Saturday, 2 April 2022

 उष्माघातासंदर्भात ‘दिलखुलास’ कार्यक्रमात

डॉ. मधुकर गायकवाड यांची मुलाखत

            मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबईतील जे. जे. रूग्णालयाचे औषध वैद्यक विभाग प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सोमवार दि. 4 एप्रिल व मंगळवार दि. 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान कमालीचं वाढू लागलं आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशबरोबरच मराठवाड्यातील तापमानही वाढत आहे. वातावरणीय बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत असताना या काळात आपली काळजी कशी घ्यावी, उष्माघातापासून स्वत:चे रक्षण कसे करावे, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

0000


 



 


 

 हिंदू नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ब्रम्हांडाच्या निर्मिती चा दिवस! विश्वाची निर्मिती झाली आणि कालमापन चक्र सुरु झाले. आपली

निसर्गाशी समन्वय ठेवणारी हिंदू जीवनपध्दती. कालमापन सुध्दा ग्रहतार्यांच्या गतीशी समन्वय ठेवणारे!

:प्रुथ्विचे स्वभ्रमण--दिवस-रात्र

:चंद्राचे प्रुथ्विभ्रमण--१महिना

:प्रुथ्विचे सूर्यभ्रमण--१ वर्ष

:सूर्याचे आकाश गंगा भ्रमण--१ मन्वंतर =३०  कोटी ६७लक्ष मानवी वर्षे

:आकाशगंगेची ब्रम्हांड प्रदक्षिणा=कल्प=४अब्ज ३२ कोटी वर्षे=ब्रम्हाचा एक दिवस..

:ब्रम्हाचा एक दिवसरात्र=८अब्ज६४ कोटी वर्षे.

:ब्रम्हाचे आयुष्य १००वर्षे=३११०४ वरदहा शुन्य----येवढी मानवी वर्षे.

:ब्रम्हाच्या आयुष्यातील पहीली पन्नास वर्षे (प्रथम परार्ध)संपली आहेत.

:द्वितीय परार्धातील  पहिला दिवस(कल्प)सुरू आहे. कल्पाचे नाव श्वेत वराह कल्प.

:ब्रम्हाच्या एका कल्पात(दिवसात)१४मन्वंतरे  होतात.

सद्ध्या ७वे मन्वंतर(वै्वस्वत)सुरु आहे.

:एका मन्वंतरात ७१ चतुर्युगे येतात.

सद्धया २८ वे चतुर्युग सुरु आहे.(युगे अठ्ठावीस विटेवरी उभा---)

:चतुर्युग = ४ युगे= सत्य ,त्रेता, द्वापर आणि कलियुग= १७२८००० वर्षे.

: १ युग=४३२००० वर्षे.

:सद्धया कलीयुग सुरु असून ५१२३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

:अशा ब्रम्हांडाचे कालमापन प्रुथ्विवरील एखाद्या माणसाच्या जन्ममरणाशी जोडून करणे म्हणजे किती मूर्खपणा! आपल्या पूर्वजांच्या अगाध द्न्यानाची गरुडभरारी किती प्रचंड होती याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

 *चैत्राची सोनेरी पहाट,*

*नव्या स्वप्नांची नवी लाट,*

*नवा आरंभ, नवा विश्वास,*

*नव्या वर्षाची हीच तर*

*खरी सुरवात…*

*गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!*

🚩🚩💐☘️🌹

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सर्वांना

गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

‘कोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा.

राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो.

            मुंबई, दि. 1 :- “कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे...” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त महाराष्ट्रवासियांना, जगभरातील मराठीभाषीक, मराठीप्रेमी बांधवांना शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे मराठी नववर्ष आणि त्यानिमित्ताने साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचे संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री यांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता, सुरक्षिततेची सवय वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया... निरोगी, बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया..., असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

००००



 



Featured post

Lakshvedhi