Saturday, 26 February 2022

 मराठी भाषा गौरव दिनी 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत

गौरव व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

            मुंबईदि. 25 : ज्ञानपिठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी रविवारी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिननिमित्त मराठी भाषा विभागातर्फे सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा गौरव व त्यांना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            यावेळी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भारत सासणे यांच्यासह श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था  - लोकवाङ्मय गृहमुंबईअशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे मानकरी  (व्यक्ती) - डॉ. रमेश वरखेडे, नाशिकमराठी अभ्यास परिषद, पूणे (संस्था) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) - डॉ. चंद्रकांत पाटीलपुणेकविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार मिळालेली (संस्था) - मराठी अभ्यास केंद्रमुंबई यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

            या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईमुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदममहापौर श्रीमती किशोरी पेडणेकरखासदार अरविंद सावंतआमदार राहुल नार्वेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  यावेळी चौरंग निर्मित 'शारदेच्या अंगणी मराठीच्या प्रांगणीहा कार्यक्रम सादर होणार आहे.

पुरस्काराचे नाव व पुरस्कारार्थी यांची माहिती

1)         विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक – डॉ.भारत सासणे

         ·         डॉ. भारत सासणे यांनी कथानाटकएकांकिकाकादंबरीबालसाहित्यललित व श्रुतिका लेखनचित्रपट पटकथा या वाङ्मय प्रकारात लेखन केले असून त्यांची 35 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

         ·         डॉ.भारत सासणे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 7 पुरस्कार व इतर 30 पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलनसांगली येथे झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व जळगांव येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

         ·         डॉ.भारत सासणे यांनी दीर्घकथा’ हा वाङ्मयप्रकार नाविन्यपूर्णतेने व प्रयोगशीलतेने हाताळला आहे.

         ·         सामाजिक वास्तवाच्या चित्रणात अद्भताचे आणि कल्पकतेचे रंग मिसळून कथात्मक साहित्याला विचारपूर्वक कलात्मक आकार दिली.

 2)       श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था 

        - लोकवाङ्मय गृहमुंबई

o   पुस्तक व्यवसायापुढची सगळी आव्हाने पेलून  सदैव पुरोगामी विचारांशी बांधिलकी बाळगणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने समाजाला नवी दृष्टी देणारे वाङ्मय सातत्याने प्रकाशित केले आहे.

o   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बृहद चरित्र’, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या मुलाखतींचा संग्रहअशोक केळकरांचा रुजुवात’ हा मराठी समिक्षेचा मानदंडसतीश काळसेकर यांचे कसदार साहित्यदहा निवडक लेखकांच्या साहित्याची संपादित निवडक साहित्यमाला’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र-चरित्रअशोक शहाणेअरुण खोपकरअरुण काळेप्रतिमा जोशीजयंत पवारमनोहर ओकनितिन रिंढेअशा नव्या वळणाच्या प्रयोगशील लेखकांच्या साहित्याने लोकवाङ्मयची सूची उजळून निघाली आहे.

o   नवीन लेखक / कवींना पुढे आणण्यासाठी कवि संमेलनविविध लेखनविषयक स्पर्धाआपले वाङ्मय वृत्त या मासिकाद्वारे साहित्यिकसामाजिक व सांस्कृतिक परिघावरील लिखाणाला चालना  देण्याचे काम लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने केले आहे.

o   वि.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कारासह मराठी विज्ञान परिषदफेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्समराठवाडा साहित्य परिषदअखिल भारतीय मराठी साहित्य संघ या संस्थांचे  पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेस प्राप्त झाले आहेत.

o   लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेची गेल्या पन्नास वर्षांतील तेराशे पुस्तकांची भरघोस निर्मिती मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात मौलिक स्वरुपाची भर घालणारी आहे.

                                   

3) अशोक केळकर मराठी भाषाअभ्यासक पुरस्कार (व्यक्ती)- डॉ. रमेश नारायण वरखेडेनाशिक

o   अनुष्टुभ’ या मराठी साहित्य आणि समिक्षाव्यवहारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक.

o   पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच पाठ्यपुस्तक निर्मितीतही पुढाकार.

o   का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र धुळे येथे कार्यरत असताना खानदेशातील भिलोरीपावराबंजाराअहिराणी या बोलींचा भाषिक आणि लोकसांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी पद्धतिशास्त्र विकसित केले. तसेच ह्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे समाज भाषाविज्ञान:प्रमुख संकल्पना’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित.

o   19वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अनुदेशन तंत्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक म्हणून कार्यरत. स्वयं-अध्ययनपर पुस्तकांची निर्मिती. ग्रंथालयशास्त्रवृत्तपत्रविद्यामानवी हक्कग्राहक संरक्षणपंचायतराजसामाजिक परिवर्तन आणि चळवळी असे अनेक नवे अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परिभाषा तयार केली.

o   निवृत्तीनंतर नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष आणि 'क्रिटिकल इन्क्वायरीया द्वैभाषिक संशोधन-पत्रिकेचे आठ वर्षे संपादन.

 राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान

 

            मुंबई, दि. 25 : श्रमशक्तीला आपल्या देशात पूर्वीपासून महत्व आहे. अखिल विश्वाचा कारभार कामगारांच्या कष्टामुळे चालतो. कामगारांनी पाया रचला नाही तर कुठलीही इमारत उभी राहणार नाही.  कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते व राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचे योगदान अनन्य साधारण आहेअसे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.  

            राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या वतीने देण्यात येणारे 'कामगार मित्रपुरस्कार शुक्रवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते. 

            यावेळी धडक कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित राणेश्रीमती अनघा राणे व पुरस्कार विजेते निमंत्रित उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कामगार मित्र विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

            कामगार चळवळीशी निगडित कार्यकर्ते व कामगारांसाठी काम करणारे वकीलपत्रकार व समाज सेवकांचा सत्कार घडवून आणल्याबद्दल धडक कामगार संघटनेचे अभिनंदन करताना राज्यपाल कोश्यारी म्हणालेकोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कामाला प्रतिष्ठा देऊन ते तन्मयतेने केले तर ते ईश्वरी आनंद देते. आज आपण प्रामाणिकपणे काम केले तर उद्या त्याचा फायदा भावी पिढीला होतो असे राज्यपालांनी सांगितले.  

            धडक कामगार युनियन मागील 10 वर्षांपासून काम करीत असून संस्थेशी 7.30 लाख कामगार जोडले गेले असल्याचे अभिजित राणे यांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील सुभाष भुतियाआसिफ मुल्लामुल्ला ऍण्ड मुल्ला असोसिएटआशिष पाटीलअतिरिक्त आयुक्तवसई-विरार शहर महानगरपालिकाअशोक भाटिया वरिष्ठ वकीलअरुण निंबाळकर वकीलहायकोर्ट मुंबई,. जय भाटियामॅनेजिंग ऍर्टनीजे. के.बी लिगलविजय शिर्केसंचालकशिर्के ग्रुपइर्शाद मुल्ला व्यवस्थापकीय संचालकहाजी आदम  मुल्लायुनिव्हर्सल स्कूलअशोक पवारडेप्युटी आरटीओअंधेरी आणि बोरिवलीवेगुणपाल शेट्टीहॉटेल साई पॅलेस उपाध्यक्षअमर पवारव्यवस्थापकीय संचालकलॅकोझी टोयोटो ऑटो प्रा. लि.राजेश विक्रांतसाहित्य संपादक: वृत्त मित्रउदय पैव्यवस्थापकीय संचालकऍड आर्टअतुल रावराणेशिवसेना नेते सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यदशरथ सिंगएचआर मॅनेजरपीव्हीआर सिनेमाकरण गायकरसंस्थापक अध्यक्षछावा क्रांतीवीर सेनानिलेश चांदोळेमानव संसाधन व्यवस्थापन (एच आर) कार्निवल सिनेमाजप्रकाश बारोटसीईओझेनल कंन्सट्रकशन प्रा. लि.राजेश पुरंदरेज्येष्ठ पत्रकारअमोल राणेसीईओवास्ट मीडिया प्रा. ली.रामजस यादवअध्यक्ष,धडक कामगार युनियनऍड. नारायण पणिकर (मुरली),उपाध्यक्षधडक कामगार युनियनप्रकाश पवारखजिनदारधडक कामगार युनियनझोहेब पटेलसंचालकआदर्श मसाला अँड कंपनीकुणाल जाधवजनसंपर्क प्रमुखधडक कामगार युनियनमनीषा यादवऑफिस को- ओरडीनेटरधडक कामगार युनियनमुख्य कार्यालयझुल्लुर यादवअध्यक्ष- सेल्स टैक्स ऑफिस यूनिटकमलेश वैष्णवब्यूरो चीफ,  नेशन फस्ट टीवी चैनलजॉनी  वायकेमहाराष्ट्र वन कर्मचारी युनिट अध्यक्ष धडक कामगार युनियनविजय एस. सावंत (विजू पटेल) निर्माता-दिग्दर्शक- अभिनेताकमलेश यादवनगरसेवकभाजपाडॉ. अजित सावंतबी.ए. एम. एस (बॉम्बे)सत्यविजय सावंतयुनिट अध्यक्षहसमुख अँड कम्पनी पीजीधडक कामगार युनियनधीरज पाटील युनिट अध्यक्षहॉटेल पर्लधडक कामगार युनियनउत्तम कुमारउपाध्यक्षमहाराष्ट्र प्रदेशधडक कामगार युनियनअभिजित भोईटेमहाराष्ट्र उपाध्यक्षधडक कामगार युनियनडॉ नारायण राठोडबी के पांडेकामगार मित्र पत्रकार यांना यावेळी कामगार मित्र पुरस्कार देण्यात आले. 

0000

 

Maharashtra Governor presents Kamgar Mitra Puraskars

 

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Kamgar Mitra Puraskars to representatives of Labour Unions, Labour Counsels, journalists and others at a function held at Raj Bhavan Mumbai on Friday (25 Feb).

      The Kamgar Mitra Puraskar function was organised by Dhadak Kamgar Union. Founder of the Union Abhijit Rane, Anagha Rane and recipients of the Kamgar Mitra Awards were present. The Governor released the Souvenir ‘Kamgar Mitra’ on the occasion.

0000

 



 *बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल.....*

*काही मिनिटांत आपली रक्कम होल्डवर जाईल*

सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

*यंत्रणा काम कशी करते...?*

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

एकप्रकारचे सुरक्षा कवच

http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म’ असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस् ,पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्सu संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खुप संस्था जुळलेल्या आहेत.

*सुनील इनामदार*

Friday, 25 February 2022

Help Ukraine Student

 युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबई शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी

शहर जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा


-.                                    जिल्हाधिकारी राजीव निवतकर

            मुंबई, दि. 25 : रशिया- युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून मुंबई शहर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

            देशातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून, या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन कार्यान्वित केल्या आहेत.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली

● टोल फ्री क्रमांक - 1800118797

दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905

● फॅक्स क्र. 011-23088124

ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क

साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहरच्या 022- 22664232 या दूरध्वनी क्रमांकावर आणि mumbaicitync@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.


००००

 दिलखुलास' कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत


· मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष प्रसारण

            मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 26 व सोमवार दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ही विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम, अमराठी लोकांना मराठी आपलीशी वाटावी यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, मराठी भाषेच्या धोरणाची अंमलबजावणी, मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालये करीत असलेली कामे आदी विषयांची माहिती, मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

00000

 राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची निती आयोगाकडून पुन्हा एकदा दखल

· उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्याकडून राज्य शासनासह      पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांची प्रशंसा

            मुंबई, दि. 25 : वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील वर्षी आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणाचा भाग म्हणून या धोरणाच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीची निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दखल घेतली असून शासनासह पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नांची त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रशंसा केली आहे.

            मुंबई महानगरपालिकेच्या ‘मुंबई ईव्ही सेल’ चा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी शुभारंभ झाला. यावेळी राज्यात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत श्री.ठाकरे यांनी माहिती दिली होती. यानंतर राजीवकुमार यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी आाणि शाश्वत विकासासाठी राज्य शासनाच्या समर्पित प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी देखील यापूर्वी 14 सप्टेंबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे कौतुक केले होते. महाराष्ट्राने भविष्याचा वेध घेऊन इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले आणि चांगले पाऊल टाकले अशा शब्दात त्यांनी प्रशंसा केली होती.

            इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीमध्ये 157 टक्के वाढ झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. राज्यात सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मुंबईतील बेस्टच्या ताफ्यात सध्या 386 इलेक्ट्रिक बस धावत आहेत. 2023 पर्यंत 50 टक्के तर 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 100 टक्के वाहने इलेक्ट्रिक असतील असे नियोजन सुरू आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासून शासकीय पातळीवर खरेदी करण्यात येणारी सर्व वाहने इलेक्ट्रिक असतील असाही निर्णय घेण्यात आला असून त्याची देखील अंमलबजावणी सुरू झाली आहे. तर, राज्यात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यादृष्टीने चार्जिंग स्थानकांसारख्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

            मुंबई, दि. 25 : पाश्चात्य जगात लिंग समानतेची (जेंडर इक्वालिटी) संकल्पना आहे. परंतु भारतात स्त्रीला मातृशक्ती व पराशक्ती म्हणून पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व दिले आहे. महिला विद्यापीठाच्या स्नातक विद्यार्थिनींनी आपले श्रेष्ठत्व ओळखावे व देशसेवेचा संकल्प करून कार्य करावे. आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

            श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 71 वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.

            दीक्षांत समारंभाला दूरस्थ माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरु रुबी ओझा, प्रभारी कुलसचिव सुभाष वाघमारे, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन संजय शेडमाके, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, महात्मा गांधींनी बॅरिस्टर असताना देशसेवेचा संकल्प केला व स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिले. सुभाषचंद्र बोस यांनी आयसीएसचा त्याग करून देशासाठी आजाद हिंद सेनेची स्थापना केली. या महान विभूतींचे आदर्श समोर ठेवून स्नातक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी तसेच देशासाठी कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे.

“विद्यापीठाच्या 32 कोटींच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता”

            महिला विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात शासनाने 75 कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी 32 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल व निधी विद्यापीठाला दिला जाईल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एसएनडीटी महिला विद्यापीठ देशाच्या अनेक भागात पोहोचले आहे. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. राजकारणात सुसंकृत व्यक्तींची आवश्यकता आहे असे सांगून विद्यार्थिनींनी पुढे राजकारणात येऊन समाजसेवा करावी असे त्यांनी सांगितले. कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी विद्यापीठ अहवालाचे वाचन केले. 

            दीक्षांत समारंभामध्ये 14,548 विद्यार्थिनींना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आली. तसेच विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना पदके व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

००००

Governor presides over 71st Convocation of SNDT Women's University

            Mumbai Dated 25 : The Governor of Maharashtra and Chancellor of universities Bhagat Singh Koshyari presided over the 71st Annual Convocation of the SNDT Women’s University at the University's Patkar Hall in Mumbai on Friday (25th Feb).

            Minister of Higher & Technical Education Uday Samant attended the Convocation programme through virtual mode.Vice Chancellor Prof Ujwala Chakradev, Pro Vice Chancellor Prof Ruby Ojha, Officiating Registrar Subhash Waghmare and In Charge Director of Examinations and Evaluation Dr. Sanjay Shedmake, Deans of Faculty, Professors, teachers and students were present.

            Degrees and diplomas were presented to 14548 students. Gold Medals and Certificates of merit were also presented to selected students.

0000


 

Featured post

Lakshvedhi