Wednesday, 10 November 2021

 दिलखुलासकार्यक्रमात मुंबई उपनगरच्या

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत

 

         मुंबईदि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास या कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एअरया ॲपवर बुधवार दि. १० आणि गुरुवार दि. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

              मतदारांचे प्रकारमतदार होण्यासाठी आवश्यक पात्रतामतदार यादीत नाव नोंदवणेवगळणे व दुरुस्तीफॉर्म नंबर ६ सोबत आवश्यक असणारी कागदपत्रेदावा अर्ज आणि आक्षेपांची पडताळणी, मतदारयादीमध्ये नोंदवलेल्या नावामध्ये मुद्रणदोष असल्यास तो दुरुस्त करण्यासाठीची पद्धती आदी विषयांची माहिती श्रीमती चौधरी यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

00000

 पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या

श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांस राज्य सरकारकडून 5 लाखांचे सहाय्य

- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

 

            मुंबईदि. 9 :  भारत-पाकिस्तान हद्दीजवळ मच्छिमार नौकेतून मासेमारी करीत असताना पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात  मृत पावलेल्या श्रीधर चामरे (रा. वडराई जि. पालघर) यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहेअशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

            गुजरात राज्यातील ओखा (जि. वेरावळ) येथील जलपरी-४’ ही मच्छिमार नौका ७ खलाशांसह २५ ऑक्टोबर रोजी ओखा येथे मासेमारीसाठी गेली होती. भारत-पाकिस्तान हद्दीनजिक मासेमारी करीत असताना दि. ६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीकडून झालेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई येथील श्रीधर रमेश चामरे हे मृत पावले तर अन्य एक खलाशी जखमी झाला. या घटनेत मृत पावलेल्या श्रीधर चामरे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करुन त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून  लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. दरम्यानठाणे- पालघरच्या सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी श्रीधर चामरे यांच्या कुटुंबियांची  भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.

००००


 

जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामास

तातडीने तांत्रिक मान्यता द्यावी

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

 

            मुंबईदि. : मुंबईतील जवाहर बाल भवन इमारत जीर्ण झाली असून त्याचे नूतनीकरण आणि मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. यासंबंधी कामाच्या अंदाजपत्रकास तातडीने तांत्रिक मान्यता देऊन पुढील कार्यवाही करावीअसे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

            मागील काही वर्षांपासून बाल भवनची इमारत जीर्ण झाली असून त्याचे तातडीने मजबुतीकरण आणि नूतनीकरण करणे गरजेचे असल्याने शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णासार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बाल भवन इमारतीचे उद्घाटन झाले होते. गेली 50 वर्षे विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्यकरमणूक साधनेग्रंथालय आदी माध्यमातून ही इमारत उपयोगी सिद्ध झाली आहे. येथे चित्रकलेसह विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात. या ऐतिहासिक इमारतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने या इमारतीच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

००००


 पालघर जिल्ह्यासह पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी

कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार

- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

 

            मुंबईदि. 9 : पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईलअसे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले. या जागा भरण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावीअसे निर्देशही प्रा.गायकवाड यांनी दिले.

            पालघर जिल्ह्यातील शिक्षकांची पदे भरताना पवित्र पोर्टल प्रणाली लागू न करता स्थानिक पातळीवर भरती प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी तेथील आदिवासी डीटीएडबीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीने आंदोलन केले आहे. त्याची दखल घेऊन प्रा.गायकवाड यांनी याबाबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधीशालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णासामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीनाशिक्षण आयुक्त विशाल सोळंखीपालघर जिल्हाधिकारीशिक्षणाधिकारी यांच्यासह आंदोलनकर्ते आदिवासी डीटीएडबीएड (टीईटी/ सीटीईटी) कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

            पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घेतली जाईल. तसेच ही भरती प्रक्रिया राबविताना त्याच क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईलअसे श्रीमती वंदना कृष्णा यांनी यावेळी सांगितले.

०००००


 हसून हसून पोट दुखेल  बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥

१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !🍥३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला🍥२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !🍥२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !🍥२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना 🍥२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !🍥२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !🍥२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !🍥२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बराहोता !🍥३०) गाढवापुढे वाचली गीता वाचणारा गाढव होता !🍥३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !🍥३३)न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला!🍥३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !🍥३५) पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये !🍥३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !🍥३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही!🍥३८) घरात नाही दाणा आणी म्हणे बर्शन आणा !🍥३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !🍥४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !🍥४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !🍥४२) घरोघरी मॉडर्न पोरी !🍥४३) ओठापेक्षा लिपस्टीक जड !🍥४४) नाकापेक्षा चष्मा जड !🍥४५) अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार !🍥४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !🍥४७) गोष्ट एक चित्रपट अनेक !🍥४८) काम कमी फाईली फार!🍥४९) लाच घे पण जाच आवर !🍥५०) मंत्र्याच पोर गावाला घोर !🍥५१) मरावे परी मूर्तिरुपे उरावे !🍥५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !🍥५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !🍥५४) रिकामी मुलगी शृंगार करी!🍥५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !🍥५६) दुरुन पाहुणे साजरे !🍥५७) ऑफीसात प्यून शहाणा !🍥५) सत्ता नको पण खैरनार आवर !🍥५९) एक ना धड भाराभर पक्ष !🍥६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !🍥६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !🍥६२) तोंडाला पदर गावाला गजर !🍥६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !🍥६४) रात्र थोडी डास फार !🍥६५) शिर सलामत तो रोज हजामत !🍥६६) नेता छोठा कटआऊट मोठा !🍥६७) चिल्लरपुरता सत्यनारायण!🍥६८) दैव देते आयकर नेत !🍥६९) डीग्री लहान वशिला महान!

Tuesday, 9 November 2021




 

 गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗


मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा.


मग काय ! 


गाडी सुसाट !!


🚗🚗🚗🚗


:


आणि अचानक वळणावर एक गाढव आडवं आलं.


😲 😳 🥵🥶


गीतानी कर्ररररकचू्..न ब्रेक दाबला.


: 😫😤😤😖😖


वाटलं आता जाऊन धडकतेकी काय .. !!


गीतानी डोळे घट्ट मिटून घेतले.. 😣😫


आणि.....


:


:


:


:


:


हुश्श.....!!!


:


:


:

:

:

:

:

:

:

:....

गाडी गाढवाच्या अगदी जवळ जाऊन, त्याच्या पुढचं थांबली. व अशाप्रकारे,


*गाढवा पुढे वाचली गीता.*

😆😂😎


नंतर घाबरलेली गीता घरी आली आणि घडलेली कथा आपला नवरा हरीला सांगितली. तिने हट्टच धरला की ज्या गाढवामुळे माझे प्राण वाचले त्याला घरी घेऊनच या. 

मग बिचारा हरी गाढवाकडे गेला. पण गाढवही हट्टी. ते काही तयार होईना.

शेवटी...

..

...

...

...

....

....

....

....

....

....

.......


*अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी..*


शेवटी कसाबसा हरी गाढवाला घरी घेवुन आला.


उन्हातून आल्यामुळे गीता ने गाढवास बसायला खुर्ची दिली आणि पाणी व गुळाचा तुकडा खावयास दिला .. 


गाढव पाणी गटा गटा प्यायला आणि मग गूळ खावयास लागला. 


अचानक काय झाले कळ लेच नाही. गाढव पाण्याच्या गुळण्या करू लागले. 


हरीला आणि गीताला हे कोडे आज पर्यंत सुटले नाही 


..

..

..

..

..

..

..

..

..

*गाढवाला गुळाची चव काय* 

😂😝😝😀

लेखक काहीही करु शकतात🤣

 महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी

12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

 

            मुंबईदि. 9 (रानिआ): विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतीलअशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

            श्री. मदान यांनी सांगितले कीभारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

            प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकामतदाराचा चुकून प्रभाग बदलणेविधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतातअशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

            विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- 5,  अहमदनगर- 9नांदेड-वाघाळा- 13मीरा-भाईंदर- 10ड आणि 22सांगली-मिरज-कुपवाड- 16अ आणि  पनवेल- 15ड.

Featured post

Lakshvedhi