Friday, 17 June 2022

यात्रा

 चार धाम यात्रेसाठी अधिकृत संकेतस्थळावरुनच नोंदणी करा

उत्तराखंड शासनाचे भाविकांना आवाहन

            मुंबई, दि. 16 : चार धाम यात्रेला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये याकरीता मार्गदर्शक तत्वे जारी केली असून भाविकांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केल्याची माहिती उत्तराखंड शासनाच्या पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागास पत्राद्वारे कळविली आहे.

            चार धाम यात्रेकरीता देशभरातून श्रद्धाळू येतात. परंतु, अनेक भाविकांची योग्य मार्गदर्शनाअभावी गैरसोय होते, अनधिकृत ठिकाणांहून नोंदणी केल्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आल्यावर उत्तराखंड शासनाच्या पर्यटनविभागाद्वारे ही प्रक्रिया सुलभ पद्धतीने राबविण्यास येत आहे. भाविकांसाठी registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर आणि Tourist Care Uttarakhand (Android/IOS) ॲपवर ही नोंदणीप्रक्रिया मोफत सुरु केली असून 01351364 हा टोल फ्री क्रमांकही दिला आहे.

            भाविकांनी नोंदणीसाठी या अधिकृत मार्गाचा अवलंब करुनच यात्रा करावी, असे आवाहनही उत्तराखंड शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


           


                                                                        


एमआयडीसी सरळसेवा भरती प्रक्रिया, ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान.

पारदर्शक प्रक्रियेद्वारे नोकरभरती - सुभाष देसाई

            मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मध्ये पात्र ठरलेल्या ३४२ जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात पाच जणांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील आदी उपस्थित होते.

            महामंडळातील सरळसेवेची वर्ग ‘क’ आणि ‘ड’ मधील १४ संवर्गातील ८६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील ११ संवर्गातील ५०२ पदांकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. त्यातील पाच जणांना प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालयात नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

            दरम्यान, या परीक्षेत कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. भरती प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मुख्यालयीन स्तरावरून समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला होता. सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आली. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

            छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन किंवा पोस्टाद्वारे नियुक्तीपत्रे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, शासनाद्वारे राबविलेली सर्वाधिक पारदर्शक नोकरभरती असल्याचे समाधान मंत्री श्री.देसाई यांनी व्यक्त केले.

००००



 

Thursday, 16 June 2022

10stdresult

 इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल 17 जून रोजी

            मुंबई, दि. 16 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 17 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

            हे निकाल www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in, https://lokmat.news18.com, https://www.indiatoday.in/education-today/results, http://mh10.abpmajha.com, https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th या संकेतस्थळांवर पाहता येतील.

            या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

            ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी सोमवार, दि. 20 जून ते बुधवार, दि. 29 जून 2022 पर्यंत व छायाप्रतीसाठी सोमवार, दि. 20 जून ते शनिवार, दि. 9 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI / Net Banking याद्वारे) भरता येईल.

            मार्च- एप्रिल 2022 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

            मार्च- एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.


0000



 



 महाराष्ट्रातील रेल्वेच्या प्रश्‍नांसंबंधी संयुक्त बैठक आयोजित करू - केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांना आश्‍वासन

कोल्हापूर ः महाराष्ट्रातील रेल्वेसंबंधी विविध मागण्या व प्रलंबित प्रश्‍नांसंबंधी आगामी अधिवेशन काळात दिल्ली येथे संयुक्त बैठक आयोजित करू असे आश्‍वासन रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री नाम. दर्शना जरदोश यांनी ललित गांधी यांना दिले.

रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री नाम. दर्शना जरदोश दोन दिवसाच्या कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर आल्या असता इचलकरंजी येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाम. दर्शना जरदोश यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करून निवेदन सादर केले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

ललित गांधी यांनी राज्यातील रेल्वेच्या विविध प्रश्‍नांची मांडणी करताना विविध मेट्रो प्रकल्पांचे क्रियान्वयन, माल वाहतुकीसंबंधी सेवा विस्तार, कोकण विभागातुन पार्सल सेवा सुरू करणे, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या कामाची प्रत्यक्ष सुरूवात यांसह कोल्हापूर-अहमदाबाद सेवा दररोज सुरू करणे व गाडीचा मार्ग आबु रोड पर्यंत विस्तारीत करणे. कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरू करणे, पुण्याहुन गुजरातकडे जाणार्‍या गाड्या कोल्हापूरहुन रवाना कराव्यात.

कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद रेल्वे स्टेशन मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणुन विकसित करावीत.

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सुरू करणे या प्रमुख मागण्या मांडल्या.

महाराष्ट्र चेंबरच्या रेल्वे विषयक समिती ने तयार केलेला सेवा विस्तार अहवाल ही यावेळी त्यांनी मंत्री महोदया यांच्याकडे सुपूर्त केला.

यावेळी महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग काऊन्सील सदस्य आम. प्रकाश आवाडे, नितिन धुत, अरूण ललवाणी, खास. संजयकाका पाटील, राहुल आवाडे, सतिश कोष्टी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.





 विदर्भातील ३००० वर्षांपूर्वीच्या पाषाणवर्तुळांच्या शोधाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३३)

दीडशे वर्षांपूर्वीचा काळ. स्टीफन हिस्लॉप हे मूळचे स्कॉटिश मिशनरी. त्यांना जगातील सर्वच क्षेत्रात कमालीची रुची व प्रचंड कुतुहूल असे. विदर्भातील पाषाणवर्तुळांचा अभ्यास करत असताना एका नाल्याला आलेल्या पुरात सापडून त्याचा मृत्यू झाला. मृत्यूच्या वेळी त्यांच्या कोटाच्या एका खिशात बायबल मिळाले, तर दुसऱ्या खिशात पाषाण वर्तुळातील काही पुरातत्वीय अवशेष! याच माणसाने विदर्भातील ३००० वर्षांपूर्वीच्या पाषाणवर्तुळांचा शोध लावला. त्यापूर्वी या पाषाणवर्तुळांबाबत वेगळ्याच समजुती होत्या... या शोधाची आणि स्टीफन हिस्लॉप यांची ही प्रेरणादायी गोष्ट!

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Vidarbha-Megalithic-Circles

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ३३ वी गोष्ट.

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com



 

आरोग्य

 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


खूप काही *शिकण्यासारखे* पण सध्या *विस्मरण* झालेले.


१. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी *धेनु ऋण मंत्र* म्हणत असे.  

धेनु (गाय) मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.


२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर *घेवडा वेल* लावावा सांगत असे. 

असे का ह्याचे उत्तरही तयार, 

म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते, *दत्तगुरु जेवण्यास येतात*, घरची घेवडा भाजी *गुरुवारी* करावी. 

घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.' 


३. अन्नाचे एक शीत तरी *सैनिकासाठी* पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग *तुळशीत अर्पण करावे*. 

देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते. 


४. *वाळवण* घालताना आज्जी *सूर्यमंत्र* म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची. 


५. रोज एकदा घरच्या झाडांना *कुरवाळून* यायची, 

*कोरफडीचे* पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, 

तर म्हणायची, 'स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. 

एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.'


६. *मुंग्यांना साखर* ठेवायची, 

म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, 

सुखात राहा, माझ्या लेकरांना डसू नका. 


७. *तुळशीला दिवा* लावायची, चिलटे, किडे नष्ट होऊन घरात येत नाहीत.

ती माझ्या घशाला अाराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते.


६. लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण *कंदील आणि चिमणी च्या उजेडात* असावे आग्रह असे. 

*भाकरी* पण *चंद्रासारखी* वाटते , 

सावल्यांची भीती जाते, 

खेळ करताना मौज असते, 

अंधाराची सवय असावी, 

*'भू'मातेला* पण शांतता मिळते म्हणायची. 


७. दारातल्या *रांगोळीने* सरपटणारे प्राणी लांब राहतात. 

त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची. 


८. झोपताना तांब्याच्या तांब्यात पाणी भरून डोक्याशी ठेवायची, 

चांगले असतेच पण तापलेल्या *'भू'* चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि आपल्याला *शांती देते*. 


*अजब* अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, 

अनुभव 

आणि ज्ञान 

कधी लक्षातच घेतले नाही.


ही post कोणाची आहे माहित नाही, पण छान माहिती आहे.


•••

देता आले तर पुढच्या पिढीला देण्यासारखे,

घेता आले तर पुढच्या पिढीने घेण्यासारखे.!🙏

Featured post

Lakshvedhi