सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 16 June 2022
Wednesday, 15 June 2022
जैन समाज
जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणार
- उपमुख्यमंत्री अजित पवार
· अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद
· जैन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक
मुंबई, दि. १५ :- जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी अल्पसंख्याक विकास विभागासह विविध विभागांच्या माध्यमातून पावले उचलण्यात येत असून जैन समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल तसेच अल्पसंख्यांक विकास विभागाच्या विविध योजनांसाठीही भरीव तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जैन समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयातील दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक विकास व वक्फ, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे तसेच जैन समाज संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. जैन समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठीही विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव तरतूद करण्यात येईल. अल्पसंख्याक समुदायातील युवकांसाठी वसतीगृहे उभारण्यात येतील. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगातही जैन समाजास योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल. जैन अल्पसंख्यांक समुदायाला कर्नाटक राज्यात देण्यात येणाऱ्या विविध सवलतींच्या धर्तीवर महाराष्ट्रात सवलती देण्यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही केंद्र शासनाची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येते. अल्पसंख्याक नागरी बहुल क्षेत्र विकास कार्यक्रम व अल्पसंख्यांक ग्रामीण बहुल क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत समाजमंदिर बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. अल्पसंख्याक उमेदवारांसाठी निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यात 23 ठिकाणी शैक्षणिक संकुलांमध्ये वसतिगृहे असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीला मंजूर निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
Bhavtal
शतकांपासून बनणाऱ्या मातीच्या सुगंधी अत्तराची गोष्ट!
(भवतालाच्या गोष्टी ३१)
तीव्र उन्हाळ्यानंतर पहिल्या पावसाचे थेंब मातीवर पडतात तेव्हा दरवळतो तो मृदगंध. हा गंध नेमका कुठून येतो, याबाबत अभ्यासकांना पूर्वी फारशी माहिती नव्हती. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे माहीत झाले की स्ट्रेप्टोमायसीस (Streptomyces) नावाच्या जीवाणूमध्ये असलेल्या एका रसायनामुळे मातीला हा विशिष्ट गंध प्राप्त होते. याची उकल होण्यासाठी १९६० - ७० हे दशक उजाडावे लागले, पण त्याच्या कितीतरी शतके आधीपासून भारतात हा मातीचा गंध मिट्टी का अत्तर याच्या स्वरूपात वापरला जात होता. याच मातीच्या अत्तराची गोष्ट.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Mitti-Ka-
भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही एकतिसावी गोष्ट.
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
(इतरांसोबत शेअरही करा.)
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
Bhavtal
शतकांपासून बनणाऱ्या मातीच्या सुगंधी अत्तराची गोष्ट!
(भवतालाच्या गोष्टी ३१)
तीव्र उन्हाळ्यानंतर पहिल्या पावसाचे थेंब मातीवर पडतात तेव्हा दरवळतो तो मृदगंध. हा गंध नेमका कुठून येतो, याबाबत अभ्यासकांना पूर्वी फारशी माहिती नव्हती. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे माहीत झाले की स्ट्रेप्टोमायसीस (Streptomyces) नावाच्या जीवाणूमध्ये असलेल्या एका रसायनामुळे मातीला हा विशिष्ट गंध प्राप्त होते. याची उकल होण्यासाठी १९६० - ७० हे दशक उजाडावे लागले, पण त्याच्या कितीतरी शतके आधीपासून भारतात हा मातीचा गंध मिट्टी का अत्तर याच्या स्वरूपात वापरला जात होता. याच मातीच्या अत्तराची गोष्ट.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Mitti-Ka-Atta
भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही एकतिसावी गोष्ट.
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
(इतरांसोबत शेअरही करा.)
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि. १५ : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रस्तावित आहे. जावळी तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे प्रस्तावित धरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण आवश्यक आहे असे सांगितले.
यावर धरणाच्या पुर्ततेसाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने आवश्यक कार्यवाही करावी. धरणासाठी आवश्यक असणारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे. सर्व्हेक्षणासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने धरणाचे सर्व्हेक्षण, अन्वेषण आणि संकल्पन याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभाग प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, पुनर्वसन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, विशेष कार्यकारी अधिकारी सी. आर. गजभिये आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बोंडारवाडी धरण प्रकल्प, प्रकल्पाची प्रगती आणि भविष्यात करावयाच्या कामाबाबत माहिती दिली.
****
अभयारण्य
राज्यात नवीन २३ संवर्धन राखीव, ५ अभयारण्ये
पर्यावरणस्नेही विकासाचा आग्रह कायम - मुख्यमंत्री
मुंबई, दि. १५ : राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही आहेत संवर्धन राखीव क्षेत्रं (कंसातील आकडे चौ.कि.मी)
राज्यात मागील अडीच वर्षाच्या काळात जी नवीन संवर्धन राखीव क्षेत्रं घोषित झाली आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी (२९.५३) जोर जांभळी (६५.११), आंबोली दोडामार्ग (५६.९२), विशाळगड (९२.९६), पन्हाळगड (७२.९०), मायणी पक्षी संवर्धन (८.६७), चंदगड (२२५.२४), गगनबावडा (१०४.३९), आजरा भुदरगड (२३८.३३),मसाई पठार (५.३४), नागपूर जिल्ह्यातील मुनिया (९६.०१), मोगरकसा (१०३.९२), अमरावती जिल्ह्यातील महेंद्री (६७.८२), धुळे जिल्ह्यातील चिवटीबारी (६६.०४), अलालदरी (१००.५६), नाशिक जिल्ह्यातील कळवण (८४.१२), मुरागड (४२.८७), त्र्यंबकेश्वर (९६.९७), इगतपुरी (८८.५०), रायगड जिल्ह्यातील रायगड (४७.६२), रोहा (२७.३०), पुणे जिल्ह्यातील भोर ( २८.४४), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) (१.०७), यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड, मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री ही ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाली आहेत.
पाच अभयारण्ये (क्षेत्र चौ.कि.मी)
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव (२६९.४०), विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ७८.४०), जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी (१२२.७४०), गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का ( १७५.७२), बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य ( .८६९४) अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत. यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जैवविविधता वारसा स्थळे ( क्षेत्र हेक्टर)
पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड (३३.०१), जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरी (४८.०८), कोल्हापूर जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका (२.५९) आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून या सर्वांची अधिसुचना निर्गमित झाली आहे.
रामसर दर्जा
लोणार ला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


.jpg)