Friday, 8 October 2021

 चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा

मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा

---------------------------------

·        राज्यात हवाई वाहतूक सेवा वाढविण्यासाठी विमानतळांच्या विकासात

राज्य शासन-नागरी हवाई वाहतूक मंत्रालय समन्वय ठेवणार

 

               मुंबई, दि. 7 राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यासच नव्हे तर कोकणाला मोठा फायदा होईल, असे सांगून श्री सिंधिया यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले. 

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेषतः नांदेडकोल्हापूरऔरंगाबाद येथील विमानतळांवर अधिक क्षमतेने हवाई वाहतूक सेवा सुरू व्हावी जेणेकरून पर्यटक व नियमित प्रवाशांची संख्या वाढेल व या भागांना त्याचा फायदा होईल यादृष्टीने चर्चा केली. काही तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याची आवश्यकताही त्यांनी नमूद केली. सिंधुदूर्गातील चिपी विमानतळ सुरू होत आहेत्याचा निश्चितच जिल्ह्याला व राज्याला फायदा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

            या बैठकीत नागपूरजळगावअकोलासोलापूरगोंदियाजुहूअमरावती येथील हवाई वाहतूक आणि दळणवळण वाढविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात राज्य शासन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी अधिक समन्वय वाढविणे तसेच कालबद्ध रीतीने काम करणे, यावर चर्चा झाली.

            या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटेअतिरिक्त मुख्य सचिव, वित्त, मनोज सौनिकएमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूरप्रधान सचिव वल्सा नायर सिंहमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

 उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना

परदेशात उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 7 : उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदविका व पीएच.डी अभ्यासक्रमासाठी THE (Times Higher Education) /QS (Quacquarelli Symonds) Ranking २०० च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा २० विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता online पध्दतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया  संचालकतंत्रशिक्षण संचालनालयमुंबई यांच्या dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावरून सुरु करण्यात आलेली आहे.

            तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील वर्ष २०२१-२२ करीता अर्ज करण्याची संधी देण्यात येत आहे. मात्र अशा विद्यार्थ्यापैकी ज्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ( प्रथम वर्ष) वगळता पुढील अभ्यासक्रमाच्या मान्य कालावधीसाठी शिष्यवृत्ती देय राहील. या योजनेच्या लाभासाठी उमेदवारांच्या व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रुपये ८.०० लाख इतकी करण्यात आलेली आहे.

            इच्छुक उमेदवारांनी www.foreignscholarship२०२१.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर online पद्धतीने अर्ज भरावयाचा असून अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. तसेच उमेदवारांनी online भरलेल्या अर्जाची प्रत मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांच्य साक्षांकित प्रतिसह पडताळणीसाठी विभागीय सहसंचालक यांचे कार्यालयात २० ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करणे आवश्यक आहेअसे सहसंचालक उच्च शिक्षण, मुंबई  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्याबाबत सर्वतोपरी सहकार्य

- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

 

            मुंबई, दि. 7 : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या चित्रपटगृह परवाना अहस्तांतरणीय आहे. हा परवाना हस्तांतरणीय व व्यापारक्षम करण्यात यावा तसेच ही प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

            एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीला  अपर मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तवअपर मुख्य सचिव अपील, सुरक्षा, आनंद लिमयेपोलीस महासंचालक संजय पांडेपोलीस आयुक्त हेमंत नगराळेमाजी खासदार अशोक मोहोळ आदी उपस्थित होते.

            एक पडदा चित्रपटगृहे कोरोना कालावधीत बंद होती. त्यांना याकाळात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळावा याकरिता सेवा शुल्कासंदर्भातील मागणीवर सकारात्मक निर्णय घेणे व कर शुल्कमाफ असलेल्या चित्रपटांवरील राज्य वस्तू व सेवा कराचा शासनाकडून परतावा देणेयासाठी वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

            चित्रपटगृहे पुन्हा सुरू करताना मागील वर्षाचा परवाना नूतनीकरण कालावधी वाढवून देण्याच्या मागणीला  गृहमंत्री यांनी मंजुरी दिली असून याबाबत कार्यवाही करण्याचे गृहविभागाला निर्देश दिले.

            टाळेबंदीच्या काळातील मालमत्ता करजाहिरात करपाणी शुल्कसॉफ्ट लोनवीज शुल्क सवलत अशा विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्याया समस्या सोडविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.

 मालीच्या वाणिज्यदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट;

कृषि माल प्रक्रियाशीतगृह उभारणी आणि निर्यातीवर चर्चा

        

            मुंबई, दि.6 : - मालीचे वाणिज्यदूत विकास मित्तरसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सहसचिव सुशील खोडवेकर उपस्थित होते.

निर्यातक्षम मालाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

            राज्यात निर्यातक्षम कृषिमालाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विभागाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार असल्याचे सांगून कृषिमंत्री श्री.भुसे यांनी आगामी काळात कृषिमाल उत्पादक शेतकरी  व निर्यातदार यांची एक परिषद आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही  दिली.

दर्जेदार हळद उत्पादनावर भर

            राज्यात दर्जेदार हळदीचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही कृषि मंत्री श्री.भुसे यांनी दिली.

            कृषि माल प्रक्रियाशीतगृह उभारणी आणि कृषि मालाची निर्यात या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली.

0000

 

अर्जेंटिनाच्या राजदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट;

कृषि क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृध्दींगत करण्यावर भर देणार

      

            मुंबई, दि.6 : - अर्जेंटिनाचे राजदूत  ह्युगो झेवियर गोब्बी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली.यावेळी कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

           यावेळी अर्जेंटिना व महाराष्ट्रातील कृषि क्षेत्रातील पिके,हवामानपाऊस,आर्द्रता,सेंद्रिय शेती,वाहतूक व्यवस्था,फलोत्पादन या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली.राज्यात तसेच अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचे पीक घेण्यात येते.या पिकासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

साठवण क्षमतेवर चर्चा

            अर्जेंटिना देशात कमी खर्चात शास्त्रीयदृष्ट्या चांगल्या प्रकारे कृषी मालाची साठवणूक करण्याबाबत तंत्रज्ञान आहे.त्यासंदर्भात अर्जेंटिनाकडून सहकार्याची अपेक्षा कृषि मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातून होत असलेले कांदाकेळी,द्राक्षे,डाळींचे मोठ्या प्रमाणातील उत्पादन व निर्यात याची माहिती कृषि मंत्र्यांनी अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाला दिली. हवामान बदलासंदर्भात आणखी संशोधन होण्याची गरज दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली.

0000

 महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाचे योगदान मोलाचे

- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

             मुंबई, दि. 7 :  महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाने महत्वाची भूमिका निभावली आहे. महिलांना समानतेचा दर्जा देण्यासाठी शासनाच्या या धोरणानचे खूप मोठे योगदान आहे. महिलांना विविध हक्क देण्याच्या अनुषंगाने या धोरणांनंतर सुरूवात झाली. 1994 मध्ये महिलांना संपत्तीमध्ये समान हक्क दिला गेला.प्रॉपर्टी कार्ड व इतर संपत्तीच्या कागदपत्रात महिलांची नावे पुरुषांच्या बरोबरीने आली. समान काम समान वेतन बरोबर रोजगार हमीचे कार्ड व रेशन कार्डवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नावे यायला लागली. महिला आरक्षण हे ही अत्यंत महत्वाचे पाऊल महिला धोरणाचेच यश आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने व्रतवैकल्यांच्या जोडीला प्रत्येक महिलेसाठी आवश्यक असणाऱ्या महिला धोरणांचा जागर - या  अभिनव उपक्रमाचा शुभारंभ विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महिला धोरण जाणीव जागृती अभियानाचा शुभारंभ डॉ गोऱ्हे यांचे हस्ते झाला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे  महाराष्ट्र राज्यात 1994 च्या पहिल्या महिला धोरणापासून 1997 चे महिला धोरण कृती कार्यक्रमकेंद्र सरकारचे राष्ट्रीय महिला धोरण आणि आत्तापर्यंतच्या सर्व महिला धोरणांचा सविस्तर आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या महिलांच्या हक्काच्या जागृतीचा आढावाही डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. जागतिक पातळीवर महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध संघटना व संघाची माहिती देत त्यांचा मुलभूत उद्देश सहजसोप्या भाषेत विषद केले. United Nations women watch , UNWOMEN व जागतिक महिला आयोग या संस्थेमार्फत चालणाऱ्या विविध योजनांची अद्ययावत माहिती घेण्यासंदर्भात त्यांनी महिलांना आवाहन केले.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला धोरणांची प्रभावशाली अंमलबजावणी होणे हे समाजाच्या  स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. महिलांच्यामध्ये जाणीव जागृती होण्याची गरज आहे.  नवरात्र उत्सव स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. स्त्रीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची ताकद ज्या महिला धोरणांमध्ये आहे ते धोरण समजून घ्यावे. २०२० ते २०३० हे दशक कृती दशक म्हणजेच सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा  ५०% सहभाग असावा यासाठी कृती दशक म्हणून सर्व जगभरात राबविले जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन कार्य करणे आवश्यक आहे असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्यावतीने "मी आत्मनिर्भर" या उपक्रमांतर्गत संस्थेच्या सचिव प्रणोती शितोळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे व आयोजकांचेही डॉ.गोऱ्हे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रणोती शितोळे यांनी केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.भारती पाटीलसर्व पदाधिकारीस्त्री एक शक्तिपीठ या उपक्रमांतर्गत असणाऱ्या सर्व महिला१००० महिला उद्योजक या उपक्रमांतर्गत समाविष्ट बचत गटाच्या सर्व महिला तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकातील महिला प्रतिनिधी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या  होत्या

 रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि. 6 : रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या रक्तदान महायज्ञ रॅलीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे स्वागत केले व रॅलीला पुढील प्रवासासाठी झेंडा दाखवून रवाना केले.

            नागपूर येथिल देवता लाईफ फाउंडेशन संस्थेतर्फे आयोजित राज्यव्यापी रॅलीच्या सदस्यांनी देवता लाईव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 6) राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्तदान महायज्ञ रॅलीची माहिती दिली. 

            यावेळी संस्थेच्या विश्वस्त निलिमा बावनेसहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री विवेक जुगादेसंजय पेंडसेसारिका पेंडसेछायाचित्रकार शेखर सोनी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

            संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी या संपूर्ण रॅलीच्या पार्श्वभूमीची माहिती राज्यपालांसमोर सादर केली. किशोर बावणे व संस्थेच्या विश्वस्त नीलिमा बावणे यांनी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन राज्यपालांचा सत्कार केला.

            आज समाजात सेवाभावाने कार्य करणाऱ्या लोकांची कमी आहे. अनेकदा लोक प्रसिद्धीसाठी काम करतात. परंतु पद व पैसा या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. त्याउलट अंतःकरणातून मिळालेले आशिर्वाद स्थायी असतात. त्यामुळे समाजातील पीडितदुःखीअपंग व आजारी लोकांना देव मानून त्यांची सेवा केली पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

            राज्यव्यापी रॅलीमुळे राज्यभ्रमणही होईल व सोबत रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होईल असे सांगताना संस्थेने वर्षानुवर्षे काम करीत रहावे व रक्तदानाचे कार्य चिरंजीवी व्हावे या शब्दात राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.

            करोना काळात लोक रक्तदान कमी झाल्यामुळे रक्ताचा तुटवडा पडला होता. लोकांच्या मनात रक्तदानाबाबत भीती निर्माण झाली होती. रक्तदान महायज्ञाच्या माध्यमातून 12 जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 15 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती केली जाईल तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती विवेक जुगादे यांनी दिली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवता लाइफ फाउंडेशनच्या उपाध्यक्ष कस्तुरी बावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवता लाइफ फाउंडेशनचे सल्लागार विवेक जुगादे यांनी केले.

0000


 

 

Governor flags off State-wide Rally to promote blood donation

 

          Mumbai, 6 : Governor Bhagat Singh Koshyari welcomed and flagged off a state-wide rally to promote blood donation across all districts of Maharashtra from Raj Bhavan Mumbai on Wednesday (6th Oct).

          The rally organised by Devta Life Foundation started from Nagpur on 2nd October and aims to travel to all districts of Maharashtra and organise blood donation camps before returning to Nagpur on 15th October.

          Complimenting the members of the rally, the Governor observed that there is a need to promote blood donation in Maharashtra in the backdrop of shortage of blood in the aftermath of the COVID-19 pandemic.  He appealed to the members to sustain the blood donation awareness drive in future also.

          Chairman of the Devta Life Foundation Kishore Bawane, Nilima Bawne, Vivek Jugade, Sarika Pendse, Sanjay Pendse, Shekhar Soni and others were present.

0000

 😉लिफ्टने वर जाताना एक सुंदर मुलगी मोबाईल वर बोलत बोलत लिफ्टनध्ये शिरली 


माझ्याकडे बघत मैत्रीणीला म्हणाली, “चल एक मस्त हॅन्डसम कंपनी मिळाली आहे फोन ठेवते बाय जरा त्याच्याशी बोलते”


मी काही विचार करून बोले पर्यंत मला हसत हसत म्हणते कशी “काय आहे ना काका मैत्रीण खुप पकवत होती तिला कटवायला खोट बोलाव लागल सॅारी”


खर सांगू 

इतका सन्मानित अपमान उभ्या आयुष्यात कधी कोणाचा झाला नसेल 


म्हणून सांगतो चाळिशी नंतर फिट रहायला जिन्याचा वापर करा .... 😒🥺😩😠😠😔


😂😅

Featured post

Lakshvedhi