Wednesday, 25 May 2022

हम पांच veda

 *पाचवा वेडा*


  😳😳😳😳😳


*अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले -*


*"आपल्या राज्यातले ५ सर्वात वेडे शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."*


*"हां महाराज,पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."*


*एक महिन्यानंतर बिरबल दोनच वेड्यांना घेऊन दरबारात आला.*


*बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ वेडे आणायला सांगितले होते."*


*बिरबल म्हणाला "महाराज मला एकेक वेड्याला सादर करण्याची इजाजत मिळावी."*


*बिरबलाने पहिला वेडा सादर केला.*


*"महाराज, हा वेडा बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून !"*


*"आणि महाराज, हा दुसरा वेडा. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."*


*बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा वेडा दाखव."*


*"महाराज,मी ह्या राज्याचा जबाबदार मंत्रीआहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ वेड्यांच्या शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा वेडा"*


*"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा वेडा मला दाखव."*


*"महाराज,आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा वेडेपणा नाही का ? म्हणून चवथे वेडे आपण !"*


*"असूदे असूदे. आता लवकर पाचवा वेडा मला दाखव, नाही तर शिक्षेला तयार हो !"*


*"महाराज, पाचवा वेडा आपल्या मूर्खपणाच्या कोड्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी, दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून हातात मोबाईल घेऊन आपला हा जो मैसेज वाचत आहे तो.*

😝😝😜🤣😂😛


*"शाबास बिरबल शाबास ! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवा वेडा कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत !"*


     🤔😇😛😜🤪😂😂😂😂😂

 खूप छान माहिती आहे संपुर्ण वाचा👌

60+ ज्येष्ठ नागरिक सहसा पुढील गोष्टींचा अनुभव घेतात:

 1. घशात अन्न अडकणे

 2. मान दुखणे

 3. पायात गोळे येणे

 4. पायला मुंग्या येणे.

 विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी  मदतीचे ठरू शकतात.

समस्या व‌ उपाय

 *१. घशात अन्न‌ अडकणे*

 आपल्याला फक्त "हात वर करणे" आवश्यक आहे.

 हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास , आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल.

 *२. मान दुखी*

 कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध‌ दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल

 *३. पायात गोळे येणे*

 जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा‌ पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरे वाटेल.

 *४. पायाला मुंग्या येणे*

  जेव्हा डावा पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा, जेव्हा उजवा पाय मुंग्या येत असेल, तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा. याने‌ लगेच फायदा होईल.

 फक्त ही माहिती जतन करू नका.

कृपया ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा‌ संदेश‌‌ लवकर पोहोचवा  .... 🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️👩🏾‍🦯🧑🏾‍🦯🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️

*चालणे म्हणजे दुसरे हदय*


आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले "दुसरे हृदय" म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.

सर्वाँना हृदयाचे कार्य काय असते ते ठाउक असेलच.

हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहातं नाही.

पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो.

होय. खर आहे.

*आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे.*

हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात.

रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.


पायाच्या पोटरी मधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.

त्यांना " मसल विनस सायनस असे" म्हणतात.

ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्या मध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदया कडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावा मुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे  रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.

घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो.

आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी  पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते.

रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. 

आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत   बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या ( DVT, deep vein thrombosis ) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 


एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते.

याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फफुसात जाऊन फसू शकतात ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.


जर पोटरितील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे,

घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे,

खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.


*थोडक्यात - चालत रहा,* शक्य असल्यास धावत रहा.

निरोगी आणि सुदृढ रहा.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*👩🏾‍🦯🏃🏻‍♂️चाला आरोग्यासाठी.* 🚶🏾‍♀️🏃🏻‍♂️

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

       जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात ते पहाटे मिळणार नाहीत.

जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    ...होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा/ साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळी चालणे आवश्यक का आहे?*

      जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटामिन डी भरपूर प्रमाणात मिळेल,

त्यामुळे शरिरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल.

दररोज सकाळी चालण्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.

अंधारात ऑक्सीजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते, जर तुम्ही योग्य प्रमाणात कोवळे ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*स्ट्रेस / तणाव मुक्ती साठी उपयोगी.*

        मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे, किबहुना आवश्यकचं आहे , यामुळे सकाळचे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर डायबिटीक आहात तर त्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये जर फिरले तर डायबेटिस, ब्लडप्रेशर आणि हृदयरोग त्याचबरोबर मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळीच का चालायचे?*

      सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते, वातावरणात शांतता असते, स्फूर्ती प्रदान करणारे असते, त्याचबरोबर शरीरास व्यायाम होतो. ज्याचा फायदा तुमची ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो  यामुळे तुमची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि  प्रतिकारशक्तीही  वाढते, फक्त चालताना एकमेकांशी गप्पा मारू नयेत हे महत्त्वाचे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालण्याचे सर्वसाधारण फायदे.*

१) त्वचा चमकदार होते, 

२) हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते, 

३) मधुमेह नियंत्रणात राहतो, 

४) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, 

५) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

६) झोप चांगली लागते, 

७) प्रतिकारशक्ती वाढते, 

८) कोलेस्ट्रॉल कमी होते, 

९) कॅन्सर चे पेशंटना उपयोगी, 

१०) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

११) प्रतिकारशक्ती वाढते, 

१२) हृदयाची कार्यक्षमता वाढते, 

१३) थकवा दूर होतो, 

१४) शरीरात स्फूर्ती येते, 

१५) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत, 

१६) चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.

१७) सर्व प्रकारच्या


 *आजारांपासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           एकूणच तुमच्या संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी दररोज सकाळी कमीतकमी (45 मिनिटे 90 मिनिटे) चालणे आवश्यक आहे....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालणे सुरू करताना काय आहे आवश्यक*

१) एक जोडी स्पोर्ट्स शूज,

२) शॉर्ट किंवा लेगिन्स, 

३) शॉर्ट टी-शर्ट, 

४) महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा हेअर बँड , 

५) स्पोर्ट्स वॉटर बॉटल 

आणि 

६) तुमचा उत्साह...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🚶🏾‍♀️🏃🏾‍♂️ *चाला आरोग्यासाठी....*🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️

*( सुबह की हवा ; सव्वा लाख की दवा...)*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


*पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!* 


अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते.  वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 


 हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. 

चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 


*वेगाने चालण्याचे फायदे -*


*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 

*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.

*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.

*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.

*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.

*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

*8)*  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.

*10)*  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत

*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

*13)*  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम

*14)*  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते

*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

*16)*  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.

*17)*  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

*18)*  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.

*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.

*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.

*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

*22)*  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.

*23)*  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.

*24)*  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.

*25)*  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.

*27)*  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.

*28)*  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते

*29)*  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 

*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.


*कृपया हा मैसेज सर्वांना पाठवणे* 

➖➖➖➖🙏🏾🙏🏾➖➖

 : *💖चांगली माणसं व जिवाभावाची मित्र*

       *शंभर वेळा जरी नाराज झाली*

         *तरी त्याची नाराजी दूर करा.*

*कारण किमती मोत्याची माळ जितक्या*

                   *वेळा तुटते,*

  *तेवढया वेळा आपण ती परत ओवतो.*

      *माळ तुटली म्हणून आपण मोती*

              *फेकून देत नाही💖*                                       

🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿

: *सुजलाम सुफलाम सुप्रभात*

*जीवनात समज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो,जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे,कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नका, अनुभवाने खात्री करा, जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही,*

*ज्याचे कर्म चांगले आहे,तो कधी संपत नसतो.*

 🙏 *शुभ सकाळ*🙏

 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा

– उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबई, दि. 24 : शेतकरी बांधवांनी त्यांच्या कृषी उत्पादनाचा दर्जा आणि वेगळेपणा जपून गुणवत्तापूर्वक उत्पादने तयार करण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर राज्याची ओळख निर्माण करण्यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनांची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी भौगोलिक मानांकन हा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात राज्यातील 12 भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यात मंगळवेढा मालदांडी ज्वारी, नवापूर तूरडाळ, भिवापूर मिर्ची पावडर, पुणे आंबेमोहोर तांदूळ, महाबळेश्वर ड्राय स्ट्रॉबेरी, सांगली हळद, आजरा घनसाळ तांदूळ, वायगाव हळद, डहाणू चिक्कू पावडर, सांगली बेदाणा, वेंगुर्ला काजू, भंडारा चिन्नोर तांदूळ या उत्पादनांचा समावेश आहे. या शुभारंभप्रसंगी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार तथा प्राधिकृत अधिकारी बाबासाहेब पाटील, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी व पदुम विभागाचे सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, प्राधिकृत अधिकारी मंडळ सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला. या माध्यमातून शेतकऱ्‍यांची गुणवत्तापूर्ण उत्पादने आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. सध्या मॅाल संस्कृती पुढे येत असून या संस्कृतीत शेतकऱ्‍यांची कृषी उत्पादने टिकून ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.

            सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, ग्राहक हा चोखंदळ असतो. त्याला चांगली उत्पादने हवी असतात. ग्राहकाला भौगोलिक मानांकन प्राप्त असलेली उत्पादने ही अधिक विश्वासार्ह वाटतात. गुणवत्ता व दर्जा टिकवून ग्राहकांचा विश्वास संपादन करता येते. 

            भौगोलिक मानांकन (जीआय) म्हणजे एखादी वस्तू व उत्पादनास विशिष्ट स्थानामुळे प्राप्त झालेला असाधारण गुणधर्म, दर्जा आणि वेगळेपणा होय. वस्तू व उत्पादनांना वैज्ञानिक विश्लेषण, वैशिष्टपूर्ण गुणधर्म व पारंपरिक इतिहास सिद्ध केल्यावरच भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त होते. केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्याद्वारे भौगोलिक मानांकन देण्यात येते. जीआय टॅगमुळे फसवेगीरीस आळा बसतो व अस्सल दर्जाची उत्पादने असल्याची ग्राहकाला शाश्वती मिळते.


०००




 स्नातकांनी उदयोन्मुख भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारई

            मुंबई, दि. 24 : देशात पुनरुत्थान होत असून आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी सर्वकष प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी विद्यापीठाच्या स्नातकांनी उन्नत भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. २४) जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारोह संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, अनेक विद्यापीठांमध्ये प्रभारी कुलगुरु व प्रभारी अधिकारी कार्यरत आहेत याची दखल घेऊन अनेकदा प्रभारी अधिकारी मनापासून काम करीत असल्यामुळे ते अधिक प्रभावी ठरतात असे राज्यपालांनी सांगितले.

            ग्रामीण भाग देशाला लागणाऱ्या अन्नधान्याची पूर्तता करीत असतो त्यामुळे ग्रामीण भागातील जळगाव सारखी विद्यापीठे मुंबई, पुणे येथील विद्यापीठांपेक्षा कमी महत्वाची नाहीत असे राज्यपालांनी सांगितले.

            बहिणाबाई चौधरी यांची 'अरे संसार संसार' ही ओवी म्हणून दाखवताना बहिणाबाईंच्या कविता संत कबीर यांच्याप्रमाणे प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.   

            माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांकरिता रोल मॉडेल होते. पंतप्रधान मोदी देखील देशासाठी २० - २० तास काम करीत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श समोर ठेवून जीवनात अधिक उंची गाठावी असे राज्यपालांनी सांगितले. आज विविध विद्यापीठांमध्ये ८० टक्के सुवर्ण पदके विद्यार्थिनी प्राप्त करीत आहेत ही आगामी भारताची नांदी आहे असे राज्यपालांनी सांगितले. पूर्वी शिक्षणातून यांत्रिकी पद्धतीने पदवीधर बाहेर पडत होते. आज देशाला चारित्र्यवान युवकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठे राजकारणापासून मुक्त असावी : डॉ भूषण पटवर्धन

            आपल्या दीक्षांत भाषणात नॅकचे अध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांनी विद्यापीठे राजकारणापासून मुक्त असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह काही विद्यापीठांमध्ये कुलगुरुपद प्रभारी व्यक्तींकडे आहे तसेच बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अनेक पदांवर प्रभारी व्यक्ती काम करीत आहेत याकडे लक्ष वेधून विद्यापीठांमध्ये अधिकाऱ्यांची तसेच शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यास त्याचा विद्यापीठांच्या मूल्यांकनावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.    

            विद्यापीठांनी पाश्चात्य संकल्पनांचे अंधानुकरण करू नये तसेच पाश्चात्य तेच आधुनिक ही मानसिकता बदलावी असे पटवर्धन यांनी सांगितले. विद्यापीठे निर्बंध मुक्त असावी व ग्रामीण भागातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शेती शिकण्याची देखील मुभा असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी काही महिने इतर विद्यापीठांमध्ये तसेच ग्रामीण भागात व्यतीत केल्यास त्यांना समाजातील प्रश्न अधिक चांगले समजतील व एकात्मता वाढेल असे त्यांनी सांगितले.

            कुलगुरु डॉ विजय माहेश्वरी यांनी यावेळी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले.

            दीक्षांत समारोहात २० हजार ०७५ विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांमधील पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी २१४ स्नातकांना आचार्य पदवी तर ९८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

            यावेळी विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरु प्रा. सोपान इंगळे, प्रभारी कुलसचिव डॉ किशोर पवार, परीक्षा मंडळाचे अध्यक्ष डॉ दीपक दलाल व स्नातक उपस्थित होते.

०००


Governor presides over 30th Convocation of Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University

       Mumbai, 24th May : Governor of Maharashtra and Chancellor of Universities Bhagat Singh Koshyari presided over the 30th Annual Convocation of the Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon through online mode.


       Prof. Bhushan Patwardhan, Chairman, Executive Committee, NAAC, Bengaluru, Vice Chancellor of the University Prof. Vijay Maheshwari, Officiating Pro VC Prof. Sopan Ingle, Deans of various faculties, teachers and graduating students were 

 राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि दर्जेदार होणार

राज्यातील आदर्श अंगणवाड्यांचा कायापालट लवकरच

- मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाचा लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार

            मुंबई, दि. 24 : राज्यातील आदर्श व स्मार्ट अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार होणार आहेत. त्यांचा कायापालट होण्यासाठी आणि आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाने लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आदर्श अंगणवाड्यांना अद्ययावत करून त्या अधिक अधिक स्मार्ट, बोलक्या आणि दर्जेदार करण्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.


            राज्याच्या आदर्श अंगणवाडी प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर मुंबईतील काही अंगणवाड्या घेऊन त्या आदर्श अंगणवाडी संकल्पनेनुसार विकसीत करण्याची जबाबदारी लाईटहाऊस लर्निंगने या संस्थेनी स्वीकारली आहे. स्मार्ट अंगणवाड्याच्या विकासासाठी लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार केल्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणाला यामुळे मदत होणार असून महाराष्ट्रातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

            महिला आणि बाल विकास विभाग व लाईटहाऊस लर्निंग या संस्थेसोबत आदर्श अंगणवाड्यांच्या विकासासाठी सामंजस्य करार आज करण्यात आला.

            यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रूबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास सेवा योजना उपायुक्त राजेश क्षीरसागर, लाईटहाऊस लर्निंग संस्थेचे सहसंस्थापक प्रजोद राजन, लाईटहाऊस लर्निंग संस्थेचे के व्ही एस. शेषशाही, तुषार श्रोत्री, अनिता मदान, शैलेश सिंह आदि उपस्थित होते.

            मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, लाईटहाऊस लर्निंग ही शैक्षणिक संस्था महाराष्ट्रातील महिला व बाल विकास विभागाकडील काही अंगणवाड्या अद्ययावत सोयी सुविधांनी विकसीत करून त्यांचे सुशोभीकरण करणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरु होत असलेल्या ह्या अंगणवाड्या कुलाबा, मालाड (मालवणी), गोरेगाव (प), शिवाजीनगर व मानखुर्द येथील आहेत. लाईटहाऊस लर्निंगद्वारे 200 पेक्षा जास्त अंगणवाड्याची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे. तसेच अमरावती येथील जिल्हा परिषद शाळामध्येही हा पॅटर्न प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून नंतर तो राज्यात राबविण्यात येणार आहे.

            लाईटहाऊस लर्निंगचे सहसंस्थापक प्रजोध राजन ह्या प्रकल्पाबाबत म्हणाले, आमच्या शाळांमध्ये शैक्षणिक व शिक्षणेत्तर उपक्रम यांत योग्य समतोल साधून मुलांना संतुलीत अभ्यासक्रम शिकवला जातो. आमच्या जितक्या पूर्वप्राथमिक शाळा आहेत तेवढ्याच अंगणवाड्या आम्ही विकसीत करणार आहेत. अंगणवाडी सेविकांनाही आमच्या शिक्षिकांच्या सोबत नियमीत प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्या अंगणवाडीतील बालकांचे योग्य संगोपन करू शकतील वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बालकांची मानसिक वाढ सर्वोत्तम होते. त्या दृष्टीने त्यांच्या शारीरिक वाढी इतकीच त्यांच्या मानसिक वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या संस्थामार्फत ते फार जबाबदारीने करत आहोत आणि यापुढे अंगणवाडीतील बालकांसाठी देखील करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.


***



 






 


            

 मृद संधारण प्रकल्पांचे आणि पाणलोट विकास योजनेअंतर्गतनिर्णय घेण्याकरिता राज्यस्तरीय मान्यता समितीची स्थापना

            मुंबई, दि. 24: मृद संधारण प्रकल्पांचे आणि पाणलोट विकास योजनेअंतर्गत धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मान्यता समितीची स्थापना करण्यात आली आहे.

            1 एप्रिल 2022 पासून नव्याने सुरु होणाऱ्या मृद संधारण प्रकल्पांचे काम पाहण्यासाठी तसेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास योजनेअंतर्गत समाविष्ठ तांत्रिक विभागामधील समन्वय आणि आवश्यकतेनुसार क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेस सल्ला, मार्गदर्शन, अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच शासन स्तरावरील धोरणात्मक निर्णय देण्याकरिता मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मान्यता समिती आणि मृद व जलसंधारण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नोडल यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे.

            राज्यस्तरीय मान्यता समितीचे अध्यक्ष हे मुख्य सचिव असतील. तर नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव हे या समितीमध्ये सदस्य असतील. मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 या समितीचे सदस्य सचिव असतील.

            सदर समिती केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाचा आढावा घेऊन या प्रकल्पाच्या बर्हिगमनाबाबत केंद्र शासनाला अहवाल सादर करतील. तसेच केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनांच्या निधीचे परिणामकारक व्यवस्थापन याबरोबरच निधी विनियोगाच्या प्रक्रियेत अधिक परिणामकारकता आणण्यासाठी प्रयत्न करतील.केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर सामाईक योजनांचे मॅपींग करणे तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांचा समन्वय आणि आढावा घेणे हे या समितीच्या कामकाजाची कार्यकक्षा असेल.

मृद व जलसंधारण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नोडल यंत्रणा

            मृद व जलसंधारण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नोडल यंत्रणेची रचना करण्यात आली आहे. मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 या राज्यस्तरीय नोडल यंत्रणेचे अध्यक्ष असतील. वने विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी, कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी, पदुम विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव

 अथवा त्यांचे प्रतिनिधी या राज्यस्तरीय नोडल यंत्रणेमध्ये सदस्य असतील. तर वाल्मीचे महासंचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सह/उपसचिव, मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव, एनआयसीचे राज्य प्रमुख, कामगार आयुक्त, मनरेगाचे आयुक्त, कृषि आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक, पशुसंवर्धन आयुक्त, दुग्धव्यवसाय आयुक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त, ग्रामीण विकास मंत्रालय, नाबार्ड, केंद्रीय भूसंसाधन विभाग यांनी नामनिर्देशित केलेले सदस्य, नवोदय कृषि संशोधन व ग्रामिण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी या नोडल यंत्रणेमध्ये सदस्य असतील. तर मृद व जलसंधारण आयुक्त आणि वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या यंत्रणेचे सदस्य सचिव असतील.

            जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर तयार करण्यात आलेले पाणलोटांचे यथार्थ दर्शी आराखडे तयार करणे, योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी दर महिन्याला आवश्यकतेनुसार बैठक घेणे, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक, विविध यंत्रणा, प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा यांची निवडसूची तयार करणे

Featured post

Lakshvedhi