Tuesday, 28 June 2022

 कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना

मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मृतांबाबत मुख्यमंत्र्यांची सहवेदना, जखमींच्या उपचारांबाबतही दिले निर्देश.

            मुंबई, दि. 28 : - मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


            मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात असे निर्देशही दिले आहेत.


00000



माउली

 रखुमाई ने केलेली कविता


दोन वर्षांनंतर पुन्हा, आनंदात दिसतीए स्वारी

ज्ञानोबा तुकोबा घोषाने, सुरू झालीये वारी


दोन वर्ष सुने होते, पंढरपूरचे अंगण

यावर्षी सुरू झाले, हरिपाठ नी रिंगण


खर सांगू?

खर सांगू दोन वर्ष, हे मंदिरात नव्हते

तुमच्यासोबत ते सुद्धा, एक लढाई लढत होते


मी म्हटलं ना मग करा चमत्कार,

सोडा ना हात कटावरचे

अहो तुम्ही देव आहात,

फिरवा ना फासे पटावरचे


देवच तो..

म्हणाला हीच तर वेळ आहे, खरा देव ओळखण्याची

माणसाने माणसाला माणूस म्हणून जपण्याची


सरले संकट तेंव्हा कुठे, हे पंढरीत परत आले..

म्हणाले जगाचे संकट, संयमाने सरत आले..


पुन्हा वाजला मृदुंग, झंकारली एकतारी

रखुमाई अग पाहतेस का सुरू झाली वारी


वारकऱ्यांच्या प्रेमासाठी देव पुन्हा विटेवर उभा राहिला..

माणसातील देव पाहतोच, मी देवातील माणूस पाहिला..


चेहऱ्यावर टिळा, हातात टाळ, बेचैनी सरली सारी

ज्ञानोबा तुकोबा नामाच्या घोषात, सुरू झालीये वारी

नखरा पावसाचा

 

पावसाचा नखरा एकीला मनसोक्त, तर दुसरीला सुकत करतोय 

माउली


 *अशी अविश्वसनीय रांगोळी तुम्ही अजिबात miss करू नका....*

एका बाजूने पाहिले तर माऊली दिसतील आणि दुसऱ्या बाजूने पाहिले तर तुकोबाराय दिसतील

अप्रतिम अशी 2 in 1 (Lenticular) रांगोळी श्रीरंग कलादर्पण च्या Level 3 च्या विद्यार्थ्यांनी प्रा. अक्षय शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटली आहे.

 पंढरीच्या वारीचे अवचित्य साधून विठुरायाच्या भक्तिमय वातावरणात ही रांगोळी रेखाटली आहे...


*तुम्हाला आवडल्यास नक्की share करा.*


*।। राम कृष्ण हरी ।।*

🌹🌹🌹🌹🌹🌹🚩

Buavtal

 भवताल कट्टा ४७


विषय -

हो, दरडींपासून बचाव शक्य आहे!

(गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे महाराष्ट्रात मोठी प्राणहानी झाली. 

या आपत्तीबाबत योग्य माहिती असेल तर त्यातून बचाव करून घेणे शक्य आहे. त्याबाबत जागरूक करणारा कट्टा...)


वक्ते -

डॉ. सतीश ठिगळे

(ज्येष्ठ भूवैज्ञानिक; दरडींचे अभ्यासक)


शुक्रवार, १ जुलै २०२२; सायं. ७ ते ८.३०


सहभागी होण्यासाठी लिंक-

https://bit.ly/3QSLXuX

किंवा

सोबतचा QR code स्कॅन करा.

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह

पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal/


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

95



45350862 / bhavatal@gmail.com


पक्षांतर

 

पक्षांतर बंदी कायद्यासाठी लढा.

 *शेंगदाणे-*

भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते.

यामध्ये असलेले, कैल्शियम, विटामिन A आणि

प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते.

रोज भिजलेले शेंगदाणे खालल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते. यामुळे तुम्ही डायबिटीजसारख्या आजारा पासून वाचता.

फाइबरयुक्त असलेले शेंगदाणे भिजवून खाण्यामुळे पचन तंत्र चांगले राहते. थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी आणि उर्जा मिळते.

पोटेशियम, मैग्नीज, कॉपर, केल्सियम, आयरन.

गुणांनी संपन्न असलेले शेंगदाणे भिजवून रिकाम्या पोटी खाण्यामुळे गैस आणि एसिडीटीच्या समस्या दूर होतात.

थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात.

लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन मिळते ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते.

शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते.

शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते.

रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कैंसरपासून दूर राहतात. कारण यामध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट, आयरन, नियासिन, फोलेट, कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात.

शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते. हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.

जेवणानंतर जर 50 किंवा 100 ग्राम शेंगदाणे खाल्ले तर बॉडी बनते, भोजन पचते, रक्ताची कमी होत नाही. तसेच यामध्ये प्रोटीन, फैट, फाईबर, खनिज, विटामिन आणि एन्टीऑक्सीडेंट असते.

*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक* 

*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*

(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन ९२ ७१ ६६९ ६६९ या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)

Featured post

Lakshvedhi