Saturday, 14 May 2022

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनविविध विकास कामांची पाहणी

            बारामती दि. 14 : बारामती तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. विकासकामांची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            श्री. पवार यांनी आज मौजे कन्हेरी येथील रस्त्याचे काम, शिवसृष्टीचे काम, फळ रोप वाटिका, वातानुकूलित पॉलिहाऊस, वनविभागाचे वन उद्यान, सुरक्षा केबिन, बांबू कुटी, वृक्ष लागवड, गौतमनगर, नक्षत्र गार्डन आणि जळोची येथील रस्त्याच्या कामांची पाहणी केली.

            यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            श्री. पवार म्हणाले, शिवसृष्टीचे काम उत्तम दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करावे. कन्हेरी येथील वन उद्यानाच्या हद्दीशेजारील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जागा देऊन सहकार्य करावे. फळ रोप वाटिकांतर्गत रस्त्याचे काम आकर्षित करावे. रस्त्याच्या दुतर्फा चांगली झाडे लावावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi