पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी आदर्श संस्था निर्माण करण्याच्या भावनेने काम केले जाईलअसा विश्वास श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केला.

बालकांना मराठी शिकवा

        मराठी वृत्तपत्रांमध्ये राज्यातील मराठी शाळा बंद होत असल्याच्या बातम्या वाचनात येत आहेत. महाराष्ट्रात राहतोय तर मराठी बोललेच पाहिजे. माझा अभ्यास कमी असला तरीही मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र आजच्या बालकांना त्यांच्या पालकांनी मराठी शिकवावीअसा आग्रह सुद्धा राज्यपालांनी यावेळी आवर्जून केला.

            केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेसंविधान रचयते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित बहुजन घटकांच्या शिक्षणासाठी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन घडविले जात आहेत. संस्थेचे कामकाजही चांगल्या रितीने सुरु आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाला सक्षम नेतृत्व मिळेल अशी आशा व्यक्त करुन राज्य सरकारच्या माध्यमातून बहुजनांना न्याय देण्याचे काम होईल. तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे रुपांतर विद्यापीठात व्हावे अशी मागणीही होत आहेअसे श्री. आठवले यांनी सांगितले.

            श्री. प्रविण दरेकर म्हणालेपीपल्स एज्युकेशन सोसायटीला मागील काळात 12 कोटींचा निधी मिळवून दिला. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी मदत केली जाईल.

            यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच माजी विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

000

Featured post

Lakshvedhi