Wednesday, 18 May 2022

 भेसळयुक्त चहा पावडर जप्तअन्न व औषध प्रशासनाची कारवाई

            मुंबई दि. १७ : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.

            शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि १४ मे २०२२ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे ए आर एम ट्रेडर्स ३८, तळमजला, रामगड हटमेंट, शिवडी मुंबई १५ या ठिकाणची तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेवून उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत .

            संबंधित हजर व्यक्ती , पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई म.ना.चौधरी, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व एस.एस.जाधव, सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली ल.सो.सावळे, अन्न सुरक्षा अधिकारी, र.ज.जेकटे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

***


वृत्त

 सिडको प्राधिकरणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय


· नवी मुंबई विमानतळाजवळील बांधकामांची उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार ठेवण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे लिहिणार नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र

· सिडकोच्या 22.05 टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना सुविधा शुल्क चार समान हप्त्यात द्यायला मंजुरी, बांधकाम मुदतवाढीच्या ना हरकत दाखल्यासाठी एकाचवेळी तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ

· नवी मुंबईतील कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन २०१९ ला लवकरच पर्यावरण विभाग देणार मंजुरी

· सीआरझेडमुळे रखडलेल्या प्रकल्पांची छाननी करून महिन्याच्या आत भोगवटा प्रमाणपत्र देणार

· सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकामासाठी अतिरिक्त ४ वर्षांचा कालावधी देण्याला मंजुरी

· सिडकोमधील प्रलंबित मावेजा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय.

            मुंबई, दि.१७– नवी मुंबईतील सिडकोच्या २२.०५ टक्के योजनेतील त्रिपक्षीय करारनामा करताना भरावयाचे सुविधा शुल्क विकासकांना चार समान हप्त्यात देण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकासकांना बांधकाम मुदतवाढीचा ना हरकत दाखला घेण्यासाठी दरवेळी वेगळा अर्ज न करता एकाचवेळी अर्ज करून तीन वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोच्या मोठ्या भूखंडांवरील बांधकाम पूर्ण करण्यासाठी चार अतिरिक्त वर्षांचा कालावधी वाढवून देण्याला मंजुरी देण्यात आली असून, मावेजा प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

            सिडको प्राधिकरणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे निर्णय घेतले आहेत, त्यात पनवेल येथे नव्याने होत असलेल्या विमानतळाजवळच्या बांधकामांची उंची नव्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार होत असल्याने २० किलोमीटरच्या संपूर्ण क्षेत्रात ५५.१० मीटर सरासरी मध्य समुद्र पातळीच्या उंचीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांचा या परिसरात नव्याने होणाऱ्या विकासप्रकल्पांना मोठा फटका बसलेला असल्याने ही उंची जुन्या कलर कोडेड झोनल मॅपनुसार ठेवण्यासाठी नगरविकास मंत्री शिंदे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. 

---चौकट.

            नगरविकास विभागाने सिडको प्राधिकरणांतर्गत असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हे सर्व निर्णय घेतले आहेत. वरकरणी जरी हे विकासकांच्या हिताचे निर्णय वाटत असले तरीही त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना आणि स्थानिक भूमिपुत्रांनाही होणार आहे. तसेच सिडकोच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्याचा महसूल वाढण्याच्या दृष्टीनेही हे निर्णय उपयुक्त ठरणार आहेत. - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

नवी मुंबई विमानतळाजवळील उंचीचे निर्बंध ठरवण्यासाठी नगरविकासमंत्री नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहिणार

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलोमीटर अंतरावरील कलर कोडेड झोनल मॅप निष्क्रिय करून 20 किलोमीटरच्या संपूर्ण क्षेत्रात 55.10 मीटर सरासरी मध्य समुद्र पातळीच्या उंचीचे निर्बंध काढून पूर्वी प्रकाशित केलेल्या सीसीझेडएम (कलर कोडेड झोनल मॅप) प्रमाणे उंची पुनर्संचयित करावी अशी मागणी विकासकांनी केली होती. या निर्णयाचा नवी मुंबईत होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर मोठा परिणाम होत असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे स्वतः याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पत्र लिहून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

मावेजा प्रकरणांचा जलद निपटारा करणार

            मावेजा ना-हरकत प्रमाणपत्राबाबत हस्तांतरण/ गहाणखत/ बांधकाम मुदतवाढ/ लीज डीड इत्यादीसाठी वसाहत 12.05% द्वारे प्रत्येक वेळी मावेजा ना-हरकत प्रमाणपत्र मागितले जाते. सदर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बराच वेळ जात असल्याचे निदर्शनास आल्याने ही प्रक्रिया जलद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (मेट्रो सेंटर), पनवेल, रायगड, ठाणे यांना बेलापूर येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर कार्यालय त्याठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांना देण्यात आले असून त्याद्वारे ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.



 राज्य उत्पादन शुल्क विभागाला 59 नवीन वाहने

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण

            मुंबई, दि. 18 : “अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी प्रभावीपणे राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रयत्नशील राहील. यामुळे देश व राज्याच्या महसूलातही मोठी भर पडेल”, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला, या विभागाला 59 नवीन वाहने आज प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या गाड्या विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी दिलेल्या असून गुन्हा अन्वेषणातील कामगिरी उल्लेखनीय करण्यास आणि महसूल उदिष्टाची पूर्तता करण्यास त्यामुळे मदत होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

            विधानभवन समोरील वाहनतळावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन वाहनांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून व वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा-नायर सिंह, आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त विश्वनाथ इदिसे, संचालक दक्षता व अंमलबजावणी श्रीमती उषा वर्मा, उपाआयुक्त सुनील चव्हाण, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            प्रधान सचिव वल्सा- नायर सिंह म्हणाल्या की, या नवीन गाड्यांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजात नक्कीच अधिक गती येईल आणि त्याचा चांगला परिणाम होईल. या विभागात अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सऍप क्रमांकही देण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाईस गती आली आहे. नवीन वाहने विभागातील अधिकाऱ्यांना गुन्हा अन्वेषणातील उल्लेखनीय कामगिरी करण्यास सहाय्यभूत ठरतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            या वेळी महिंद्रा अण्ड महिंद्रा, कंपनीचे अधिकारी गुरुप्रिंतसिंग रंधावा, मारोती सुझुकीचे अधिकारी जावेद सय्यद यांनी प्रतिनिधिक स्वरूपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चावी दिली. या नवीन 59 वाहनात महिंद्रा अंड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ मॉडेलच्या 51 स्कॉर्पिओ व मारोती सुझुकी कंपनीच्या इर्टिगा 8 कारचा समावेश आहे. विभागासाठी एकूण 271 वाहने मंजूर करण्यात आली आहेत.


0000



सायली कल्पेश विवाह बंधन


 



 


 

 नैना' क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना चाप बसविण्यासाठी

'रेरा' आधी सिडकोची परवानगी घेणे अनिवार्य

· 'नैना' क्षेत्रातील भूखंडांवर आकारण्यात येणारे विकास शुल्क शेवटचा फायदा होणाऱ्या घटकाकडून घेण्याचा निर्णय

· 'नैना' मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले मोठे निर्णय.

· 'नैना' क्षेत्रातील टाऊन प्लॅनिंग स्किममध्ये सहभागी शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड मिळणार

            मुंबई, दि. 17 :- नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रात (‘नैना’) वेगाने वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी या इमारतींचे रेरा रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी त्यांना सिडकोची मान्यता तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे 'नैना' क्षेत्रात वेगाने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना रोखण्यास मोठी मदत होणार आहे. यासोबतच 'नैना' क्षेत्रातील भूखंडावर आकारण्यात येणारे विकास शुल्क शेवटच्या घटकाकडून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 'नैना' प्रकल्पातील टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये सामील होणाऱ्या भूखंड धारकांना लवकरात लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णयही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

            नवी मुंबई विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसराचा विकास सुनियोजितपणे व्हावा यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र ('नैना') प्राधिकरणाशी संबंधित भूमिपुत्र आणि विकासकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्यांना दिलासा देण्यासाठी विविध निर्णय घेतले आहेत.

--- चौकट ---

            'नैना' क्षेत्र हे नव्याने विकसित होत असलेले क्षेत्र असल्याने ते अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकू नये ही आपली प्राथमिकता आहे. त्यासोबतच 'नैना' तील टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये सामील होत असलेल्या शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा आणि त्यांच्यावर विकास शुल्काचा बोजा न टाकण्याचा शब्द मी दिला होता. त्यानुसार भूमीपुत्रांना दिलासा देणारे हे दोन्ही निर्णय मी घेतले आहेत.

 एकनाथ शिंदे , नगरविकासमंत्री

-----

'नैना' क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना बसणार चाप

            'नैना' मध्ये मुख्य रस्त्याच्या कडेला विशेष करून माथेरान रोडवर ग्रामस्थ आणि स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. 'नैना' क्षेत्रामध्ये सिडको हे नियोजन प्राधिकरण असल्याने 'रेरा' मध्ये सदर प्रकल्पांची नोंदणी करण्यापूर्वी सिडकोने सदर प्रकरणाची परवानगी दिली आहे का? याची पडताळणी करूनच सदर प्रकल्पांची नोंदणी करण्याची विनंती महारेराला करण्यात आलेली आहे. तसेच 'नैना' क्षेत्रातील अनधिकृत बांधकामविरोधी विभागाला बळकटी आणण्यासाठी महसूल विभागाकडे ५ पदे पुरवण्याची मागणी करण्यात आलेली होती. महसूल विभागाने ही मागणी देखील मान्य केली आहे. त्यामुळे 'नैना' क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. 

टीपीएस योजनेच्या भूखंडधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार

            'नैना' क्षेत्रात टीपीएस-०१ (टाऊन प्लॅनिंग स्कीम), टीपीएस-०२, टीपीएस-०३ मध्ये मिळणाऱ्या भूखंडांचा ताबा लवकरात लवकर जागामालकांना प्रॉपर्टी कार्डसह देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने टाऊन प्लॅनिंग योजना १ आणि २ यांना मंजुरी दिलेली असून जमीन मालकाला भूखंड वाटपाचे काम सुरू केलेले आहे. वाटप केलेल्या भूखंडांची मालमत्ता पत्रके तयार करण्यात आलेली आहेत. तसेच ही प्रक्रिया जलदगतीने होण्यासाठी महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी त्यांचे महाराष्ट्र जमीन, महसूल संहितेनुसार विहित अधिकारासह सिडकोला वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे 'नैना'तील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यामुळे ही कारवाई जलदगतीने करणे शक्य होणार आहे.

शेतकऱ्यांकडून सुधारणा शुल्क (बेटरमेंट चार्जेस) घेणार नाही

            सिडकोमार्फत नवी मुंबई क्षेत्रात १२.०५ टक्के योजनेमध्ये १.५ चा चटई क्षेत्र निर्देशांक देण्यात येत असून २२.०५ टक्के योजनेमध्ये २.० चे चटई क्षेत्र देण्यात येतो. 'नैना' क्षेत्राचा विकास हा टाऊन प्लॅनिंग स्कीमद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यास ४० टक्के भूखंड जमीन मालकाला फ्रि होल्ड देण्यात येतो. या भूखंडावर २.५ टक्के चटई क्षेत्र मंजूर असून भूखंडधारकास त्या जमिनीचे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच १०० टक्के क्षमता विकास करण्यासाठी उपलब्ध आहे. टाऊन प्लॅनिंग स्कीममध्ये घेण्यात येणाऱ्या सुधारणा शुल्काला स्थगिती देण्याचा निर्णय .

Featured post

Lakshvedhi