Friday, 8 July 2022

सागरा प्राण

 ही अशी उडी बघताना । 

कर्तव्य मृत्यू विसरला ॥ 

बुरुजावर फडफडलेला । झाशीतील घोडा हसला॥ १॥ 


वासुदेव बळवंतांच्या । 

कंठात हर्ष गदगदला ॥ 

क्रांतीच्या केतूवरला । 

अस्मान कडाडून गेला ॥ २ ॥ 


दुनियेत फक्त अाहेत । 

विख्यात बहाद्दर दोन ॥ 

जे गेले आईकरिता । 

सागरास पालांडुन ॥ ३ ॥


हनुमंतानंतर आहे । 

या विनायकाचा मान ॥ 

लावुनिया प्राण पणाला । 

अस्मान कडाडून गेला ॥ ४॥ 


८ जुलै - त्रिखंडात गाजलेली स्वा. सावरकरांची मार्सेलिसची उडीः अर्थातच साहसदिन :स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.


अश्या दिवशी जन्माला येणे , ह्यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता??


त्या उडीला आज ११२ वर्षे पूर्ण होत आहेत.

वीर सावरकर ह्यांच्या ऐतिहासिक उडीला आज ११२ वर्ष पूर्ण झाले. त्या एका उडी मुळे हिंदुस्थानाला बराच आंतरराष्ट्रीय फायदाझाला. त्या उडीचे वर्णन करण्या इतका काय माझा शब्द संचय नाही आणि त्या अलौकिक घटनेचे वर्णन करण्या इतका मी समर्थ पण नाही. पण त्या उडीमुळे परिणाम काय झाले हे मात्र मी सांगू शकतो. त्या एका उडीमुळे संपूर्ण फ्रेंच सरकार गडगडले,एका माणसासाठी दोन देशांना हेग च्या न्यायालयात जावे लागले. ह्या उडी...मुळे इंग्लंड च्या प्रधानमंत्रीला माफी मागावी लागली. त्या उडीची धास्ती घेऊन फ्रेंच सरकारने स्व खर्चाने सावरकरांच्या जहाजामागे त्यांची पाणबुडी लावली का तर ह्या माणसाने परत उडी मारलीतर ? अश्या ह्या ऐतहासिक उडीला आणि त्या महापराक्रमी माणसाला आपण वंदन केले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला जावे लागेल. 


सावरकर एकदा म्हणाले होते " कि माझी उडी विसरला तरी चालेल पण मी केलेले सामाजिक कार्य विसरू नका, त्यात खंड पडू नको, ते तसेच अविरतपणे अखंड चालू द्या 


"८ जुलै, १९१० - एक ऐतिहासिक दिन. याच दिवशी स्वा. सावरकरांनी मार्सेलिस येथे इंग्रज सरकारच्या छाताडावर पाय ठेऊन अशी उडी घेतली की ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढा त्रिखंडात पोचला. ईंग्रज सरकारची संपूर्ण जगात नाचक्की झाली, निर्भत्सना करण्यात आली - इटलीमधील तत्कालिन सरकारकडून सुद्धा. 

विश्वात फक्त आहेत। विख्यात बहादूर दोन ॥... जे गेले आईकरिता। सागरास पालांडून ॥ हनुमंतानंतर आहे। त्या विनायकाचा मान ॥ 

अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोन जाती,कोणी त्यांची महती गणती ठेविली असे,परि जे गजेंद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले,कमलफूल ते अमर ठेले, मोक्षदायी पावन॥--------

 स्वा. विनायक दामोदर सावरकर.🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi