Sunday, 27 March 2022

 तबारक उल्ला खान के नाम से मुमेरीयल टूर्नामेंट रखा गया है शिवली नगर मुंब्रा थाने में

➖➖➖➖➖➖➖➖ नेहाल हसन रीपोर्टर मुंबई से ➖➖➖➖ यह टूर्नामेंट 3 दिन का है जिसमें 26 तारीख को लड़कियां खेलेंगे 27से 28 पुरुषों के लिए रखा गया है महाराष्ट्र के कई जिलों से खेलने के लिए खिलाड़ियों और लड़को ने भाग लिया है यह टूर्नामेंट महफूज शेख उर्फ मामा कराते हैं उनको सहयोग करते शब्बीर खान अजीम शेख शमीम खान हिरा सीता राम पाटिल एहतेशाम शेख इक्सपोट का शौक मामा को बचपन से है और राजनीतिक का कभी शौक है 16 सालों से शिवली नगर मुंब्रा में अकेले दम पर इक्सपोट टूर्नामेंट का प्रोग्राम कराते हैं और बड़े पैमाने पर कराते हैं जब उनसे बातचीत की गई उन्होंने बताया कि हम किसी पार्टी लेवल से काम नहीं करते हैं हम अपना खुद का पैसा खर्च कर के यह सब कराते हैं और एक संस्था भी चलाते हैं जिसमें गरीब बच्चियों की शादी कराना गरीबों की मदद करना जो परेशान हाल है उसकी परेशानी को हल करना मगर हैरतअंगेज की बात यह है जब पता लगाया गया तो पता चला महफूज मामा किसी से ₹1 रुपया चंदा नहीं लेते हैं ना किसी से मदद मांगते हैं अपने अकेले दम पर जो उनसे होता है वह काम करते हैं अगर किसी को जरूरत पड़ती है आधी रात को भी तो महफूज मामा तुरंत आ जाते हैं और मुंब्रा के अंदर हर कोई उनको मामा के नाम से जानता है उनका कहना है मुंब्रा वासियों से अपनी बच्चियों को इक्सपोट सिखाएं ताकि देश का नाम रोशन करें और अपने मां बाप का भी हर मां बाप का सपना होता है कि मेरे बच्चे आगे बढ़कर नाम करें इसीलिए हमने इक्सपोट खोला है आए और उसका फायदा उठाएं महफूज मामा का कहना है हम किसी से ₹1 रुपया नहीं लेते हैं बच्चों को और बच्चियों को फ्री में इक्सपोट सिखाते हैं उनके दोस्त एहतेशाम भाई ने तारीफ करते हुए नजर आए वह मुंब्रा के समाजवादी पार्टी के उपाध्यक्ष है इसी तरह कांग्रेस राष्ट्रवादी पार्टी के सभी लोग मामा को मान सम्मान और सहयोग करते हैं वह खुद कांग्रेश राष्ट्रवादी पार्टी में है उनका कहना है खेल में कोई राजनीतिक नहीं है यह दिलों को जोड़ता है इस कार्य को हम राजनीतिक से दूर रखते हैं राजनीतिक अपनी जगह है खेल अपनी जगह और कई बड़ी हस्तियां मामा के प्रोग्राम में शामिल है


 समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा आढावा

समृद्धी महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री

 एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक कार मधून केली पाहणी

'ऑटो कार इंडिया' मासिकाने आयोजित केलेल्या

सुपर कार रॅलीला दाखवला हिरवा झेंडा.

            नागपूर, दि. २७ - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नागपूरमध्ये येऊन समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. तसेच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचे सारथ्य करून त्यांनी फेरफटकाही मारला.

            समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्झिट पॉईंट्सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या महामार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार करण्यात येणार असून त्याचे काम देखील सुरू आहे. आज मंत्री श्री. शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला, याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजित आहे. सध्या या सर्कलचे काम प्रगतीपथावर असून ते देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल.

            या महामार्गाचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विशेष काळजी घेण्यात आली आहे. वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी समृद्धी महामार्गावर ८ ओव्हरपास आणि ७६ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. या ओव्हरपासच्या कामाची देखील मंत्री श्री. शिंदे यांनी आज पाहणी केली. तसेच वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बॅरीयर्स देखील बसवण्यात येणार आहेत. आनंदाची बाब म्हणजे या ओव्हरपास वरून वन्यजीवांनी ये जा सुरू केली असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांना हे ओव्हरपास जंगलाचा भागच वाटावे यासाठी त्यांची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली असून त्यात खास झाडे देखील लावण्यात आलेली आहेत.

             समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी खास मुंबईहून आलेल्या 'ऑटो कार इंडिया' या वाहन उद्योगातील अग्रगण्य मासिकाच्या टीमने समृद्धी महामार्गावर येऊन आज विशेष भाग चित्रित केला. त्यासोबतच या महामार्गावर फेरारी, लॅमबोर्गनी, मर्सिडीज यांच्या सुपरकार्सच्या विशेष रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन श्री. शिंदे आणि एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मासिकाच्या टीमने केलेल्या विनंतीवरून मर्सिडीजच्या नव्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाडीचे सारथ्य करून या रस्त्यावरून श्री. शिंदे यांनी फेरफटका मारला.

            यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आणि एमएसआरडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

000

 बालगृहातील किशोरवयीन मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण*

*मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्थेचा संयुक्त उपक्रम*

            मुंबई, दि. 26 : कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी बालगृहातील प्रवेशितांनाही मिळावी याकरीता माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक शाळेमध्ये किशोरवयीन मुलांना ज्यूट बॅग मेकिंग व असिस्टंट वायरमन या व्यावसायिक कोर्सेसचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले.

            मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थ्यांनी बनविलेल्या ज्यूट बॅग्सची पाहणी करुन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी मुलांचे कौतुक केले. कौशल्य प्रशिक्षणाची संधी वंचित घटकापर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे सांगून या प्रशिक्षणाचा वंचित मुलांना भविष्यात निश्चितच उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

            जिल्हा केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जन शिक्षण संस्थेच्या संचालिका अरुणा मोहिते, चिल्ड्रेन एड संस्थेचे उपमुख्य अधिकारी सतीश बनसोडे यांनी नियोजन केले. 

 राज्यपालांच्या हस्ते गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान प्रदान

गोविज्ञानातून रासायनिक खतांना पर्याय, पर्यावरणातील प्रदूषण देखील कमी करता येईल.

                                         - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.

            मुंबई,दि.26 : भारतीय लोक आजही आपल्या प्राचीन संस्कृतीशी जुळले असून देशात गाय, गंगा, गीता व गायत्रीला वंदनीय मानले आहे. गौ उत्पादने आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झाले आहे. गौ उत्पादनांचा वापर केल्यास उत्तम आरोग्य राखण्यास मदत होईल तसेच गोविज्ञानाचा सुयोग्य वापर केल्यास रासायनिक खतांना पर्याय निर्माण करून पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी देखील मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

            मुंबई येथील गोरक्षक सेवा ट्रस्टच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त गोरक्षण सेवेसाठी देशाच्या विविध भागांमधील ४५ मान्यवरांना 'गऊ भारत भारती राष्ट्र सेवा सन्मान शनिवारी (दि. २६) राजभवन येथे प्रदान करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी गौरक्षक सेवा ट्रस्टचे संस्थापक व गऊ भारत भारतीचे मुख्य संपादक संजय शर्मा 'अमान', फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष तरुण राठी व पटकथा लेखक विकास कपूर आदी मान्यवर उपस्थित होते.  

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी पुणे येथील बायोगॅस तज्ज्ञ डॉ. संतोष सहाने, राजस्थानच्या कोटा येथील गौ वैज्ञानिक डॉ. महेंद्र कुमार गर्ग, डॉ. आर. एस. चौहान, डॉ. राजेंद्र तांबोळी, डॉ. रमेश पाटील, डॉ. प्रवीण निचट, डॉ. राजेश ढेरे, दिलीप कुमदास अमलानी, महेंद्र संगोई, राजेंद्र कुमार राणे, विक्रमसिंह राजपुरोहित, कालिदास पांडे, शत्रुघ्न प्रसाद, राजश्री राजेश तुडेयेकर, कॅप्टन ए. डी. माणेक, मुकुंद शांताराम व्यवहारे, फॅशन डिझायनर शायना एन सी, अनुजा झवेरी आणि डॉ. विजय गुप्ता यांसह ४५ लोकांना राष्ट्र सेवा सन्मान देण्यात आले.  

Governor Koshyari presents

Gau Bharat Bharati Rashtra Seva Samman for cow protection

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Gau Bharat Bharati Rashtra Seva Samman for cow protection and cow shelter management at Raj Bhavan Mumbai on Saturday (26 Mar).

The Gau Bharat Bharati Rashtra Seva Samman were presented to 45 individuals on the occasion of the 7th anniversary of the Gau Rakshak Seva Trust. Chief Trustee and Editor of Gau Bharat Bharati Sanjay Sharma 'Amaan'. Vice President of Film Development Council Tarun Rathi and screen play writer Vikas Kapoor were prominent among those present.

 Biogas Expert from Pune Dr. Santosh Sahane, Cow Scientist from Kota Rajasthan Dr. Mahendra Kumar Garg, Dr. R. S. Chauhan, Dr. Rajendra Tamboli, Dr. Ramesh Patil, Dr. Praveen Nichat, Dr. Rajesh Dhere, Dilip Kumdas Amalani, Mahendra Sangoi, Rajendra Kumar Rane, Vikramsinh Rajpurohit, Kalidas Pandey, Sharughan Prasad, Rajashri Rajesh Tudeyekar, Capt. A. D. Manek, Mukund Shantaram Vyavahare, fashion designer Shaina NC, Anuja Zaveri and Dr. Vijay Gupta were among those felicitated by the Governor.

Saturday, 26 March 2022

 कौशल्य विकासाला आता मिळणार सीएसआरची जोड ; राज्य शासनही देणार आर्थिक योगदान

विविध कॉर्पोरेट संस्थाउद्योग आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहयोगातून युवकमहिलादिव्यांगविधवा आदींसाठी राबविणार विविध कौशल्य विकास उपक्रम

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती

          मुंबईदि. 26 :  राज्यातील युवकमहिलादिव्यांग व्यक्तीविधवा आदींच्या कौशल्य विकासाला गती देण्यासाठी आता सीएसआर फंडातूनही मदत घेण्यात येणार आहे. राज्य शासन आणि विविध कॉर्पोरेट संस्थाउद्योग यांच्या एकत्रित सहभागातून कौशल्य विकासविषयक विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी राज्यस्तरीय कौशल्य विकास सामाजिक दायित्व निधी (CSR) व स्वेच्छा देणगी (VD) समिती स्थापन करण्यात येत आहेअशी माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

          याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्य शासनही योगदान देणार आहे. कॉर्पोरेट संस्थाउद्योग यांनी कौशल्य विकासासाठी 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी सीएसआर किंवा स्वेच्छा निधीमधून खर्च केल्यास त्यासाठी राज्य शासन 20 टक्‍क्‍यांपर्यंत शासन सहभाग देईल. त्याचबरोबर 5 ते 10 कोटी सीएसआरस्वेच्छा निधीसाठी राज्य शासन 40 टक्क्यांपर्यंत तर 10 कोटींहून अधिक निधी सीएसआरस्वेच्छा निधीमधून खर्च केल्यास त्या कार्यक्रमासाठी राज्य शासन 60 टक्‍क्‍यांपर्यंत शासन सहभाग देईलअशी माहिती मंत्री श्री. टोपे यांनी दिली.

          सामाजिक दायित्व निधी व स्वेच्छा देणगीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यात येतील.   यामध्ये प्रामुख्याने कौशल्य विकासरोजगार यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अथवा विकसित करून देणेकौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करणेमहाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठसेंटर ऑफ एक्सलन्स यांची उभारणी करणेStartups, Incubators, Researchers (Startup Parks, Exhibitions, Mini Incubators) यांना प्रोत्साहन देणेप्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण (ToTआयोजित करणेआधुनिक तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण देणेभविष्यात मागणी असणाऱ्या कौशल्यावर आधारित अत्याधुनिक प्रयोगशाळांची (Skill Labs) निर्मिती करणेआयटीआय अद्ययावत करणेऔद्योगिक आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी On Job Training आयोजित करणेकार्यशाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रसामग्रीउपकरणे व हत्यारे उपलब्ध करुन देणेयंत्रसामग्री व उपकरणांची दुरूस्ती व देखभाल करणेऔद्योगिक आस्थापनांना भेटी (Industrial Visits), प्रशिक्षणार्थ्यांना शिष्यवृत्तीModel Career Centre व Career Guidance & Counselling Centre तयार करणेराज्यस्तरीय रोजगार मेळावे आयोजित  करणेस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र शिबीर आयोजित करणेत्याकरिता Online lecture, Digital Content इत्यादी विकसित करण्याकरिता सहाय्य करणेप्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्यासाठी डिजिटल लायब्ररी आणि e -Learning प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणेKnowledge Partnership साठी प्रोत्साहन देणेपरदेशी जावू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करणेसर्वसमावेशक पोर्टलIT Platform विकसित करणेकौशल्य स्पर्धातंत्रप्रदर्शन आयोजित करणे असे विविध उपक्रम या कार्यक्रमातून राबविण्यात येणार आहेतअसे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

          शिक्षणव्यावसायिक प्रशिक्षणरोजगाराभिमुख शिक्षणाचा मुलेमहिलावयस्कर आणि अपंग यांमध्ये प्रसार करणेस्त्रियांच्या हक्कांसाठीसक्षमीकरणासाठी काम करणेशैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञानाधारित प्रयोगशाळांसाठी आर्थिक मदत करणेसामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांची असमानता कमी करण्याच्या उपाययोजना राबविणे यासाठी केंद्र शासनाच्या सीएसआरसंदर्भातील धोरणांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल. यासाठी विविध कॉर्पोरेट संस्थाउद्योग यांनी पुढे यावेअसे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले आहे.

0000

 

वृत्त क्र. 1027

राज्यात आता कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेचे सहकार्य;

महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविणार

कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती

            मुंबईदि. 26: राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांच्या सहकार्याने ज्ञान आदान-प्रदानता (knowledge Sharing), अनुभव आणि उपक्रम यांच्या माध्यमातून उद्योजकता आणि नाविन्यतेच्या वृद्धीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प (महाराष्ट्र स्किल डेव्हेलोपमेंट प्रोजेक्ट -MSDPराबविण्यात येणार आहेअशी माहिती कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

            मंत्री श्री. टोपे साहेब यांनी या प्रकल्पाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालास नुकतीच मान्यता दिली. यानंतर राज्याच्या कौशल्य विकासाचा विस्तृत आराखडा (PPRजागतिक बँकेसमोर सादर केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर राज्यात कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगारात वाढ होईलअसा विश्वास मंत्री श्री. टोपे यांनी व्यक्त केला.

            यासंदर्भात कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्माइतर वरिष्ठ अधिकारी आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत बैठकांचे आयोजन केले होते. यामध्ये या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. आता मंत्री श्री. टोपे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने जागतिक बँकेच्या सहकार्याने लवकरच हा प्रकल्प आकारास येणार आहे.


 


Aurvedic

 *कारले : सहजसुंदर सर्वत्र उपलब्ध होणारे अमृतफळ ….*

“कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले, तरीही कडू ते कडूच! ” अशी ओळख असणा-या कारल्याचं नाव ऐकताच जीभेची चव कडवट होते. पण कारल्याच्या कडूपणावर जाऊ नका. कारण कारल्याइतकी बहुगुणी भाजी दुसरी कोणती नसेल. ग्रीष्मात आढळणाऱ्या भाज्यांमध्ये कारले एक आहे. कारल्याची वेल बरीच वर्षे जगणारी असते ती ब-याच ठिकाणी आपोआप उगवलेली सुद्धा दिसते. चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अती प्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. संस्कृतमध्ये कंदुरा (करवल्ली), हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये कॅरीला फ्रुट किंवा बिटर गार्ड म्हणून ओळखले जाणारे कारले ही वनस्पती कुकरबिटेसी या कुळातील आहे.

कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार सबंध भारतात आढळतात.

कारले सर्व सामान्य आहारामध्ये वापरले जात असले तरी ते एक उत्तम औषध म्हणून वैद्य पाहतात.

*हल्ली बाजारात मिळणारी हायब्रीड आणि मोठी कारली शक्यतो आहारात वापरू नयेत.*

भरपूर रेषा असणारी आणि मध्यम आकाराची कारली वापरावीत.

*औषधी गुणधर्म :*

आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत. कारल्याची पानेही ज्वरनाशक, कृमीनाशक व मूत्रल आहेत. कारल्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात तर ‘ब’ जीवनसत्त्व थोडय़ा प्रमाणात असते. या सर्व औषधी गुणधर्मामुळे कारले ही शक्तीवर्धक, पुष्ठीकारक व सारक असल्यामुळे आहाराबरोबरच औषध म्हणूनही वापरतात.

*कारल्याचे औषधी उपयोग आपण पाहूया …*

१) कारले रक्त आणि लघवी मधली साखर कमी करते. वजन वाढलेले आहे आणि मधुमेह आहे अशा लोकांनी आहारात कारले नियमित ठेवावे. कारल्याचा थेट रस कपभर किंवा ग्लासभर घेउ नये. घेतलाच तर जास्तीत जास्त चार ते सहा चमचे एवढाच घ्यावा. तोही कपभर पाण्यात मिसळून घ्यावा.

२) चरबी वाढल्यामुळे होणारे आजार आणि विषबाधा यावर नियमित कारले सेवन करणे हे फार मोठे आणि साधे औषध आहे.

३) अंगाला पिसू सारखे कीटक चावल्याने अंगाची आग होत असेल तर कारल्याच्या पानांचा रस अंगास चोळावा.

४) तोंडाला चव नसेल, भूक लागत नसेल, पचन होत नसेल तर कारल्याची भाजी नियमित खावी.

५) कारले उत्तम रक्तशुद्धी करते त्यामुळे त्वचारोग असणा-या लोकांसाठी ती एक नवसंजीवनी आहे.

६) पाळीच्या विकारात कारले उत्तम असून वेळेवर पाळी येत नसेल किंवा पाळी अचानक बंद झाली असेल तर कारल्याचे नियमित सेवन करावे.

७) रातआंधळे पण असेल तर डोळ्यावर पानांचा लेप लावतात.

८) अंगावर सूज असेल तर कारल्याचा रस सकाळी घेतल्यास फायदेशीर आहे.

९) दमा, सर्दी, खोकला अशा श्वसन मार्गाच्या तक्रारी असतील तर कारल्याचा रस व तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून त्यात मध मिसळून महिनाभर घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून हे विकार दूर होतात.

१०) जंत-कृमी झाले असतील तर कारल्यांच्या पानांचा रस कपभर नियमितपणे आठ दिवस द्यावा. यामुळे सर्व कृमी शौचावाटे पडून जातात.

११) आम्लपित्ताचा त्रास होत असेल कारले नियमित सेवन करावे.

१२) कारल्यांच्या पानांचा ३ चमचे रस एक ग्लासभर ताकातून रोज दुपारी महिनाभर घेतल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. या सोबत कारल्याची मुळे स्वच्छ धुवून वाटून त्याचा कोंबावर लेप लावल्यास मूळव्याधीचे कोंब नाहीशी होतात.

१३) खरूज, खाज, नायटे, चट्टे अशा त्वचाविकारांवर कारल्याच्या कपभर रसात चमचाभर लिंबूरस घालून तो उपाशीपोटी सावकाश प्यावा. नियमितपणे असा रस घेतल्याने रक्तदोष कमी होऊन रक्तशुद्ध होते व पर्यायाने त्वचा विकार कमी होतात.

१४) मधुमेह झालेल्या रुग्णांनी कोवळ्या कारल्यांचे बारीक काप करून ते उन्हामध्ये सुकवून त्याचे बारीक चूर्ण करावे व हे चूर्ण दररोज सकाळ, संध्याकाळ ५-५ ग्रॅम (अर्धा चमचा) नियमितपणे घ्यावे. यामुळे साखर नियंत्रणात राहते.

१५) दारू पिणाऱ्या रुग्णांची यकृताची हानी होते. ती हानी भरून काढण्यासाठी व दारूचे व्यसन सोडण्यासाठी कारल्यांच्या पानांच्या रस रोज सकाळ-संध्याकाळ कपभर घ्यावा.

१६) कावीळ या विकारांमध्ये ताज्या कारल्यांचा रस सकाळ-संध्याकाळ प्यावा यामुळे कावीळ दूर होते.

१७) यकृताच्या सर्व विकारांमध्ये कारल्याचा रस अत्यंत उपयुक्त असतो.

१८) कारल्याच्या पानांचा कल्क, हळद, तीळ तेलात उकळून हे तेल त्वचेला लावल्यास जुने त्वचा विकार तसेच सोरायासीस हा विकार दूर होतो.

Featured post

Lakshvedhi