Thursday, 24 March 2022

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झोपडीधारकांना सदनिकांच्या चाव्या, ताबा पत्रांचे वाटप.

मिठी नदी, विमानतळ प्राधिकरण जागा बाधितांचे पूनर्वसन

            मुंबई, दि. 24 :- मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांना आज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदनिकांची चावी तसेच ताबा पत्रांचे वाटप करण्यात आले.

            विधान भवन येथील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास राजशिष्टाचार, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, संसदीय कार्य तथा परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, आमदार दिलीप लांडे आदी उपस्थित होते.

            मिठी नदी शेजारील क्रांतीनगर, संदेशनगर परिसरातील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांचे एचडीआयएल संकुल, प्रीमियर कॉलनी, कुर्ला(प) येथे पुनर्वसन करण्यात येत आहे. सन २००५ च्या अतिवृष्टीमध्ये क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरी, बामनडायापाडा या परिसरात मोठी हानी झाली होती. त्यामुळे या परिसरातील बाधित झोपडीधारकांचे पूनर्वसन करण्यासाठी सन २००८ मध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या सदनिकांचे ताबा पत्र व चाव्यांचे वाटप संबंधित सदनिकाधारकांना करण्यात आले. यावेळी उपस्थित सदनिकाधारकांनी समाधान व्यक्त केले.

0000



बास्केबॉल

 


 बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौ.फूटपर्यंतच्यासर्व निवासी मालमत्तांना करातून सूट

                                                            - प्राजक्त तनपुरे

 

            मुंबईदि. 23 : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 46.45 चौ.मीटर (500 चौ.फूट) किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांना दि. 1 जानेवारी 2022 पासून संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये (500 चौ.फूट) अथवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारती अथवा निवासी गाळ्यांवर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात संपूर्ण करमाफी करण्यात आली आहेअशी माहिती, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत दिली.

            याबाबत विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री श्री.तनपुरे बोलत होते.

            या कर सुधारणेद्वारे मिळणाऱ्या सवलतीचा लाभ हा मालमत्तेच्या क्षेत्रफळावर अवलंबून आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील गावठाणकोळीवाडे व आदिवासी पाडे या ठिकाणी स्थित निवासी मालमत्तेचे क्षेत्रफळ हे 500 चौ.फूट पेक्षा कमी असल्यास याचा लाभ होत आहे. यामध्ये जवळपास 16 लाख निवासी मालमत्ता करधारकांना लाभ होणार आहे.

००००सर्व निवासी मालमत्तांना करातून सूट


                                                            - प्राजक्त तनपुरे.

            मुंबई, दि. 23 : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 46.45 चौ.मीटर (500 चौ.फूट) किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांना दि. 1 जानेवारी 2022 पासून संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये (500 चौ.फूट) अथवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारती अथवा निवासी गाळ्यांवर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात संपूर्ण करमाफी करण्यात आली आहे, अशी माहिती, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत दिली.

            याबाबत विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री श्री.तनपुरे बोलत होते.

            या कर सुधारणेद्वारे मिळणाऱ्या सवलतीचा लाभ हा मालमत्तेच्या क्षेत्रफळावर अवलंबून आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील गावठाण, कोळीवाडे व आदिवासी पाडे या ठिकाणी स्थित निवासी मालमत्तेचे क्षेत्रफळ हे 500 चौ.फूट पेक्षा कमी असल्यास याचा लाभ होत आहे. यामध्ये जवळपास 16 लाख निवासी मालमत्ता करधारकांना लाभ होणार आहे.

००००

 जावळी तालुक्यातील 21 गावांच्या पाणीप्रश्नी

जलजीवन मिशन योजनेत समावेश करणार

                                                     - गुलाबराव पाटील

            मुंबई, दि. 23 : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील 21 गावांचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत समावेश होता. सन 2014 पासून प्रादेशिक करंजे योजनेचा वीज पुरवठा थकबाकी असल्यामुळे कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना बंद आहे. या गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशन येाजनेत समावेश करुन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

            याबाबत विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री श्री.पाटील बोलत होते.

            याबाबत कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभाग यांच्याकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव सादर केला आहे. हा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव शासनाकडे सादर होणार आहे. त्यानंतर या प्रस्तावाला मान्यता देऊन स्वतंत्र योजनांचे सुधारणात्मक पुनर्जोडणी योजनांना विहित पद्धतीने मंजुरी देऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले

 


 




Featured post

Lakshvedhi