Saturday, 12 March 2022

 साताऱ्यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी

·       उपक्रम राज्यभर राबविण्याची अर्थसंकल्पात घोषणा

            मुंबई, दि. 11 : महिला सुरक्षेचा  आधुनिक दृष्टिकोनातून विचार करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. साताऱ्यात या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.

            साताऱ्यात पोलीस विभागाने या पथदर्शी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने सहा महिन्यांतच या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नरत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेउपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राज्यभर राबविण्यास मान्यता दिली. त्याची घोषणा सादर केलेल्या अर्थसंकल्पात केल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाईल. महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

            महिला सुरक्षेसाठी अभिनव कार्यप्रणाली निर्माण करणारा आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारा पथदर्शी उपक्रम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पथदर्शी उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले होते. गृहराज्यमंत्री श्री देसाई यांनी या उपक्रमाच्या काटेकोर अंमलबजावणीकडे  विशेष लक्ष दिले होते. तसेच वेळोवेळी आढावा घेऊन पोलीस यंत्रणा आणि संबंधितांना प्रोत्साहन दिले. सातारा पोलीस दलाने  पथदर्शी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला. महिलांसाठी असलेल्या कायदेविषयक जागृतीपोलिसी कार्यपद्धतीत सुधारणा आणि सामान्य महिलांना स्वसंरक्षणाचे धडे यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. महिला व बाल अत्याचाराच्या घटनांमध्ये वेगाने तपास करणेआरोपींना तातडीने अटक करणेलवकर आरोपपत्र दाखल करणेआरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे तसेच पिडीत महिला व बालकांना शासनाच्या योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे यासाठी पोलीस विभागाने गंभीरपणे पावले उचलली. त्याचबरोबर या उपक्रमाअंतर्गत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठीही पोलीस विभागाने नियोजन केले.

साताऱ्यात उपक्रमाला मिळालेले यश

            सातारा जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६ जुलै २०२१ पासून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत यातून पाचशेहून अधिक युवतींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षणतर ३७ हजारांहून अधिक महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा२००५ या कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे परिणाम जिल्ह्यात सकारात्मक दिसून आले आहेत.

            साताऱ्यात पोलीस विभागाने महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबवला. सातारा पोलिसांनी घेतलेल्या कष्टामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरला आहे. हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने हा उपक्रम आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे ठरवले आहे. सातारा पोलिसांनी या पथदर्शी उपक्रमाची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळेच त्याची व्याप्ती वाढवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्यासाठी सातारा पोलिसांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई  यांनी अभिनंदन केले आहे.


 सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प

- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

            मुंबई, दि. ११ : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कृषी, आरोग्य, मनुष्यबळविकास, दळणवळण व उद्योग या विकासाच्या पंचसूत्रीवर भर देत सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि प्रगतीपथावर घेऊन जाणारा आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

            अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना श्री. थोरात म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही शासनाने कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करून समाजातील सर्व घटकांना मोठा दिलासा दिला आहे. या अर्थसंकल्पात सर्व क्षेत्रांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

            बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क समायोजनाच्या कालावधीत १ वर्षावरून ३ वर्ष इतकी वाढ करण्यात आली आहे. यामुळे बांधकाम व्यवसायातील गुंतवणुकदारांना प्रोत्साहन मिळणार आहे.

            महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांना विनामोबदला स्थावर मिळकत हस्तांतरीत होत असेल तर अशा दस्तांवर सध्या आकारला जाणारा ३ टक्के, खरेदी पत्रावरील ५ टक्के मुद्रांकशुल्क माफ करण्यात येणार आहे.  

            मुद्रांक शुल्कावरील दंडाच्या रकमेत सवलत देण्यासाठी १ एप्रिल २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीसाठी दंड सवलत अभय योजना राबण्यात येणार आहे.

            सोने चांदीचे दागिने बनविणारे छोटे मोठे उद्योग, रिफायनरी व निर्यातीस चालना देण्यासाठी तसेच राज्यात रोजगार निर्मिती करण्यासाठी व कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी राज्यात आयात केल्या जाणा-या सोने चांदीवर सध्या आकारण्यात येणारा ०.१ टक्के मुद्रांक शुल्क माफ केला आहे.

            नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकी ५० हजार रूपये अनुदान देण्यासाठी १० हजार कोटी रूपयांची तरतूद केली असून २० लाख शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, किमान आधारभूत किंमतीवर शेतमाल खरेदीसाठी ६ हजार ९५२ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच शेती आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

            कोरोना महामारीनंतर आरोग्य सुविधांचे महत्व लक्षात घेऊन नियमित अर्थसंकल्पीय निधीव्यतिरिक्त आरोग्य सेवांसाठी येत्या तीन वर्षात ११ हजार कोटी रूपयांचे नियोजन केले आहे. अहमदनगरसह राज्यात ५० खाटांची सहा ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. नाशिक, पुणे अतिजलद रेल्वेसाठी भूसंपादन सुरु करण्यात आले असून शिर्डी विमानतळ विकास आणि विस्तारासाठी १५० रूपयांचा निधी दिला आहे. राज्यातील सर्वच समाजघटक आणि सर्व क्षेत्रांना या सरकारने या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे श्री. थोरात म्हणाले.

०००० 



 महाराष्ट्रातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह दिंडोरीत

· अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा

            मुंबई, दि.11 :- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका इतर आदिवासी तालुक्यांचा मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथील रस्ते आणि पाणी यांची उपलब्धता यांचा विचार करुन दिंडोरी तालुक्यात राज्यातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह प्रस्तावित करण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात यासंदर्भातील घोषणा केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या आदिवासी औद्योगिक समूहाची संकल्पना मांडली.        

            प्रस्तावित आदिवासी औद्योगिक समूह ही नाविन्यपूर्ण संकल्पना असून आदिवासी उद्योजकांना एका छताखाली सुविधा उपलब्ध करून आदिवासी समाजात उद्योजकता विकास घडवून आणणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. Tible Industrical cluster (TIC) मध्ये आदिवासी उद्योजकांना उद्योगांकरिता शेड, वीज, पाणी, रस्ते यांची उपलब्धता करण्यासोबत मोठे, मध्यम आणि लहान उद्योग एकाच ठिकाणी विकसित करण्यात येतील. आदिवासी युवकांना रोजगार उपलब्धीतून कौशल्य विकास साध्य करणे या उद्देशाने TIC ची निर्मिती करण्यात येईल.

            दिंडोरी तालुक्यातील टोमॅटो, द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांसोबत, तांदूळ, नागली, खुरासणी, वरई ही महत्वाची पिके असून यावरील विविध प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे शक्य होईल. दिंडोरी तालुक्यात परनॉड रिकॉर्ड, गोदरेज, UB बेव्हरेज, वरून ॲग्रो, सह्याद्री ॲग्रो, सूला, सिग्राम, एव्हरेस्ट हे उद्योग असून उद्योगांकरिता पोषक वातावरण असल्याने नाशिक जिल्हा मुख्यालयापासून 23 किमी पेठ, गुजरात राज्य मार्गावरील जांबूटके शिवारात हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

            आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने उद्योजकांसाठी तयार शेड वितरीत करणे, कृषि प्रक्रिया, इंजिनिअरींग, आदिवासी हस्तकला, लॉजीस्टीक आणि कौशल्य विकास तसेच गाळे या स्वरुपात शेडचे बांधकाम करण्यात येईल. सोबत तांत्रिक पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, शेती प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतमालाची स्वच्छता, वर्गीकरण आणि पॅकींग सुविधा, तसेच निर्यातीस चालना देण्याकरिता सहाय्य, प्रशिक्षण आणि वर्कशॉप यूनिट यांची उभारणी करण्यात येईल.

            आदिवासी‍ औद्योगिक समुहामुळे तसेच सोबतच्या नवीन औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती होवून या परिसराचा विकास होण्यास चालना मिळणार आहे.

0000


 


 

 सागर शनिवारी नखे कापत बसला होता, ते पाहून आजोबा म्हणाले, *बाळा शनीवारी नखे कापू नयेत.*

*सागर :-* मी अंधश्रद्धाळू नाही. असल्या कथा मी मानत नाही.

*आजोबा :-* ही अंधश्रद्धा नसून व्यवहारीक सोईसाठी केलेला नियम आहे.

शनीवारी नखे कापली तर शनीवारी व रवीवारी रात्री बीयरचे कॅन उघडण्यास अवघड जाते तसेच चिवडा चकली वेफरची पाकीटे चटकन उघडता येत नाहीत, आणि नखं कापताना जखम झाली तर रविवारी मटण खाताना बोटाची आग होते.

*सागर* :- धन्यवाद आजोबा, हे ज्ञानामृत मला दिल्याबद्दल मी तूमच्या चरणी नतमस्तक आहे 🙏

🤣🤣🤣🤣🤣

  Press Ranjankar Bharat: *कुछ चीजे निकट आने पर बिना मांगे ही मिल जाती हैं,जैसे अग्नि से गर्माहट,बर्फ से शीतलता,और फूल से सुगंध इसलिए ईश्वर से भी कुछ मांगिए मत,बस निकटता बढ़ाइए,सब कुछ बिना मांगे मिलने लगेगा।*: ...💫

*कठीण प्रसंगात न मागता दिलेली*

*साथ नेहमी मोलाची ठरते*...

     *जिथे सर्व संपले याची जाणीव होते*,

     *तिथे पाठीवर अलगत पडणारा हात*,

    *देवापेक्षा कमी नसतो*...!

              🙏🙏

       🌹 *सुप्रभात*🌹

 


Featured post

Lakshvedhi