प्रतापगडा वरील महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एका गाईड ने दिलेली जबरदस्त माहिती! नक्की ऐका गाईडच्या तोंडून! 🙏🙏🙏
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 7 December 2021
तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना
नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार
नगरविकास विभागाचा निर्णय
· ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद/नगर पंचायतीत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन
· 1477 सफाई कर्मचाऱ्यांना होणार लाभ; शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 6 : ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील 1477 सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही.
विविध नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये ग्रामपंचायतकालीन सुमारे 1477 सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मंजूर व रिक्त असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 च्या पदांवर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार मंजूर व रिक्त जागांवर विहीत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) या संस्थेच्या माध्यमातून ६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
००००
येवल्याच्या मुक्तिभूमीला 'ब वर्ग' तीर्थक्षेत्र दर्जा
नगरविकास विभागाचा निर्णय
मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला येथील मुक्तिभूमीला 'ब वर्ग' तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी नगरविकास विभागाला पाठवला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
येवल्यातील मुक्तिभूमी याच ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या जागेस ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी १३ ऑक्टोबर, विजयादशमी आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेंडकर यांचे लाखो अनुयायी या जागेला भेट देतात. त्यामुळे या जागेस तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही जागा मुक्तिभूमीसाठी आरक्षित असून तिचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आला आहे. तसेच, या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था, मोबाइल टॉयलेट आदी व्यवस्था पुरवली जाते. ही जागा समाज कल्याण विभागाच्या मालकीची असून तिची देखभाल-दुरुस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने केली जाते.
या जागेचे महत्त्व लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी विश्वभूषण स्तूप, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा इ. कामे करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण केंद्र, भिख्खु निवास, भिख्खु पाठशाला, अँफीथिएटर, कर्मचारी निवासस्थाने, बगिचा आदी कामे प्रस्तावित आहेत.
सन 2018 च्या पहिल्या विधिमंडळ अधिवेशनात विधान परिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मुक्तिभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद केले होते. येवला नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने याबाबतचा प्रस्ताव मंजूर करून नगर विकास विभागाकडे पाठवला होता. तसेच, नाशिकच्या विभागीय आयुक्तांनीही ऑगस्ट 2021 मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.
येवल्याची मुक्तिभूमी ही डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी तीर्थक्षेत्रच आहे. याच ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. या जागेला 'ब वर्ग' तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी होत होती. आज ६ डिसेंबर रोजी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुक्तिभूमीला 'ब वर्ग' तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन हे महाविकास आघाडी सरकार बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत आहे. |
रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी तीर्थयात्राच
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
अलिबाग, जि.रायगड, दि. 6 (जिमाका):- रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, राष्ट्रपती श्री. कोविंद यांची कन्या स्वाती कोविंद, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद म्हणाले की, रायगड किल्ल्याला भेट देणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या रायगड भेटीला आपण एक प्रकारची तीर्थयात्राच मानतो. या भेटीसाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व जगाला प्रेरित करणारे होते, असेही श्री. कोविंद यांनी सांगितले.
राष्ट्रपती श्री. कोविंद आपल्या भाषणात गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकता, सांस्कृतिक गौरव व देशप्रेम वाढीच्या परंपरेची सुरुवात केल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कार्यकुशल वैशिष्ट्यांबद्दल आदर व्यक्त केला.
भारतातील युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख होण्यासाठी "शिवराजविजया" या संस्कृत भाषेतील पुस्तकाचा भारतीय इतर भाषांमधून अनुवाद व्हावा, अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रपती श्री.रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय सामाजिक उत्थानासाठी केलेल्या विशेष कार्याप्रति राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आदरभाव व्यक्त केला.
"मराठा लाईट इन्फंट्री" या भारतीय सैन्याच्या युनिटच्या "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या युद्ध घोषणेचा त्यांनी आवर्जून उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान व्यक्त केला.
पश्चिम घाट आणि कोकण अशा या निसर्गसंपन्न क्षेत्रात पर्यटन आणि आधुनिकीकरणास अधिक वाव असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना आपण आजच्या 21 व्या शतकात साकारू शकतो, असे त्यांनी शेवटी अधोरेखित केले.
राष्ट्रपती श्री.कोविंद हे "रोप वे" ने रायगड किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी पत्नी व मुलीसह होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. याशिवाय त्यांनी राजसदर येथील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
या भेटीदरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगड किल्ल्याचे संवर्धन आणि जतन कशा प्रकारे केले जात आहे, याबाबतचे संगणकीय सादरीकरण पाहिले. त्याचबरोबर यावेळी रायगड विकास प्राधिकरणाकडून राष्ट्रपती श्री.कोविंद यांना छत्रपती संभाजीराजे यांनी "रायगड सिग्निफिकंट मॉन्यूमेंन्ट्स" आणि "रायगड फोर्ट:-प्रोग्रेस ऑफ वर्क " ही पुस्तके तर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड किल्ल्याची सचित्र माहिती देणारे "दि ग्रेट कॅपिटल:- रायगड" हे कॉफीटेबल स्वरूपातील पुस्तक दिले.
तत्पूर्वी किल्ले रायगडावर पोहोचल्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी,आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी राष्ट्रपती श्री. कोविंद यांचे स्वागत केले.
राजसदर येथील आयोजित स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रपती श्री. कोविंद व त्यांच्या कुटुंबियांना दांडपट्टा, होन, महाराजांच्या आज्ञापत्राची प्रतिकृती या भेटवस्तू दिल्या.
यावेळी प्रस्तावना करताना छत्रपती संभाजीराजे यांनी महामहीम राष्ट्रपती यांची आजची रायगड किल्ल्याला भेट, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याची भावना व्यक्त केली.
०००००
येवल्याच्या मुक्तिभूमीला 'ब वर्ग' तीर्थक्षेत्र दर्जा
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आंदोलन मागे घेण्याच्या
आवाहनाला 'मार्ड'चा सकारात्मक प्रतिसाद
मुंबई, दि. 6- राज्य शासन निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला मार्डच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.
आपल्या विविध मागण्यांसाठी देशातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबईतील महापालिकेच्या महाविद्यालयांचे अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मार्डचे सदस्य उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री श्री ठाकरे म्हणाले, निवासी डॉक्टरांच्या विभागाशी निगडीत व महानगरपालिकेच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील विषयांबाबतही पाठपुरावा करण्यात येईल. आरोग्यसेवेसाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या चांगल्या दर्जाच्या देण्याबाबत शासन आग्रही असल्याचेही ते म्हणाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्डने आंदोलन करू नये, असे आवाहन श्री ठाकरे यांनी यावेळी केले.
राज्य शासनाने डॉक्टर्ससाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्डच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.
00000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...