Friday, 24 June 2022

जय महाराष्ट्र


   👔 

🙏🙏🙏जय महाराष्ट्र..

कोणी म्हणतोय भाजप जिंकला,

कोणी म्हणतोय शिवसेना हरली,

कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,

कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,

कोणी म्हणतोय मनसेची वाट

लावली... पणलक्षातठेवा

 इथे फक्त    "जिंकलाय" आणि पुढे गेलाय तो            गुजराथी, मारवाडी,भैया,  मद्रासी,सिंधी,पंजाबी,

  आणिहरलाय आणि फक्त     तो   माझा    "महाराष्ट्र".        आणिमझ्या महाराष्ट्रातील "मराठी माणूस"...

आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल ...

महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही    मुंबईची आणि पुण्याची स्थिति...

  💎हिरा मार्केट - गुजराती‬

   👔 कपडा मार्केट - ‪मारवाडी‬ आणि गुजराती

 🚪लकडा मार्केट - मुस्लिम‬

 📈 शेयर मार्केट - गुजराती, मारवाद. स्टील मार्केट - मारवाडी आणि गुजराती

🏢🏢 हाॅटेल लाईन - ‪‎शेट्टी‬, आणि पय्याडे

🍷🍻 वाईन मार्केट- शेट्टी, ‪‎पंजाबी‬

🐬🐟 मच्छी मार्केट - मुस्लिम, उत्तर भारतीय ..

‪‎मराठी‬ माणुस ??❓???? आहे कुठे ?   वडापावच्या गाडीवर.. !!

हसण्यावर घेऊ नका ‪

'लाज‬'' वाटण्या सारखी गोष्ट आहे.

Share करा प्रत्येक मराठी माणसापर्यत पोहोचवा हे

कटु सत्य .......

रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले ... 🏠🏡 🏢🏢

तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ......!!!

🙏🙏🙏जय महाराष्ट्र..

हवा मे उडनेवला बुलडोझर

 


वैदिक

 


Kal जुना

 *काळ जुना होता*

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे

आज कपड्यांचे भंडार आहेत,

तरीही जास्तीतजास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरु आहेत

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*, रहदारीची साधने कमी होती.

तरीही कुटुंबातील लोक

भेटतं असत

आज रहदारीचे साधने भरपूर आहेत.

अजूनही लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती.

आजची मुलगी ही

शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*, लोकं

गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे

आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

खेळण्यांचा तुटवडा होता.

तरी शेजारची मुलं

एकत्र खेळायचे.

आज खूप खेळणी आहेत,

मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

रस्त्यावरील प्राण्यांना सुध्दा

भाकरी दिली जायची

आज शेजारीच मुलंही

भुकेली झोपी जातात

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*


*काळ जुना होता*,

शेजारच्या व आपल्या घरी

नातेवाईक भरले असायचे

आता परिचय विचारला तर

आज मला शेजारचे नावही माहीत नाही.

*समाज सुसंस्कृत झाला आहे.*

🙏😔🙏

सारथी

 सारथीमार्फत स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा सपंन्न

विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत योग्य चौकशी करण्याची

व्यवस्थापकीय संचालकांची ग्वाही

            पुणे, दि. 23 : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) २५० विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रवेश देण्याकरीता सामाईक प्रवेश परीक्षा १९ जून २०२२ रोजी घेण्यात आली. परीक्षेबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.


            सारथीच्यावतीने नियुक्त संस्थेमार्फत एमपीएससी-२०२३ करीता ‘सारथी एमपीएससी सीईटी २०२२’ पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद व अमरावती येथील २७ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रावर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी ७ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी लोणी काळभोर येथील एका परीक्षा केंद्रावर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या.

            एमआयटी व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी काळभोर पुणे या परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे, संगणकाची स्क्रीन वारंवार हँग होत असल्यामुळे त्याच दिवशी दुपारी या परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीसंबंधी तांत्रिक व प्रशासकीय चौकशी पूर्ण करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याबाबत काळजी घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000



शाळाबाह्य बालक झीरो dropout

 शाळाबाह्य बालकांसाठी 5 ते 20 जुलै दरम्यान मिशन झिरो ड्रॉपआऊट

 

            मुंबईदि. 23 :- शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट’ व्यापक स्वरूपात राबविण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

            बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणेबालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.

            राज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूलग्रामविकासनगरविकाससामाजिक न्याय व विशेष सहाय्यमहिला व बालविकासकामगार विभागआदिवासी विकासअल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ राबविण्यात येणार आहे.

मिशन झिरो ड्रॉपआऊट ची कार्यपद्धती

            मिशन झिरो ड्रॉपआऊट मध्ये बालकांचा शोध घेताना ग्रामपंचायत/ नगरपरिषद/ महानगरपालिकातील जन्म मृत्यू अभिलेख्यामधील नोंदीकुटुंब सर्वेक्षणतात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहितीशाळाबाह्यअनियमित बालके यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कार्यवाही करण्यात येईल. ही मोहीम वस्तीवाडीगाववार्ड या स्तरावर पूर्ण करण्यात येईल. तरशिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक)/ जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास)बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व नागरी) यांच्याकडून गाव. केंद्रबीटविभाग व शाळा स्तरानुसार नियोजन करण्यात येईल.

            या अभियानात एकही शाळाबाह्य/ स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावीअसे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असून यासाठी राज्यजिल्हा आणि तालुकास्तरावर विविध नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.


Thursday, 23 June 2022

भवताल


 पालखी मार्गावरील एका दक्षिणी भाषेच्या प्रभावाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३६)

माऊलींची पालखी पुण्यात येताना आळंदी रस्त्याने येरवड्याजवळून येते. शब्द लक्षात ठेवा- येरवडा. पुण्यातून पुढे जाताना एका गावावरून जाते. त्याचे नावही लक्षात ठेवा, वडकी. त्यानंतर पालखी एक घाट ओलांडून जाते. घाटाचे नाव लक्षात ठेवा, दिवे घाट. सासवडनंतर मुख्य गाव लागते. त्याचे नाव लक्षात ठेवा, जेजुरी. त्यानंतर मार्गावर आहे वाल्हे. आणि पालखी मार्गावर नसले तरी वाल्ह्यापासून काही अंतरावर गाव आहे परिंचे. गावांची नावे पुन्हा एकदा पाहा- येरवडा, वडकी, दिवे, जेजुरी, वाल्हे, परिंचे. यामध्ये काही साम्य आढळते का?

या गावांची नावे एका दक्षिणी भाषेतून आली आहेत असे कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? माहितीए ती भाषा कोणती आणि या गावांच्या नावांचे अर्थ काय?

सविस्तर वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Palkhi-South-Influence

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ३६ वी गोष्ट.)

भवतालाविषयी दर्जेदार वाचनासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा 

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi