Saturday, 19 March 2022

 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद.

 'मुंबई येथे सुरक्षित वाटत असल्याची विद्यार्थ्यांची भावना'

            मुंबई, दि.19 : विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. १९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली. 

            राज्यपालांनी यावेळी सर्व पाहुण्या विद्यार्थ्यांना रंग लावला व सर्वांना पुरण पोळीची मेजवानी दिली.    

            भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर मुंबई येथे शिक्षण घेत असलेले दक्षिण आफ्रिका, काँगो, अफगाणिस्तान, दक्षिण सुदान, श्रीलंका, स्वाझीलँड, पॅलेस्टाईन, नेपाळ व बांगलादेश येथील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.  

            मुंबई येथे आपल्याला सुरक्षित वाटते असे यावेळी बोलताना विद्यार्थिनींनी सांगितले तर शिक्षणानंतर भावी करिअर देखील मुंबईतच करायला आवडेल असे काही विद्यार्थ्यांनी राज्यपालांना सांगितले.  

            या भेटीचे आयोजन वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ, मुंबई विभागाच्या पुढाकाराने करण्यात आले होते. यावेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी तसेच वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथचे आंतरराष्ट्रीय सचिव भूषण ठाकरे उपस्थित होते.    

            उपस्थितांपैकी बहुतांशी विद्यार्थी वाणिज्य, विज्ञान व व्यवस्थापन शाखेचा स्नातक अभ्यासक्रम करीत आहेत तर दोन विद्यार्थी आयआयटी मुंबई येथे पीएचडी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

            International Students in Mumbai celebrate Holi with Maharashtra Governor

            A group of 25 international students and researchers pursuing higher education at various educational institutions in Mumbai celebrated the festival of colours with Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Saturday (19th Mar)

            The Governor applied colour to the students and treated them with the Maharashtrian special dish of Puran Poli.

            Speaking on the occasion some students told the Governor that they are privileged to be pursuing education in Mumbai. They said they felt very safe in Mumbai. Some of the students added that they would like to pursue their careers in Mumbai on completion of their studies.

            The visit of the international student was organised by the Mumbai Chapter of the World Organisation of Students & Youth. International Secretary of the Organisation Bhushan Thakare and Regional Director of Indian Council of Cultural Relations Renu Prithiani were present.  

            Most of the students coming from South Africa, Afghanistan, South Sudan, Sri Lanka, Swaziland, Congo, Palestine, Nepal and Bangladesh are pursuing Commerce, Science or Management under graduate programmes while a couple of them are pursuing Ph.D with IIT Bombay on the scholarship granted by the Indian Council of Cultural Relations.

0000

 






*काश्मीरच्या अनंत जुन्या कथा*
(मायथोलॉजी नाही, मिथ्या नाही हे ठासून सांगत) -- 

काश्मीर हे ज्ञानसाधनेचे केंद्र म्हणून कश्यप ऋषींनी वसवले. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासुन. *'काश्यपस्य मीर'*! संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. 

काश्यप हे सध्या सुरू असलेल्या वैवस्वत मन्वंतरातील मरीची या सप्तॠषींपैकी एक असलेल्या ऋषींचे पुत्र. त्यांचा वंशजांचे काश्यप गोत्री  हे गोत्र ठरले.

प्रजापती दक्षांच्या तेरा कन्यांचा विवाह काश्यपांसोबत झाला होता. देवता, दानव, यक्ष, गरुड व नाग हे सर्व काश्यपाचीच संतती आहेत.

मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते. भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे, हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी आपली मेहुणी सतीला हे सरोवर आंदण दिले तेव्हापासून या सरोवराला  *'सतीसार'* हे नाव पडले.

जलोद्भव नावाच्या दुष्ट दैत्याने या सरोवराचा आश्रय घेऊन परिसरातील लोकांना त्रस्त करून टाकले होते. परिसरातील लोकांनी काश्यप ऋषींना जलोद्भवाच्या क्रौर्याची व  आतंकाची माहिती देऊन त्यांना यातुन वाचवण्याची प्रार्थना केली. काश्यपांनी त्यांच्या नाग वंशीय ज्येष्ठ पुत्र  अनंत (शेष) नाग नावाच्या मुलाला बोलावून जलोद्भवाचा आतंक संपवण्याची आज्ञा केली. शेषाने सरोवरातील पाणी सोडुन देऊन सरोवर कोरडे करायचे व त्यामुळे उघड्यावर पडलेल्या जलोद्भव दैत्यास भगवान श्री विष्णूंच्या हातून मारावयाची नीती आखली.

याच नीतीनुसार सरोवराच्या पश्चिमेला 'वराहमुख' (सध्याचे बारामुल्ला)  नावाची दरी (घाटी) खोदून त्याद्वारे सरोवरातील सर्व पाणी सर्व बाजूंना जमिनीने वेढलेल्या 'काश्यप ' सागरात वहावुन देण्यात आले. स्वतःचे जल संरक्षण नाहीसे झाल्याचे बघुन जलोद्भव दैत्य सरोवराबाहेर उघड्या मैदानात आला तेव्हा श्री विष्णूंनी त्याचा वध केला.

कोरड्या पडलेल्या या सरोवराच्या ठिकाणी मग वेद उपनिषद आदी शास्त्रांचे अध्ययन केंद्र विकसीत झाले. ज्या जागेत अशा अतिशय समृद्ध संस्कृतीचा उगम व विकास झाला त्या जागेवर वसलेल्या नगराचे नाव आहे *'श्रीनगर'* अनंताने  श्रीनगरच्या बाजूलाच अजून एक शहर वसवले होते व त्या नगराचे नाव आजदेखील 'अनंतनाग'  आहे. तिथे आज *'अनंतनाग'* जिल्हाचे मुख्यालय आहे 

श्रीनगर हे लवकरच भरभराटीस व प्रसिद्धीस आले. देवी गौरी व गणेश हे नियमितपणे इथे येत असत. गौरींच्या येण्याचा मार्ग *'गौरी मार्ग'* म्हणजेच आजचे 'गुलमर्ग' म्हणुन ओळखला जातो. कल्हणाने 'नीलमत पुराणाच्या' संदर्भाने लिहीलेला 'राजतरंगिणी' हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा प्रमाणग्रंथ मानल्या जातो. जगभरातील विद्वान काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी याच ग्रंथाचा संदर्भासाठी वापर करतात.

काश्मीरची अधिष्ठात्री देवी शारदा आहे.
*"नमस्ते शारदे देवी काश्मीरपूरवासिनी,*
*त्वमहं प्रार्थये नित्यम् विद्यादानंच देहि मे"*

शारदादेवीला काश्मीरपुरवासिनी म्हटले आहे. काश्मीरी भाषेच्या लिपीला 'शारदा' म्हटले जात असे व काश्मीरातील अध्ययनाच्या अनेक केंद्राना *'शारदा पीठ'* म्हणत असत. संपूर्ण काश्मीरच कधी काळी *'शारद देश'* म्हणुन ओळखला जायचा.

आठव्या शतकात आद्य शंकराचार्य काश्मीरला आले तेव्हा काश्मीर हे शैव  संप्रदायाचे प्रमुख केंद्र होते. गोपालाद्री पर्वत शिखरावरच आद्य शंकराचार्यांनी शिव व शक्तीच्या एकरूपतेचे वर्णन करणाऱ्या 'सौंदर्य लहरी' ची रचना केली. त्या टेकडीलाच आज *'शंकराचार्य टेकडी'* म्हणून ओळखले जाते.

सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या कृष्णगंगा नदी काठी असलेल्या शारदा मंदिराचे सौंदर्य बघुन शंकराचार्यांना तुंगा नदीच्या तीरावर वसलेल्या शृंगेरी येथे तसेच मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली.

शृंगेरीच्या मंदिरातील शारदेची चंदनाची मुळ काष्ठमूर्ती (विग्रह) काश्मीरमधुनच आणण्यात आली आहे.

आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसहित काश्मीरात फिरत असताना एक प्रसंग घडला. एका काश्मीरी पंडित जोडप्यानी शंकराचार्यांना काही दिवसांसाठी त्यांचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना केली.

शंकराचार्यांनी त्यांची प्रार्थना मान्य करण्यापूर्वी ते व त्यांचा शिष्य परिवार स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खातील ही अट घातली. ही अट ऐकून त्या जोडप्याला त्यांच्या आदरातिथ्याबद्दल शंका घेतल्यासारखे वाटले परंतू त्यांनी ही अट मान्य केली. सायंकाळी पाकसिद्धीसाठी आवश्यक तो शिधा व इंधनादी देऊन यजमान दाम्पत्य निद्रीस्त झालं. परंतू या सर्वांसोबत ते अग्नी प्रज्वलित करण्यासाठी काही सामान द्यायचे विसरले होते. शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना यजमानांना त्रास देण्याची मनाई केली व त्या रात्री ते काहीही न खाताच झोपले.

दुसऱ्या दिवशी शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.
शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला. हे बघून शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खूप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून आले.

रामानुजाचार्यांनी अकराव्या शतकात काश्मीरला भेट दिली. केवळ काश्मीरातच उपलब्ध असलेल्या *'ब्रह्मसुत्रां'* चा अभ्यास करून 'श्रीभाष्य' लिहीले. रामानुजांना तो ग्रंथ ग्रंथालयात केवळ  वाचण्यासाठी बघण्याची अनुमती मिळाली होती. तिथे कोणतेही टिपण काढण्याची त्यांना अनुमती नव्हती.
रामानुजार्य व त्यांचे शिष्य कुरूत्थलवर प्रतिदिनी ग्रंथालयात जाऊन अक्षर अन् अक्षर पाठ करून घेत. शारदापीठात परतल्यावर सगळे पाठांतर आठवून त्यांनी ग्रंथरचना केली. असे तीन महिने त्यांनी पाठांतर करून व आठवुन *'श्रीभाष्य'* ग्रंथ पूर्ण केला. हाच *'श्रीवैष्णवां'* चा आद्यग्रंथ आहे.
काश्मीरची अधिष्ठात्री  विद्येची देवी श्री शारदा प्रसन्न होवून रामानुजांसमोर प्रकटली व तिने त्यांना हयग्रीवाचे शिल्प आशीर्वाद म्हणुन दिले.
नीलमत पुराणानुसार काश्मीरला ५१०० वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. 
काश्मीरची सगळी लोकसंख्या हिंदू व बौद्ध होती.
जगभर इस्लामी आक्रमक एक एक प्रदेश पादाक्रांत करत असताना लोहाणा वंशाच्या शूर राजांनी भारताच्या पश्चिमी सीमांचे इस्लामी आक्रमणापासुन यशस्वी संरक्षण केले होते. हे लोहाणा प्रभू रामांचे पुत्र राजा लव यांच्या सैन्यातील खड्गवीर होते. आजचे लाहोर हे रामायण काळातील 'लवपुरी' होते.
*जे इतिहास विसरतात किंवा इतिहासाचा फक्त परीक्षेत उत्तीर्ण होण्यापुरताच अभ्यास करतात... त्यांच्यावर   इतिहासातील दुःखद गोष्टींच्या पुनरावृत्तीचे दुर्भाग्य ओढवते.*

विंग कमांडर श्री सुदर्शन यांच्या मुळ इंग्लीश लेखाचा मराठी अनुवाद 

🙏🏼😯☺️



 महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कर चुकविणा-यांविरूध्द विशेष मोहीम                                                              सुमारे २०० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक

       मुंबई, दि.१९: खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल नुकसान करणा-या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे.

                खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणा-या करदात्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. टेस्को इम्पेक्स आणि मे. पारसमणी ट्रेडर्स या प्रकरणांमध्ये अन्वेषण भेट देण्यात आली होती. टेस्को इम्पेक्सचे मालक प्रमोद कातरनवरे आणि पारसमणी ट्रेडर्स या कंपनीचे मालक गणेश काकड हे कोणताही व्यवसाय करीत नाहीत. दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या पुरवठ्याशिवाय १९७ कोटी रुपयांची बनावट बीजक देऊन आणि २९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवाकर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरीत करून २९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बिजक किंवा बिले जारी करुन शासनाची महसूल नुकसान केले आहे.

             या दोन्ही प्रकरणांमध्ये हिरालाल जैन हे कर्ताधर्ता असून प्रमोद कातरनवरे हे ही महसूल नुकसानीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हिरालाल जैन व प्रमोद कातरनवरे या दोन व्यक्तींना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरीसाठी १६ मार्च २०२२ रोजी अटक केली आहे. या व्यक्तींचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या दोन्ही व्यक्तींना मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. २८ मार्च २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

        या प्रकरणात अन्वेषण अधिकारी सहाय्यक राज्यकर आयुक्त श्रीकांत पवार हे राज्यकर उपआयुक्त प्रविण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी सहआयुक्त अन्वेषण कर अनिल भंडारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, या कार्यवाहीसाठी सुजित पाटील, प्रशांत खराडे, विद्याधर जगताप, सुमेधकुमार गायकवाड, रंजित हातोले आणि श्रीमती लीनता चव्हाण, सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त हे सहभागी होते. सलग दोन महिन्यांच्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे, असे एका पत्रकाव्दारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

      TWO ARRESTED IN GST SCAM WORTH AROUND RS. 200 CRORE

      The investigation was conducted in the cases of M/s. Tesco Impex and M/s. Parasmani Traders as a part of a special operation launched against taxpayers issuing fake invoices by the Maharashtra government. During the investigation, it was noticed that Shri. Pramod Katarnavare, owner of M/s. Tesco Impex and Shri. Ganesh Kakad, owner of M/s. Parasmani Traders were not doing any business. In both the cases, by issuing fake invoices of Rs. 197 crore without supply of goods and by transferring ITC of Rs. 29 Crore, fake deduction of Rs 29 crore has been made available to the recipients. Thus, both the taxpayers have violated the provisions of the Maharashtra Goods and Services Tax Act, 2017 by issuing invoices or bills without supply of the goods and thereby causing huge loss of revenue to the exchequer.

      During the investigation, it was found that one Shri. Hiralal Jain is the operator in both the cases and Shri. Pramod Katarnavare was hand in glove in causing the revenue loss. Therefore, both the persons, Shri. Hiralal Jain and Shri. Pramod Katarnavare have been arrested by Maharashtra Goods and Services Tax Department on 16/03/2022. The act of these persons is cognizable and non-bailable offence and is liable to imprisonment under the Goods and Services Tax Act, 2017. Both the persons have been remanded in judicial custody till 28/03/2022 by the Hon'ble Additional Chief Metropolitan Magistrate's Court.

      Investigating Officer Shri. Shrikant Pawar, Assistant Commissioner of State Tax is conducting further investigation in this case under the guidance of Shri. Praveen Kulkarni, Deputy Commissioner of State Tax. Special guidance was given by Hon'ble Shri. Anil Bhandari (IAS), Joint Commissioner of State Tax, Investigation - C for this case. Shri. Sujit Patil, Dr. Vidhyadhar Jagtap, Shri. Prashant Kharade, Shri. Ranjit Hatole, Shri. Sumedhkumar Gaikwad and Smt. Leenata Chavan, all Assistant Commissioner State Tax and State Tax Inspectors actively participated in this action. By augmenting arrest actions in last two months the Maharashtra Goods and Services Tax Department has once again issued a stern warning to the tax evaders.

0000


 


 



 यशदा,पुणे येथे *पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन'* या महत्त्वाच्या विषयावर *दि.२४ ते २६ मार्च व दि.२८ ते ३० मार्च* अश्या दोन तुकड्यामध्ये *दोन दिवशीय मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन* करण्यात आले आहे.*पाणलोट क्षेत्रात* कार्यरत असलेल्या संस्था,कार्यकर्ते,प्रशिक्षक अथवा काम करण्यास इच्छुक असलेले आपल्या ओळखीचे कार्यकर्ते असल्यास वरील पत्रकात दिलेल्या नंबरवर संपर्क करुन प्रशिक्षण सहभाग नोंदणी करण्यासाठी *दि.२१ मार्च* पर्यंत नाव नोंदवणे गरजेचे आहे.


Featured post

Lakshvedhi