Thursday, 9 December 2021

 कंपनी एकत्रिकरण, विलगीकरणाच्या दस्तांवर मुद्रांक शुल्क


आकारण्याच्या अधिनियमात सुधारणा

            कंपनी एकत्रिकरण तथा विलगीकरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या दस्तांवर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

                 कंपनी एकत्रिकरण तथा विलगीकरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या दस्तांवर तथा निर्गमित होणाऱ्या आदेशांवर मुद्रांक शुल्काची आकारणी करता यावी यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे अशा दस्तांवर देय होणाऱ्या मुद्रांक शुल्काची वसुली होऊन शासनाच्या महसूलामध्ये वाढ होणार आहे. याकरिता महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील संबंधित कलमांमध्ये व अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

 नीती आयोगाच्या शिफारसी आणि सूचना राज्याच्या कृषी विकासासाठी मार्गदर्शक


- कृषीमंत्री दादाजी भुसे

· कृषी आणि संग्लन क्षेत्रासाठी धोरणाबाबत सादरीकरण

            मुंबई, दि. 8 : राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नीती आयोगाने केलेल्या शिफारसी आणि सूचनांबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. पुढील वर्षात यासंदर्भातील सूचनांवर कृषी आणि संलग्न विभाग एकत्रित मिळून काम करतील. या शिफारशी आणि सूचना राज्याच्या कृषी विकासासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

            नीती आयोगामार्फत मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळापुढे 'कृषी आणि संग्लन क्षेत्रासाठी धोरण' या विषयावर सादरीकरण केले होते. त्यावेळी कृषी आणि संलग्न विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

            कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नीती आयोगाने केलेल्या शिफारसी आणि सूचनांबाबत कृषी विभाग सकारात्मक आहे. नीती आयोगाने निदर्शनास आणलेल्या राज्याच्या कृषीक्षेत्राच्या विकासदराविषयी सकारात्मक विचार करुन राज्य शासन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नीती आयोगाच्या शिफारशी आणि सूचना राज्याच्या कृषी विकासासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. तालुकास्तरावरील कृषी विकास दर आणि उत्पादकतेतील फरकाबाबत इतर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासंदर्भात उपक्रम राज्य शासनाने सुरु केला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधनाप्रमाणे जे शेतकरी स्वयंप्रेरणेने संशोधन करुन शेतीचा विकास करत आहेत अशा जवळपास 5 हजार शेतकऱ्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना देण्याचा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. अशी माहिती यावेळी श्री. भुसे यांनी दिली.

            कृषी मंत्री श्री. भुसे यांनी राज्य शासन राबवित असलेले योजनांची माहिती देऊन कोरोना संकट काळात अनेक शेतकऱ्यांचा पिक घेण्याच्या पद्धतीत बदल करण्याकडे कल दिसून आला असल्याचे सांगितले. कोरोना काळात कृषी विभागाने चांगले काम केले आहे. सोयाबीनचे विक्रमी उत्पादन झाले असून चांगला दरही मिळाला आहे. ते म्हणाले, कृषी क्षेत्रात गावपातळीवर महिलांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे कृषी योजनांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा मानस असून केंद्र सरकारनेही याबाबत विचार करावा. अनेकदा कीटकनाशकांची किंमतीपेक्षा कमी किंवा जास्त दरात विक्री होत असल्याचे आढळून येते. यावर आळा घालण्यासाठी कीटकनाशक दराबाबत अधिक कठोर नियम आणि कायदे असण्याची अपेक्षा श्री. भुसे यांनी व्यक्त केली.

            कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, ग्राहक न्यायालयात शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निश्चित कालावधीत निपटारा व्हावा यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात. फळ निर्यातीसाठी मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी निधीची उपलब्धता व धोरण तयार व्हावे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेतकऱ्यांना अवजारासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करुन दिल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. वातावरणीय बदलामुळे राज्यातील बागयतदारांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानग्रस्त बागायतदारांना शेड-नेट, पॉली कव्हर आदी मदत देण्याबाबत योजना सुरु करावी. खर्चाचे नियम (कॉस्ट नॉर्म्स) दरवर्षी निश्चित करावे. शेतमजूरांसाठी विमा संरक्षण देण्यासंदर्भात केंद्रीयस्तरावर उपाययोजना कराव्यात तसेच भरड धान्यासाठी प्रायोजित योजना असाव्यात अशा विविध मागण्या कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी नीती आयोगाकडे केल्या. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाच्या योजनांची माहिती देऊन भविष्यातील दृष्टीकोनही श्री.भुसे यांनी विषद केला.

            नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद यांनी राज्याचे सादरीकरण चांगले झाल्याचे सांगून भविष्यात कृषीक्षेत्रा पुढील आव्हाने वाढणार असल्याचे सांगितले. रोजगार वाढीसाठी कृषी संग्लन उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. वातावरणीय बदलाचाही कृषीक्षेत्रावर प्रभाव पडणार आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सेंद्रिय शेतीवर लक्षकेंद्रीत करणे गरजेचे आहे. या सर्व बाबीसाठी कृषीक्षेत्रात दिर्घकालीन नियोजन करण्याची गरज प्रा. रमेश चंद यांनी यावेळी व्यक्त केली.

             बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, पणन विभागाचे प्रधान सचिव, नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार ॲना रॉय, कृषी आयुक्त पंकज कुमार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी राज्याच्या कृषी क्षेत्र विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

        नीती आयोगाचे सदस्य (कृषी ) प्रा. रमेश चंद यांनी मांडलेल्या शिफारशी

· पावसावर विसंबून असलेल्या शेतीतील कमी उत्पादकतेचे निर्दयी चक्र मोडीत काढा

-चांगल्या दर्जेदार प्रतीचे बी-बियाणे

-बी बियाणांवर प्रक्रिया

-जल व्यवस्था

-पीक पद्धतीत बदल करणे

· अतिरिक्त/ पूरक उत्पन्नासाठी कृषी वनीकरण

· उपलब्ध पाण्याचा उत्कृष्ट उपयोग करण्यासाठी सिंचन धोरणाची गरज

-पाण्याचा प्रभावकारी उपयोग, जल साठवणे, जल संधारण

· भू-प्रदूषण व जमिनीचा ऱ्हास थांबविण्याची आवश्यकता

· पडीक जमीन वृक्षारोपण, चारा आणि जलसंधारणासाठी उपयोगात आणली जाऊ शकते.

· फलोत्पादनासाठी अधिक प्रोत्साहन व प्राधान्यक्रम

· पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता

· जिल्ह्यातील पशुधन तसेच पिकांची वाढ, या आधारे जिल्हानिहाय नियोजनाची गरज

· कृषी क्षेत्रासाठी जागतिक पातळीचे उत्कृष्ट तंत्रज्ञान आणावे. जसे रूट, सी ओ ई

· डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग: शेत विस्तार

· दुग्ध-सहकाराचे बळकटीकरण व विस्तार

· राज्यातील यशोगाथांची संख्या वाढविणे

· जल व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टी केंद्रस्थानी ठेऊन बहुस्तरीय नियोजनाची गरज. 

· कृषी आणि अन्न प्रणालीत बदलांसाठी सर्वसमावेशक नियोजनाची उच्चस्तरीय तज्ज्ञ गट स्थापित करावे.


00000



 

 कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास


सानुग्रह सहाय्यासाठी संकेतस्थळ विकसित

            मुंबई, दि. 8 : कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- सानुग्रह सहाय्य देण्यातबाबत सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे.

               या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.

            अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.

            जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

            अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.

            सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.

            जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.


**********




 


 थोडाफार वेळ काढून नक्की वाचा.. व आत्मचिंतन करा...

💐 *"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"-:*💐 

     *"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???*

   *"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."*

*श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :*

*पार्था,* 

     *"मांजर जेव्हा उंदराला पकडते* 

*तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना* 

*खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्‍या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त*

*परिणाम वेगवेगळे आहेत.."*

     *"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*

*तर दुसरा ८४ फेर्‍यामध्ये अडकेल.."*

*: विष काय आहे ..?*

     *"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...*

*जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा*

*जास्त मिळाली की ती विष बनते...*

*मग ती ताकत असो*

*गर्व असो.*

*पैसा असो.*

*भूक असो.."*

     *"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....*

*जशी,एक जीभ बत्तीस*

*दातांच्या मध्ये रहाते,*

*सर्वांना भेटते,*

*पण कोणाकडून दबली जात नाही"..l

 *सुखाचे १७ पाऊले*👏👏

❗जाग येता पहिल्या प्रहरी

हळुवार डोळे उघडावे... १

❗मग उत्तरेकडे पाहून देवास स्मरावे... २

❗अंथरुणातून उठताक्षणी

देवाला नमावे... ३

❗ध्यानस्थ होऊ भगवंताला 

आठवावे... ४

❗देवाचरणी बसावे... ५

❗काही न मागता

त्यालाच सर्व अर्पावे... ६

❗घरांतून निघता बाहेर

आई वडिलांना नमावे... ७

❗येतो असा निरोप घेऊन 

मगच घर सोडावे... ८

क्षणभर दाराबाहेर थांबून

देवाला स्मरावे... ९

❗समाधानाचे भाव आणून

मगच मार्गस्थ व्हावे... १०

❗चेहऱ्यावर स्मित हास्य

नेहमी बाळगून चालावे..११

❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे

आनंदाने पहावे... १२

❗जगात खूप भांडण तंटे

आपण शांत राहावे... १३

❗सतत तोंडात मध आणि

मस्तकी बर्फ धरावे... १४

❗जीवन हे मर्त्य आहे

नेहमी लक्षात असावे... १५

❗प्रत्येक क्षण हेच अ अंतिम जीवन

हेच मनी ठसवावे... १६

❗सत्याने वागून नेहमी

जीवन आपुले जगावे... १७

*🙏🏼आपले आयुष्य आनंदात जावो*🙏

*-मी कोण ?-* *सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?*


®️ *महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.*


®️ *विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.*


®️ *व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.*


®️ *सुरदासही आंधळे होते.* 

®️ *मुक्तेश्वर मुके होते.*

®️ *कुर्मदास पांगळे होते.*

 ®️ *चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.*

®️ *तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.* 

®️ *ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.*

®️ *जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.* 

®️ *पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.* 

®️ *महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.* 

®️ *श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.*

®️ *प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला.*  

®️ *विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.*

®️ *पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यास्पद नाही का?*

🔰 *"मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का" असे रडगाणे गाणा-या अज्ञ जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमुटपणे प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.*

🎯 *म्हणून पुण्याची गणना करुन स्वतःचा टेंभा मिरवू नका .*

*म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा*

*पुण्याची गणना कोण करी*🌹🌹🙏🌹🌹

🌹🌹जय गुरु महाराज🌹🌹

 एक व्यक्ती लॉकडाऊननंतर दाढी करायला गेला असता तो दुकानदाराने लावलेला बोर्ड वाचतो...


दाढी - फक्त १०₹

ब्लेड अधिभार - २₹

वस्तरा भाडे - ५ ₹

क्रिम - ५ ₹

कात्री भाडे - ५ ₹

खुर्ची भाडे - ५₹

लोशन - ५₹

पावडर - ५ ₹

नॅपकिन भाडे - ५₹

एकूण रु. - ४७ ₹

बोर्ड वाचून ग्राहकाने विचारले : तुम्हीतर कमाल केली, दाढी फक्त १० ₹ लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूट करता?

दुकानदार : हा बोर्ड तरी मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता येतो! तरीही तुम्ही मला जाब विचारला? परंतु, *महावितरणकडून अनेक वर्षांपासून महाफसवणूक सुरू आहे! त्यांचे बिल किती जणांना कळते?*

😳😜😝😂🤣

Bal krida


 

Featured post

Lakshvedhi