सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 28 June 2022
Good think
All beautiful relationships do not depend on how well we understand someone, but it depends on how well we manage the misunderstanding.
🌹 *GOOD MORNING
जगाची माउली
#आषाढी_वारी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई मुळे रात्रीच्या वेळी दिसणारे मंदिराचे नयनरम्य दृश्य ...
मान्सून
मान्सूनच्या लांबलेल्या आगमनाची गोष्ट !
(भवतालाच्या गोष्टी ३८)
मान्सून म्हणजेच मोसमी वारे सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमार्गे भारतात येतात. त्यानंतर ते हळूहळू संपूर्ण भारत व्यापतात. हे वारे पूर्वी १५ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापत होते, आता मात्र आठवडाभर आधी म्हणजे ८ जुलै रोजी संपूर्ण भारतात पोहोचतात. महाराष्ट्रात मात्र ते उशिराने पोहोचू लागले आहेत. मुंबई-पुण्याला एक दोन दिवसांचा उशीर, तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आठवड्याभराचा विलंब होत आहे. असे का? याचा मागोवा घेणारी ही रंजक गोष्ट.र्ण वाचण्यासाठी लिंक-
https://www.bhavatal.com/
वताल बेवसाईटच्या वाचकांसाठी भसाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
निवडणूक मतदार यादी
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध.
ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा.
मुंबई, दि. 27 (रानिआ) : राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
श्री. मदान यांनी सांगितले, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
-0-0-0-
शाळा
*एकदा काय ते लवकर ठरवा..*
*मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत..*
*त्यांना जर शाळेत विचारले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?*
*तर बरोबर उत्तर देता आले पाहिजे..*
- *एक चिंताग्रस्त पालक* 🤷🏼♂️
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मत्स्य योजना
सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ;
30 जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 27 : मत्स्य व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन असे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील वर्सोवा येथील प्रशिक्षण केंद्रात दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाच्या १२८ व्या सत्रासाठी इच्छूकांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप यांनी केले आहे.
वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिके आदींचे प्रशिक्षण दिले जाते. १२८ व्या प्रशिक्षण सत्रासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून ४५० रुपये आणि दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत, प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असावा, १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असावा, पोहता येणे आवश्यक, किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक, मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असून प्रशिक्षणार्थींकडे बायोमॅट्रिक कार्ड अथवा आधारकार्ड असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यात परिपूर्ण अर्ज करताना त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक असून दारिद्र्यरेषेखालील प्रशिक्षणार्थी असल्यास अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गटविकास अधिकाऱ्याच्या दाखल्याची स्वाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारी करणाऱ्या तरुणांनी आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह विहित नमुन्यातील अर्ज मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-६१ येथे ३० जूनपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्रदीप जगताप संपर्क क्र. ८७८८५५१९१६ आणि यांत्रिकी निर्देशक जयहिंद सूर्यवंशी संपर्क क्र. ७५०७९८८५५२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



