Tuesday, 31 May 2022

 जन्माला आल्यावर आपल्या हाताच्या मुठी बंद असतात.. त्या बंद असतात हेच खरं छान असतं😊😊..


जसजसे मोठे होत जातो तश्या या हातात काहीबाही येत राहते..लहान असताना चॉकलेट, बिस्किटे नंतर छोटी मोठी खेळणी..

आपण अजून मोठे होतो..

हात अजूनच पसरतो..

आता हातात खेळण्या ऐवजी मोबाईल आलेला असतो, त्याचं अप्रुप काही दिवसांनी संपते..तारुण्यात कधीतरी सुंदर ,आवडणाऱ्या मुलीचा हात हातात येतो अन आपण मोहरून जातो..😊

मग लग्न होतं, मुलं होतात..

आता त्याच हातांवर भली मोठी जबाबदारी येऊन पडते..

आई वडिलांची दुखणी, बायकोच्या ईच्छा आकांक्षा, मुलांची शिक्षणे. व्यवसायातील जबाबदारी हे सगळं आपल्या हातावर येऊन पडतं...

तारुण्यात आपल्याला जोश असतो, काहीही काम हातावर घेतलं ते तडीस नेलं अशी हाताची पॉवर असते..

नंतर नंतर मात्र हे हात थकायला लागतात.. सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊन..

अन एक दिवस आपण बोलतो..

बस झालं आता... हात टेकले..

राजदीप

मन वेंनधलेले

 एक भिकारी असतो. तो एका शांत दुपारी, देवळाबाहेर बसून आरामात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या भाजीभाकरीचा आस्वाद घेत असतो. त्याक्षणी त्याच्या मनात कोणतेही विचार नसतात. तो अतिशय न्युट्रल असतो. इतक्यात एक मनुष्य बाईकवरून येतो. तो भिकाऱ्याला बघून जवळ येतो आणि म्हणतो, “बरं झालं तुम्ही दिसलात. आज माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं. मला अन्नदान करायचं होतं. गावात कोणी दिसतंय का ते आधी बघावं म्हणलं. तासभर झाला कोणीच दिसलं नाही. बरं झालं तुम्ही सापडलात. आलोच दहा मिनिटांत... श्रीखंडपुरी घेऊन आलो” इतकं बोलून निघून जातो. भिकाऱ्याचं समोर असलेलं जेवण आपोआपच मंदावतं. बाईकस्वार गेलाय त्या दिशेकडे नजर ठेवून तो बसतो. भाजीभाकरी बाजूला ठेवून वाट बघू लागतो. दहा मिनिटे, पंधरा मिनिटे.... तासभर झाला तरी तो बाईकस्वार काही येत नाही. श्रीखंडपुरी खायला मिळेल ही आशा तीव्र असते. भिकारी वाट बघतो. पोटात कावळे ओरडत असतात. तो पक्वान्नाच्या आशेने क्षुब्ध होतो..मगाचची शांत अवस्था संपते, डोकं फिरतं. तो गेलेला मनुष्य काही परत येत नाही. आता भिकारी कंटाळून समोरची भाजीभाकरी खाऊ लागतो. पण आता त्याची चव आवडेनाशी होते. भाजी बेचव तर भाकरी कडक वाटते....मनुष्य काही येत नाही, श्रीखंडपुरी मिळत नाही...

आपलंही असंच होतं बरेचदा...आपल्या हाती काहीतरी असतं. त्यापेक्षा भव्यदिव्य काही मिळावं अशी आशा असते (आशा, महत्वाकांक्षा नक्की असायला हवीच) पण ती आशा जेव्हा हतबलतेचं रुप घेते आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही तेव्हा त्याक्षणी आपल्याकडे जे हाती आहे तेही नकोसं वाटू लागतं. त्याचीही किंमत क्षुल्लक होते. त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही ही फॅक्ट आहे. माझ्या मते आशेचा किरण दिसला तरी आनंद मानावा आणि विझला तर जे याक्षणी आपल्या नशिबी आहे त्या वर्तमानाचा आनंद घ्यावा....

 एकदा एका माकडाला 🐵अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्याने झोपलेल्या सिंहाचे 🦁कान ओढले. 


सिंहाने उठून रागाने😡 गर्जना केली की, हे धाडस कोणी केले ?

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?


माकड : मी कान ओढले, महाराज, सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे😒; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.


सिंहाने हसून विचारले 🤠: माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिले तर नाही ना ?🙈


माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय.😆😅


या कथेचे सार.....,

एकटा राहून जंगलाचा राजा ही कंटाळतो.😂यावरून स्पष्ट होत की मैत्री ही हवीच..!!


म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा,🤝 त्यांचे कान ओढत रहा..!😃, म्हणजे चेष्टा मस्करी करीत रहा.😜 मेसेज येणे भाग्याचे समजा,  कोणीतरी आपली आठवण काढतंय..😍.


वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाणघेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो..🥳.  कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा,मजा करीत रहा.


😎.संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.👨‍👩‍👦‍👦               

 विश्वास ठेवा की,तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू शकूत..


मैत्री-श्रीमंत किंवा गरीब नसते ,मैत्री शिकलेली  वा अडाणी  असावी असे काही नसते. कारण- मैत्री ही  केवळ मैत्रीच असते


👬👩‍❤️‍👩 ☺️.🙏🙏🤝🤝🙏🙏





 


 *आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत.*

*ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.*

*फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुले ही सर्वांसाठी असतात*

*आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात..* 


             *🌹शुभ सकाळ🌹*

 🚒🔥रेवदंडा बंदर येथे रविवार दि 29 ला नारायण मुंबईकर यांच्या बोटीला आग लागली ही बातमी कळताच समाजसेवक *संकेत भाटकर* त्वरित घटना स्थळी पोहोचले आणि रेवदंडा पोलिस स्टेशन चे *थोरात साहेबांना* या घटने बद्दल माहिती दिली त्या नंतर jsw साळाव अग्निशमन दलाला बोलावून संकेत भाटकर यांनी स्वतः ही आग विजवूंन आटोक्यात आणली वरील विडिओ मध्ये आग विजवत असलेली व्यक्ती लाल टीशर्ट मधील संकेत भाटकर आणि त्याचे सहकारी मित्र. प्रत्तेक संकटकाळी धावून येणारा आणि समाज सेवा हिची ईश्वर सेवा असा विचाराचा असल्याने संकेत यांचे आज सगळीकडून कौतुक होत आहे.


 जिल्हा सहकारी बँका, शेतकऱ्यांची मोठी अडचण

शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागण.

            मुंबई, दि. 30 : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांना दिलासा द्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्राच्या अलीकडील निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र दिले असून हा परतावा पूर्ववत सुरु ठेवण्याची मागणीही केलेली आहे. व्याज परतावा बंद झाल्याने राज्यातील 70 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.


            आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देखील हा व्याज परतावा परत सुरू करण्याबाबत ठराव करण्यात आला.


            केंद्र शासनाने 28 मार्च, 2022 रोजीच्या परिपत्रकाद्वारे अल्प मुदतीच्या पीक कर्ज वाटपात बँकांना दिला जाणारा 2 टक्के व्याज परतावा बंद करण्याचे आणि चालू आर्थिक वर्षापासून हा लाभ देता येणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे चालू वर्षात पीक कर्ज वाटपात बँकांना केंद्र शासनाचा 2 टक्के व्याज परतावा मिळणार नाही आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत येवून त्याचा प्रतिकूल परिणाम पीक कर्ज वाटपावर होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.


            नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची सध्या चालू असलेली योजना शुन्य टक्के दराने कशी राबवायची हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, मूळातच ही व्याज परतावा योजना सुरु करण्यात जिल्हा सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पीक कर्ज देणे हा उद्देश होता. मोठ्या प्रमाणावर कर्जासाठी शेतकरी हे ह्या बँकांवर अवलंबून असतात. बँकांना 7 टक्केपेक्षा अधिक दराने कर्ज वाटप करता येत नसल्याचे केंद्र शासनाच्या परिपत्रकात नमूद आहे. तथापि, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा निधी उभारणीचा खर्च व्यापारी बँकांच्या तुलनेत जास्त असल्याने केंद्र शासनाचे 2 टक्के व्याज अनुदान बंद झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकांना आर्थिक नुकसान सोसावे लागेल.

            यापूर्वीच्या केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे बँकांनी 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज 7 टक्के दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्यास बँकांना 2 टक्के व्याज परतावा देय होता. याबाबत राज्य शासनाने बँकांनी शेतकऱ्यांना 7 ऐवजी 6 टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप करावे व त्यासाठी राज्य शासन 1 टक्का व्याज परतावा बँकांना अदा करेल असा निर्णय घेतला होता. याप्रमाणे बँकांना पीक कर्ज वाटपासाठी केंद्र शासनाकडून 2 टक्के दराने व राज्य शासनाकडून जिल्हा बँकांना 2.5 टक्के दराने व व्यापारी बँकांना 1 टक्के दराने व्याज परतावा मिळून शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज उपलब्ध होत होते. सदरच्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास वर नमूद केल्याप्रमाणे शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होते.

             केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँकांना 2 टक्के दराचा व्याज परतावा मिळणार नसल्याने बँकांना व्याजाचे नुकसान होणार असून त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. पिकांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांच्या किंमती सातत्याने वाढत असून पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. या सर्व बाबींचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक हित विचारात घेवून पीक कर्जासाठी बँकांना देण्यात येणारी 2 टक्के व्याज परतावा योजना पूर्ववत सुरु ठेवावी, असे मुख्यमंत्र्यांनी आग्रही प्रतिपादन केले आहे.

00000


Featured post

Lakshvedhi