Tuesday, 9 November 2021

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


          🌻 *आनंदी पहाट* 🌻


            *इंद्रायणी काठावरची*


                *पु. ल. देशपांडे*

              *जन्म दिन विशेष*

                    

🌹🔆🌸🌿🚩🌿🌸🔆🌹 

        

        *पु. ल. यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले तरीही महाराष्ट्राने दिलेली पदवी म्हणजे 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व' आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार हे आजन्म जवळचे वाटणारे.* 

        *पु. ल. बहुआयामी. त्यांनी अनेक कलांत नैपुण्य प्राप्त केले. अनेक क्षेत्र गाजवली. याचे कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि क्रियाशीलता. लहानपणी त्यांना एका जागेवर शांत बसविणे ही घरच्यांची कसरत होती. अगदी वयाच्या पाचव्या वर्षी आजोबांनी लिहून दिलेले भाषण साभिनय सादर केले, तर बाराव्या वर्षी स्वतःच भाषण लिहून सादर करायचेच पण इतरांनाही लिहून द्यायचे. घरच्या गाण्याच्या मैफिली ऐकून अनेक वाद्य पण शिकले. त्यांचे पेटीवादन ऐकून बालगंधर्वही सुखावले होते.*

        *१९४७ मध्ये त्यांचा चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून प्रवेश झाला. चित्रपट क्षेत्रातील सर्वच अंग आत्मसात केली. अभिनयासह कथा.. पटकथा.. संवाद लेखन.. दिग्दर्शन.. संगीत यामध्येही पु. ल. आपली छाप पाडायचे. त्यांनी आकाशवाणी.. दुरदर्शन यामध्ये ही काही काळ नोकरी केली. देशात दुरदर्शनचा प्रारंभ होताच पं. नेहरुंची पहिली मुलाखत पु. लं. नी घेतली होती.*

        *'गुळाचा गणपती' हा साध्या भोळ्या व्यक्तीला लोकांच्या डावपेचाचा होणाऱ्या त्रासावरचा चित्रपट. या चित्रपटात तर पु. लं. प्रमुख अभिनेते होतेच पण कथा.. पटकथा.. संवाद.. दिग्दर्शन आणि संगीतही त्यांचेच असल्याने सबकुछ पु. ल. म्हणून प्रसिद्ध आहे.*

        *इंद्रायणी काठावरची आळंदी. जिथे सत्ता आहे ती जगाला सत्य ज्ञान मुक्तपणे वाटणाऱ्या ज्ञानियाच्या राजाची. या संजीवन समाधीच्या मागे पुढे सारे जग ज्ञानप्राप्तीसाठी धावतेय. इथे मनातील अंधःकार दूर करणारा उजेड आहे. इथेच मनात.. बुद्धीत दडलेला अहंकार दूर करणारे कैवल्याचे.. मोक्षाचे झाड आहे. याच ज्ञानोबा नामक वटवृक्षाखाली ज्ञान प्राप्त होत निवृत्ती.. सोपान.. मुक्ताबाईंंचे जीवन उजळले. ज्ञानप्रकाशाने मोक्षाचा मार्ग सापडला.*

        *इंद्रायणी नदी. जिच्या  तिरावर ज्ञानोबांनी प्रदान केलेल्या सत्यमार्म ज्ञानाने मनुष्याच्या अनाठायी इंद्रिये इच्छा वाहून जातात.. इंद्रिय विजय प्राप्त होतो.. समता बुद्धी प्राप्त होत मनःशांती लाभत जीव शिव होतो.,अर्थात मोक्ष लाभतो अशी ही सरीता.*

        *पु. ल. यांच्या संगीताची जादू अशी की, आजही या चित्रपटाची गाणी लोकप्रिय आहेत. भीमसेन जोशींना त्यांची मैफिल ज्या गाण्याशिवाय लोक पूर्ण होवू देत नव्हते अश्या या गाण्याचे संगीतकारही पु. ल. आणि चित्रपटात हे गाणे साभिनय सादर केलंय पु. ल. यांनीच.*

     

🌹⚜️🌹🔆🚩🔆🌹⚜️🌹

 

  *_इंद्रायणी काठी, देवाची आळंदी_*

  *_लागली समाधी, ज्ञानेशाची_*


  *_ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव_*

  *_नाचती वैष्णव, मागेपुढे_*


  *_मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड_*

  *_अंगणात झाड कैवल्याचे_*


  *_उजेडी राहिले उजेड होऊन_*

  *_निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई_*


🌸☘🌺🥀🌻🥀🌺☘🌸


  *गीत : ग. दि. माडगूळकर*  ✍

  *संगीत : पु. ल. देशपांडे*

  *स्वर : पं. भीमसेन जोशी*

  *चित्रपट : गुळाचा गणपति (१९५३)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *०९.११.२०२१*


🌻🌸🥀⭐🌺⭐🥀🌸🌻

 ॥ श्री स्वामी समर्थ ॥

सर्व भक्तांना शुभ दिपावली 

माझ्या पाठीशी माय बापा प्रमाणे आधार बनून उभ्या राह1णाऱ्या माझा सर्व दानशूर व भक्तांना नतमस्तक होऊन एक विनंती करतो🙏

एवढ वर्ष वाचवा हो ही गोशाळा !

कारण कोकणात आता भात कापणी सुरू आहे त्यामुळे वर्षभराचा चारा हा आत्ताच विकत घ्यावा लागतो सुमारे चारशे ट्रक चारा गोशाळेत एक वर्षासाठी लागतो.माझे कीर्तन सेवा आजपर्यंत बंद असल्यामुळे मी हतबल आहे माझ्या पुढे विनंती केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्यापुढे शिल्लक नाही.

मला सर्वात जास्त महत्वाचे वाटते ते आता या साडेआठशे 850 गाईंचे संगोपन करणे.

माझ्याकडे कोणता  इन्कम सोर्स नाही. मी उद्योजक नाही व माझ्या पाठीशी कोणती हिंदुत्ववादी संघटना नाही. मला बाहेरून मदत करणारे आपण माय बापा प्रमाणे पाठीशी उभे असणारे दान दाते  हेच या गोशाळेचे खरे संचालक आहेत. म्हणून तेरा 13 वर्ष हे कार्य अविरत सुरू राहिले आहे. आपली कोकणातली एकमेव गोशाळा आहे की आजही कोणत्याही बाहेरून येणाऱ्या गाईला गो शाळेत प्रवेश मिळतो ती आजारी असो, जखमी असो, भाकड असो, हे काही न पाहता एवढ्या अडचणींवर मात करून आजही गाईंना विनामूल्य प्रवेश दिला जातो.हे आपण कधीही पडताळू शकता🙏

आज पर्यंत आपण केलेल्या मदतीचा रुपाया नी रुपयाचा हिशोब मी आपणासमोर कधीही द्यायला तयार आहे मी यापुढे आपला येणारा एक एक रुपया गोमातेच्या अविरत सेवेत खर्च केला जाईल असा विश्वास देतो🙏 आपण कधीही ही आमच्या जमाखर्चाचा अहवाल  पाहू शकता. आपल्या गोशाळेत सुरुवातीला चार 4 गाई होत्या आत्ता 850 गाई आहेत. आपण व्हिडिओ कॉल करून कधीही प्रत्यक्ष पाहू शकता. व यापूर्वी अनेक चॅनेलवर आलेल्या बातम्याही आपण पाहिल्या असतील, व आमच्याकडे  992148 7148 कॉल करून प्रत्यक्ष पाहणी करू शकता.


1) एक दिवसाचा खर्च रुपये 40000


2) एक ट्रक कडबाकुट्टी रुपये 72 हजार


3) एक ट्रक भाताचा पेंढा रुपये 15000


4 ) ट्रक ओला चारा रुपया 30000


5 ) एक गाय मासिक दत्तक खर्च 1500 रुपये


6) एक अबोल गोमाता वार्षिक दत्तक खर्च 18000 हजार रुपये


7) पोर्णिमा निमीत्त गुळ खादय 6000 रूपये 


ते कोणताही पाळीव जीवाला रोज जगण्या करता कमीत कमी पन्नास 50 रुपये खर्च येतो हे आपणा सर्वांना माहीत आहे.


मदतीसाठी संपर्क


श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान 

AC / 60010708605

IFSC - cod - MAHB0000296

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिपळूण (सेविंग खाते )

Google pay व Phon  pay साठी 992148 7148

कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा कदाचित आपण मदत करतच आहात आणी आपण नुसता हा संदेश पुढे पाठवला तरीसुद्धा दुसऱ्याकडून मिळाल्या दानाच्या पुण्यात आपणही वाटेकरी व्हाल🙏

आपल्या घरातील आपल्या मुलांचा वाढदिवस आपला वाढदिवस कोणतेही सुख किंवा दु:ख कार्य असता गाईला चारा द्यायला विसरू नका कारण तिचा आशीर्वाद खूप मोठा आहे🙏

Tips arogya


 

 




 

 स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता

‘मार्जिन मनी’ उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 8 : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत राज्यातील पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज सादर करावा, असे आवाहन सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी केले आहे.

            नवउद्योजक लाभार्थींना ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत४ था मजलाआर. सी. मार्गचेंबूर (पूर्व)मुंबई ४०० ०७१, दूरध्वनी ०२२ - २५२२२०२३ ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्यावर अर्ज करावा, असे सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

००००

 


दि. 8 नोव्हेंबर 2021

 

पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात

राज्य शासन कमतरता राहू देणार नाही

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

           सोलापूर/पंढरपूरदि. 8 :- संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे 231 व  130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यातअसे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

            पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून आभासी प्रणालीद्वारे करण्यात आलेत्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरीकेंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंहकेंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमानेविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीससोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

               प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले कीया पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशीही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार असून या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरच्या वारीला अनेक वर्षांची परंपरा असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामीनैसर्गिक आपत्तीमध्येही वारी सुरूच होती. आजही अविरत सुरु आहे. या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी ही वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे त्यांनी सांगितले.

               केंद्र शासनाकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर महामार्गाची निर्मिती केली जात असून प्रत्येक गाव व खेडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरीलाही पालखी महामार्गाने जोडले जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. या रस्त्यामुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच या भागाच्या विकासाला अधिक चालना मिळून येथे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढेल. रोजगार निर्मितीही होणार असल्याने हे मार्ग म्हणजे विकासाचा नवा प्रवाह असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करून पंढरीची वारी ही स्त्री पुरुष समानतेचे प्रतिक असल्याचेही त्यांनी म्हटले.

                यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी या भागातील नागरिकांकडून पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सावली देणारे वृक्ष लावणेपालखी मार्गावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे व भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच येथील जनसमुदायाशी काही वेळ मराठी भाषेतूनही त्यांनी संवाद साधला.

पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात

राज्य शासन कमतरता राहू देणार नाही

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

                    पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच वाखरी येथे वारकऱ्याकडून  रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हेही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

                    पालखी महामार्ग तसेच महाराष्ट्रातून जाणारे रस्ते निर्मितीत महाराष्ट्र शासनाचे प्रत्येक पाऊल केंद्रासोबत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून पंढरपूरकडे म्हणजेच भक्तिमार्गाकडे जाणारे रस्ते चांगलेच असले पाहिजेत असे सांगून हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी विठूमाऊलीचा आशीर्वाद असेल असेही त्यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारीची परंपरा जपलेली आहे. त्या वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात राज्य शासनाचाही पुढाकार असेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Featured post

Lakshvedhi