Monday, 8 November 2021

 औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड

अन्न व औषध प्रशासनाची कायदेशीर कारवाई

 

मुंबई, दि. 8 : औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती ) कायदा १९५४ व नियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून औषधांच्याबाबत आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास संबंधिताविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

"गायनोप्लस कॅप्सुल" या औषधांच्या लेबलवर "महिलांची बंद झालेली मासिक पाळी नियमित करते" अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर छापलेला होता. अशा प्रकारची जाहिरात करणे हे औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम यांचे उल्लंघन करणारे असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने औषध निरीक्षक ए. ए. रासकर व श्रीमती पी. एन. चव्हाण यांनी शिवडी न्यायालयात दोन खटले दाखल केले होते. यामध्ये सुनावणी होऊन दि.22 ऑक्टोबर 2021 रोजी निकाल देण्यात आला. त्यानुसार मे. नॅल्को बायोटेक इंदोर या संस्थेचे मालक दिलीप बुन्हानी यांना दोन्ही खटल्यात एकूण रु.४०,०००/- व मे. क्रिस्टल हेल्थकेअरमुंबई या संस्थेचे मालक गौरव शहा व मे लॉईड फार्मास्युटीकल्सइंदोर याचे संचालक देवेंद्र खत्री यांना प्रत्येकी रु.२०,०००/- इतका दंड ठोठावण्यात आला.

आणखी एका प्रकरणात "व्हिरुलिना पाऊडर" या आयुर्वेदिक औषधाबाबत औषधाच्या लेवलवर व उत्पादक नॅचरल सोल्यूशन्सनाशिक या उत्पादकाच्या संकेतस्थळावर औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम यांचे उल्लंघन करणारे श्वसन संस्थेशी संबंधित असलेला आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने अन्न व औषध प्रशासनमुंबईचे तत्कालिन औषध निरीक्षक श्री.ध. अ. जाधव यांनी नॅचरल सोल्यूशन्सनाशिकचे मालक अनिलकुमार शर्मा व युगंधर फार्मानाशिक चे मालक योगिता केळकर यांचेविरुध्द शिवडी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी निकाल लागला. त्यानुसार प्रत्येकी रु. १०,०००/- दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे

***

 छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

 

            मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी या वर्षीचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.

            दि. 9 नोव्हेंबरच्या सुर्यास्तापासून ते दि. 10 नोव्हेंबर2021 रोजीच्या सुर्योदयापर्यंत छठपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

1. कोविड19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महसूल व वनआपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

2. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही छठपूजा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

3. नागरिकांनी नदीतलाव अथवा समुद्राच्या काठी एकत्र न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीने छठपूजा साजरी करावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे.

4. महानगरपालिका/स्थानिक प्राधिकरणलोकप्रतिनिधीस्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी व त्या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण इ. उपाययोजना कराव्यात तसेच सुरक्षा व स्वच्छतेच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी. छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावेजेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.

5. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये ब्रेक द चेन च्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक/धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावयाचे झाल्यास या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईनकेबल नेटवर्कफेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

6. छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत.

7. या सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित

महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासनाला असतील.

8. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसनआरोग्यपर्यावरणवैद्यकीय शिक्षण विभागतसेच संबंधित महानगरपालिकापोलीसस्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीतकेलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

            हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१११०३१६५७५८०४२९ असा आहे.

००००


 *ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिटनेस प्रशिक्षण !*


🎁🎁 आपल्या आई-बाबा , आजी-आजोबा आणि ओळखीतील इतर ज्येष्ठ नागरिकांना ही भेट अवश्य द्या ! 


ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिटनेस प्रशिक्षण !

मोफत । मराठी । ऑनलाईन । LIVE


नमस्कार मित्रांनो,


वाढत्या वयाबरोबर शरीराच्या तक्रारी सुध्दा वाढायला सुरुवात होते. त्यातच सध्याच्या काळात वयोवृद्ध माणसांनी घरा बाहेर पडू नये, घरातच रहावे अशी सक्त ताकीद दिली जाते. त्यामुळे या वयात बाहेर पडून चालण्याचा जो थोडाफार व्यायाम होत होता तो सुध्दा बंद झाला आहे.


पण खरं तर व्यक्तिला याच वयात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जास्त गरज असते. त्यासाठीच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आणि फिटनेस मास्टर तर्फे आम्ही विनामूल्य 7 Days Fitness Training for Senior Citizens ट्रेनिंग प्रोग्राम आपल्यासाठी घेऊन येत आहोत.


8 November 2021 पासून दररोज संध्याकाळी 6:00 - 7:00 PM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.


यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन , आपल्या वयानुसार आणि शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.


👉🏻  *अधिक माहिती आणि मोफत रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा*  - https://my.netbhet.com/ftsc.html


Whatsapp - 99309 36050 / 90822 05254


धन्यवाद !


टीम नेटभेट

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

www.netbhet.com

 *ज़िंदगी के इस रण में खुद ही*

*कृष्ण और खुद ही अर्जुन*

*बनना पड़ता है। रोज अपना ही* *सारथी बनकर जीवन की* *महाभारत को लड़ना पड़ता है।।*


आपका दिन मंगलमय हो💐🙏

Sunday, 7 November 2021


 

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

              *🔸भाऊबीजेची कथा.🔸*


*सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुने नेे त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून! तेव्हा यमुना म्हणाली "मला तर कसली कमी नाही, नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा..! आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको ..! त्यांचे मृत्यू पासून संरक्षण करावे." यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकार चे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे हाच यामागील उद्देश होय.*                  

🌹जय गुरु महाराज🌹

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Saturday, 6 November 2021

 दि. 6 नोव्हेंबर 2021

 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी

मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक


            
मुंबई दि. 6 : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटने संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

            आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

००००

 

 

अहमदनगर जिल्हा रुग्णालय जीवितहानीबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

          मुंबई दि. 6 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील अग्निकांडात झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

            अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयु विभागात झालेल्या दुर्दैवी अग्निकांडात काही निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना सद्गती लाभो,  यासाठी प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. दुर्घटनेतील जखमींना त्वरित बरे वाटावे ही प्रार्थना करतोअसे उत्तराखंड दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांनी आपल्या  संदेशामध्ये म्हटले आहे. 

0000

Featured post

Lakshvedhi