Monday, 28 March 2022

 मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध

 

            मुंबईदि. 28 : सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकिर्ण प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास  विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मुंबई शहर जिल्ह्याकरिता बाल न्याय निधी आयुक्तमहिला व बाल विकास पुणे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हाकृती दलमुंबई शहर यांच्या खात्यात हा निधी जमा केलेला आहे. या रकमेचा विनियोग कोविड 19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी (शालेय शुल्कवसतीगृह शुल्कशैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशासाठी) प्रति बालक कमाल मर्यादा रु.10000/ (अक्षरी रु. दहा हजार) इतकी वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील कोविड 19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधी वितरीत करावयाचा असल्याने पात्र लाभार्थी यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहरबी.डी.डी. चाळ क्र.117, पहिला मजलावरळी- 400018 यांचे कडून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रे मुळ अर्जासह प्रस्ताव जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहर कार्यालयास सादर करावा. प्राप्त अर्जाची छाननी झाल्यानंतर ते जिल्हा कृती दल यांना सादर करण्यात येईल. आर्थिक सहाय्य मंजुरीबाबतचा जिल्हा कृतीदल यांचा निर्णय अंतिम असेल त्याप्रमाणे निधी वितरण करण्यात येईलयाची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहरदूरध्वनी क्रमांक २४९२२४८४ यांच्याकडे संपर्क साधावा.

            अर्जासोबत अर्थसहाय्य मिळण्याकरिता पुढील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्जबालकांचे शाळेचे बोनाफाईडआई वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुराव्याची झेरॉक्सआई वडील मृत्यु दाखलाबालक अथवा बालक पालकसंयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँकेचे पास बुकरद्द केलेल्या धनादेशाची मुळ प्रत, बालकाचे आधारकार्ड इ. कागदपत्रे स्वयं साक्षांकीत करुन अर्जासोबत जोडावी, असे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमुंबई शहर श्रीमती शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

-------

 वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही

- डॉ. नितीन राऊत

· वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक.

            नागपूर, दि. 28 : राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी 2 वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात येईल. प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले आहे.

            या आवाहनाला प्रतिसाद देऊन वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्या होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून चर्चा करण्याला मान्यता दिली. या चर्चेतून निश्चितपणे तोडगा निघून वीज कर्मचारी संप मागे घेतील, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

            वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या 27 वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

            सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो. उद्या मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला हजर रहावे आणि संप मागे घ्यावा, असे आवाहन डॉ.राऊत यांनी केले.                           

ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्या होणाऱ्या बैठकीला हजर राहून चर्चा करण्यास तयारी दर्शविली.

000



 समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा

समृद्धी महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री

 एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक कार मधून केली पाहणी

'ऑटो कार इंडिया' मासिकाने आयोजित केलेल्या

सुपर कार रॅलीला दाखवला हिरवा झेंडा.

            नागपूर, दि. २७ - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.

            समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या महामार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्याचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री श्री. शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला, याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल.

            या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर ८ ओव्हरपास आणि ७६ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील मंत्री श्री. शिंदे यांनी आज पाहणी केली. तसेच वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स देखील बसवण्यात येणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपास वरून वन्यजीवांनी ये जा सुरू केली असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्यांची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत.

             समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या 'ऑटो कार इंडिया' या वाहन उद्योगातील अग्रगण्य मासिकाच्या टीमने समृद्धी महामार्गावर येऊन आज विशेष भाग चित्रित केला. त्यासोबतच या महामार्गावर फेरारी, लॅमबोर्गनी, मर्सिडीज यांच्या सुपरकार्सच्या विशेष रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन श्री. शिंदे आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मासिकाच्या टीमने केलेल्या विनंतीवरून मर्सिडीजच्या नव्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडीचे सारथ्य करून या रस्त्यावरून श्री. शिंदे यांनी फेरफटका मारला.

            यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आणि एमएसआरडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

00                                              

"महाराष्ट्र सायबर" आणि "मेटा" यांच्या संयुक्त विद्यमाने

उद्या डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम.

                                        -विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची माहिती

            मुंबई, दि.27: महाराष्ट्र सायबर विभाग आणि मेटा प्लॅटफॉर्म यांच्यावतीने उद्या सोमवार दि. 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई येथे डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

           डिजिटल सुरक्षितता आणि किशोरवयीन मुले, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सायबर संबंधी सुरक्षेसाठी जागरूकता करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डिजिटल साक्षरता जागरुकतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल, हिंदी टेलिव्हिजन आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ऐश्वर्या राज भाकुनी याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून त्यांचा अनुभव कथन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विशेष पोलिस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली.

          सायबर बुलींग, सेक्सटोर्शन, डार्कनेट सर्व्हिसेस, सोशल इंजिनिअरिंग, ट्रोलिंग, आयडेंटिटी थेफ्ट याविषयी जागरूकता पसरवणे, ऑनलाइन धोक्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक साधने आणि माहिती देणे, सुसज्ज करणे, सुरक्षित ऑनलाइन वर्तनाला प्रोत्साहन देणे अशा विविध विषयांवर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 वेश्या व्यवसायातील महिलांच्या पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी

आधार व समन्वय आवश्यक.

- न्यायमूर्ती उदय ललित.

            मुंबई, दि. 28 : वेश्या व्यवसायातील महिलांच्या‍ पाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी व त्यांचे वेश्या व्यवसायातील प्रवेश रोखण्याकरिता समाजातील सर्व घटकांकडून त्यांना आधार व मार्गदर्शन करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती तसेच राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष उदय ललित यांनी केले.

            सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायमूर्ती तसेच राष्‍ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष उदय ललित, महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्‍यक्ष तथा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मा. न्‍यायमूर्ती श्री.ए.ए. सईद, उच्‍च न्‍यायालय विधी सेवा समितीचे अध्‍यक्ष तथा मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे मा. न्‍यायमूर्ती श्री.एस.एस. शिंदे, श्रीमती अमिता ललीत यांनी मुंबई जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. हितेंद्र वाणी यांच्यासह अलीकडेच मुंबईमधील खेतवाडी परिसरातील प्रेरणा संस्‍थेला भेट दिली, त्याप्रसंगी मा.न्‍यायमूर्ती श्री. ललित बोलत होते.

            मुंबईच्‍या देह व्‍यापार चालत असलेल्‍या विभागात प्रेरणा संस्‍थेतर्फे केल्‍या जाणाऱ्या कामकाजाबाबत संस्‍थेच्‍या प्रि‍ती पाटकर यांनी माहिती दिली.

            याप्रसंगी सर्व सन्‍माननीय न्‍यायमूर्ती यांनी प्रेरणा संस्‍थेच्‍या रात्र काळजी केंद्रात शिकणाऱ्या मुलांशी तसेच देह व्‍यापाराशी संबंधित काही पीडित महिलांशीही चर्चा केली व त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. तसेच त्‍यांनी तेथील मुलांद्वारे राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमांचीही माहिती घेतली. सन्‍मानपूर्वक जीवनाकरिता शिक्षण हेच महत्‍वाचे असल्‍याचे याप्रसंगी प्रेरणा संस्‍थेच्‍या आधाराने आपले शिक्षण यशस्‍वीरित्‍या पूर्ण करणाऱ्या मुलांनी नमूद केले.

            हेतू ट्रस्‍टचे सचिव श्री.रिखब जैन यांनी याप्रसंगी सदर संस्‍थेला व्‍हीडिओ प्रोजेक्‍टर भेट दिला. तुरूंग सुधारणेबाबत कार्य करणाऱ्या श्रीमती बिना चिंथलपूरी व आशियाना फाउंडेशनच्‍या श्रीमती साचि मणियार या सुद्धा याप्रसंगी हजर होत्‍या.

दत्ता ची पाऊ ले

 पादुकांना नमस्कार कसा करावा ?

पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असतात अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.

'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय. पादुकांच्या अंगठयातून (पादुकांच्या खूंट्या) आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो, त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात), तेथे टेकवावे.

श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. 

श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरूपेक्षा गुरु चरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरण पादुका यांना फार महत्व आहे. श्रीगुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.

अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सर्व दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.


गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत.

विष्णूचा जसा शाळीग्राम तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच 'मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥' असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.😊🙏💐🕉


 

जागे रहो.

 


Featured post

Lakshvedhi