Wednesday, 15 June 2022

फुलाला सुंगध मातिचा

 शतकांपासून बनणाऱ्या मातीच्या सुगंधी अत्तराची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३१)

तीव्र उन्हाळ्यानंतर पहिल्या पावसाचे थेंब मातीवर पडतात तेव्हा दरवळतो तो मृदगंध. हा गंध नेमका कुठून येतो, याबाबत अभ्यासकांना पूर्वी फारशी माहिती नव्हती. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात असे माहीत झाले की स्ट्रेप्टोमायसीस (Streptomyces) नावाच्या जीवाणूमध्ये असलेल्या एका रसायनामुळे मातीला हा विशिष्ट गंध प्राप्त होते. याची उकल होण्यासाठी १९६० - ७० हे दशक उजाडावे लागले, पण त्याच्या कितीतरी शतके आधीपासून भारतात हा मातीचा गंध मिट्टी का अत्तर याच्या स्वरूपात वापरला जात होता. याच मातीच्या अत्तराची गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Mitti-Ka-Attar

भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही एकतिसावी गोष्ट.

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

(इतरांसोबत शेअरही करा.)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


वडपूर्णीमा


 

 राज्यातील सर्व तालुक्यात संविधान सभागृह उभारण्यासाठीसधारित आराखडा सादर करा

- धनंजय मुंडे

जिल्ह्याचे ठिकाण वगळून सर्व तालुक्यात एक एकर जागेत संविधान सभागृह उभारण्याचे नियोजन

            मुंबई, दि. 14 :- राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण वगळता सर्व तालुक्यांच्या ठिकाणी नगर परिषद , नगर पंचायत यांच्या माध्यमातून संविधान सभागृह उभारण्यात यावेत, असा आपला मानस असून, यासाठी प्रत्येक ठिकाणी किमान एक एकर जागा विचारात घेऊन संविधान सभागृहाच्या पूर्व आराखड्यात सुधारणा करून नव्याने आराखडा मंजुरीस्तव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीत दिले.

            सामाजिक न्याय विभागाच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती वस्तीची 500 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी संविधान सभागृह उभारण्याचा शासन निर्णय आहे, याअंतर्गत कृती आराखडा व अन्य विषयी आज मंत्रालयात श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी श्री. मुंडे यांनी नव्याने सुधारित आराखडा तयार करून त्या ठिकाणी, सभागृह, स्वच्छतागृह, अभ्यासालय, ग्रंथालय, वायफाय यांसह विविध सुविधा अंतर्भूत असाव्यात अशा सूचना करत, जिल्ह्याच्या ठिकाणी जसे सामाजिक न्याय भवन आहे, तसेच तालुक्याच्या ठिकाणी संविधान सभागृह/भवन असावे या दृष्टीने आराखडा तयार करावा, असे निर्देश विभागाला दिले.

            या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांसह आदी उपस्थित होते.

०००

लोकराज्य’चा जून महिन्याचा अंक प्रकाशित

            मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या 'लोकराज्य' या मासिकाच्या जून-2022 महिन्याच्या ‘समता, न्याय, एकात्मतेच्या मार्गावर...माझा महाराष्ट्र’ या सामाजिक न्याय विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन झाले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना, उपक्रम, यशकथा हे या अंकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.




            26 जून हा दिवस लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती राज्यात सामाजिक न्यायदिन म्हणून साजरी करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून या विशेषांकाची मांडणी करण्यात आली आहे. सामाजिक न्यायाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल, बहुजनांचा सर्वांगीण विकास, वंचितांसाठी योजना, कल्याणकारी महामंडळे, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आदी विषयांवरील लेखांचा या अंकात समावेश आहे. यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या प्रातिनिधिक यशकथा, राज्याच्या खरीपपूर्व हंगामाचा आढावा व दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या वृत्तांताचा अंकात समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ निर्णय व महत्त्वपूर्ण घडामोडी, वाचू आनंदे ही नेहमीची सदरेही अंकात समाविष्ट आहेत. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

०००



पाणीपुरवठा

 चिकोत्रा लाभ क्षेत्रातील 52 गावांच्या समन्यायी पाणीवाटपप्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणार

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

 

            मुंबईदि. 14 : कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील 52 गावांचा समन्यायी पाणीवाटपाच्या पथदर्शी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली जाईल व  मंत्रिमंडळाचा ठराव करुन मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईलअशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.

            कागल मतदारसंघाच्या चिकोत्रा प्रकल्पामध्ये समन्यायी तत्त्वावर पाणीवाटपाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूतसहसचिव श्री. शुक्लामुख्य अभियंता श्री. गुणालेकोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. सुर्वेसमन्यायी पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष आनंदराव पाटीलसहसचिव मोहन पाटीलप्रकल्प समन्वयक जितेश मेमाने आदी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणालेचिकोत्रा पाणलोटातील 52 गावांच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करुन आरखडा तयार करा. या प्रकल्पातील गावांचे सर्व्हे करतांना पारदर्शकता आणि अचूकता असली पाहिजे. हा प्रकल्प दीर्घकालीन परिणाम करणारा असून आरखडा तयार करताना दक्षता घेण्यात यावीअशा सूचना श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत ठराव करुन केंद्र सरकारला पाठविण्यात येईलअसे आश्वासन देखील श्री. पाटील यांनी समन्यायी पाणी हक्क परिषदेला दिले.

            गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिकोत्रा पाणलोटातील समन्यायी वाटपाच्या 52 गावांचा प्रकल्प मार्गी लागला पाहिजे. चिकोत्रा धरणातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्यास आम्ही संमती दर्शवितोअसे समन्यायी पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांनी  सांगितले.

            या भागातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने चिकोत्रा धरणालगतच्या गावांसाठी प्राथमिक स्तरावर पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करुन देण्याची संकल्पना जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी मांडली होती. या संकल्पनेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने  योजना राबवून प्रकल्प पूर्ण करता येणार असून या संकल्पनेला समन्यायी पाणी हक्क परिषदेनेही समर्थन दिले.

0000

रक्त पेढी


राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार

- सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

            मुंबई, दि. 14 : राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

            महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आज राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., श्री साईबाबा शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले की, रक्ताला अद्यापही विज्ञानाने पर्याय दिलेला नाही. त्यामुळे रक्तदान केले पाहिजे. कोविडच्या कालावधीतही आपल्या राज्याने देशातील सर्वात जास्त युनिट रक्त संकलन केले आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. राज्याच्या अनेक तालुक्यांत रक्तपेढी नाहीत, अशा तालुक्यात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल.

            अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. शिंगणे यांनी कोविडच्या कालावधीतही महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त संकलन केले आहे. याकाळात राज्यातील सर्व रक्तदाता यांनी अतिशय उर्त्स्फुतपणे रक्तदान केले. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रक्तदानातून साध्य होते. आई वडिलांच्या खालोखाल रक्तदानातून जोडले गेलेले नाते सर्वात पवित्र आहे. रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज आहेत, हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असे सांगितले.

            डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राज्यातील रक्तपेढी नसलेल्या भागात रक्तपेढी सुरू करण्यास सामाजिक संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

            यावेळी सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ अरुण थोरात, डॉ. अर्चना जोगेवार, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते.


            या कार्यक्रमात रक्तदाते, रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.


***


 

 विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

 

            पुणे दि. 14 : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहेअसे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

            देहू येथे आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसआमदार चंद्रकांत पाटीलवारकरी संप्रदायाचे मारुतीबाबा कुरेकरजगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरेतुषार भोसले आदी उपस्थित होते.

            प्रधानमंत्री म्हणालेभारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असल्याचा आपल्याला अभिमान आहेयाचे श्रेय भारतीय संत परंपरेला आणि ऋषी मुनींना आहे. राष्ट्रीय ऐक्य मजबूत करण्यासाठी आपली प्राचीन ओळख आणि परंपरेचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. भारत ही संतांची भूमी असल्याने या देशाचा विचार शाश्वत आहे. प्रत्येक काळात महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या शाश्वत मूल्यांचे रक्षण  केले आणि देश व समाजाला मार्गदर्शन केले. समाजातील अखेरच्या व्यक्तींचे कल्याण करावे हाच संतांचा संदेश आहे. या संदेशानुसार गरिबांचे कल्याण ही देशाची प्राथमिकता आहे.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने अनेक पिढ्यांना प्रेरणा

            संत भिन्न परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संतांची महत्त्वाची भूमिका आहे. संत तुकारामांची करुणादया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभंगाच्यारुपाने आजही आपल्यात आहे. या अभंगांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आजही हे अभंग आपल्याला ऊर्जा देतातमार्गदर्शन करतात. ऐक्यासाठी संत विचारांच्या प्राचीन परंपरेला जपावे लागेल.

            प्रयत्नातून अशक्याला शक्य करता येते हे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. देशात पर्यावरणजलसंरक्षण आणि नदी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेशी हे विषय जोडल्यास पर्यावरणाचे मोठे काम होईल. सेंद्रिय शेतीला प्रत्येक शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी मिळून प्रयत्न करावे लागतील. योग ही भारताची जगाला देणगी आहे असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिवसात सर्वांनी सहभाग व्हावेअसे आवाहन त्यांनी केले.

संत तुकाराम महाराज शिळा बोध आणि वैराग्याची साक्ष

            तुकाराम महाराजांनी जीवनात भूक आणि दुःख पाहिले. संकटकाळात कुटुंबाच्या संपत्तीला जनसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे कार्य भविष्यासाठी आशेचा किरण आहेतर ही शिळा त्यांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष आहे. संतांच्या अभंगवाणीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. आज देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात असताना अभंग समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. मराठी संतांच्या अभंगवाणीतून नित्यनवी प्रेरणा मिळते. तुकाराम महाराजांनी माणसात भेदभाव करणे मोठे पाप म्हटले आहे. समाजासाठी हा संदेश महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.

            श्री.मोदी म्हणालेसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यात आणि आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. या दोन्ही एकूण ३५० किलोमीटरपेक्षा अधिक चौपदरी मार्गासाठी ११ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या मार्गामुळे परिसरातील विकासालाही गती मिळेल. शास्त्रात म्हटले आहे मानवजन्मात संतसंग सर्वात महत्वाचा आहेत्यांच्या सहवासात सुखाची अनुभूती असते. असा अनुभव देहूसारख्या तीर्थक्षेत्री आल्यावर मिळतो.

            नितीन महाराज मोरे यांनी प्रास्ताविक केले.

            प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते संत चोखामेळा सार्थ अभंग गाथेचे प्रकाशन करण्यात आले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांचा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरेविठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरसंत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी तिन्ही संस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

            तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण आणि ध्वजपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यांनी इंद्रायणी नदीभंडाराघोरवडेश्वर आणि भामगिरी टेकडीचे दर्शन घेतले. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी संत तुकाराम महाराज लिखित अभंगगाथेची हस्तलिखित प्रत आणि पालखीचेही दर्शन घेतले.

000

<span lang="MR" style="font-size

 मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव

प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातीलसर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मराठी - गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

            मुंबई, दि. 14 : गेल्या २ वर्षात कोरोना काळात ज्याप्रकारे सर्वच भाषेतल्या पत्रकारांनी, दैनिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम केले ते नेहमीच स्मरणात राहील. भारतातील प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत झाली. येणाऱ्या काळात सुद्धा वृत्तपत्र आणि पत्रकारांकडून सकारात्मक पत्रकारिता दिसेल, अशी अपेक्षा यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजच्या काळात मराठी आणि गुजराती एकमेकांमध्ये दुधात साखरेप्रमाणे विरघळून गेले आहेत, त्यामुळे मराठी - गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे, हीच माझी सदिच्छा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

            भारतातील सर्वांत जुने वर्तमानपत्र अशी ओळख असणाऱ्या मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडला. द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांच्यासह मुंबई समाचार वृत्तपत्राचे प्रमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.

            मुंबई समाचार वृत्तपत्राचे अभिनंदन करून श्री. मोदी म्हणाले, महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्ष पूर्ण करत आहे याचा आनंद आहे. भाषेचे माध्यम जरी गुजराती असले तरी वृत्तपत्राचे उद्दिष्ट राष्ट्रीयत्व जपणे हेच होते. मुंबई समाचार केवळ बातम्यांचे माध्यम नाही तर तो एक समाजाचा वारसा आहे. मुंबई समाचार वृत्तपत्रातून भारताचे दर्शन घडते. अनेक संकटाना तोंड देत भारत कशा प्रकारे अढळ राहिला, याचे दर्शन आपल्याला मुंबई समाचारमधूनही मिळते. येणाऱ्या काळात मुंबई समाचार आपली ही परंपरा टिकवून ठेवेल, असा विश्वास वाटतो. समाजाला दिशा देणाऱ्या बातम्या देण्याचे, बातम्यांमधून लोकशिक्षण करण्याचे, समाज आणि सरकारमध्ये काही उणीवा असतील तर त्या वाचकांसमोर आणण्याचे काम वृत्तपत्रांचे आणि प्रसारमाध्यमांचे आहे.

            गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत असलेले मुंबई समाचार हे एक गुजराती वृत्तपत्र असले तरी सर्वसामान्य वाचकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे याचा आनंद आहे. मुंबई समाचारने स्वातंत्र्यचळवळीला आवाज दिला आणि नंतर स्वतंत्र भारताची प्रगती देखील वाचकांपर्यंत पोहोचवली;भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुंबई समाचार वृत्तपत्राची २०० वर्षे एकाच वर्षी साजरा होणे हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे. येणाऱ्या काळात मुंबई समाचार वृत्तपत्राने आपला इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात जगासमोर आणावा जेणेकरून आजच्या पिढीला भारताचा इतिहास समजण्यास मदत होईल, असेही श्री. मोदी म्हणाले.


            मुंबई समाचार वृत्तपत्रास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे. मुंबई समाचारने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा.

            आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे कठीण आहे. वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणे, पत्रकारांचे कर्तव्य असते आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे. काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहेत. मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मुंबई समाचारला दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

            मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांनी सांगितले की, सर्वात जुने वर्तमानपत्र अशी ओळख असलेले मुंबई समाचार २०० व्या वर्षात पर्दापण करीत आहे. १८२२ मध्ये बॉम्बे समाचार या नावाने साप्ताहिक म्हणून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती. दक्षिण मुंबईतील फोर्ट संकुलाच्या मध्यभागी असलेल्या रेड हाऊस नावाच्या एका गडद लाल इमारतीमध्ये असलेले देशातील सर्वात जुने गुजराती वृत्तपत्र अथा्र्त मुंबई समाचार २०० वर्षाचा टप्पा गाठत आहे.

            सलग २०० वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचारच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका स्मृती तिकिटाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi