Monday, 4 October 2021

 मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी

सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       राज्यातील शाळा सुरु

·       मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद

·       माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाचे उद्घाटन

·       खेळती हवानिर्जंतुकीकरणआणि मुलांमध्ये अंतर ठेवण्याच्या सूचना

 

मुंबईदि. 4 आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवूअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेराज्यातील सर्व विद्यार्थीशिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला  त्यांना शुभेच्छा दिल्यात्यावेळी ते बोलत होतेशाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचेप्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोतमात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहेअसेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

कोरोनासाठीचे  निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आलीयावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाडअपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णाया प्रत्यक्ष तर शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकीसंचालक राहुल त्रिवेदीटास्क फोर्स सदस्य डॉ.सुहास प्रभूराज्य शैक्षणिक संशोधन  प्रशिक्षण परिषद (MSCERT) चे विकास गरड ऑनलाईन उपस्थि होतेयावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. 

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेआज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेततेव्हा  मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेतसुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचामित्रांना भेटण्याची उत्सुकता असायचीनवीन वह्या-पुस्तकेगणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतातत्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमि चर्चा होत असते.

शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीतहवा खेळती असावीशाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावेनिर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले. 

आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्यापावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेतत्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावेस्वःताला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले 

मुलांशी भावनिक संवाद साधणार प्रा.वर्षा गायकवाड

            आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहेप्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेतअशी माहिती  शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्याग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेतमागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी  शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही.

सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ

 आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोतविद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजाउपलब्ध सुविधाविद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य  अध्ययन नि:ष्पतीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित  सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहेयामध्ये अध्यापनाचे नियोजनवेळापत्रकउपस्थितीसाहित्यपालक सहभागमूल्यमापनअभ्यासे नियोजनशाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणेशैक्षणिक सुविधाशारीरिक आरोग्य  मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे<span style="font-size: 12.0pt; font-family: DVOT-SurekhMR;" data-mce-style="font-size: 12.0p


 विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

 

·       "वेलकम बॅक टू स्कुल..." सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'शिक्षणोत्सवानिमित्तजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे केले पुष्प देऊन स्वागत...

 

·       शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरणमास्क सॅनिटायझर आदी सुरक्षा उपाययोजनांबाबत  सूचना

 

 

          परळी (दि. 04) -: कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री श्री.मुंडे यांनी 'वेलकम बॅक टू स्कुल...म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात 'थँकू यु सर...म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

            कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतरआता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजवण्याचा निर्णय घेतला असून राज्यात शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा, टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा, अशा शुभेच्छा दिल्या.

            पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेतत्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी मास्कसॅनिटायझरअन्य स्वछता याबाबत दक्षता घेण्यात यावी. यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत संबंधितांना सक्त सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.

            यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

            मधल्या काळात शाळा बंद राहिल्या पण शाळा पुन्हा सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील उत्साह एक वेगळाच आनंद देतो आहेतसेच मधल्या काळात झालेले शैक्षणिक नुकसानही भरून निघेल असा विश्वास वाटत असल्याची प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

            यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडेमार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडेडॉ.राजाराम मुंडेटोकवाडीच्या सरपंच गोदावरीताई मुंडेग्रा.प. सदस्य तुकाराम काळेनामदेव मुंडेसुरेश रोडेशालेय समितीचे अध्यक्ष मदन काळेगणेश मुंडेमाधव मुंडे, यांसह शाळेचे मुख्याध्यापक श्याम आघाव तसेच शिक्षकशिक्षिका उपस्थित होते.

0000


 



 

Udbhodhak

 माया


अतिशय सुरेख बोधकथा आहे.


अथांग पसरलेला सागर. क्षितिजापलीकडील किनाऱ्यावर काहीतरी  भव्य-दिव्य असल्याची जाणीव झालेला एक तरुण, समुद्रकिनाऱ्यावर  आढळलेल्या एका वृद्ध नावाड्याला आपल्या मनाला झालेल्या 'त्या' जाणीवेविषयी खातरजमा करतो. नावाड्याचे सकारात्मक उत्तर ऐकून आपली तिथे जाण्याची तीव्र इच्छा तो नावाड्याशी व्यक्त करतो. तो वृद्ध नावाडी लांब खुंट्याला बांधून ठेवलेल्या एका छोट्या नावेकडे बोट करतो आणि त्याला प्रवासासंबंधीच्या सर्व गोष्टी नीट समजावून देतो आणि त्यातील एकही गोष्ट विसरायची नाही अशी समज देखील देतो. 

शेवटी, 

प्रवासामध्ये अगदीच अघटित काही जर घडलंच, तर माझ्या नावाने जोराने हाका मार, असं सांगून तो वृद्ध नावाडी त्याला शुभेच्छा देतो ....


कधी एकदा त्या पैलतीरावर जाऊन पोहोचतो आणि ते ऐश्वर्य उपभोगतो ह्या तीव्र इच्छेपोटी तो तरुण लगबगीने त्या नावेत जाऊन बसतो. दुसरा कोणताही विचार न करता, लगेच झपाझपा वल्ही मारायला सुरुवात देखील करतो. लक्ष फक्त उसळणाऱ्या लाटांवर आणि पैलतीरावर...काही काळ जातो. हळूहळू थकवा जाणवू लागतो. पण काहीही झालं तरी वल्ही मारणं थांबवायचं नाही, पैलतीर गाठायचाच, ह्या निश्चयाने तो वल्ही मारणं सुरूच ठेवतो. पण आता शरीर थकायला लागलं होतं. हाता-पायात गोळे येऊन अंगाचा थरकाप उडत होता. रात्र समोर ठाकली होती. दृष्टीपथात आता पैलतीर तर सोडाच, काहीच दिसत नव्हतं. सर्वत्र नुसता अंधारच अंधार ! त्याच्या मनात 'आपण काही चुकलो तर नाही ना ?

अशी शंकेची पाल चुकचुकते. आणि शेवटी न राहावल्याने, जिवाच्या आकांताने तो नावाड्याला हाका मारायला लागतो.

"अरे, काय झालं बेटा ?"

असे त्या वृद्ध नावाड्याचे प्रेमळ शब्द त्या तरुणाच्या कानावर पडतात. आश्चर्याने तो मागे वळून पाहतो, तर तो नावाडी अगदी जवळ किनाऱ्यावरच रेतीवर बसला होता. त्या वृद्ध नावाड्याने हळूवार विचारलं, "अरे वेड्या, 

खुंट्याला बांधलेली दोरी नाही का आधी सोडायची ? 

तू दोरी सोडलीच नाहीस .....

आणि वल्ही मारतोयस खुळ्यासारखा ! नाव पुढं जाईल कशी ?"

आता ह्या गोष्टीचं मर्म लक्षात येऊ लागलंय.

अथांग सागर म्हणजे ....

आपलं जीवन ... अस्थिर, *अडचणींच्या लाटा संकटांचे भोवरे असणारा कधी संशयाचे मत्सराचे वादळी वारे तर कधी आल्हाददायक सुखाची झुळूक.. तरी पण अथांग अंतहीन...*

तो उतावळा तरुण म्हणजे साधक  अर्थातच आपण.

 वृद्ध नावाडी म्हणजे सद्गुरु..


पैलतीर म्हणजे आपल्या पारमार्थिक जीवनाचं उद्दिष्ट अर्थात, 'अंतिम लक्ष्य' ....


खुंटा म्हणजे अहंकार "स्वत्व"...मी पणा ...


वल्ही मारणं म्हणजे उत्तम  आचरण .. !

आणि सर्वात महत्त्वाचं,  ती दोरी म्हणजे  माया ....


ही मायेची दोरी जोपर्यंत आपण अहं च्या खुंट्यापासून सोडून, निष्ठेने आणि विश्वासाने सद्गुरुंच्या इच्छेनुसार आचरण घडवत नाही नामस्मरण करीत नाही  तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टाप्रत पोहोचणं कठीण आहे. 🙏

*जय जय रघुवीर समर्थ*🙏


🌳🌷शुभ प्रभात🌷🌳



 

Featured post

Lakshvedhi