Saturday, 21 May 2022

 चंद्रपूर दुर्घटना के मृतकों के परिवार को मुख्यमंत्री की ओर से   प्रत्येकी पाँच लाख रुपये की आर्थिक मदद घोषित

            मुंबई दि. 21: चंद्रपूर-मूल महामार्ग पर अजयपूर में हुई दुर्घटना में 9 लोगों की मृत्यु हुई, इस घटना के मृतकों के परिवार को प्रत्येकी 5 लाख रुपए की आर्थिक मदद मुख्यमंत्री सहायता निधि से देने की घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने की है।   

            अजयपूर गाँव के पास गत शुक्रवार की रात पेट्रोल टैंकर और ट्रक में हुई दुर्घटना में लगी आग में 9 मजदूरों की आग में झुलसकर मृत्यु हो गई। मुख्यमंत्री ने इस घटना पर शोक व्यक्त किया है और मृतकों के परिवार को आर्थिक मदद घोषित की है। 


000

 मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचविण्यात यशस्वी होऊ

कान चित्रपट महोत्सवात अमित देशमुख यांचा विश्वास

            मुंबई, दि. 21 : मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्‍वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान चित्रपट महोत्सवात व्यक्त केला.

            कान फिल्म फेस्टिव्हलमधील इंडिया पॅव्हिलियनमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक मनोज कदम तसेच फिल्म मार्केटसाठी निवड करण्यात आलेल्या ‘कारखानीसांची वारी’, ‘तिचं शहर होणं’ आणि ‘पोटरा’ या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अनुक्रमे अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, सिध्दार्थ मिश्रा, रसिका जोशी, समीर थोरात आणि शंकर धोत्रे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

            सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच विविध देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विशेषतः विविध देशांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र शासनाचा विविध योजना राबविण्यामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

            याच कार्यक्रमात कान चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या मराठी चित्रपटांच्या माहितीपत्रकाचे तसेच बॉलीवूड म्युझियम या चित्र नगरीत सुरू करण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमाच्या फोल्डरचे अनावरण सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, फिल्मसिटीचे महाव्यवस्थापकीय संचालक विवेक भिमानवार यांनी यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण आणि फिल्म सिटीची सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. यानंतर मंत्रीमहोदयांनी कान फिल्म मार्केटला भेट दिली आणि ए.आर. रेहमान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सिनेमा ऑफ फ्युचर’ या चित्रपटाच्या नव्या तंत्राच्या आविष्काराबाबत माहिती घेतली. मार्केटमधील कॉन्फडरेशन ऑफ इंडस्ट्रीजच्या बूथलाही मंत्रीमहोदयांनी भेट दिली.

000



 समर्पित आयोगाचा पुणे दौरा


पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

            पुणे, दि. 21 : राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समर्पित आयोगासमोर मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक-प्रतिनिधींनी उपस्थित राहून यासंदर्भातील भूमिका मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले.

            सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 11 मार्च 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग” गठीत केला आहे.

            सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी अभिवेदन, सूचना मागविण्यात आल्या आहेत. आयोगाच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निवेदन सादर करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात व्यक्ती आणि प्रतिनिधींनी नोंदणी केली होती.

पाचही जिल्ह्यातून निवेदने

पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे प्रतिनिधींसोबत अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींनी निवेदने देत आपली भूमिका मांडली. आयोगाने निवेदने देण्यासाठी सकाळी 9.30 ते 11.30 अशी वेळ ठेवली असताना नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेता दुपारी 1.30 वाजेपर्यंत निवेदने स्विकारण्यात आली.

राजकीय पक्षांसह विविध 81 संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनीदेखील आपली मते नोंदवली. यामध्ये अखिल भारतीय कुंभार समाज संस्था, कुणबी समाज संघ पुणे, ओबीसी वेलफेअर फाऊंडेशन, पुणे जिल्हा बारा बलुतेदार महासंघ, राष्ट्रीय छावा संघटना, अखिल भारतीय माळी समाज संघ, समता बेलदार समाज संस्था, कोष्टी समाज सेवा मंडळ, मुंबई, अखिल भारतीय बारी समाज महासंघ, अखिल भारतीय ओतारी समाज सेवामंडळ, मुस्लिम छप्परबंद भटकी विमुक्त विकास संस्था, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, प्रांतिक तैलिक महासभा पश्चिम महाराष्ट्र, राष्ट्रीय विणकर सेवासंघ, अखिल महाराष्ट्र सुतार लोहार महासंघ, कोलाटी डोंबारी समाज संघटना, ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशन पुणे, ओबीसी संघर्ष समिती, कुंभार समाज उन्नती मंडळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे, न्यू सलून पार्लर असोसिएशन, मराठा सेवक समिती, नाभीक विकास परिषद, शिंपी समाज मंडळ, सकल मराठा समाज सोलापूर, मराठा सेवा संघ सांगली, यासह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली.

समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य महेश झगडे, डॉ. नरेश गिते, ह.बा.पटेल, सदस्य सचिव पंकज कुमार, डॉ. शैलेशकुमार दारोकार, प्रा.जेम्स यांच्या उपस्थितीत निवेदने स्विकारण्यात आली. या सर्व निवेदनांची नोंद आयोग घेत असल्याची माहिती समर्पित आयोगाच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

समर्पित आयोगाने यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुणे विभागातील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदा, किंवा महानगरपालिकेत या संदर्भातील निवेदने प्राप्त झाल्यास ती आयोगाकडे पाठवावीत, अशा सूचना आयोगाने दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माजी सनदी अधिकारी मोहन ठोंबरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तसेच आयोगाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक प्रतिनिधीला म्हणणे मांडण्याची संधी

समर्पित आयोगाला निवेदन देण्यासाठी पुणे विभागाच्या विविध भागातून आलेले प्रतिनिधींनी सकाळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. आलेल्या प्रत्येक प्रतिनिधींना आपले म्हणणे मांडण्याची आणि निवेदन देण्याची संधी देण्यात आली. आयोगाने पुणे विभागाने केलेल्या व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केले.



बेलाच्या फायदे

 बेलाच्या फळाचे फायदे:-

       आयुर्वेदात उन्हाळ्यात बेलाच्या फळाचे सेवन शरीरासाठी लाभदायक असते. बेलाच्या फळाच्या फायद्याविषयी क्वचितच लोकांना माहित असेल. काही लोकांना बेल केवळ महादेवाला अर्पित करण्यासाठी वापरले जाते एवढेच माहित आहे. त्यामुळे याच्या फळाचा फायदा खूप कमी लोकांना माहित आहे. परंतु बेलाचे फळ औषधी म्हणून वापरले जाते.

या गुणांची भरपूर असते बेलाचे फळ- :-

          बेलाच्या फळामधी 100 ग्रॅम रसाळ भागात 61.5 टक्के आर्द्रता, चरबी 3 टक्के, प्रोटीन 1.8 टक्के, फायबर 2.9 टक्के, कार्बोहायड्रेट 31.8 टक्के, कॅल्शिअम 85 मिलीग्रॅम, फॉस्फोरस 50 मिलीग्रॅम, आयर्न 2.6 मिलीग्रॅम, व्हिटॅमिन सी 2 मिलीग्रॅम, शिवाय बेलामध्ये 137 कॅलरी उर्जी आणि काही प्रमाणात व्हिटॅमिन बीसुध्दा आढळते.

मधूमेहासाठी फायदेशीर :-

        बेलामध्ये लेक्साटीव्हचा स्तर अधिक असतो. ते शरीरामध्ये रक्ताची पातळी नियंत्रित करण्याचे काम करते. शरीरात इन्सुलिन बनवण्यासाठी बेल सर्वाधिक मदत करते. यामुळे मधूमेहाला आराम मिळतो.

पोटाच्या आजारांवर रामबाण आहे बेल :-

     पोटाच्या समस्यांसाठी बेलाचे फळ रामबाण आहे. बेलाचे शरबत प्यायल्यास बद्धकोष्ठता मूळापासून नष्ट होते.

डिहाड्रेशनपासून मिळते सुटका :-

      डिहाड्रेशन झाल्यास बेलाचे ताजे पाने वाटून मेंदीसारखे पायाच्या तळव्यावर लावावे, शिवाय माथ्यावर, छातीवरसुध्दा मालिश करावी. मिश्री टाकून बेलाच्या फळाचे शरबत प्यायल्यास त्वरित आराम मिळतो.

रक्ताची कमतरता करा दूर :-

      दररोज बेलाच्या फळाचे शरबत प्यायल्यास हिमोग्लोबिनची समस्या दूर होते. 

श्वासोच्छवासाच्या आजारापासून सुटका :-

     आयुर्वेदामध्ये बेलाच्या फळातून निघणा-या तेलाने अस्थमा आणि श्वासाच्या आजारावर आराम मिळतो. 

हृदयासाठी फायदेशीर :-

    बेलाच्या रसाला तुपात मिसळून दररोज प्यावे. याच्या सेवनाने हृदयासंबंधित आजार दूर होण्यास मदत होते.

संसर्गापासून ठेवते दूर :-

 बेलामध्ये अनेक अँटीमायक्रोबिअल गुण आहेत. जे शरीराला संसर्गापासून वाचवते.  

अल्सरसाठी फायदेशीर :-

    बेलामध्ये फेनोलिक तत्वासोबतच अँटीऑक्सीडेंट असते. त्यामुळे बेलाचे शरबत गॅस्ट्रिक अल्सर दूर करण्यास मदत होते. एवढेच नव्हे, याच्या सेवनाने अॅसिडीटी संतुलित राहण्यास मदत होते. 

ऊन लागल्यास :-

      विदर्भातील पारा ४८ पार जातो. दरवर्षीचा हा अनुभव असल्याने अनेकांना ऊन लागते. हा त्रास सुरू झाल्यास बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायावर लावावे. त्याशिवाय डोके, हात, छातीवरही याची मा‌लिश करावी. मिश्री टाकून बेलाचा शरबत प्यायल्यास तत्काळ आराम मिळतो. 

डायरियापासून बचाव :-

       उन्हाळ्याच्या दिवसात डायरिया ही समस्या आता अधिकांश लोकांमध्ये दिसून येते. अलीकडे या रुग्णांचे प्रमाण विदर्भात वाढीस लागले आहेत. या परिस्थितीत उलट्या, हगवण, मळमळ वाटू लागते. बेलाच्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात. हे केल्यास आतून आरोग्यवर्धक अनुभव मिळतो. 

गर्भवती महिलांसाठी :-

     गर्भवती महिलांना उलट्यांचा त्रास सर्वसामान्य मानला जातो. या त्रासापोटी अनेकदा जेवण बंद केले जाते. त्याचा परिणाम बाळावर होऊन पुढच्या त्रास वाढतो. डॉक्टरही गोळ्या देत असतात. पण, या समस्येवर बेल सर्वोत्तम उपाय आहे. बेलाचा गर कुटून तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा लगदा तयार करावा. नंतर त्याची छाननी करून प्यावे.  

रक्ताची कमतरता दूर :-

     बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेचे लक्षण दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराचा पावडर तयार करून गरम दुधात मिश्रीसोबत रोज एक चम्मच घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते. आपणास आरोग्यदायी अनुभव यायला लागतो.

उम्र चाळीस


 

 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित

            पुणे, दि. 19 : राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ संकेतस्थळ कार्यान्वित झाले आहे. संकेतस्थळाला नागरिकांसह सहकारी संस्थांचा चांगला प्रतिसाद असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य चे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.

            राज्यातील निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (२५० सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून), तसेच, निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कामकाजाचे सनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.

कामकाजात यापुढील काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्या यांच्या सभासद, निवडणूक कामकाजाच्या विविध टप्प्यांची माहिती दर्शकांना सुलभरितीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

            सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाशी निगडित असलेले सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, साखर आयुक्त, पणन संचालक, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, उद्यम विकास आयुक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त, गृहनिर्माण विभाग या संकेतस्थळाची माहिती (लिंक) देण्यात आली आहे.


            राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांची कार्यपद्धती, त्या संबंधित अद्ययावत कायदे व नियम, सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांची हस्त-पुस्तिका, राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादी, प्रत्येक जिल्ह्याच्या नामिकेतील क तसेच ड वर्गातील सहकारी संस्थांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी, नागरिकांची सनद, माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत स्वयं-प्रकटन, वारंवार विचारले जाऊ शकणारे प्रश्न, महत्वाचे नमूने , सांख्यिकी माहिती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सहकार, कृषी, पणन क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

            राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव (सहकार) अनुप कुमार, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका जयश्री भोज यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. येत्या काळात संकेतस्थळावरील सुविधा अधिक विस्तारित करण्याचा मानस असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे.


००००



: *देण्याची सवय लावून घेतली की, येणं आपोआप सुरू होत......*

*मग तो 'मान' असो, 'प्रेम' असो वा 'वेळ' असो.......!!*

🌞 *सकाळ* म्हणजे नविन दिवस,

नविन सुरुवात

काल जे घडले ते विसरून

पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.

     *आयुष्य* सुंदर आहे

त्याला आणखी सुंदर बनवायचा

प्रयत्न करा. 

*आज उद्या करता करता*

*आयुष्य संपून जातं,*

*मनासारखं जगायचं तेवढं*

*मात्र राहून जात...*


  


Featured post

Lakshvedhi