Thursday, 28 October 2021

 उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास, आयुर्वेद उपयुक्त

- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

            अहमदनगर दि.27 (जिमाका ) : आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगाभ्यास व आयुर्वेदाच्या सूत्रांचे पालन करणे गरजेचे आहे. आयुर्वेद हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

         प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमीपूजन  व डॉ.बाळासाहेब विखे -पाटील रिसर्च फाउंडेशनचे  उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटीलआमदार चंद्रकांत पाटीलसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदचे सदस्य राजेश पांडेप्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटीलकुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरेप्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त मोनिका सावंत इनामदार यांची प्रमुख उपस्थित होती.

            राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणालेउपचारासाठी ॲलोपॅथीचे आरोग्य क्षेत्रात महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेद  व योगा महत्त्वाचा आहे. आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे. तरीसुद्धा आज आपण आपल्या परंपरेतील आयुर्वेदाकडे वळत आहोत. चरकसंहितेमध्ये 'गोड खाकमी खा व परिश्रमाचे खाही जीवनशैली नमूद केली आहे. 'आयुष मंत्रालयकार्यरत आहे. कमी दरामध्ये सर्वसामान्य लोकांना औषधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी देशभरात 'जन औषधी केंद्रस्थापन झालेले आहेत. योगाच्या प्रचार-प्रसारांवर भर देण्यात येत आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.

            'प्रवरा मेडिकल ट्रस्टने सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी भरीव योगदान दिले आहे आणि आता आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय सुरू करून नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे‌. असे गौरवोद्गारही श्री.कोश्यारी यांनी यावेळी काढले.

            आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ.राजेंद्र विखे-पाटील यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली.  डॉ.व्ही.एन.मगरे यांनी प्रास्ताविक केले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानले

 राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद;

कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांची पाहणी

·       कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा लाभ घेतल्याने प्रगती झाल्याची शेतकऱ्यांची भावना

 

            अहमदनगरदि. 27 (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतीमध्ये आधुनिकता आणता आली. त्यामुळे  शेतीमध्ये उन्नती झाली असल्याची भावना राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्याशी  संवाद साधतांना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

            प्रगतशील शेतकरी कृषीभूषण डॉ.दत्तात्रय बनेसुरसिंग पवारमच्छिंद्र घोलपविष्णू जरेमेजर ताराचंद घागरेराजेंद्र वरघुडेप्रविण गाडेमारूती गितेप्रणव धोंडेसविता नारकरशिवाजी थोरातसंजीव मानेश्रीनिवास बागलरामदास थेटेराहुल रसाळसारंगधर निर्मळरविंद्र कडलगअशोक खोत या शेतकऱ्यांनी राज्यपालांशी संवाद साधला.

            यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणालेशेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनचा लाभ घेत आपल्या कल्पकतेने शेती करत उन्नती साधली. ही प्रशंसनीय गोष्ट आहे. काळानूरूप शेतकऱ्यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला तर शेती निश्चित फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांनी सकारात्मक विचार करत काम केले पाहिजे. सेंद्रिय शेती व जीआय टेक्नॉलॉजीचे ज्ञान शेतकऱ्यांनी प्राप्त केले पाहिजे. यातून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. शेतीमधील नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. 'उत्तम शेतीमध्यम उद्योगनिकृष्ट नोकरीअशी पूर्वापार धारणा आहेच. कोरोना काळात सर्व बंद होते. मात्र शेती सुरु होती. शेतकरी शेतीत राबत होता, असेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

            आपणास शेतीतून किती उत्पन्न होते, त्यातून आपल्याला नफा किती राहतो, आपण किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे, शेतकरी गट स्थापन केले आहेत, आपल्या कामातून किती लोकांनी प्रेरणा घेतली,  किती लोक सेंद्रिय शेती करतात, यासारख्या प्रश्नांच्या माध्यमातून श्री.कोश्यारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांची मते जाणून घेतली.

            यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटीलजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसलेश्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते.

            तत्पूर्वी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या विविध विभागांची पाहणी केली. यात माहिती व तंत्रज्ञान विभागातील विविध पिकांच्या वाणांचीगायीं व शेळींच्या संकरीत जातींची माहिती जाणून घेतली. त्यानंतर उद्यानविद्या विभागडाळींब संशोधन केंद्रमनुष्यविरहित हवाई वाहन ( यूएव्ही ड्रोन) द्वारे केल्या जाणाऱ्या पिकावरील फवारणींची पाहणी केली. त्यानंतर सिंचन उद्यान विभाग व बेकरी उत्पादने प्रकल्पास राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली.

००००


 पूरस्थितीमुळे बाधित 14 जिल्ह्यांसाठी 2860 कोटींच्या मदतीनंतर

9 जिल्ह्यांसाठी 774 कोटींची मदत

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत

 

            मुंबईदि. 27 : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कालच 14 बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2860 कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे.

            कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाहीअसे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी सांगितले आहे.

            पूरस्थितीमुळे बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार मदत देण्यात येत असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

            ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून  निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी 75 टक्के एवढा असा एकूण रु 774,15.43 लाख (अक्षरी रुपये सातशे चौऱ्‍याहत्तर कोटी पंधरा लाख त्रेचाळीस हजार फक्त) इतका निधी सोलापूरगोंदियाअमरावतीअकोलायवतमाळबुलढाणावाशिमनाशिक आणि जळगाव या नऊ जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त यांचेमार्फत हा निधी वितरित करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

            दिनांक 21.10.2021 च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत.  पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने  हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्यात येईल.

००००

 .बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारप्राप्त पुरस्कारर्थींच्या

मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेणार

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबईदि. 28 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागास लवकरच  सादर करण्यात येईल तसेच पुरस्कारार्थींच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

                मंत्रालयातील दालनात राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाच्या विविध मागण्यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे,राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यासह राज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मित्र संघाचे अध्यक्ष नरोत्तम चव्हाणप्रभाकर फुलसुंदरयोगेश वागदेविलास वंशिकशंकर खुळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

                सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे  म्हणालेडॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून पुरस्कारार्थींनी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वसाधारणनिमआराम व आराम गाडयातून तसेच भाडे तत्वावर असलेल्या बसेसमधून मोफत प्रवासास मान्यता देण्याबाबत गृह विभागाला दिवाळीच्या आधी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच मानधनाबाबतीत वित्त विभागाला माहिती सादर करून याबाबतीतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

*****






 

 पितळीच्या वाटीला कितीही घासा

ती सोन्याची होत नाही.


हे वाक्य कुणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डखाली लिहून

पळून गेलं राव! 


दिवाळी आधीच फटाक्याला सुरुवात!

😳😳🤪😝🤪😱😱🤪😱🤪🤪😝😝🤪🤪😝😝🤪🤪😝🤪😝

 *धातूंचीभांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध.....*


*सोन्याची भांडी*

सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.


*चांदीची भांडी*

चांदी हा एक शीतल धातू आहे, जी शरीराला आंतरिक थंडावा देते. शरीर शांत ठेवते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.


*कांस्यची भांडी*

कांस्याच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांस्याच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांस्याच्या भांड्यात जेवण बनवल्याने ९७% पोषकतत्वं मिळतात व केवळ ३% पोषकतत्वंच नष्ट होतात.


*तांब्याची भांडी*

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्हर संबंधी तक्रारी नाहीशा होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूध पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.


*पितळेची भांडी*

पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने ९३% पोषकतत्वं मिळतात आणि केवळ ७% पोषकतत्वंच नष्ट होतात. मात्र पितळेच्या भांड्यांना कल्हई अवश्य करावी.


*लोखंडाची भांडी*

लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडूरोग नाहीसा करते, शरीरात सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, कामला रोगाला नाहीसे करते, आणि कावीळ दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दुध पिणे चांगले असते.


*स्टीलची भांडी*

स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत कारण गरम किंवा आम्ल, कशाशीही यांची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने श्सारीराला कोणताही फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.


*एल्युमिनिअमची भांडी*

एल्युमिनिअम हे बॉक्साईट पासून बनलेले असते. त्याच्या भांड्यात बनवलेले खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीम ला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. एल्युमिनिअमच्या कुकर मध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्व नष्ट होतात.


*मातीची भांडी*

मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.


*सुनील इनामदार*

Featured post

Lakshvedhi