सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 8 July 2022
सागरा प्राण
ही अशी उडी बघताना ।
कर्तव्य मृत्यू विसरला ॥
बुरुजावर फडफडलेला । झाशीतील घोडा हसला॥ १॥
वासुदेव बळवंतांच्या ।
कंठात हर्ष गदगदला ॥
क्रांतीच्या केतूवरला ।
अस्मान कडाडून गेला ॥ २ ॥
दुनियेत फक्त अाहेत ।
विख्यात बहाद्दर दोन ॥
जे गेले आईकरिता ।
सागरास पालांडुन ॥ ३ ॥
हनुमंतानंतर आहे ।
या विनायकाचा मान ॥
लावुनिया प्राण पणाला ।
अस्मान कडाडून गेला ॥ ४॥
८ जुलै - त्रिखंडात गाजलेली स्वा. सावरकरांची मार्सेलिसची उडीः अर्थातच साहसदिन :स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
अश्या दिवशी जन्माला येणे , ह्यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता??
त्या उडीला आज ११२ वर्षे पूर्ण होत आहेत.
वीर सावरकर ह्यांच्या ऐतिहासिक उडीला आज ११२ वर्ष पूर्ण झाले. त्या एका उडी मुळे हिंदुस्थानाला बराच आंतरराष्ट्रीय फायदाझाला. त्या उडीचे वर्णन करण्या इतका काय माझा शब्द संचय नाही आणि त्या अलौकिक घटनेचे वर्णन करण्या इतका मी समर्थ पण नाही. पण त्या उडीमुळे परिणाम काय झाले हे मात्र मी सांगू शकतो. त्या एका उडीमुळे संपूर्ण फ्रेंच सरकार गडगडले,एका माणसासाठी दोन देशांना हेग च्या न्यायालयात जावे लागले. ह्या उडी...मुळे इंग्लंड च्या प्रधानमंत्रीला माफी मागावी लागली. त्या उडीची धास्ती घेऊन फ्रेंच सरकारने स्व खर्चाने सावरकरांच्या जहाजामागे त्यांची पाणबुडी लावली का तर ह्या माणसाने परत उडी मारलीतर ? अश्या ह्या ऐतहासिक उडीला आणि त्या महापराक्रमी माणसाला आपण वंदन केले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला जावे लागेल.
सावरकर एकदा म्हणाले होते " कि माझी उडी विसरला तरी चालेल पण मी केलेले सामाजिक कार्य विसरू नका, त्यात खंड पडू नको, ते तसेच अविरतपणे अखंड चालू द्या
"८ जुलै, १९१० - एक ऐतिहासिक दिन. याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेलिस येथे इंग्रज सरकारच्या छाताडावर पाय ठेऊन अशी उडी घेतली की ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढा त्रिखंडात पोचला. ईंग्रज सरकारची संपूर्ण जगात नाचक्की झाली, निर्भत्सना करण्यात आली - इटलीमधील तत्कालिन सरकारकडून सुद्धा.
विश्वात फक्त आहेत। विख्यात बहादूर दोन ॥... जे गेले आईकरिता। सागरास पालांडून ॥ हनुमंतानंतर आहे। त्या विनायकाचा मान ॥
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोन जाती,कोणी त्यांची महती गणती ठेविली असे,परि जे गजेंद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले,कमलफूल ते अमर ठेले, मोक्षदायी पावन॥--------
स्वा. विनायक दामोदर सावरकर.🙏
भवताल
भवताल व्यवस्थित समजून घेण्यासाठी !
भवतालातील विविध महत्त्वाचे पैलू सूत्रबद्ध रितीने समजून घेता यावेत आणि त्यांची ओळख व्हावी म्हणून "भवताल" सुरू करत आहे खास उपक्रम,
भवताल शॉर्ट कोर्सेस
(सोमवार ते गुरूवार सायंकाळी, वेळ बहुतेकांच्या सोयीची)
पहिल्या टप्प्यात,
जीवाश्मांची दुनिया (भूविज्ञान),
शिवरायांची नाणी (इतिहास),
भारतीय मान्सून (हवामान),
माणसाची उत्क्रांती (मानवशास्त्र)
हे चार महत्त्वाच्या शाखांमधील विषय.
सर्व कोर्सेस online. त्यामुळे महाराष्ट्रात, देशात, जगात कुठेही असलात तरी सहभागी होऊ शकता.
उशीर केलात तर कदाचित संधी हुकेल.
मग वेळ कशासाठी दवडायची?
नावनोंदणीसाठी लिंक :
https://bhavatal.com/event/short/courses
(अधिक माहितीसाठी अचॅटमेंटमधील पोस्टर पाहा.)
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत,
जिज्ञासू व्यक्तिंसाठी खास खजिना !
- भवताल टीम
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तनस्मार्ट) प्रकल्पाला गति द्यावी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 7 : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. त्यामुळे या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आढावा बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. तसेच दृकश्राव्य प्रणालीद्वारे जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात यावा. या प्रकल्पाला शासनस्तरावरून आवश्यक सर्व मदत करण्यात येईल.
यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री. डवले यांनी प्रकल्पाची माहिती दिली.
महोत्सव
राज्यातील चार शहरांमध्ये ‘स्वनिधी सांस्कृतिक महोत्सव’
नवी दिल्ली दि. 7 : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा यशोत्सव म्हणून या योजनेचे लाभार्थी फेरीवाले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देशातील ७५ शहरांमध्ये ‘स्वनिधी महोत्सव’या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील चार शहरांचा यात समावेश आहे.
येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी स्वनिधी महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा केली. मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी आणि अपर सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील चार शहारांमध्ये आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३३ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ७५ शहरांमध्ये ९ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन होणार असून १४ जुलै रोजी नाशिक, १६ जुलै रोजी कल्याण डोंबिवली, २२ जुलै रोजी मुर्तिजापूर ( जि. अकोला ) आणि २४ जुलैला नागपूर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
असा साजरा होणार महोत्सव
या महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसह,डिजीटल आदान-प्रदान विषयक प्रशिक्षण, ऋण मेळावा, फेरीवाले-रस्त्यावरील विक्रेत्यांचा सत्कार, या विक्रेत्यांचे अनुभव कथन आणि योजनेची माहिती व महत्व विषद करणारे नुक्कड नाटक यांचा समावेश असणार आहे.
कोविड-१९ महामारीमध्ये देशातील फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांसमोर उभ्या ठाकलेल्या संकटातून बाहेर काढून त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करता यावा, या उद्देशाने १ जून २०२० रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची देशभर सुरुवात करण्यात आली होती.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

.jpg)
