गणगापुरचे दत्त मंदिर।ह्या व्हिडिओत छान व स्पष्ट दर्शन होतंय। तिथे गेल्यास एका पीप होल मधून ते पाहावे लागते तेही वाकून। ते दिसतही नाही। गर्दीत पुजारीहि घाई करतात।दत्ताची 3 हि मुखे वेगळी आहेत त्यामुळे ती नीट दिसत नाही। तिथे जाऊन नीट दर्शन होत नाही म्हणून ह्याचेच स्पष्ट दर्शन घ्यावे।
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 21 December 2021
टीईटी परीक्षेतील अनियमितता प्रकरणी चौकशीसाठी
अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
मुंबई, दि. 20 : सन २०१९-२०२० मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितता प्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
या समितीमध्ये आयुक्त (शिक्षण) पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे, संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य असतील. तर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असतील.
ही समिती सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) तसेच जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल १५ दिवसांत शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर करेल. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
00000
Monday, 20 December 2021
1) *What is Old Age?*
Best Answer:
When You start
Turning Off Lights
for
Economic Reasons
rather
than Romantic Reasons
😃😛
and
when You start
Cursing the
Romantic
Restaurant Lights,
becoz You
Can't Read the Menu
👍 😁 👍
2) *Who are MEN?*
Woh jo Narak mein bhi apne *Dost se Mile, toh kahe.. "Abe !! Yamraj ki Wife Dekhi ?? Aag hai Aag "!!** 😆😜
*Who are Women ??*
Woh jo Swarg mein bhi apni Saheli se Mile, toh kahe.. *"Apsara Dekhi... No Dressing Sense at all".* 😄😅😆
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. 20 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर.एन.कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) हे पाच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मान्यता देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
या मान्यतेनुसार एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे 4,3,6,1 आणि 4 प्रवेशक्षमतेची परवानगी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिल्यानंतर शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात या दोन्ही रुग्णालयाला प्रत्येक शाखेसाठी मंजूर प्रवेशक्षमतेनुसार प्रवेश देता येणार आहे.
००००
जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार
- सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास
· सोलापूरसह चार जिल्ह्यांतील २२ लाख मुलांना लस देणार
मुंबई दि. २० : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केले. या चार जिल्ह्यांतील एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सुमारे बावीस लाख एकशे तेवीस मुलांना ही लस दिली जाणार आहे.
जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण जानेवारी महिन्यात केले जाणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
या बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, नगरविकास विभाग उपसचिव विद्या हम्पया, ग्राम विकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रा. भा. गायकवाड, सल्लागार डॉ. राजीव कुमार, डॉ. राज जोटकर आदी उपस्थित होते.
डॉ. व्यास यांनी सांगितले की, जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा मृत्यूदर तीस टक्के आसपास आहे. आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वरील चार जिल्ह्यांतील सर्व पात्र मुलांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत.
डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेसाठी केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. डॉ.सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
बैठकीस कक्ष अधिकारी सा. दा. मुकदाडवार, आदिवासी विभागाचे कक्ष अधिकारी स. श्री. खांडेकर, शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी आदी उपस्थित होते.
****
जैतापूर प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल
- जॉन मार्क सेर शॉर्ले
2022 मध्ये ‘बॉनजो इंडिया’ आणि ‘नमस्ते फ्रांस’ होणार
मुंबई, दि. 20 : फ्रान्सच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी येथे केले.
शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी (दि. २०) राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. फ्रान्स सन 2022 साली भारतात आपला सांस्कृतिक महोत्सव 'बॉनजो इंडिया' आयोजित करणार असून त्यानंतर भारत देखील फ्रान्स मध्ये 'नमस्ते फ्रांस' या भारताच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करोना काळात भारतातील फ्रेंच कंपन्यांनी एकही कामगार कपात केली नाही असे वाणिज्यदूतांनी राज्यपालांना सांगितले.
राफाएल सहकार्यामुळे भारत - फ्रान्स संबंध अधिक मजबूत झाले असून फ्रेंच कंपनी दासाऊँ एव्हिएशनच्या सहकार्याने नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरु असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
राज्यातील 22 सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने फ्रान्समधील विद्यापीठांनी राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य करण्याचा प्रस्ताव केल्यास आपण त्याचे स्वागत करू, असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.
००००
Jaitapur project will further promote business cooperation between India and France
Mumbai Dated 20 : The newly appointed Consul General of France in Mumbai Jean Marc Sere Charlet has said that successful commissioning of the Jaitapur project, the largest nuclear power plant in the world will further promote business cooperation between India and France. The Consul General was speaking to Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai on Monday (20th Dec)
The Consul General told the Governor that France will be holding its cultural festival ‘Bonjour India’ after which India will also hold its ‘Namaste France’ in France.
The Governor said that Rafale deal has strengthened the strategic cooperation between India and France. He said French company Dassault Aviation is offering a vocational training programme at Government Industrial Training Institute in Nagpur.
0000
राज्यात 2022 पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
· गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर गुणसंवर्धीत तांदूळ वितरण प्रकल्प सुरु
मुंबई, दि. २० : ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मंत्रालयातील दालनात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गुणसंवर्धित तांदुळाच्या वितरणाचे प्रमाण वाढविणे व इतर उपाययोजना संदर्भात बैठक झाली. या बैठकीत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री.भुजबळ यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, शिधावाटप नियंत्रक कान्हूराज बगाटे व वैधमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक रविंद्र सिंघल, सहसचिव सुधीर तुंगार यावेळी उपस्थित होते.
अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ म्हणाले, केंद्र शासनाने २०२४ पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांना शंभर टक्के फोर्टीफाईड राईस उपलब्ध करून देण्याबाबतची योजना आखली असून त्यासाठी केंद्राकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील तामिळनाडू, तेलंगणा, हरीयाणा, मध्यप्रदेश या राज्यांनी १०० टक्के गुणसंवर्धित तांदळाचे वितरण चालू केले आहे. केंद्र शासनाकडून फोर्टीफाईड राईस वितरणासाठी महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली असून. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक वितरण प्रणालीमधून गुणसंवर्धित तांदळाचे (फोर्टीफाईड राईसचे) वितरण सुरू आहे. केंद्रशासनाच्या निर्देशानुसार राज्यात प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना श्री.छगन भुजबळ यांनी दिल्या.
श्री.भुजबळ म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात ज्याप्रमाणे यशस्वीपणे गुणसंवर्धित तांदळाचे (फोर्टीफाईड राईसचे) वितरण सुरू आहे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यात कार्यवाही करावी. जेणेकरून ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन होण्यास मदत होईल. २६ जानेवारी २०२२ पर्यंत राज्यात ही योजना सुरू होईल याबाबत सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे. देशात आणि राज्यात अॅनेमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अॅनिमिया प्रामुख्याने रोजच्या जेवणात Vitamin- A, B-९/फॉलेट व B-१२ या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की, जर पुरेशा प्रमाणात जेवणातून लोह व इतर पोषक द्रव्य मिळाल्यास अॅनिमिया मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. राज्यात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेवून कार्यवाही करावी अशा सूचना मंत्री श्री.छगन भुजबळ यांनी केल्या.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...