Wednesday, 23 March 2022

प्रेस,कल्याण निधी

 शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत सध्या 35 कोटींची तरतूद

                                             - कु. अदिती तटकरे.

            मुंबई, दि. 22 : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत सध्या 35 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेत मुदतठेव स्वरूपात गुंतवण्यात आले असून त्यावरील मिळणाऱ्या व्याजामधून राज्यातील पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात वारसांना मदत करण्यात येत आहे असे माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी सांगितले.

            याविषयी विधानसभेचे सदस्य रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना कुमारी तटकरे बोलत होत्या.

            या योजनेंतर्गत अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्याची पत्नी/पती तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले यांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आजवर 258 पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांना एकूण रु.१ कोटी ५८ लाख ५२ हजार ७११ एवढी रक्कम वैद्यकिय कारणास्तव आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

            पत्रकारांना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केशरी व पिवळे शिधापत्रिकाधारक किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असलेल्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्यातील पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांना याचा फायदा झाला आहे. याच दृष्टीकोनातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पत्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

            महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच अनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता त्याअंतर्गत आजवर 29 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावरही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0000000

 नामांकित इंग्रजी निवासी शाळेसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करावे.

            मुंबई, दि. 22 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेशासाठी 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे मुंबई येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

            यामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश देण्यात येतो. इयत्ता 1 ली व इयत्ता 2 री मध्ये प्रवेश घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावे व पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 31 मार्चपर्यंत 2022 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.




 

 






सुप्रभात

 



जय हो बाबा की

 *बाबा नेहमीच मागे का असतात*.??? हे माहित नाही. 🤔

◆ आई नऊ महिने ओझं वाहते, वडील २५ वर्षे ओझं वाहतात. दोघेही बरोबरीचे आहेत, तरीही... *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही. 

◆ आई कुटुंबासाठी मोबदला न घेता काम करते, बाबा कुटुंबासाठी सर्व पगारच खर्च करतात. दोघांचे प्रयत्न समान आहेत. तरीही... *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.

◆ आई आपल्याला पाहिजे ते शिजवते. बाबा आपल्याला पाहिजे ते खरेदी करतात. दोघांचे प्रेम समान आहे, परंतु आईचे प्रेम वरिष्ठ म्हणून दर्शवले जाते. *बाबा मागे का पडतात* ??? हे माहित नाही.

◆ जेव्हा आपण फोन करतो तेव्हा आपल्याला आधी आईशीच बोलावेसे वाटते. दुखापत झाल्यास आपण ‘आई गं’ असेच ओरडतो. जेव्हा आपल्याला वडिलांची गरज असते तेव्हाच आपल्याला त्यांची आठवण होते. परंतु वडिलांना कधीच वाईट वाटले नाही, की इतर वेळी मुलांना आपण आठवत नाही. पिढ्यानपिढ्या मुलांचे प्रेम मिळवतांना आपण पाहतो, की *बाबा नेहमीच मागे पडतात* का...??? हे माहित नाही.

◆ कपाटांमध्ये रंगीबेरंगी साड्या आणि मुलांसाठी पुष्कळ कपडे भरलेले असतात, परंतु वडिलांकडे फारच कमी कपडे असतात. कुटुंबियांच्या गरजेपुढे त्यांना स्वतःच्या गरजेची काळजी नसते. तरी... *बाबा अजूनही मागे का आहेत* ??? हे माहित नाही.

◆ आईकडे सोन्याचे अनेक दागिने असतात, पण वडिलांकडे एकच रिंग असते, कदाचित ती ही नसते. तरीही आई कमी दागिन्यांची तक्रार करते, आणि बाबा कधीच करत नाहीत. तरी अजूनही *बाबा मागे का आहेत* ??? हे माहित नाही.

◆ आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी बाबा आयुष्यभर खूप कष्ट करतात. पण घरातच जेव्हा जेव्हा ओळख मिळते, तेव्हा *बाबा नेहमीच का मागे पडतात*??? हे माहित नाही. 

◆ आई म्हणते, ह्या महिन्यात मुलांची शिकवणी फी देण्याची गरज आहे. सणानिमित्त मला साडी घेऊ नका, परंतु वडिल स्वतःसाठी नव्या कपड्यांचा साधा विचारही करत नाही. तरीही... *बाबा का मागे पडतात* ??? हे माहित नाही.

◆ आई-वडील म्हातारे झाल्यावर मुले म्हणतात, आई कमीत कमी घरातील कामात मदत करते, पण ते म्हणतात, बाबा निरुपयोगी आहेत. *बाबा मागे का पडतात*..??? हे माहित नाही.

●●● वडील *मागे, ‘मागच्या बाजूला’* आहेत. कारण *ते कुटुंबाचा कणा आहेत.* त्यांच्यामुळेच आपण सगळे उभे आहोत.

म्हणून तर ते... *मागे* आहेत.

●●● *आई श्रेष्ठ आहे.* पण, म्हणून... *बाबा कनिष्ठ नाहीत,* एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ...

*❤️...कुठलाही मोठेपणा न मिरवणारा बाबा आमचा भक्कम आधार आहे.*❤ *लेकरू आईच्या उदरात ९ महिने असते पण बापाच्या डोक्यात कायम असते तरी बाबा मागे का*🙏🏻🙏🏻

🙏 *सर्व बाबांना समर्पित..* 🙏

🕉️जय भोलेनाथ🕉️




 

Featured post

Lakshvedhi