सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 23 May 2022
पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यानेही केला कमी
सुमारे 2500 कोटींचे नुकसान
मुंबई दि 22: केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.
000
Sunday, 22 May 2022
*जर तुम्हीही जेवणानंतर "बडीशेप" खात असाल, तर आवश्य वाचा.*
बडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जातं, भारतातील बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमुळे पचन सुधारण्यास मदत होते, सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. बडीशेप मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला निरोगी आयुष्य प्रदान करू शकतात. कदाचित आपल्याला माहीत नसेल, मात्र जे लोक नियमित बडीशेपचे सेवन करतात. त्यांचं आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ती बडीशेप न खाणाऱ्या व्यक्तीपेक्षा किती तरी पटीने अधिक असते, हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे.
बडीशेप ही केवळ स्वयंपाक घरातील एक मसाला नाही, यामध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यांसारखे तत्व आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. बदाम आणि बडीशेप एकत्र वाटून, दररोज जेवणानंतर त्याचे एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. तर मित्रांनो आज आपण बडीशेप चे असेच फायदे पाहणार आहोत.
१) बडीशेप खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे, तो म्हणजे तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. दररोज बडीशेप खाल्यास आपल्या आरोग्याला चांगला फायदा होतो, आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स, मुरुम येत असतील, तर हे मुरुम देखील दूर होऊ शकतात.
२) शरीरातील हार्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी, तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे घटक उपयोगी असतात. नेमके हेच घटक बडीशेप मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच आपल्या शरीरातील हार्मोनची पातळी चांगली राहते. तसेच पिंपल्स पासून देखील आपला बचाव होतो.
३) रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत, बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी ही बडीशेप मोठी उपयोगी ठरते. रक्त शुद्धीकरणाचे काम फार चांगल्याप्रकारे होते.
४) चौथा फायदा तो म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी, डोळ्यांचे आरोग्य जर चांगले राखायचे असेल, जर सुंदर डोळे हवे असतील, तर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे घटक असायला हवेत. मित्रांनो या बडीशेप मध्ये हे तीनही घटक अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच जे लोक बडीशेपचं सेवन करतात, त्यांच्या डोळ्यांच आरोग्यही चांगलं राहतं.
५) अपचन, गॅसेस म्हणजेच ॲसिडिटीच्या तक्रारींवर उपयुक्त, बडीशेप मध्ये जे घटक आहेत, हे घटक आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्यामुळेच बडीशेप खाल्ल्यामुळं आपण खाल्लेल्या अन्नाच चांगल्या प्रकारे पचन होतं आणि परिणामी आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होत नाही.
६) शेवटचा एक फायदा आहे तो म्हणजे आपल्या हृदयाशी निगडित तक्रारी. आजकाल हार्ट ॲटॅक येण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे. हार्ट अटॅक येण्यामागे एक प्रमुख कारण आहे, आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणापेक्षा जास्त वाढणे. मित्रांनो बडीशेप जर आपण रोज खाल्ली तर आपल्या हृदयाशी निगडित जे आजार आहेत, ते दूर होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि म्हणूनच तर बडीशेप जर आपण दररोज खाल्ली, तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी हृदय रोग, हार्ट ॲटॅक येण्याची शक्यता कितीतरी पटीने कमी होते.
उपायुक्त
*सर्व LPG सिलिंडर वापरकर्त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी.**लेडीज ग्रुपमध्ये माहिती द्या*
एखाद्याच्या अनुभवातून आलेली गोष्ट :-
गेल्या रविवारी मला एक मनोरंजक अनुभव आला.
मला गॅस सिलिंडर बदलावा लागला.
जेव्हा मी नवीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला गॅसचा वास आला, मला जाणवले की ते गळत आहे.... मी नॉब बंद केला.
मी एक-दोन एजन्सींना फोन केला, पण रविवार असल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
त्यावर सोमवारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मला आत्ताच काही इमर्जन्सी नंबर आहे की नाही हे जाणून घ्यायचे होते, म्हणून Google वापरून पाहिले.
Google ने कॉल करण्यासाठी *1906* दाखवले.
मी प्रयत्न केला.
एका बाईने फोन उचलला आणि हिंदीत बोलली.
मी तिला माझी समस्या समजावून सांगितली.
ती म्हणाली एक व्यक्ती तासाभरात येईल आणि कामाला हजर होईल.
ती पुढे म्हणाली की भेटीसाठी कोणतेही शुल्क नाही, त्यामुळे ट्यूब खराब झाल्याशिवाय मला त्याला पैसे देण्याची गरज नाही ज्यासाठी मला पैसे द्यावे लागतील.
मला आश्चर्य वाटले की अर्ध्या तासात एक तरुण मुलगा आला, त्याने तपासले आणि सिलिंडरला नवीन वॉशर ठेवले.
हे छोटे काम असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी कोणतेही मानधन स्वीकारले नाही.
*केंद्र सरकार* कडून काही वेळातच सेवा प्रदान करण्यात आली.
त्या महिलेने तासाभरानंतर पुन्हा फोन केला आणि काम पूर्ण झाले की नाही ते तपासले.
_______________
कृपया हा दूरध्वनी क्रमांक तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा.
हे *1906* आहे.
*तथ्य तपासणी*:
मी गुगल करून पाहिलं.
तीच माहिती.
हे तुम्हाला *https://cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_pages_initiatives/emergencyhelpline1906* वर घेऊन जाईल
ही 24x7 सेवा आहे, सर्व एलपीजी कंपन्यांना कव्हर करते.
*आपल्या सर्वांसाठी उपयुक्त माहिती आहे असे वाटले.*
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...
*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*
1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत
फक्त आणी फक्त
*"कर्म"*
शेवट l पर्यंत
जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*
यातील वेलांटीचा फरक
म्हणजेच माणसाचे जीवन......
*नक्की वाचा*
*जन्म* : दूस-याने दिला ...
*नाव* : दूस-याने ठेवलं ...
*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...
*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...
*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...
*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ...
*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...
*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...
तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...
आपल्या माणसांना *आठवतात*.
*धन* इतकं दुर्दैवी आहे की
ज्याला मिळवून लोक नेहमी...
आपल्या माणसांना *विसरतात*.
किती विचित्र आहे ना...??
माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे,
पण जखम झाली की रक्त येतं....
आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं…Good morning 💐
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...




