Saturday, 1 January 2022



 

 लोकराज्य’ चा डिसेंबर-जानेवारीचा अंक प्रकाशित

            मुंबईदि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या डिसेंबर 2021 - जानेवारी 2022 चा आपला महाराष्ट्र आपले सरकार- दोन वर्ष जनसेवेची महाविकास आघाडीची’ या जोड अंकाचे प्रकाशन नुकतेच झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर हे अंकाचे मुख्य संपादक आहेत.

            मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने या अंकात राज्य शासन जनसेवेसाठी राबवित असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला आहे. यात मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्रिमहोदयांनी आपल्या विभागातर्फे दोन वर्षात राबविलेल्या विविध योजना आणि लोककल्याणार्थ घेतलेल्या निवडक निर्णयांबाबत आपले मनोगत व्यक्त केले आहे. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण विशेष विभाग या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील निर्णय आणि महत्त्वाच्या घडामोडी ही सदरे नेहमीप्रमाणे आहेत.

            हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.

000

 बेघर व गरजूंसाठी महाआवास अभियान

            20 नोव्हेंबर या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून देशात 20 नोव्हेंबर 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण ही योजना राबविण्यास सुरूवात झाली. या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतीमान करण्यासाठी व गुणवत्ता सुधारण्यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून महाराष्ट्रात ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यास सुरूवात झाली.

            हे महा आवास अभियान दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविण्यात आले आणि या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आलेली गतीमानता व गुणवत्तावाढ विचारात घेऊन 20 नोव्हेंबर 2021 ते 31 मार्च, 2022 पर्यंत पुन्हा ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ हे सन 2021-22 या वर्षामध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

            राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे, शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे, घरांची गुणवत्ता वाढविणे, लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम घडवून आणणे, जन-जागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे ही या महा आवास अभियानाची उद्दिष्टे आहे. या अभियानाच्या कालावधीत भूमीहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे तसेच बहुमजली इमारती व गृहसंकुले उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, घरकुल लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया किमान कालावधीत पूर्ण करून मंजुरी देऊन घरकुल मंजुरीचे पत्र त्वरीत वितरित करण्यात येतील.

            राज्यात महिला स्वयंसहायता गट / ग्राम संघ / प्रभाग संघ / विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी इत्यादी समुदाय आधारित संस्थाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक घरकुल मार्ट सुरू करून त्याद्वारे घरकुलाचे बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले जातील. त्याचप्रमाणे सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाच्या भौतिक प्रगतीनुसार टप्पानिहाय सर्व हप्ते किमान कालावधीत वितरीत करण्यात येतील.

            प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत घरकुलांना पहिला हप्ता प्रदान केल्यानंतर 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेली मात्र अद्यापपर्यंत अपूर्ण असलेली प्रलंबित घरकुले प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील. यात घरकुले प्रलंबित राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणाचे विश्लेषण व त्यावर उपाययोजना करणे. पूर्ण होऊ न शकणारी प्रलंबित घरकुले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रिफंड करून रिमांड करणे.

            घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट देणाऱ्या संस्थांशी समन्वय ठेवून कुशल गवंडी तयार करण्यात येणार आहे. प्रशिक्षित ग्रामीण गवंडी व ग्रामपंचायत क्षेत्रातील इतर उपलब्ध गवंडी याची ग्रामपंचायतनिहाय यादी तयार करून त्याचे पॅनेल बनवून या पॅनेलमधील गवंड्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील बांधकामात सहभाग घेण्यात येईल.

            घरकुलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत डेमो हाऊस निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड त्यांचे आधार सिडींग करण्यात येईल. राज्यपुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मधील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व जॉब कार्ड काढून त्याचे आधार सिडींग व जॉब कार्ड मॅपिंग पूर्ण करण्यात येणार आहे.

            ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन, पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मिशन, गॅस जोडणीसाठी उज्ज्वला योजना, विद्युत जोडणीसाठी सौभाग्य योजना, उपजिविकेसाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन अशा विविध शासकीय योजनांशी कृतीसंगमातून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृतिसंगम साधण्यात येणार आहे.

            या गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता सुधारणासाठी बहुमजली गृहसंकुले उभारणे व त्याच्या सहकारी संस्था स्थापन करणे, भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याकरिता विविध मार्गांनी उपलब्ध होणाऱ्या जागांची लॅण्ड बँक तयार करणे, वाळू करिता सॅण्ड बँक आणि वाळूला पर्याय म्हणून क्रश सॅण्ड, प्लाय ॲश ब्रिक्स, इंटर लॉकींग ब्रिक्स, हॉलो ब्रिक्स इत्यादीसोबतच अन्य बांधकाम तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे.

            महा आवास अभियान ग्रामीण 2021-22 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेबरोबरच विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून सोबतच ग्राम कृती गटाचे गठन, लाभार्थी मेळावे, बँक मेळावे यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सनियंत्रण व मूल्यमापन समितीची रचना करण्यात आली आहे.

            महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ‘महा आवास अभियान पुरस्कार 2021-22’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, इत्यादी ग्रामस्तरीय पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजना यांचा समावेश असणार आहे. या उत्कृष्ट कामासाठीच्या पुरस्कारांची नामांकने निवडण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

            बेघर आणि गरजू लोकांना हक्काचे आणि पक्के घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या महाआवास अभियानाच्या टप्पा-2 द्वारे राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, याची काळजी शासन आणि त्यासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी घेत आहेत.                                                                                                                                                                                                                                                          माहिती व जनसंपर्क महासंचालनाल                                      l        मंत्रालय, मुंबई-32






 अनुसुचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देण्याच्या

योजनेसंदर्भात लाभार्थी व संस्थाना आवाहन

            मुंबई, दि. 31 : सन 2009-2010 या वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत "अनुसुचित जमातीच्या मुलांना वाहन चालक प्रशिक्षण देणे" ही योजना मंजूर आहे. या योजनेकरिता इच्छुक अनुसुचित जमातीच्या मुलांनी तसेच वाहन चालक प्रशिक्षण देणाऱ्या मोटार वाहन अधिनियमाखाली नोंदणीकृत व मान्यताप्राप्त संस्थानी आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा,असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 रुग्णसेवा देणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घ्यावी

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

            मुंबई, दि. 31 : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 82 शिकाऊ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून या संदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करावा अशा सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना श्री.देशमुख यांनी दिल्या आहेत.

            वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल तसेच अन्य कर्मचारी वैद्यकीय सेवा पुरवितात. कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत आहेत याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विचारणा केली. वैद्यकीय सेवा देताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असणारे मनुष्यबळ बाधित होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

            मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना लक्षात घेता राज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनीही याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मनुष्यबळ बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सतर्क करण्यात यावे याबाबतच्या सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिल्या आहेत.

            याबाबतचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल असे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

Happy new year

  नाम का पंगा 🤣


जैसलमेर से बीकानेर बस रुट पर....

बीच में एक बड़ा सा गाँव है जिसका नाम है *नाचने*

 

वहाँ से बस आती है तो लोग कहते है कि 

*नाचने वाली बस आ गयी..*😎 


कंडक्टर भी बस रुकते ही चिल्लाता.. 

*नाचने वाली सवारियाँ उतर जाएं बस आगे जाएगी..*😎


इमरजेंसी में रॉ का एक नौजवान अधिकारी जैसलमेर आया 

रात बहुत हो चुकी थी,

वह सीधा थाने पहुँचा और ड्यूटी पर तैनात सिपाही से पूछा -

*थानेदार साहब कहाँ हैं ?*


सिपाही ने जवाब दिया थानेदार साहब *नाचने* गये हैं..😎


अफसर का माथा ठनका उसने पूछा डिप्टी साहब कहाँ हैं..?

सिपाही ने विनम्रता से जवाब दिया-

हुकुम 🙏🏻 *डिप्टी साहब भी नाचने* गये हैं..😎


अफसर को लगा सिपाही अफीम की पिन्नक में है, उसने एसपी के निवास पर फोन📞 किया।


एस.पी. साहब हैं ?


जवाब मिला *नाचने* गये हैं..!!


लेकिन *नाचने* कहाँ गए हैं, ये तो बताइए ?


बताया न *नाचने* गए हैं, सुबह तक आ जायेंगे।


कलेक्टर के घर फोन लगाया वहाँ भी यही जवाब मिला, साहब तो *नाचने* गये हैं..


अफसर का दिमाग खराब हो गया, ये हो क्या रहा है इस सीमावर्ती जिले में और वो भी इमरजेंसी में।


पास खड़ा मुंशी ध्यान से सुन रहा था तो वो बोला - हुकुम बात ऐसी है कि दिल्ली से आज कोई मिनिस्टर साहब *नाचने* आये हैं।

इसलिये सब अफसर लोग भी *नाचने* गये हैं..!!


🤪🤣😂

[31/12/2021, 21:24] Handicraf Naina: एक शंका...







सुलभ शौचलय वाल्याने कमावलेला पैसा.... 




हा दोन नंबरचा म्हणता येईल का....


🤔🤔😁😁

[31/12/2021, 21:24] Handicraf Naina: Kuch manoranjan ho Jaye

 आज का हिंदी ज्ञान :


 Air Hostess = हवाई सुंदरी

 Nurse = दवाई सुंदरी

 Lady Teacher = पढ़ाई सुंदरी

 Maid = सफ़ाई सुंदरी.


 Some one added:


 Wife = लड़ाई सुंदरी

 Girl frnd = पराई सुंदरी

          कृपया लेखक का नाम न पुछे 😛😜😝😆

 लेखक लेख लिखने के बाद से फरार है

 कुदरत का सबसे बडा सच ::--


 💧 यदि आप फूलों पर सो रहे हैं

         तो ये आपकी पहली रात है l


 💧 और यदि फूल आप पर सो रहे

         है तो ये आपकी आखिरी रात है l


 (अजब तेरी दुनिया गज़ब तेरा खेल)


 ®️🔹🔸🔹®️🔹🔸🔹®️


 💧 मोमबत्ती जलाकर मुर्दों को याद

         किया जाता है l


 💧 और मोमबत्ती बुझाकर जन्म

         दिन मनाया जाता है l


 (कैसी विडम्बना है हमारे देश की)


 ®️🔹🔸🔹®️🔹🔸🔹®️


 💧 फूलन देवी डाकू होकर भी

         चुनाव जीत गई थी l


 💧 और किरन बेदी पुलिस वाली

         होकर भी हार गई l


 (किस्मत के खेल निराले मेरे भैया)

 🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧


 कितनी अजीब दुनिया हैं, जहाँ औरतें ‘दूसरी औरतों

 की शिकायते करते नहीं थकती,


 जबकि पुरूष ‘दूसरी औरतों’ की तारीफ करते नहीँ

 थकते !!!


 पुरुष सच में महान हैं !!😜😝😝😝


 🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧


 5 चीजें जो खत्म होने पे बहुत तकलीफ देते हैं


 1. दोस्ती

 2. पैसा

 3. प्यार

 4. रविवार और

 5. इंटरनेट पेक


 लास्ट वाला तो रुला ही देता है…😜


 😜😝😛😷😷😋😋


 🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧


 😝😝 पुराने जमाने में जब कोई

 अकेला बैठकर हंसता था, तो लोग

 कहते थे… कि इसपर कोई भूत-

 प्रेत का सांया है..!!

 आज कोई अकेले में बैठकर हंसता है

 तो कहते हैं…

 मुझे भी SEND कर दे

 😂😂😂😆😆😆🌿🐄

 भारत अब साफ सुथरा रहेगा क्योंकि अब पूरी ,

  " निरमा वाशिंग पाउडर " की टीम

  " संसद " में मौजूद है ...!!

 हेमा ,

 रेखा ,

 जया ,

 और

 सुषमा ,

 सबकी पसंद ,निरमा .....🎽👖🎽👖

 एकदम लेटेस्ट है.....😁😁

 अजब कोकणातील गजब चालीरीती!!! 


कोकणातील काही चमत्कारिक चालीरीतींचा हा अद्भुत मागोवा......

 *मालवण-कुडाळ* रस्त्याला चौक्याच्या पुढे असलेल्या धामापूर गावाजवळ *कासार टाका* नावाचे एक विलक्षण ठिकाण आहे. अगदी रस्त्यालगत, निर्मनुष्य जागेत असलेल्या कासार टाक्याला माणसे वेगवेगळे *नवस* बोलतात. त्यामुळे भक्ताची कसलीही अडचण दूर होते. अडलेली कामे होतात, अशी अनेकांची *श्रद्धा* आहे. नवस फेडायचा असेल तर *कोंबडा, दारू व सिगारेट* यांचा नैवेद्य इथल्या ‘‘ठिकाणा’’ला देण्याची प्रथा आहे. कारण पूर्वीच्या काळी गावोगाव फिरून बांगडया विकणाऱ्या कासाराला या आडवाटेवर गाठून वाटमारी करणाऱ्यांनी क्रूरपणे मारले. तेव्हापासून तो कासार इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून येतो असा समज आहे.

सावंतवाडी तालुक्यात *दाभील* नावाचे एक गाव आहे. या गावात एकही *विहीर नाही*. किंबहुना विहीर मारली तर पाणीच लागत नाही. परंतु वरच्या भागात गुळगुळीत काळ्याशार दगडात *सात (बावी) विहिरी* आहेत. या निसर्गनिर्मित विहिरींचे पाणीच साऱ्या गावाची तहान भागवते. कोकणात नैसर्गिक चमत्कारांची अशी उदाहरणे आहेत तशीच चमत्कारिक रीती-रिवाजांचीसुद्धा कितीतरी ठिकाणे आहेत.

*मातोंड* हे एकही *चहाचे दुकान* नसलेले गाव. येथील जत्रेतसुद्धा चहाचे हॉटेल लावत नाहीत. गावात *दारू* प्यायला बंदी. पण डोंगरात भरणारी *घोडेमुखची जत्रा* हा देव ब्राह्मण असून त्याला *शुद्ध शाकाहारी नैवेद्य* दिला जातो आणि त्याच्या गणांना मात्र *कोंबडय़ाचा नैवेद्य* द्यावा लागतो. म्हणून या जत्रेला *कोंब्याची जत्रा* म्हणतात.

*देवगड* तालुक्यातील *नारिंग्रे* गावात कोणीही *कोंबडी* पाळीत नाहीत. अगर *बाहेरून* आणून *खाऊ* शकत नाही. गावाचे तसे कडक नियम आहेत. तर *म्हापण* गावात *येसू आकाच्या* देवळात नवस फेडायचा असेल तर *सुक्या बांगडयाची चटणी* आणि *नाचण्याची भाकरी* असा अस्सल *मालवणी* बेत करावा लागतो.

*उभादांडा* येथे *मानसीचा चाळा* नावाचे एक *जागृत स्थळ* आहे. तिथे *नवस* फेडायचा असेल तर *खेकड्यांची माळ* आणि *गॅसची बत्ती* देतात. या चाळ्याच्या जत्रेला *बत्तेची जत्रा* म्हणतात.

*परुळे* गावच्या *येतोबाच्या* देवळात म्हणे, भिंतीला *लोखंडी खंजीर* चिकटतो. या उत्सवाला *बाक उत्सव* म्हणतात तर *आरवली* गावात वेतोबाचे सुप्रसिद्ध देऊळ आहे. त्याचा *नवस* फेडण्यासाठी *सोनकेळीचा घड* आणि *चामडयाची चप्पल* भेट म्हणून देतात. वेताळाला दिलेली ही चप्पले ठेवल्या जागेवर आपोआप झिजतात. अशी झिजलेली चप्पले आजही पाहायला मिळतात.

मालवण तालुक्यातील *पेंडुर* गावचे *मसणे-परब* लग्न लावण्याआधी देवळाच्या आवारात स्मशानातले सगळी विधी करून मग लग्नाच्या *बोहल्यावर* उभे राहतात. याच तालुक्यातील *कोईल* गावातील रहिवासी हे लग्नपत्रिकेवर *गणपती* प्रतिमा छापत नाहीत. कोणाच्याच घरी गणपती पूजन करीत नाहीत. भिंतीवर *गणपतीचे कॅलेंडरसुद्धा* लावीत नाहीत. 

*कणकवली* तालुक्यातील *कुर्ली* गावचे *पाटील* घराण्यातले लोक *तुळशीच्या लग्नादिवशीच म्हाळ* घालतात. तर *वालावल* गावातील एकही माणूस *पंढरपूरला* जात नाही.

फोंडाघाट येथील *वाघोबाचे मंदिर* हे समस्त *अनिष्ट* शक्तींना रोखून धरणारे *शक्तिस्थळ* आहे असे मानतात. इथले मंदिर कोंबडा आरवायच्या आत फक्त एका रात्रीत बांधायचे अशी विचित्र अट होती. शेवटी गावकऱ्यांनी धाडस करून अतिशय नियोजनपूर्वक सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या वेळेत मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.

पुराणात ज्याचा *एकचक्रानगरी* म्हणून उल्लेख आहे ते गाव *वैभववाडी* तालुक्यात सह्याद्रीच्या निबीड अरण्यात आहे. इथे मोठमोठ्या *गुहा* असून त्यात *गाडाभर अन्न खाणाऱ्या बकासुराचे वास्तव्य* होते असे सांगितले जाते. दगडात *कोरलेला महाल* आणि काळय़ा दगडाचा प्रशस्त *पलंग* आजही तेथे आहे. पांडवांना अन्न पुरवणाऱ्या ब्राह्मणाचा वाडाही जवळ आढळतो. या दुर्गम भागात *प्रशस्त गुहा* आहेत, पांडवांची लेणी आहेत आणि भरपूर *पाण्याचे साठेही* आहेत. अंगी खूप धाडस आणि चिकाटी असल्याशिवाय इथे पोहोचणे खूप अवघड आहे. अरण्यातील या विशिष्ट जागेला *राकसमाळ* असेही म्हणतात. 

*कोकणातील अशा असंख्य ठिकाणच्या चालीरीती व गूढता समजून घेवून अश्या अद्भुत ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!!! 

Mahesh Said यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार!!! 

फोटो सोर्स इंटरनेट!

Featured post

Lakshvedhi