सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 9 March 2022
Tuesday, 8 March 2022
बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.
· ग्रामविकास विभागाच्या ‘महाजीविका अभियाना’चा राज्यस्तरीय शुभांरभ.
मुंबई, दि. 8 : महिलांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून बांधणी करून त्यांच्या सक्षमीकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. आता महिला बचतगटाच्या माध्यमातून पुढे येत असल्याने देश प्रगतीपथावर जोमाने वाटचाल करीत असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद अभियानमार्फत ‘महाजीविका अभियान’ राज्यस्तरीय शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, गृहनिर्माण (ग्रामीण)चे संचालक डॉ.राजाराम दिघे, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सन 2022-23 हे उपजीविका वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये उपजीविका व विपणन या विषयावर भर देण्यासाठी महाजीविका अभियानाचा शुभारंभ झाला असल्याचेही सांगितले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला आरक्षण असल्याने त्यांची प्रगती दिसून येते. महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढविल्यास आपला देश महासत्ता होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामामुळेच महिला चूल आणि मुलांसह पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन कार्य करत आहेत. ग्रामविकासामध्ये महिलांचा विकास हा महत्त्वाचा विषय असून यासाठी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीयदृष्ट्या सक्षम करण्याची गरज असल्याचे श्री.मुश्रीफ यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आजमितीस राज्यातील जवळपास 56 लाख कुटुंबे या अभियानात सहभागी असून सुमारे 5 लाख 47 हजार स्वयंसहाय्यता गटांची निर्मिती करण्यात आली आहे. या स्वयंसहाय्यता गटांना आतापर्यंत 12,479 कोटी रूपयांची बॅंक कर्जे आणि अभियानामार्फत 953 कोटी रूपयांचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड काळात उमेद अभियानातील महिलांनी पुढाकार घेऊन मास्क निर्मितीच्या विक्रीतून 11.25 कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल<
मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना कोठे काय काय खरेदी कराल ?
पेण : गावामध्ये झिंगा (कोळंबी) भाकरी, कलिंगड , पांढऱ्या कांद्याच्या माळा, पोहे मिरगुंड, पापड.
इंदापूर : गावठी पोहे, तांदूळ, वेलवांगी.
महाड: वटवाघूळ तेल ( वातनाशक )
परशुराम घाट : जेवण ( हॉटेल ओमेगा)
चिपळूण: जेवण (अभिषेक हॉटेल)
संगमेश्वर : मोहनथाळ, (संगमेश्वरी खाजा) गणेशकृपा चे मोदक.
निवळी घाट: जेवण (ग्रीन पार्क हॉटेल)
हातखंबा: HP पंपावर गद्रे यांची बेस्ट फ्रोझन फिश प्रॉडक्टस व मॉलमध्ये शॉपींग.
लांजा: व्हेज नॉनव्हेज जेवण, सरसचे शेंगदाणा लाडू व इतर उत्पादने.
राजापूर: ठाकूर बेकर्सची स्पेशल नान-कटाई व इतर बेकरी प्रॉडक्टस.
कणकवली:- सकाळी ताजे मासे, ब्रेकफास्ट, मालवणी खाजा व खडके लाडू, बाळा सावंतचो कटवडो
सावंतवाडी :- माशांचे जेवण,ताजा मालवणी खाजा, शोभेची फळे. सकाळी सुरंगीचे गजरे, स्थानिक भाजी, आबोलीचे वळेसर, नारळ आणि पुराणिक फूड्सची प्रसिद्ध गुळापासून बनविलेली स्पेशल कोकोनट बर्फी आणि मॅंगो कोकोनट बर्फी
पुढे गोव्यात :
म्हापसा : म्हापशाच्या बाजारात मडक्यात मिळणारी हुर्राक, फेणी, काजूगर,
एकदा अवश्य भेट देऊन खरेदी करा व आनंद घ्या...
सहज गंमत...
*बायकांकडून नवऱ्यांना संबोधण्या बाबतचा इतिहास तुम्ही वाचलाच पाहिजे.....*
न्या. रानडे यांच्या घरी एकदा कोणी गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का? विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *"खुंटीवर पगडी दिसत नाहीये.”*
त्या माणसाला काही कळलं नाही. त्याने परत विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *“जोडेही दिसत नाहियेत."*
तरिही त्याला कळलं नाही त्याने पुन्हा तेच विचारलं.
रमाबाई म्हणाल्या, *"कोपऱ्यात काठीही दिसत नाहिये."*
*ते घरी नाहियेत हे सांगण्याची ही त्या काळची पद्धत झाली.*
नावाने सोडाच पण *"हे"* वगैरे उल्लेखही केला जात नव्हता त्या काळी.
*का. पु. स. (काळ पुढे सरकला)* ..... नवर्याचा उल्लेख *"इकडुन येणं झालं"*, तिकडुन सांगणं झालं *"इकडची स्वारी”* असा होऊ लागला.
मऱ्हाटी शिणुमात *"एक माणुस रागावलंय जणू आमच्यावर"* असा लडिवाळपणा करु लागला.
*का. पु. स.* ..... नवर्याचा उल्लेख *अहो, माझे यजमान, माझे मिस्टर असा होऊ लागला*.
*का. पु. स.* ..... नवर्याला चारचौघांच्यात *अहो*, तर *एकांतात लाजत लाजत अरेतुरे* सुरु झालं.
याशिवाय *खाशा स्वाऱ्या, घरधनी, कारभारी, मालक, पप्पुचे पप्पा, बंटीचे बाबा, अहो नारायण* हा एक समांतर प्रवास चालु होताच .....
*का. पु. स.* ..... नवर्याचा उल्लेख *रितसर नावाने किंवा माझा नवरा* असा होऊ लागला.
*का.पु.स.* ..... नवर्याचा उल्लेख *बंड्या, खंड्या, निल्या, मित्या* असा यायाकारी होऊ लागला.
*का. पु. स* ...... *सिरिअल्स* मधुन आणि कुठे कुठे प्रत्यक्षातही *शोना, बच्चु,पिलु,डार्लिंग, बेब, Hb, हब्बी, हब्बुडी* असा होऊ लागला.
या सगळ्याला मागे टाकील असा एक अति लडिवाळ उल्लेख हल्ली वरचेवर आढळायला लागलाय तो म्हणजे *नवरू* .....
अगदी नारू म्हटल्यासारखं वाटतं आणि, *"नारुचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा"* किंवा *"पाणी गाळा नारू टाळा"* अशा भिंतीवर लिहिलेल्या जाहिराती डोळ्यासमोर तरळायला लागतात.😀
पण सर्वात धडकी भरवणारी हाक म्हणजे.. *अहो..ऐकलत का* याला अजुन तोड नाही.
असा हा नवरे जमातीचा इतिहास.......
🙏🙏
एका माणसाने शेतक-याच्या बायकोला "नवरा घरी आहे का?"
अशी विचारणा केली. बायको रमाबाईंची फॅन असावी ....
तिने सांगितले *"बैल शेतातून अजून परतला नाही".*
*☹️😀🤣👍🙏🤣🤣🤣🤣*
जागतिक महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🌷🌷🌺🌺
*आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची निवड झाली आहे!*
भारताचा मोठा विजय!!!
*पंतप्रधान मोदींची चाणक्य कूटनीति. जागतिक मंचावर ब्रिटनचा पराभव. पंतप्रधान मोदीजींनी जगभरात कसे संबंध विकसित केले याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.* न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे. *भारताचे न्यायमूर्ती दलवीर सिंग यांना 193 मतांपैकी 183 मते मिळाली (प्रत्येक देशातून एक) आणि त्यांनी ब्रिटनच्या न्यायमूर्ती ख्रिस्तोफर ग्रीनवुडचा पराभव केला. ब्रिटनची या पदावरील 71 वर्षांची मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली.*
हे साध्य करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालय गेल्या ६ महिन्यांपासून प्रयत्नशील आहे! सर्व 193 देशांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांना सहज जिंकण्याची खात्री असलेल्या ब्रिटीश उमेदवाराबाबत भारताची भूमिका समजावून सांगणे हे फार कठीण काम होते. * मतदानाच्या 11 फेऱ्यांमध्ये, न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांना महासभेत 193 पैकी 183 मते मिळाली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 15 पैकी सर्व 15 सदस्य.
न्यायमूर्ती दलवीर भंडारी हे 9 वर्षांच्या कार्यकाळासाठी हे पद सांभाळतील. *भारताला मत देणारे हे 183 देश " स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर आपले पंतप्रधान मोदीजींनी जगभरातील देशांशी किती विनम्र, आदरयुक्त आणि उत्तम संबंध निर्माण केले याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.*
️विनंती - आवडल्यास तुमच्या इतर मित्रांनाही पाठवा
*जय हिंद-जय भारत.*
वृत्त क्र. 733विधानपरिषद प्रश्नोत्तरे:
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधिमंडळाची
संयुक्त समिती गठीत करणार
- परिवहन मंत्री ॲड. अनिल परब
मुंबई, दि.8 : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमण्यात यावी अशी सूचना केली. या समितीमध्ये सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, मंत्री, विरोधी पक्षनेते यांचा समावेश असावा. असेही त्यांनी सूचित केले. याबाबत येत्या आठवड्याभरात समिती गठीत करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य डॉ. परिणय फुके यांनी राज्य परिवहन मंडळाची बससेवा सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री ॲड. परब बोलत होते.
परिवहन मंत्री ॲड परब म्हणाले, एसटी कर्मचारी संपावर गेले असल्याने बससेवा विस्कळीत झाली असून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांचे हाल होत आहेत. कर्मचारी कामावर नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. हळुहळु कर्मचारी कामावर येत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी एसटी सेवा प्राधान्याने विद्यार्थ्यांसाठी सुरु करीत आहोत.
शासनाने आपली भूमिका वारंवार जाहीर करुनही दिवाळीपूर्वी 19 युनियननी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्याबाबत तात्काळ कृती समितीची बैठक घेवून शासनाच्या महागाई भत्त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 12 टक्केवरुन 28 टक्के करुन तफावत दूर केली. तसेच दोन ते तीन टक्के पगारवाढ करण्यात आली. घरभाड्याचा विषय होता, तोही शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जाहीर करण्यात आला. दिवाळीमध्ये नगारिकांचे हाल होऊ नये म्हणून न्यायालयात सकारात्मक बाजू मांडली. न्यायालयाने आदेश देवूनही कर्मचारी संपावर गेले. विलीनीकरणाबाबत त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीला बारा आठवडयांची मुदत देण्यात आली होती. त्रिस्तरीय समितीने आपला अहवाल शासनास सादर केला असून एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही असे स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात आली. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत पगारवाढही देण्यात आली. कर्मचाऱ्यांना कामावर येण्याबाबत वारंवार आवाहन केले गेले. तरीही कर्मचारी कामावर रुजु झालेले नाहीत. यामुळे जनतेला त्रास होत असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर होणारी कारवाई चारवेळा मागे घेतली. कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आम्ही चर्चा करुन प्रश्न सोडविण्यास तयार आहोत. याबाबत शासनाचे सहानभूतीपूर्ण धोरण आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहनही परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर यांनी सहभाग घेतला.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...