Saturday, 26 March 2022

अर्थसंकल्प

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर

सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी.

‘सीएनजी’वरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3 टक्के झाल्याने

राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; 1 एप्रिलपासून नवे दर

            मुंबई, दि. 26 : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने शुक्रवार दि.25 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

000

राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा

            मुंबई,दि.26 : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील 11 पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा एका बैठकीत विस्तृत आढावा घेतला. मुंबई, पुणे, नागपूरसह विविध विद्यापीठांमधील इनोव्हेशन, इन्क्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत शुक्रवारी (दि.25) राजभवन येथे झालेल्या बैठकीत राज्यपालांनी हा आढावा घेतला.

            विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्टार्टअप्स व उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या कार्याचा राज्यपालांनी यावेळी विद्यापीठनिहाय आढावा घेतला.

            विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे मत व्यक्त करून राज्यपालांनी प्रत्येक विद्यापीठांच्या यशोगाथा वाढावयास पाहिजे असे मत व्यक्त केले. विद्यापीठांनी इन्क्युबेशन केंद्रातून काय सुविधा दिल्या, विद्यापीठांमधून किती पेटंट्स मिळाले तसेच विद्यापीठांच्या नवसंकल्पनांना किती बीज भांडवल मिळाले याची देखील राज्यपालांनी चौकशी केली. 

       यावेळी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व इतर विद्यापीठांच्या कार्याचे कौतुक केले तसेच विद्यापीठांनी परस्परांकडून शिकावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

000

Maharashtra Governor reviews work of Universities on Innovative Ideas, Incubation, Start Ups

Maharashtra Governor and Chancellor of State Universities Bhagat Singh Koshyari had a meeting with directors of Innovation, Incubation and Linkages in traditional universities of Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Friday (25th Mar).

The Governor witnessed the presentations made by the Directors of all 11 traditional Universities and discussed the innovative ideas being encouraged by the universities through innovation.

He reviewed the work being done by the universities to promote entrepreneurship and startups. Mentioning that the nation wants its youths to become job creators and not job seekers, he expressed the hope that the number of success stories coming from the universities will increase. In this connection, the Governor praised the work done by the Savitribai Phule Pune University, Sant Gadge Baba Amravati University and other universities. He asked universities to coordinate among each other to share their successful initiatives.


000



हसू नका.

 *रिटायर झाल्यावर लोक काय करतात याची यादी.* 


१) गरज नसताना दूध आणायला जाणे. 

२) गेटबाहेर झाडू मारणे,सडा टाकणे. तरी बरं रांगोळी येत नाही,नाही तर ती पण काढली असती.

३) दिवसभर वॉचमन सारखे खिडकीत बसून राहाणे. 

४) प्रत्येक काम मीच करायला पाहिजे,असा उगाच तगादा लावणे आणि बाकीचे कसे बीना कामाचे आहेत हे दाखवून देणे.

५) पाण्याची टाकी भरेपर्यंत उगाच उभे राहाणे, Automatic असली तरी उगाच गच्चीवर जाऊन टाकीत डोकावणे.

६) गरज नसताना बँकेत जाऊन निरर्थक वाद घालणे आणि मी किती कामात पटाईत होतो हे पटवून द्यायचा प्रयत्न करणे.

७) मुलाचे फेकून दिलेले शर्ट, टी शर्ट,शूज उगाचच वापरायला काढणे.

८) कार जर बाहेर काढायची म्हंटले, तरी उगाच फालतू चौकश्या करणे. 

९) उगाचच चट्ट्या पट्याची हाफ पॅन्ट घालून गेटमधे किंवा मागच्या दारात उभे राहाणे. 

१०) बिनकामाचे फोन करुन उगाचच काड्या करीत बसणे. 

११) येणार्या जाणार्याला उगाचच एखाद्या नातेवाईका विषयी गा-्हाणी सांगत बसणे आणि स्वतःचे हसे करुन घेणे. 

१२) नातवांचे मित्र/मैत्रिणी दारात खेळायला आले की अंगावर खेकसणे. 

१३) कुठे बाहेर जायचे म्हंटले ,तरी कार मधे पुढे बसायचा यांचाच मान आणि परत वर Driving चे धडे. (गाडी चालवायला येत नसली तरी!) 

१४) एखादी आवडती सिरीयल/सिनेमा लागला म्हणून बघत बसले,की यांची फालतू बातम्या बघायची वेळ होते!!

१५) बजेट,संसद सभागृहातला गोंधळ समजत नसला तरी वेड्यासारखे tv वर बघत बसणे. 

१६) सर्वांचे एकमत झाले असताना मला का विचारले नाही,म्हणून रुसणे आणि विचारले असताना मला कशाला विचारता,म्हणून झटकून टाकणे. 

१७) आपल्याला मोबाईल मधले फार कळते,हे समवयीन असलेल्या म्हाताऱ्याला दाखवत काहीतरी सेटींग चेंज करणे. १८) एखादी गोष्ट नवीन करताना,उदा: घरातील फर्निचर,फॅब्रीकेशन उगाच स्वतःच्या कारागीराला बोलवून ती गोष्ट चौपट खर्च करून बनवणे आणि ती कितीही वेडी वाकडी झालेली असली,तरी जाणाऱ्या,येणाऱ्याला दाखवून हसे करून घेणे. १९) उगाचच जुने वाहन, उदा:Scooter अथवा मोटर सायकल न विकता ठेऊन देणे,कधीतरी काढून उगाच फार मोठ्ठा मेकॅनीक असल्या सारखे कीका मारत बसणे,प्लग साफ करत बसणे.

२०) लाईटबील, फोनबील जास्त येते म्हणून जाता येता लाईट बंद करणे,आपण फोनवर बोलताना रागाने पहाणे आणि स्वत: फोन वरून कोणा बरोबर तरी तासन तास कागाळ्या करीत बसणे.

२१) संध्याकाळी बागेत फिरायला जाणे आणि तासन् तास बाकडे अडवून बसून राहणे. 

२२) पिवळी गोळी, निळी गोळी अशा प्रकारे गोळ्यांची नावे लक्षात ठेवणे म्हणजे डॉक्टर तपासायला आला की वेडाच व्हावा!! 

२३) कारण नसताना सोसायटीच्या कामाचे झेंगट गळ्यात घेणे. 

*सर्व सेवा निवृत्त लोकांनी हे वाचावे व आपण यातले काय काय करतो, ते तपासणे. तुमचा स्कोर १३ पेक्षा जास्त झाला, तर अधून मधून शेगांवला गजानन महाराजांच्या किंवा वज्रेश्वरी व गणेशपुरी,अकलोली येथे दर्शनाला जात जावे!!*

 विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी;

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.

- अजित पवार.

            मुंबई, दि. 25 : राज्य शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्देशाप्रमाणे पंचसुत्रीनुसार निधीचे वाटप करण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यावर महाविकास आघाडी शासन कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. पवार बोलत होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील विकासासाठी राज्य शासनाने भरीव निधी दिला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातही मागच्या तुलनेपेक्षा वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा या भागाचा अनुशेष दूर करण्यासाठी वैधानिक विकास मंडळाची मुदत नाकारली नाही. मुदत वाढविण्याबाबत शासन विचाराधीन आहे. निधीचे नियोजन करताना राज्यपालांच्या निर्देशाप्रमाणे ठरवून दिलेले सूत्र विचारात घेऊन करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाड्यासाठी शासनाने निधी वाटपात झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.


सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री तुर्तास नाही

            राज्यातील सुपर मार्केटमध्ये मद्य (वाईन) विक्रीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या निर्णयाबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर मद्य (वाईन) विक्रीबाबत यथायोग्य निर्णय घेण्यात येईल. जनतेला नको असलेले निर्णय लागू करण्याची राज्य सरकारची भूमिका नाही. राज्यात मद्यावरील कर कमी केल्यामुळे उत्पन्न वाढले. मद्यावरील कर 300 टक्क्यांवरुन 150 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला. हा कर कमी केल्यापासून उत्पन्नात 100 कोटीवरुन 300 कोटी रुपयांपर्यत वाढ झाल्याची माहिती देखील श्री. पवार यांनी दिली.

            वीज महामंडळाचे शासनाकडील जे देणे बाकी होते ते हक्काचे पैसे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा पैसा ताबडतोब वीज महामंडळाला वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीज परवडत नसल्यामुळे राज्यातील काही प्रकल्प इतरत्र स्थलांतरीत होत होते. त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि राज्यात उद्योग टिकून राहावे. यासाठी उद्योगांना वीज सवलतीही राज्य शासनाने दिल्या असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

            पदभरती प्रक्रियेत विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी सभागृहात केल्या होत्या. त्याला उत्तर देताना श्री. पवार यांनी भरती प्रक्रियाही शासनाने ठरवलेल्या चक्राकार पद्धतीनेच होतील याकडे जातीने लक्ष दिले जाईल. यासाठी समिती गठीत करण्यात आली असून लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही सांगितले. 

            या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र वायकर, अमित साटम, अबु आजमी, अतुल भातखळकर, प्रशांत ठाकुर, रईस शेख, कालीदास कोळंबकर, श्रीमती मनिषा चौधरी आदींनी सहभाग घेतला होता.

०००००


 

 


रानमेवा हावाहवासा


 



 





 

Featured post

Lakshvedhi