Monday, 17 January 2022

 चहा म्हणजे चहा असतो

कधीही मिळाला तरी वाह वाह असतो


उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो

कधीही मिळाला तरी वाह वाह असतो


मुंबईत तो पिला जातो

पुण्यात घेतला जातो

कोल्हापुरात टाकला जातो तर,

नागपुरात तो मांडला जातो

चहा म्हणजे चहा असतो

कधीही मिळाला तरी वाह वाह असतो


क्षण आनंदाचा असो 

वा आलेल असो टेंशन 

आळस झटकायला लागतो तसाच 

थकवा घालवायला ही लागतो

चहा म्हणजे चहा असतो

कधीही मिळाला तरी वाह वाह असतो


काहीच काम नसताना पण चालतो 

आणि खूप काम असलं तरी पण लागतो

गप्पा मारताना जसा लागतो

तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो


चहा ला वेळ नसते पण,

वेळेला चहाच लागतो

चहा म्हणजे चहा असतो

कधीही मिळाला तरी वाह वाह असतो🤪😋👌🏾👌🏾👍🏽👍🏽

 *हृदयरोगांपासून बचावासाठी कोलेस्ट्रॉल करा कमी, जाणून घ्या सोपे उपाय!*

शरीरात अधिक कोलेस्ट्रॉल झाल्याने आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग किंवा स्ट्रोकचा धोका होतो. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल स्तर वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार.

आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, आपलं शरीर काही संकेत देतं. हे संकेत समजून घेऊन वेळीच ब्लड टेस्ट करावी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवावी. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

१) तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की हृदयासाठी लसूण चांगला असतो. ते खरंच आहे. लसूण हृदयासाठी चांगला असतो. कच्चा लसूण खाल्याने अधिक फायदा होतो. लसणाची एक कळी, आल्याचा एक तुकडा आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण रोज जेवणाआधी खाल्ल्याने जास्त फायदा होईल.

२) दालचीनीचा वापर करूनही तुम्ही कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण कमी करू शकता. एक चमचा दालचीनी आणि हर्बल त्रिकुटचा ( काळे मिरे, लवंग आणि सूंठाचं चूर्ण) एक चतुर्थांश भाग टाकून चहा करा. चहा तयार केल्यावर १० मिनिटे थंड होऊ द्या. नंतर यात एक चमचा मध मिश्रित करून दोनदा सेवन करा.

३) नियमितपणे रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होता. सोबतच कोलेस्ट्रॉलही कमी केला जातो. आवळ्याचा शरीरावर अ‍ॅंटी-हायपरलिपिडेमिक, अ‍ॅंटी-एथेरोजेनिक आणि हायरोलिपिडेमिक प्रभाव होतात. हे शरीरासाठी हायपोलिपिडेमिक एजंटसारखं काम करतात आणि याने सीरममधील लिपिडचं प्रमाणही कमी केलं जातं.

४) दररोज रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होता. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कंट्रोलमध्ये राहतं. याने शरीरातील चरबी कमी करून खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित करण्यात मदत मिळते. यात तुम्हाला हवं असेल तर एक चमचा लिंबाचा रस किंवा अ‍ॅपल व्हिनेगरची दहा थेंबही टाकूनही सेवन करू शकता.

५) शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी आहारात बाजरी, दलिया, गहू, सफरचंद, द्राक्ष आणि बदामचा समावेश करा. बदाम शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवण्यास मदत करतं.

६) कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी केवळ आहारात बदल करूनच फायदा नाही तर एक्सरसाइजची तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे रोज वेळ काढून एक्सरसाइज करावी. चांगला आहार आणि एक्सरसाइज या दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवू शकता.

 *विष्णू सहस्त्र नामाची सुरस माहिती*

पूर्वी एकदा १९४० किंवा ५० च्या दशकात कोणीतरी महा पेरियार कांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती ह्यांची मुलाखत घेत होते. ते सद्गृहस्थ मुलाखत ध्वनिमुद्रित करीत असताना टेप रेकॉर्डरचा वापर करीत होते तेव्हा पेरियार ह्यांनी प्रश्नार्थक पवित्रा घेत विचारले, " कोणाला सर्वात जुन्या टेप रेकॉर्डर विषयी माहिती आहे कां ???"

ह्या नंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, "विष्णू सहस्त्र नाम आपल्या पर्यंत कसे आले ???

कोणी तरी म्हणाले, " पितामह भीष्म ह्यांच्या मुळे ते आपल्याला प्राप्त होऊ शकले", ह्या वर सर्वांचे एकमत झाले. 

त्यावर महा पेरियार ह्यांनी पुढचा प्रश्न केला, " युद्ध भूमीवर सगळ्यांनी भीष्म ह्यांना विष्णू सहस्त्र नाम म्हणताना ऐकले तेव्हा ते कोणी टिपून घेतले ???"

पुन्हा एकदा शांतता पसरली. तेव्हा महा पेरियार ह्यांनी स्पष्ट केले, " जेव्हा भीष्म कृष्ण स्तुतीपर विष्णू सहस्त्र नाम म्हणत होते तेव्हा कृष्ण व्यास ह्यांच्या समवेत सर्वजण त्यांच्या कडे पाहत होते. जेव्हा त्यांनी १००० विष्णू नामे म्हणून पूर्ण केली सर्वजण त्यांच्या कडे आश्चर्यचकित होऊन पहातच राहिले. सर्वात पहिले युधिष्ठिर भानावर येऊन ह्यावर संमिश्र प्रतिक्रिया देते झाले, " पितामह ह्यांनी वासुदेवाची उत्कृष्ठ अशी रमणीय १००० नावे पठण केली, आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो पण कोणी ती टिपून घेतली नाहीत, आता त्याचा क्रम पण आपण गमावला". तेव्हा सगळेजण कृष्णाकडे मोठ्या आशेने वळून मदतीची याचना करु लागले, नेहमी प्रमाणे कृष्ण म्हणाला," मलासुद्धा तुम्हा सर्वांप्रमाणे ऐकलेली रचना आवडली पण आपण काय करू शकतो ???"

तेव्हा सर्वजण अमूल्य अश्या रचनेच्या पुनर्प्राप्तीसाठी कृष्णाची आर्जवं करु लागले तेव्हा वासुदेव उदगारले, " हे फक्त सहदेव पुनर्प्राप्त करू शकेल आणि व्यास ते टिपून घेतील". सर्वजण, सहदेव हे कार्य कश्या प्रकारे करु शकेल ??? जाणुन घेण्यासाठी उत्सुक झाले, तेव्हा कृष्णाने उत्तर दिले, " आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूत स्फटिक धारण केले आहे. जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केलं तर तो स्फटिकाला ध्वनी लहरींमध्ये रुपांतरीत करु शकेल आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील". 

तेव्हा सहदेव आणि व्यास जिथे त्यांनी भीष्म पितामहांना सहस्त्र नाम म्हणताना ऐकले होते त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाच्या मार्फत ध्वनी लहरींद्वारे सहस्त्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थनेला सुरवात केली. 

स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल अशी असते. जो श्वेतांबर आणि स्फटिकासामान आहे अश्या शिवाचे उचित असे ध्यान केल्यास ह्या ध्वनी लहरी पुनर्प्राप्त होऊ शकतात . 

अश्या प्रकारे विश्वातील सर्वात पहिल्या स्फटिक टेप रेकॉर्डर मार्फत रचना ऐकून व्यासांनी ती टिपुन आपल्यापर्यन्त विस्मयकारक असे विष्णू सहस्त्रनाम पोहोचवले हे जेव्हा महा पेरियार ह्यांनी स्पष्ट केले तेव्हा सर्वजण स्तंभित होऊन ऐकतच राहिले..

*आपण आज वापरतोय त्या हार्डडिस्क, मेमरी कार्ड मध्ये स्फटिकाचाच वापर होतोय याचेशी तंतोतंत जुळणारी माहिती आहे. Quartz stone or SiO2 or silicon म्हणजेच स्फटिक...*

*ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ।।*

 🎯 *पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी!*

💁‍♂️ आता पेन्शनधारक धारकांना येत्या काळात हयात (जिवंत) असल्याचा दाखला देण्याची गरज नाही. कारण त्यासाठी केंद्र सरकारनं एक वेगळी योजना आखली आहे. 

🧐 पेन्शनधारकांनी दरवर्षी जिवंत असल्याचा दाखला दिला नाही तर त्यांची पेन्शन बंद केली जाते. पण आता पेन्शनधारकांची या दाखल्याच्या झंझटीतून सुटका होणार आहे. 

👍 केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम ही हायटेक टेक्नोलॉजी आणणार आहे. 

🗣️ टेक्नोलॉजीनुसार आता पेन्शधारकाचा चेहरा हाच जिवंत असल्याचा पुरावा असेल. राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्या हस्ते या नव्या तंत्रज्ञानाचं अनावरण करण्यात आलं. 

🤓 *फेस रेकग्नायझेशन टेक्नॉलॉजी काय आहे?* : 

● यानुसार बँकेला लिखित स्वरूपात हयातीचा दाखला देण्याची गरज नाही. 

● बँक अधिकारी मोबाईल अ‍ॅपद्वारे पेन्शनधारकाच्या चेह-यांची पडताळणी करतील. 

● चेहऱ्याचं स्कॅनिंग पूर्ण होताच संबंधित पेन्शनधारकाची अ‍ॅप्लिकेशनमध्ये नोंदणी होईल. 

● हाच जिवंत असल्याचा डिजिटल पुरावा असेल. 

💫 वयोमानामुळे अनेक पेन्शनधारकांना बँकेत जाता येत नाही. अशात ही नवी टेक्नॉलॉजी पेन्शनधारकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*


 उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence), खारघर, नवी मुंबई बाबतची विस्तृत माहिती:-

             उत्कृष्टता केंद्र असलेल्या अत्याधुनिक असा महत्वाकांक्षी प्रकल्प खारघर, नवी मुंबई येथे सिडको द्वारे विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

       याचे प्रामुख्याने उद्दिष्ट्य आहे की, भारतातील आगामी प्रतिभावान फुटबॉल खेळाला चालना देणे. जागतिक दर्जाच्या आंतराष्ट्रीय फिफा सामन्यांसाठी 40,000 प्रेक्षक आसन क्षमतेचे फुटबॉलचे स्टेडिअम टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहे.

      या उत्कृष्टता केंद्रासाठी एकूण 10.5 हेक्टर एवढी जागा आहे. जी आंतराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कच्या 42 दशलक्ष चौरस फूटच्या आवारातच आहे.

ज्यात वैशिष्टपूर्ण पध्दतीने रहिवासी आणि वाणिज्यिक अशा एकत्रित वापरासाठी विकसित करणे प्रस्तावित आहे.

       प्रस्तावित उत्कृष्टता केंद्र हे मुंबई-पुणे जलदगती मार्गापासून 20 मीटर वाहतुकीच्या अंतरावर आहे.

       भविष्यातील पायाभुत विकसनशील सुविधांच्या निकट आहे. ज्यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, नैना यांचा समावेश आहे. तसेच मुंबई या भारताच्या आर्थिक राजधानी व कला व क्रीडा यांचे केंद्रस्थान असलेल्या शहरापासून फक्त 1 तास वाहतूक अंतरावर आहे.

अंमलबजावणीच्या सुलभतेसाठी आणि भविष्यातील वापरासाठी हे काम 3 टप्प्यात विभागले आहे.

     पहिल्या टप्प्यात फिफाच्या दर्जाच्या सरावासाठी लागणार्‍या चार पिचेस (फुटबॉल मैदान) व प्रेक्षकांची गॅलरी ज्यात टेन्साईल रुफ सिस्टीमचा समावेश आहे.

दुसर्‍या टप्प्यात सर्व सुविधांनी युक्त अशा सदस्यता प्रकार असलेल्या अ‍ॅथलेटिक सुविधांनी युक्त अशा क्लब हाऊसचा समावेश आहे.

      तसेच तिसर्‍या टप्प्यात 40,000 क्षमतेच्या अत्याधुनिक अशा फिफा दर्जाच्या फुटबॉल स्टेडिअमचा समावेश आहे.

      पहिल्या टप्प्यातील उत्कृष्टता केंद्र असलेल्या वास्तुचा उपयोग व्यावसायिक खेळाडुंना मुख्य सामन्याआधीच्या सरावाकरिता केला जाईल, जे स्टेडिअमच्या बाजुलाच लागून आहे. तसेच राज्य / जिल्हा पातळीवरील सामने, आंतर महाविद्यालयीन सामने तसेच युवा विकास कार्यक्रमाकरीता त्याचा वापर केला जाईल.

       4 पिच पैकी 3 पिच नैसर्गिक गवताचे असतील व एक पिच कृत्रिम गवताचे असेल. हे सर्व पिच फिफाची तांत्रिक मार्गदर्शक तत्वे वापरुन बनविले जातील. जेणेकरुन फिफाचे आंतरराष्ट्रीय सामने येथे खेळविणे शक्य होणार आहे.

       जागतिक पातळीवर कृत्रिम गवताची मोठया प्रमाणावर स्वीकृती होत असताना, कृत्रिम गवताचे पिच अशा प्रकारे बनविले जाईल की, जेणेकरुन फिफाच्या अति उच्च अशा गुणवत्ता मानांकनात ते गणले जाईल.

      प्रत्येक नैसर्गिक गवताच्या पिचला स्वयंचलित सिंचनाची सुविधा दिला जाईल. 2 लाख लिटर क्षमता असलेल्या भूमिगत पाण्याची टाकी पुरविली जाईल. तसेच फिफाच्या शिफारसी प्रमाणे लागणाऱ्या नाले आणि कुंपणाची व्यवस्था केली जाईल.

      सर्व उत्पादने आणि ब्रँड हे जागतिक दर्जाचे वापरले जातील याकडे खात्रीलायक पध्दतीने लक्ष दिले जाईल. मुख्य:त्वे करुन कृत्रिम गवताचे गालीचे हे फिफा ने प्रमाणित केलेल्या सात कंपन्यांपैकी असतील त्यापैकी काही म्हणजे लिमोन्टा, फिल्डटर्फ, डोमो स्पोटर्स ग्रास, ओमेगा इत्यादी.

      प्रत्येक पिचचा आकार 68 × 105 मीटर एवढा असणार आहे आणि तीनही नैसर्गिक पिच वर 500 लक्सचे प्रकाशझोत दिवे लावले जातील, जे फिफाच्या वर्ग- 2 तपशिलाप्रमाणे असतील, जेणेकरून येथे सांघिक आणि क्लब सामने खेळविता येतील.

      तसेच जास्तीत जास्त वापराचे अनुमान असलेल्यास पिच क्र. 4 वर कृत्रिम गवताच्या पिचसह 2000 लक्सचे प्रकाशझोत दिवे लावण्यात येतील, जेणेकरून हे सामने दूरदर्शनवर दाखविणे सोयीचे होईल. जे की, फिफाच्या वर्ग - 4 तपशिलाप्रमाणे असतील.

      सरावाच्या 4 पिचेससाठी प्रेक्षक गॅलरी व टेन्साईल रुफ सिस्टीमची बैठक व्यवस्था नियोजित आहे. ज्यात खालच्या बाजूने प्रेक्षकांसाठी स्वच्छतागृह, खेळाडुंची कपडे बदलण्याची खोली, डॉक्टरची खोली, उत्तेजक द्रव्य सेवन नियंत्रण खोली, न्हाणीघर, साठवणुकीची खोली, प्रशासक व माहिती तंत्रज्ञान व्यवस्थेसाठी जागा इत्यादीसाठी केली जाईल.

     बैठक व्यवस्था ही एका वेळेस 4 संघ सहभागी करु शकेल अशा क्षमतेची असेल व वापराप्रमाणे वरील सर्व सुविधांना पुरेसा प्रकाश असेल, असे नियोजन आहे.

      जगातील 12 देशांतील उत्कृष्ट फुटबॉल संघ आशियाई फेडरेशन काँन्फेडरेशन महिला आशियाई कप 2022 यात सहभागी होत असून हे सामने भारतात अहमदाबाद, भुवनेश्‍वर आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये होणार आहेत.

      महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये काही सामाने खेळविण्यात येणार आहे.

    सिडकोव्दारे विकसित करण्यात येणार्‍या आंतराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क मध्ये 10.50 हेक्टर क्षे़त्रावर उत्कृष्टता केंद्र प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर वरील सामन्याकरिता सहभागी झालेल्या संघाना सराव करण्याकरिता या मैदानांची निवड वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशन शिफारशीद्वारे करण्यात आली असून वरील 02 नैसर्गिक गवताच्या फुटबॉल मैदानावर सिडकोतर्फे वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनला सरावाकरिता विनामोबदला देण्यात येणार आहे.


 


 


वृत्त क्र. 142


 


स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या

 पुणे येथील श्री बालाजी अभिमत विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

            मुंबई, दि.16:- पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येकाने आत्मनिर्भर झाले पाहिजे तसेच आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 

             पुणे येथील श्री बालाजी (अभिमत) विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारोह राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने संपन्न झाला, त्यावेळी राजभवन मुंबई येथून सहभागी होताना राज्यपाल बोलत होते. .

 दीक्षांत समारोहाला श्री बालाजी विद्यापीठ पुणे येथून एअर मार्शल भूषण गोखले (सेवानिवृत्त), अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, श्री बालाजी विद्यापीठाचे प्रकुलपती बी. परमानंदन, कुलगुरु डॉ जी के शिरुडे तसेच दूरस्थ माध्यमातून कॉल हेल्थ कंपनीचे मुख्याधिकारी टी. हरी, ओनिडा इंडियाचे माजी प्रमुख यशो वर्मा, शिक्षक व स्नातक विद्यार्थी उपस्थित होते. 

 आपण केवळ नोकरी व रोजगार मिळविण्यासाठी पदवी घेतली का याचा स्नातकांनी विचार करून डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवले पाहिजे. जीवनात अपयश आले तरी न डगमगता अधिक परिश्रम करून यश प्राप्त केले पाहिजे. शिक्षणाला संस्कार व नीती मूल्यांची जोड दिल्यास विद्यार्थी चांगले नागरिक होतील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणावे : एअर मार्शल भूषण गोखले

            भारतीय लष्कराला संरक्षण दल न म्हणता सशस्त्र सैन्य दल म्हणणे योग्य आहे असे मत सेवानिवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनीं यावेळी मांडले. 'संरक्षण' हा शब्द बचावात्मक पवित्रा दर्शवतो तर 'सशस्त्र सैन्य दल' आत्मविश्वास जागवतो असे त्यांनी सांगितले. लढाऊ पायलट प्रमाणे युवकांनी उच्च ध्येय ठेवावे मात्र ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजासाठी कार्य करावयाचे असल्यामुळे आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवावे असे त्यांनी सांगितले.

श्री बालाजी विद्यापीठाचे 22000 माजी विद्यार्थी जगभर विविध ठिकाणी चांगले कार्य करीत असून विद्यापीठाचे संस्थापक डॉ कर्नल बालसुब्रमण्यम यांनी महिला सक्षमीकरणाला विशेष महत्व दिल्याचे प्रकुलपती बी. परमानंदन यांनी सांगितले. 


 


 


कुलगुरू डॉ जी के शिरुडे यांनी यावेळी विद्यापीठाच्या अहवालाचे सादरीकरण केले. यावेळी २०१९-२१ तुकडीच्या स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तर गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.

 फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर देशाचा नावलौकिक होईल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

        अलिबाग,दि.16:- नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.

     नवी मुंबई, खारघर येथील फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence) उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, खासदार तथा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व महिला आशिया चषक भारत 2022 चे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल,खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आदेश बांदेकर,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.

मातीशी नाळ जोडली

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम अभिनंदनीय आहे.

स्पोर्ट्स सिटीचा उदय

             खारघर हे शहर भविष्यात "स्पोर्टस् सिटी" म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी "सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात" ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा हिंदुस्थानचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर हिंदुस्तानच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.

     यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राज्य शासनाचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. नव्या पिढीचा आवडता खेळ फुटबॉलच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या उत्कृष्टता केंद्राच्या व मैदानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढेल यासाठी सर्वजण मिळून सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. तसेच याच मैदानात लवकरच एएफसी वूमेन एशियन कप इंडिया 2022 चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे श्री.एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील हे उत्कृष्टता केंद्र एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे,असे सांगून नवी मुंबई शहर हे एज्युकेशन सिटी, आयटी सिटी याबरोबरच आता "स्पोर्टस् सिटी" म्हणूनही ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

नव्या पिढीसाठी पर्वणी

            पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉल प्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व हिंदुस्थानचे नाव मोठे करतील, असे सांगितले.


 


क्रीडा क्षेत्रातील मानाचा केंद्रबिंदू


            राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे या म्हणाल्या, नव्या पिढीचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे. येत्या काळात पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या पार्श्वभूमीवर या उत्कृष्टता केंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित होतील. ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी हा प्रकल्प निश्चितच लाभदायक राहील. यातून उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले जातील, त्यामुळे हा प्रकल्प क्रीडा क्षेत्रातील एक मानाचा केंद्रबिंदू ठरेल.

   या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाविषयीची तांत्रिक व प्रशासकीय माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. तसेच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष आभारही मानले.


    कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे या प्रकल्पाचे आभासी उद्घाटन झाले. त्यानंतर या प्रकल्पाच्या निर्मितीबाबतची छोटीशी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

Featured post

Lakshvedhi