Wednesday, 20 October 2021

Jeevan sar

 


 चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार

- वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

             मुंबई, दि. 20 : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

          मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य महाव्यवस्थापक( नियोजन) संजीव गौंड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) नागपूर जीत सिंग, व्यवस्थापकीय संचालक बांबू विकास मंडळ श्रीनिवास राव, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक श्रीमती अभरना, चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर,वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे, चंदन उद्योजक वदीराज मदभावी या बैठकीला उपस्थित होते.

            वने राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, राज्यात चंदनाची लागवड वाढून हा उद्योग वाढल्यास राज्याच्या महसूलात भर पडेल.चंदन उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेवून जे उद्योजक या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहेत त्यांना सहकार्य करण्यात येईल. शासनस्तरावरून देण्यात येणाऱ्या परवानग्या विहित वेळेमध्ये  देण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात येतील. चंदन पावडर,तेल तसेच चंदन काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर मागणी आहे त्यामुळे चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. या उद्योगाला बळकटीकरणासाठी शासन नक्कीच प्रोत्साहन देईल. अगरबत्तीच्या व्यवसायात कशा प्रकारे चंदनाचा समावेश करता येईल याचीही पाहणी वने विभागाने करावी. जेणेकरून अगरबत्ती व्यवसायाला देखील गती मिळेल, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी स्पष्ट केले.

            यावेळी चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर  यांनी अगरबत्ती व्यवसायाची सद्य:स्थितीची माहिती सांगितली. यावेळी चंदन उद्योजक वदीराज मदभावी यांनी चंदन उद्योगात महाराष्ट्राला असलेल्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चंदनाची मागणीचंदन उद्योजकांना शासनाकडून हवे असलेले सहकार्य याबाबतीत सविस्तर सादरीकरण केले.

******


 

तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणाली विकसीत करावी

- वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

 

            मुंबई, दि. 20 : तेंदूपत्ता ई - लिलाव विकसीत करण्याबाबत आलेल्या सूचनांचा योग्य अभ्यास करून वने विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयातील दालनात तेंदूपत्ता ई लिलाव प्रणाली विकसीत करण्याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला दूरदृश्यप्रणालीव्दारे अप्पर  प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता,उपसचिव गजेंद्र नरवणे उपस्थित होते.

            राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे म्हणाले, सध्या तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणालीमध्ये फक्त स्थानिकच व्यापारी सहभागी होतात  मात्र यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी सहभागी झाले तर तेंदूपत्त्याला चांगला दर मिळून तेंदू पत्तामध्ये काम करणाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल.मात्र यासंदर्भात या क्षेत्रातील उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा निश्च‍ित विचार करू, असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

           अप्पर  प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता  यांनी सध्याची तेंदूपत्ता ई - लिलाव प्रणालीबाबत बैठकीत माहिती दिली.

******


Voters registration

 नवमतदार नोंदणीसाठी निवडणूक साक्षरता मंच’ महत्त्वाचा

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

·       ‘एनएसएस’ मार्फत राज्यभर विशेष मतदार नोंदणी मोहिमेस लवकरच सुरूवात

 

            मुंबईदि. 20 : मतदार म्हणून नोंदणी करणे हा लोकशाही सुदृढ करण्याचा महत्त्वाचा भाग असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. याचाच भाग म्हणून शालेय शिक्षणउच्च व तंत्र शिक्षणवैद्यकीय शिक्षण या विभागाने शासन निर्णय निर्गमित करून प्रत्येक विद्यापीठांमध्ये निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. या दृष्टीने महाविद्यालय स्तरावर निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करून ती लोकशाही सक्षमीकरणाची व्यासपीठे व्हावीतअसे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.

            विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजन केंद्राच्या समन्वयकांसोबत ऑनलाईन बैठक घेण्यात आलीत्यावेळी श्री.देशपांडे बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय सेवा योजना केंद्राचे संचालक प्रभाकर देसाईएनएसएस विद्यापीठ संचालकसमन्वयक त्याचबरोबर मुख्य निवडणूक कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे उपस्थित होते.

            लोकशाही क्लबमार्फत प्रत्येक विद्यापीठेमहाविद्यालयेविद्यालयाने नवमतदारांची नोंदणी होण्यासाठी सहभाग घ्यावा. क्लबच्या मंचावर राजकीय नेतेविविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. मतदानाकरिता वापरण्यात येणाऱ्या ई.व्ही.एम.मशीनची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी जेणेकरून हा मंच आणखी सक्षम करता येईलअशाही सूचना श्री.देशपांडे यांनी यावेळी केल्या.

            मतदार यादी अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे काम निवडणूक विभागाद्वारे सातत्याने करण्यात येते. यावेळी दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांमार्फत जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती येत असून दि. 131427 आणि 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत असून यात ग्रामपंचायत स्तरावर मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना केंद्रातील जे जे विद्यार्थी उत्कृष्ट काम करतीलअशा विद्यार्थ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनी मानचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी दिली.

            राष्ट्रीय सेवा योजना केंद्राचे संचालक प्रभाकर देसाई यावेळी म्हणाले कीराष्ट्रीय सेवा योजना केंद्रामार्फत एक परिपूर्ण असा रोडमॅप तयार करून तो निवडणूक विभाग तसेच महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

000

Curruption prohibit

 भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन

 

            मुंबई, दि. 20 : भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने२६ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर 2021 या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताहाचेआयोजन करण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेचभ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. सुजाण नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४दूरध्वनी क्रमांक 022-24921212वेबसाईट acbmaharashtra.gov.inईमेल - acbwebmail@mahapolice.gov.in/ addlcpacbmumbai@mahapolice.gov.inफेसबुक - www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप - www.acbmaharashtra.netट्वीटर - @ACB_Maharshtra, व्हॉट्सॲप - 9930997700 येथे संपर्क साधून तक्रार नोंदवावी अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत देण्यात आली आहे.

०००

 


 महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा

एकत्रित आराखडा तयार करावा

- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई विद्यापीठात शाहीर अमरशेख जयंती समारंभाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 20 : महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे. महाराष्ट्राच्या मातीत परंपरेने रुजलेल्या अनेक कला आहेत. देशपातळीवर  महाराष्ट्राचे नाव अभिमानाने-गौरवाने घेतले जाईल, अशी लोककला आपण जपली पाहिजे. त्यासाठी लोककलेचा विभागानुसार एकत्रित आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

            मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, भारत सरकार आणि शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी संगीत विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शाहीर अमरशेख जयंती समारंभाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते.

             उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणालेआपली संस्कृती, लोककला  विद्यापीठांनी जपली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक मोठ्या ताकतीचे कलावंत आहेत. त्यांच्या कलेला योग्य ठिकाणी संधी देऊन अधिकाधिक लोकांपर्यत ती कला कशी पोहोचेल याचे योग्य नियोजन केले पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण घेणे जसे आवश्यक आहे, तसेच आपली बहुमोल संस्कृती टिकविणे देखील तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी आपली लोककला जिवंत राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे.

            राज्याच्या लोककलेचा सर्वसमावेशक आराखडा लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी तयार करावा. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही करण्यात येईल, असे आश्वासनही श्री.सामंत यांनी यावेळी दिले.

            यावेळी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रउदयपूरचे निदेशक सोनी गुप्ता, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. विनोद पाटील, मानव्यविद्या मुंबई विद्यापीठ अधिष्ठाता डॉ.राजेश खरात, प्रख्यात सिने-नृत्य दिग्दर्शिका श्रीमती फुलवा खामकर, शाहीर अमरशेख अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे उपस्थित होते.

0000

COVID ka flew

 *आरटीपीसीआर चाचणी कोव्हिड आणि फ्लू या  विषाणुंमधील भेद  ओळखत नाही. याचा अर्थ गेल्या पावणेदोन वर्षांत फ्लू च्या रूग्णांना कोव्हिडचे रुग्ण ठरवले गेले. म्हणूनच लाखो करोडोंच्या संख्येत कोव्हिड बाधितांच्या नोंदी झाल्या.* 




*अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने ( CDC )  आरटीपीसीआर चाचणी, ३१ डिसेंबर २०२१ नंतर बंद करण्याचा महत्वाचा निर्णय  घेतला. तसे २१ जुलै २०२१ रोजीचे पत्र ( सोबत जोडले आहे ) 


https://drive.google.com/file/d/12K5dS8An3t9RUGvxp9jWl32Qy9DCjh60/view?usp=drivesdk


देशात प्रयोगशाळा व इतर संबंधितांना दिले गेले. अन्न व औषध प्रशासनाने ( FDA ) देखील अशी भूमिका घेतली.* 


या यंत्रणेने कबुल केले की, *आरटीपीसीआर चाचणी कोव्हिड आणि फ्लू या  विषाणुंमधील भेद  ओळखत नाही. याचा अर्थ गेल्या पावणेदोन वर्षांत फ्लू च्या रूग्णांना कोव्हिडचे रुग्ण ठरवले गेले. म्हणूनच लाखो करोडोंच्या संख्येत कोव्हिड बाधितांच्या नोंदी झाल्या.* यावर अवलंबुन, हा आजार वेगाने पसरतो असे म्हटले गेले. जागतिक साथ घोषित केली गेली. भयगंड  पसरला. पुढे मास्क, लाॅकडाऊन,  सार्वत्रिक लसीकरण इ. अनर्थ केला. फ्लू हा तर बहुतेक सर्वांना वरचेवर होणारा सर्वसाधारण आजार आहे.  बहुतेक त्यामुळेच या भयनाट्यासाठी फ्लू ची निवड केली आहे. 


आरटीपीसीआर च्या शोधाबद्दल डाॅ. कॅरि म्युलिस यांना  सन १९९३ चा रसायनशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार दिला गेला. त्यांनी बजावले होते की, हे संशोधन डिएनए वृद्धीसाठी आहे त्याचा वापर विषाणु शोधण्यासाठी करू नये. तसे केल्यास चुकीचे निष्कर्ष येतील. असे दिसते की नेमक्या त्याच हेतूने ही चाचणी जगभर लावली गेली. झोपलेल्याला जागं करता येते परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला ( जागतिक आरोग्य संघटनेला ) जागे करता येत नाही.


 युरोप अमेरिकेतील २२ नामवंत शास्त्रज्ञांचा आरटीपीसीआर चाचणी फेटाळून लावणारा अहवाल दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी आला. त्यातही सर्व मुद्दे नमूद आहेत. मग खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी जानेवारी २०२१ मधे काढलेले पत्रक ही एक प्रकारे आरटीपीसीआर चाचणी ही चूक असल्याची कबुली आहे. मात्र आजही ही चाचणी भारतात सर्रास केली जात आहे आणि लाखोंना संकटात लोटले जात आहे.


 लाखोंची आरटीपीसीआर टेस्ट केली की खोटे पाॅझिटिव्ह रूग्ण मोठ्या संख्येने मिळतात. मग लाट आल्याचे घोषित होते. माणसे भीतीने, कोव्हिड हाॅस्पिटलमधे एकटे पडल्याने निराशेने, रेमडेसिविर सारखी औषधे, नव्हे विषे दिल्याने आणि खऱ्या आजारावर उपचार  झाले नाहीत म्हणून मरण पावली. खरी कारणे न समजल्याने कोरोनाची भीती वाढत गेली. सन १९९० पासुन भारतीय समाजात उपभोगवाद बोकाळला. पैसा हे जगण्याचे उद्दिष्ट बनले आणि ज्ञान- विज्ञानाकडे पाठ फिरवली गेली. प्रेम विश्वास उरला नाही. असा समाज सहज बळी पडतो. 


बरं, खरंच कोव्हिड म्हणजे कोरोना - २ नोंदला जात आहे वा होता का? तर नाही. ती फसवणुक आजही सर्वत्र चालू आहे. चॅरिटे हाॅस्पिटल बर्लिनने शिफारस केलेली  आरटीपीसीआर चाचणी जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी २०२० मधे   स्वीकारली. तिच्या समर्थनाचा अहवाल 'काॅर्मन - ड्राॅसन अभ्यास' म्हणून ओळखला जातो. तो अहवालच म्हणतो की, चीनच्या प्रयोगशाळेने पाठवलेल्या ज्या संगणकीय मांडणीवर ही चाचणी आधारित आहे, ती मांडणी कोव्हिड- १९ म्हणजे कोरोना-२ या विषाणूची नाही. ती मांडणी सन २००३ मधे प्रादुर्भाव झालेल्या सार्स ( सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम ) कोरोना विषाणु - १ च्या मांडणीवर आधारित आहे. २२ शास्त्रज्ञांच्या अहवालात, आरटीपीसीआर फेटाळण्याचे हे प्रमुख व पहिले कारण आहे. 


येत्या जानेवारीपासुन नवी चाचणी पध्दती लावली जाईल असे दिसते. पण आरटीपीसीआर फाॅल्स पाॅझिटिव्ह म्हणजे बाधा नसलेल्यांना बाधा आहे असे नोंदत आली असल्याने जागतिक साथ घोषित झाली होती. ती ९७% चुकीचे निर्णय देत होती हे वास्तव मान्य करून जागतिक साथीची घोषणा व त्याबरोबर सर्व बंधने आणि लसीकरण मागे घेतले पाहिजे. 


 *ही अथ पासुन इति पर्यंत फसवणुक आहे. "कोव्हिड- १९ नावाचा विषाणु व अर्थातच त्याची साथ अस्तित्वात नाही", असे म्हटल्यावर ऐकणाराचा विश्वास बसत नाही, इतके जनतेला भ्रमात टाकले आहे. विज्ञानाच्या नावाने अशी जागतिक पातळीवरील, अक्षरशः जीवघेणी नियोजित फसवणूक इतिहासात झाली नाही.* 


*जनतेने प्रसारमाध्यमांकडे आपले डोके गहाण ठेवले आहे. यापुढच्या टप्प्यात भारतात खोट्या तिसऱ्या लाटेचा प्रयोग करण्यात येईल असे चिन्ह आहे. तसे झाल्यास भारतीयांच्या पुढच्या पिढ्या कायमच्या उध्वस्त होतील.* या लसी जनुकीय बदल घडवतात. निर्माण होणारी व्यंगे, आजार, वंध्यत्व इ. दोष पुनरूत्पादनाद्वारे पुढील पिढ्यांमधे विवाहांद्वारे संक्रमित होतील. मग यासंदर्भात लस न घेण्याला अर्थ उरणार नाही. 


लेख वाचुन गप्प राहू नका. कृपया राजकारणी, नेते, नोकरशहा आणि जनतेला जागं करण्यासाठी झटुन प्रयत्न करा. लस घेतलेल्यांना असे वाटत आहे की, आता स्वातंत्र्य परत मिळेल, परंतु तसे होणार नाही. इझ्रायलमधे जवळजवळ सर्वांनी दोन वा तीन लसी घेतल्या. तरी आता त्यांना दर सहा महिन्यांत एकदा लस घ्यावी लागेल असे सांगण्यात येत आहे. मानवजातीला नियंत्रित गुलाम करण्याचा व लुटण्याचा खास अभिनव मार्ग जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्फत हाताळला जात आहे. त्यापलिकडे या लसींमुळे मानवसंहाराचा कार्यक्रम पार पाडला जात असल्याचा स्पष्ट आरोप डाॅ. मायकेल यिडाॅन, डाॅ. जुडी मायकोविटस, डाॅ. जेन रूबी इ. अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील जागृत  डाॅक्टरांच्या आघाडीने श्वेतपत्रिकेत हा अंदाज नमूद केला आहे की, पुढील   पाच वर्षांत अमेरिकेतील सुमारे ३०% माणसांचा कोव्हिड लसीकरणामुळे मृत्यू होईल. 


हे अवैज्ञानिक आणि गुन्हेगारी स्वरूपाचे लसीकरण आणि त्याकडे नेणारी आरटीपीसीआर चाचणी तात्काळ थांबवण्याची आणि कोव्हिड प्रकरण गुंडाळण्याची मागणी जगातील नामवंत शास्त्रज्ञ सतत करत आहेत.

भारतीय जनतेचा मोठा घटक संमोहनात आहे किंवा अगतिक बनला आहे. या अवस्थेतुन तातडीने बाहेर येणे आवश्यक आहे. निर्णय घेणारांना गदगदा हलवण्याची गरज आहे. राजकारण, मनोरंजन वा इतर कोणतीही गोष्ट यापेक्षा महत्वाची नाही. 


*"जेव्हा सर्व एकसारखा विचार करतात* तेव्हा 

*कुणीही खोल विचार करत नाही" .* 

-वाॅल्टर लिपमन ( दोनदा पुलित्झर पारितोषिक विजेते ) 


आपला

अॅड. गिरीश राऊत

निमंत्रक

भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

दू. ९८६९ ०२३ १२७

कृपया सर्वत्र पाठवा.

दि. १६ ऑक्टोबर २०२१.

🚩🚩🚩सुप्रभातम्🚩🚩🚩

e shram govt policy


 

Featured post

Lakshvedhi