Sunday, 15 May 2022

ती पाहताच बाला

 हृदय घात !!


रोजच्याच रस्त्यावरून जाताना गेले काही दिवस एक "देखणा चेहरा" माझ्याकडे पाहून सुंदर हसतोय हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.

नेमकं त्याच ठिकाणी रस्त्याला स्पीडब्रेकर असल्याने दोन क्षण जास्त रेंगाळायला मिळायचं.

पन्नाशीत असूनही असं काही घडतंय म्हटल्यावर एकदम मस्त फील यायला लागला होता. आत्मविश्वास वाढला होता. असे काही दिवस चालू राहीलं. मग एक दिवस हिम्मत करून तिला विचारलंच...


"काय म्हणतेस , रोज मला पाहून छान हसतेस. मला ही बरं वाटतं तुला पाहून .

मैत्री करूया की आणखी काही आहे मनात ?"


पुन्हा एकदा दिलखुलास हसली, माझ्या छातीत अणुबॉम्ब फुटावेत तशी धडधड होत असतानाच ती मला म्हणाली,

"अरे तसं काहीच नाही, तू त्या स्पीडब्रेकर वरून जातोस ना, तेव्हा तुझी ढेरी गदागदा हलताना पाहून मला जाम हसू येतं ..."


मी सध्या दूरचा नवीन रस्ता निवडला आहे, त्याला स्पीडब्रेकर नाहीये..🤨


रोजच्याच रस्त्यावरून जाताना गेले काही दिवस एक "देखणा चेहरा" माझ्याकडे पाहून सुंदर हसतोय हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.

नेमकं त्याच ठिकाणी रस्त्याला स्पीडब्रेकर असल्याने दोन क्षण जास्त रेंगाळायला मिळायचं.

पन्नाशीत असूनही असं काही घडतंय म्हटल्यावर एकदम मस्त फील यायला लागला होता. आत्मविश्वास वाढला होता. असे काही दिवस चालू राहीलं. मग एक दिवस हिम्मत करून तिला विचारलंच...


"काय म्हणतेस , रोज मला पाहून छान हसतेस. मला ही बरं वाटतं तुला पाहून .

मैत्री करूया की आणखी काही आहे मनात ?"


पुन्हा एकदा दिलखुलास हसली, माझ्या छातीत अणुबॉम्ब फुटावेत तशी धडधड होत असतानाच ती मला म्हणाली,

"अरे तसं काहीच नाही, तू त्या स्पीडब्रेकर वरून जातोस ना, तेव्हा तुझी ढेरी गदागदा हलताना पाहून मला जाम हसू येतं ..."


मी सध्या दूरचा नवीन रस्ता निवडला आहे, त्याला स्पीडब्रेकर नाहीये..🤨

 🍦🍨🍧🤴👸👍🏻पुण्यातील एका लग्नाच्या हॉल मध्ये आईस क्रीम च्या काऊंटर वर शेंदराचा टिळा लावत होते.

मी म्हटलं " वा ! आपल्या संस्कृतीचा वारसा जपत आहात. फार छान !"

.

.

."तस नाही काही...पुन्हा पुन्हा आईस्क्रीम घ्यायला आले तर कळाव म्हणून...

😇😊☺️😁😄😆😝🤪

भवताल

 भवताल’तर्फे गेल्या वर्षीप्रमाणे येत्या पावसाळ्यातही संपूर्ण महाराष्ट्राभर सामूहिकरित्या पाऊस मोजला जाणार आहे. हा उपक्रम जून ते ऑक्टोबर या काळात केला जाईल. या काळात दररोज १५ - २० मिनिटे (शक्यतो सकाळच्या वेळी) द्यायची तयारी असेल तर तुम्हीसुद्धा या उपक्रमात सहभागी होऊ शकता. १० वर्षांच्या पुढील कोणीही यात भाग घेऊ शकेल. लहान मुले पालकांच्या / शिक्षकांच्या मदतीने सहभागी होऊ शकतात.

घर, अंगण, बाग, शेत, सोसायटी, कॉलनी, शाळा, महाविद्यालये, संस्था, ऑफिसेस, शासकीय कार्यालये अशा कोणत्याही ठिकाणी पाऊस मोजला जाऊ शकतो. महाराष्ट्रात राहणाऱ्या ज्यांना ज्यांना पाऊस मोजण्याची इच्छा असेल त्यांनी नाव नोंदवावे.




पर्जन्यमापक तयार करण्याबाबत आणि ते वापरून पाऊस कसा मोजायचा याबाबत ‘भवताल’तर्फे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण - मार्गदर्शन पूर्णपणे विनामूल्य असेल. नावनोंदणी २३ मे २०२२ पर्यंत सुरू राहील.

नाव नोंदवण्यासाठी पुढील लिंक क्लिक करून किंवा QR कोड स्कॅन करून माहिती भरा.

लिंक - https://www.bhavatal.com/bhijuya-mojuya

QR कोड - (पोस्टरवर आहे, शिवाय फोटो म्हणूनही दिला आहे.)

अधिक माहितीसाठी संपर्क :

ईमेल : bhavatal.rainfall@gmail.com

वेबसाईट : bhavatal.com

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Saturday, 14 May 2022

 *भीती*

एक मनुष्य सांगत होता…

मला आयुष्यभर भीती वाटली…


-प्रथम पालकांची

-मग शिक्षकांची

-मग बॉसची

-मग म्हातारपणाची

-मग मृत्यूची…


कोणीतरी म्हटलं "पत्नीचा उल्लेख केला नाही तुम्ही!"

तो म्हणाला,

*"भीतीपोटीच…"*

😂😂😄😄

केंद्र शासन योजना

 











 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनविविध विकास कामांची पाहणी

            बारामती दि. 14 : बारामती तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. विकासकामांची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            श्री. पवार यांनी आज मौजे कन्हेरी येथील रस्त्याचे काम, शिवसृष्टीचे काम, फळ रोप वाटिका, वातानुकूलित पॉलिहाऊस, वनविभागाचे वन उद्यान, सुरक्षा केबिन, बांबू कुटी, वृक्ष लागवड, गौतमनगर, नक्षत्र गार्डन आणि जळोची येथील रस्त्याच्या कामांची पाहणी केली.

            यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            श्री. पवार म्हणाले, शिवसृष्टीचे काम उत्तम दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करावे. कन्हेरी येथील वन उद्यानाच्या हद्दीशेजारील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जागा देऊन सहकार्य करावे. फळ रोप वाटिकांतर्गत रस्त्याचे काम आकर्षित करावे. रस्त्याच्या दुतर्फा चांगली झाडे लावावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


 

 राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ.

            मुंबई, दि. 13 राज्यातील पी.यु.सी. चाचणीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

            सुधारित दरवाढ पुढील प्रमाणे आहेत. दुचाकी वाहन -५० (जुने दर ३५), पेट्रोल वरील तीनचाकी वाहन -१०० (जुने दर ७०), पेट्रोल सीएनजी एलपीजी वर चालणारे चारचाकी वाहन -१२५ (जुने दर ९०), डिझेलवर चालणारे वाहन-१५० (जुने दर ११०) हे दर तत्काळ अंमलात येत असून प्रत्येक वायुप्रदूषण तपासणीसाठी देय राहतील.

0000

Featured post

Lakshvedhi