Saturday, 14 May 2022

 


मान्सून केरळात २७ मे रोजी दाखल होणार!

- वेळेआधी येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

सामान्यत: १ जूनच्या आसपास केरळच्या किनाऱ्यावर दाखल होणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) या वर्षी सरासरी वेळेआधी दाखल होणार आहे. या वेळी तो २७ मे म्हणजेच सरासरीच्या पाच दिवस आधी दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक- 

https://www.bhavatal.com/Monsoon-arrival-forecast

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


Vastudhastra, टिप्स

 वास्तूशास्त्र टिप्स - 


1.हळद, केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते

2. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.

3. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.

4. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.

5. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.

6. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.

7. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते.

8. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.

9. घरात मनीप्लँट लावू नये. पैशाची चणचण भासते.

10. 'श्री स्वामी समर्थ' हा जप घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ होतो.

11. घरातून कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे.

12. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.

13. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल

14. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.

15. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.

16. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात , लिंग , देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र्य नेहमी राखा यचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व "ॐ नम: शिवाय " या मंत्राचा १०८ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी.

17. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.

18. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून "हनुमान चालिसा" चे ११ पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल.

19. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.

20. दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्‍भवणार नाही.

21. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.

22. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.

23. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती १००% होतेच होते.

24. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा

25. रोज रात्रौ पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा कटकट निघून जाते

26. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.

27. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्रय येत नाही. उत्त्तर- पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम-दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठयावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदुवर रुपया हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विडयाच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठयावर ठेवा. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे.

28.उपवास करून - शरीरशुध्दी होते,

यात्रा करून - शरीर बलवान होते,

जप करून - मानसिक विकास होतो,

अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते,

धन, रत्‍न जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राह्ते,

दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,

वास्तुशास्त्रानुरूप - घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते,

रत्‍न वापरल्याने - मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते,

29. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.

अश्र्वत्थाची (म्हणजे पिंपळाची) नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र म्हणून १०८ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील.

30. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहात राहील.

31. गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे. गुरूपुष्यामृत केव्हा आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्‍नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.

32. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक.

33. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये.

34. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते.

35. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णुसहस्त्रार्जुनचा जप करावा. तसेच तुळशीकाष्ठाची पाने घेऊन 'ॐ नमो विष्णवे नम:' या मंत्राचा जप करावा

36. रोज गरम तव्यावर पोळी-भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते.

37. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.

38. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात "श्री श्री" मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्र्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल.

39. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद/कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये.

40. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्व्च्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धूप दाखवावा.

41. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपटयाची पाने ही धन देणारी असतात.

42. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको. पिवळा असावा.

43. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन:शांती लाभते .

44. रोज सकाळी पहिली भाकरी गायीला, दुसरी कुत्र्याला व तिसरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो.

45. कोणाकडून कर्ज घेतले तर, त्यातले ५-१० रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. कर्ज लवकर उतरते.

46. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो.

47. घराच्या प्रवेशद्वारावर/ मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये.

48. उंबरठयावर दर पोर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वडया (पंचमहाभूतांच्या दोष परिहारार्थ) जाळाव्यात.

49. कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घडयाळे किंवा भंगारवजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या व भंगारवजा वस्तूंमध्ये कलीचा वास असतो.

50. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते?

उत्तर: बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात. क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक लाभ होतो. म्हणून अशा एकाक्ष नारळाला 'चिंतामणी' नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात.

51. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये.

52. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.

53 . वास्तूची आयुमर्यादा काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला ८ ने गुणून १२० ने भाग दिल्यावर जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे, असे समजावे.

54. काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे.

55. बाधित वास्तूसाठी काय उपाय करता येतात?

उत्तर: यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते. मात्र त्यापेक्षा श्री सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी.

56. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.

57. यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या व्यवहारचार्तुयाची (म्हणून मित्रांनो आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा

58. आपल्या घरच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतश: खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे

'सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात.

59. घरमालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये.

60. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी 'नवनाथ भक्तिसार' २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.

61. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा

62. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.

63. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.

64. वर्षातून एकदा तरी कुलदेवताच दर्शन घ्यावे.

65. रोज सकाळ-संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे.

66. आपल्या स्वत:च्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करुन ठेवावे. दक्षिणेला तोंड करुन गाडी ठेवू नये.

67. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.

68. बेडरुमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा.

69. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे.

70. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सवाष्णींना मानपान करावे व दूध द्यावे . असे केल्याने कटकटी कमी होतील.

71. श्रीवेद व्याससुध्दा म्हणतात ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धान्त आहे.

72. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये

73. देवघरात, देवाच्या फोटोबरोबर मृतव्यक्तीचे फोटो ठेवू नये.

74. मुख्य दरवाज्यास उंबरठा असणे आवश्यक असते.

75. ज्या नवीन वास्तूस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तू मध्ये ब्राह्मणभोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये.

76 उंबरठयावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत. करण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं हे काही बरं नाही

Friday, 13 May 2022

 जागतिक कृषी पर्यटन दिन विशेष

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पांडुरंग तावरे यांची मुलाख

            मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात बारामती येथील प्रगतीशील शेतकरी तसेच राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन समितीचे सदस्य पांडुरंग तावरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. १४ मे, सोमवार दि. १६ मे व मंगळवार दि. १७ मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            16 मे च्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषद 2022 चे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शेती अर्थव्यवस्थेचे संपूर्ण गणित बदलविण्याची क्षमता असलेले कृषी पर्यटन, त्याची संकल्पना, त्याचा शेतकऱ्यांना आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला होत असलेल्या लाभाबाबत श्री. तावरे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

0000

जागतिक कृषी पर्यटन दिन विशेष

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पांडुरंग तावरे यांची मुलाखत

            मुंबई, दि. 13. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात बारामती येथील प्रगतीशील शेतकरी तसेच राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन समितीचे सदस्य पांडुरंग तावरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे

        रविवार, दि. १5 मे २०२२ रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

16 मे च्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन परिषद 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शेती अर्थव्यवस्थेचे संपूर्ण गणित बदलविण्याची क्षमता असलेले कृषी पर्यटन, त्याची संकल्पना, त्याचा शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला होत असलेल्या लाभाबाबत श्री. तावरे यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

0000



 



केंद्र शासन उपक्रम







 

 


 कृषी पर्यटन दिनानिमित्त विशेष लेख :

कृषी पर्यटन : रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ

सध्याच्या धावपळीच्या युगात विशेषतः शहरातील नागरिकांना विरंगुळा हवा असतो. परंतु हा वेळ केवळ रिकामा न घालवता त्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता आले आणि त्यातही पारंपरिक आणि आधुनिक शेतीची माहिती घेता आली तर विरंगुळ्याबरोबरच माहितीपूर्ण पर्यटनाची सुवर्णसंधी साधता येईल. त्याचबरोबर शेतकरी आणि संबंधितांना रोजगार देखील उपलब्ध होईल. रोजगार आणि पर्यटनाचा सुरेख मेळ साधण्याचा हाच प्रयत्न पर्यटन विभागाने केला आहे.

            राज्याच्या पर्यटन विभागाने नुकतेच आपले कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकऱ्यांच्या जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतोय. शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळतेय आणि निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा देखील मिळतेय. 

            आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास कंपनी (एटीडीसी) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 16 मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी पर्यटन विकासाशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात राज्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना पुरस्कृत केले जाणार आहे.

            कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना आहे. कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थाजनाच्या संधी निर्माण होत आहेत. याद्वारे गावांचा शाश्वत विकास होईल. 2020 मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती, यंदा कोविडबाबतचे नियम शिथील झाल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यामध्ये अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.

            राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नेहमी सांगतात, आपल्या राज्यात बर्फ आणि वाळवंट सोडले तर पर्यटनाच्या सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. गड किल्ले, थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, डोंगर दऱ्यांनी संपन्न निसर्ग, ऐतिहासिक वास्तू आदींसह वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती ही देखील महाराष्ट्राची विशेष ओळख आहे. अजिंठा वेरूळ सारख्या लेण्या, बिबीका मकबरा, पाणचक्की, लोणार सरोवर, प्राचीन मंदिरे, अष्टविनायकाची ठिकाणे, देशातील ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख मंदिरे यांची जागतिक स्तरावर कीर्ती आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

            पर्यटनाच्या या पारंपरिक साधनांना राज्याच्या पर्यटन विभागाने नावीन्यपूर्ण कल्पनेची जोड देऊन साहसी पर्यटन, कॅराव्हॅन, बीच शॅक्स, कृषी पर्यटन आदींच्या माध्यमातून पर्यटन विकासाची धोरणे जाहीर केली आहेत. यातील कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना व्यावसायिक लाभ तर होतोच शिवाय रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटनाची आणखी एक संधी उपलब्ध होत आहे.

            पर्यटन संचालनालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या 354 कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांच्या रोजगारात सुमारे 25 % वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या काही लाखांमध्ये आहे. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील सुमारे एक लाख महिला आणि तरूणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनाला नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागल्याचे पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अनुभवायला आले आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.

            कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते. म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक या कार्यक्रमात पर्यावरण पूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने आणि वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरूणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.


 

 पोयसर सबे रुंदीकरण लवकरच होणारआ. अतुल भातखळकर यांची माहिती

मुंबई, दि. 13 मे (प्रतिनिधी)

            पावसाळ्यापूर्वी पोयसर सब वे च्या रुंदीकरणासंदर्भात पावसाळ्यापूर्वी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून काम चालू करण्यात येणार आहे. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न तसेच त्यावरील उपाययोजनांसदर्भात महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रबंधकांसोबत मुंबई सेंट्रल येथे पार पडलेल्या बैठकीत ठरल्याची माहिती आ. अतुल भातखळकर यांनी दिली. याशिवाय मालाड पूर्वेला सरकता जिना बसवण्याचे आश्वासनही रेल्वेच प्रबंधक शीलभद्र यांनी दिल्याचे आ. भातखळकर म्हणाले.


विधानसभा मतदारसंघातील देवचंद नाला तसेच परिसरातील नाले सफाई तातडीने पूर्ण करून पावसाळ्यात पाणी साठणार नाही, अशा उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी आ. भातखळकर यांनी केल्या. त्यावर पालिका आधिकाऱ्यांनी नाले सफाई तसेच पावसाळा पूर्व तयारीची झालेली तसेच सुरू असणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही, यासाठी दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर आराखडा तयार करावा, अशा सूचनाही आ. भातखळकर यांनी केल्या. बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते तसेच रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  



Featured post

Lakshvedhi