Friday, 4 February 2022

 नगर रचनाकार पदाकरिता ‘महाराष्ट्राचा अधिवासी’ ही अट ठाकरे सरकारने वगळली...

अट पुनर्स्थापित करा अन्यथा आंदोलन – आ. अतुल भातखळकर

मुंबई, दि. 4 फेब्रुवारी (प्रतिनिधी)

          महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील “उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अटच वगळून टाकल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे महाराष्ट्र आणि मराठीवरील प्रेम हे निव्वळ बेगडी आहे अशी खरमरीत टीका मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

          राज्यातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील “उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अट वगळण्यात आली असल्यावरून आ. भातखळकर यांनी ठाकरे सरकारला त्याबाबत जाब विचारला आहे. तसेच रोजगाराकरिता महाराष्ट्रातल्या लोकांना प्राधान्य देऊ अशा फुशारक्या मारणार्‍या सरकारने नगररचनाकारांच्या संदर्भातील 2018 सालची “उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अट का वगळली या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं आणि ही अट पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणली पाहिजे अशी मागणीही आ. भातखळकर यांनी केली आहे. 

          ठाकरे सरकारने वगळलेली अट पुनर्स्थापित केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार असून त्याचबरोबर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या विरोधात आवाज उठवणार असल्याचा इशाराही आ. अतुल भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Abol preet

 अभिनेते रमेश देव यांचा वाढदिवस निधनापूर्वी दोन दिवस अगोदर झाला होता. शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. त्यांनी आपल्या सुविद्य पत्नी सीमा देव यांना मृत्यूची चाहूल लागल्या बाबत कसे बोलले. प्रत्यक्ष पहा


 लोकसेवा आयोगाच्या सन 2022 च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर

        मुंबई, दि. 03 : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

            राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी खालील प्रमाणे अंदाजित वेळापत्रक आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.           

अ.क्र.परीक्षेचे नाव जाहिरात पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा परीक्षेचा दिनांक निकालाचा दिनांक

1राज्य सेवा परीक्षा 2021-ऑक्टोबर 2021

02 जानेवारी 2022

मार्च, 2022

7,8, व 9 मे 2022

ऑगस्ट 2022

2दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2021

डिसेंबर 2021

12 मार्च, 2022

मे, 2022

02 जुलै 2022

ऑगस्ट 2022

3महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021

ऑक्टोबर 2021

26 फेब्रुवारी 2022

एप्रिल 2022

--

3.1) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-1

09 जुलै, 2022

सप्टेंबर 2022

3.2) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक

17 जुलै 2022

सप्टेंबर 2022

3.3) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक

24 जुलै 2022

सप्टेंबर 2022

3.4) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी

31 जुलै 2022

सप्टेंबर 2022

4 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021

डिसेंबर 2021

03 एप्रिल 2022

मे, 2022

4.1) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.1

--

 --

--

6 ऑगस्ट 2022

ऑक्टोबर 2022

4.2) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-संयुक्त पेपर क्र.2 लिपिक-टंकलेखक

13 ऑगस्ट 2022

ऑक्टोबर 2022

4.3) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

20 ऑगस्ट 2022

ऑक्टोबर 2022

4.4) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 कर सहाय्यक

27 ऑगस्ट 2022

ऑक्टोबर 2022

4.5) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 तांत्रिक सहाय्यक

10 सप्टेंबर 2022

ऑक्टोबर 2022

4.6) महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-पेपर क्र.2 उद्योग निरीक्षक

17 सप्टेंबर 2022

ऑक्टोबर 2022

5लोकसेवा आयोगाच्या सन 2022 च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहिर महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2021

डिसेंबर 2021

30 एप्रिल 2022

जून 2022

5.1) महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2021

24 सप्टेंबर 2022

नोव्हेंबर 2022

5.2) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021

01 ऑक्टोबर 2022

नोव्हेंबर 2022

5.3) महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021

01 ऑक्टोबर 2022

नोव्हेंबर 2022

5.4) महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021

01 ऑक्टोबर 2022

नोव्हेंबर 2022

5.5) महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा-2021

01 ऑक्टोबर 2022

नोव्हेंबर 2022

5.6) महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2021

29 ऑक्टोबर 2022

नोव्हेंबर 2022

6पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021

डिसेंबर 2021

16 एप्रिल 2022

मे, 2022

03 जुलै 2022

सप्टेंबर 2022

7सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021

डिसेंबर 2021

06 मार्च 2022

एप्रिल, 2022

--

--

8राज्यसेवा परीक्षा-2022

एप्रिल, 2022

19 जून 2022

ऑगस्ट 2022

15, 16 व 17 ऑक्टोबर 2022

जानेवारी 2023

9दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2022

मार्च, 2022

07 ऑगस्ट 2022

सप्टेंबर 2022

20 नोव्हेंबर 2022

जानेवारी 2023

10महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपित्रित, गट-ब संयुक्त पूर्व मा-2022

जून 2022

08 ऑक्टोबर 2022

नोव्हेंबर 2022

--

--

10.1) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 संयुक्त पेपर क्रमांक-1

--

--

--

24 डिसेंबर 2022

फेब्रुवारी 2023


10.2) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 संयुक्त पेपर क्रमांक-2, पोलीस उपनिरीक्षक

31 डिसेंबर 2022

फेब्रुवारी 2023

10.3) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, राज्य कर निरीक्षक

07 जानेवारी 2023

फेब्रुवारी 2023

10.4) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-2022 पेपर क्रमांक-2, सहाय्यक कक्ष अधिकारी

14 जानेवारी 2023

फेब्रुवारी 2023

11महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022

जून 2022

05 नोव्हेंबर 2022

Pl verify mpsc site.

<td width="105" valign="top" style="width: 63.0pt; border-top: none; border-left: n


 बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी

- मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

            मुंबई, दि. 3 : जिया राय दिव्यांग असून अपंगत्वावर मात करत तिने ओपन वॉटर पॅरा स्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम केला आहे. बाल पुरस्कार विजेती जिया राय हिची कामगिरी बालकांना प्रेरणा देणारी असल्याचे मत, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

           क्रीडा श्रेणीमध्ये ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित जिया राय हिचा सत्कार महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी केला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

         मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, जियाला ऑटिझम आहे, तरीही ती उत्तम जलतरणपटू बनली आहे. अवघ्या तेरा वर्षाच्या जियाने आज हा विश्वविक्रम केला आहे. पालकांनी आपल्या मुलांमध्ये काय कमी आहे, हे न पाहता ते काय करू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. जियाच्या या यशात तिच्या पालकांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांचाही सत्कार आणि अभिनंदन मंत्री ॲड. ठाकूर यांनी केले. जियाला भविष्यात जी काही मदत लागेल त्याबाबत शासन म्हणून आम्ही नेहमीच तिच्या पाठीशी असू, असे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

       या सत्कार समारंभास जियाचे वडील मदन राय आणि आई रचना राय उपस्थित होते.

 व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा जागतिकस्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे

यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करावा

                                             - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबई, दि. 3 : ताडोबा हे व्याघ्रदर्शनासाठी जागतिक स्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागास दिल्या. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जावा असेही ते यावेळी म्हणाले.

            मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढीच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अपर मुख्यसचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वन‍ विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, प्रभारी वनबल प्रमुख वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            पर्यावरणाचे रक्षण करतांना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन विकासाला कशी चालना देता येईल याचा विचार करावा असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, चंद्रपूर शहरालगत व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र निमिर्तीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करावे. येथे वनीकरण कार्यक्रमातून वृक्ष लागवड करण्यात यावी, जेणेकरून वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास मिळू शकेल. वन अकादमीनजिक जे वन्यजीव रेस्क्यु सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे त्यास सेंट्रल झु ॲथॉरिटीची मंजूरी मिळालेली आहे. याला जोडूनच व्याघ्र सफारी करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करण्यात येऊन अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वैयक्तिक सोलर कुंपण

            मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच शेत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सोलर कुंपण वितरीत करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ताडोबा भवन

            ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण १८ कोटी रुपयांची आवश्यकता असून या वित्तीय वर्षात ३ कोटी तर उर्वरित निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी, कोळसा या गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी एकूण ६४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. चालू व येणाऱ्या आर्थिक वर्षात तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या

            राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी अभयारण्याचा क्षेत्र विस्तार करण्यास व हे क्षेत्र गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार असून या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर कारवा गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

            ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर क्षेत्रातील बांबूला फुलोरा येण्यास सुरुवात झाली असून यासंबंधीचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात बांबू कुपांची कामे, जाळरेषेचा विस्तार, अतिरिक्त अग्नि संरक्षक मजूर लावणे, बिनतारी संदेशन यंत्रणेचे बळकटीकरण करणे, बांबू बिया गोळा करून सीड बॉल तयार करणे अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठीही निधीची तरतूद करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.



 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

            मुंबई, दि. 3 :- मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

            शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 दिलखुलास' कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे

सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांची मुलाखत

            मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या मुलाखतीचे पुनः प्रसारण करण्यात येणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच 'न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर गुरुवार दि. 3 आणि शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            पर्यटन संचालनालयाच्या स्थापनेमागचा उद्देश, भूमिका आणि रचना, राज्यात युनेस्कोने जाहीर केलेली पर्यटनस्थळे, पर्यटनाला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि योजना, पर्यटन संचालनालयाची प्रसिद्धी मोहीम, कृषी पर्यटन धोरण, तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या उपाययोजना आदी विषयांची माहिती डॉ. सावळकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

Featured post

Lakshvedhi