Wednesday, 29 September 2021

Tuesday, 28 September 2021

 जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपीदोषविरहीत करण्यासाठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन

 

          मुंबईदि. 27 :- वस्तू व सेवा करप्रणालीतील (जीएसटी) त्रूटी दूर करुन ती सहजसोपी करण्यासंदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यांच्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांचा मंत्रीगट स्थापन करण्यात आला आहे. मंत्रीगटाने शिफारस केलेल्या आणि जीएसटी परीषदेने मंजूर केलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीवर देखील हाच मंत्रीगट देखरेख ठेवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने त्यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीगटात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीयाहरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौतालाआंध्रप्रदेशचे अर्थमंत्री  बुग्गना राजेंद्रनाथआसामचे अर्थमंत्री अजंटा निओगछत्तीसगडचे व्यापार करमंत्री टी. एस. सिंगदेवओडीसाचे अर्थमंत्री निरंजन पुजारीतामिळनाडूचे अर्थमंत्री डॉ. पलानीवेल थैगाराजन यांचा समावेश आहे. हा मंत्रीगट सध्याचीजीएसटी भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणेकरदात्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करणेकरवसुलीतील गैरप्रकार थांबवणे,  माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन करप्रणाली सक्षमदोषविरहीत बनवणेकेंद्र व राज्यांच्या करयंत्रणेमध्ये समन्वयासाठी यंत्रणा प्रस्थापित करणे आदी विषयांसंदर्भात वेळोवेळी शिफारशी करणार आहे. मंत्रीगटाने केलेल्या व जीएसटी परिषदेने मंजूर केलेल्या शिफारशींच्या कालबद्ध अंमलबजावणीवरही हाच मंत्रीगट लक्ष ठेवणार आहे. 17 सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी  परिषदेच्या 45 व्या बैठकीनंतर हा मंत्रीगट स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आला आहे.

 गरजू व्यक्तींना मदत केल्याबद्दल राज्यपालांकडून सिंधी समाजाचा गौरव

·        सिंधी हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने युवकांना स्वयंरोजगार कीट'चे वाटप

 

            मुंबई, दि. 27 : सिंधी समाजातील अनेक लोक स्वातंत्र्यानंतर स्थलांतर करून भारतात आले.  सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थिती असून देखील या समाजातील लोकांनी बुद्धीमत्ता व परिश्रमांच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली. संत झूलेलाल यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कोरोना काळात सिंधी समाजाने सर्व समाजातील गरजू व्यक्तींना केलेली मदत कौतुकास्पद आहेअसे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

            सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्‍या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व्यक्तींना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारतकीट देण्याच्या उपक्रमाचा आरंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. २७) राजभवन येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी आमदार संजय केळकरआमदार गणपत गायकवाडसिंधी हेरीटेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नारायण बबलानीआंतरराष्ट्रीय अध्यक्ष मुकेश बजाजमहिला अध्यक्षा दिव्या बजाज आदी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

            कोरोना संकटाप्रमाणे अतिवृष्टीभूस्खलनचक्रीवादळ यांसारखी संकटे अधून मधून येत असतात. अश्यावेळी केवळ सरकारकडून मदतीची अपेक्षा न करता समाजातील दानशूर लोकांनी परोपकाराचे काम केले पाहिजे असे सांगून सर्व समाजाने एकत्रितपणे काम केल्यास कोरोनासारख्या कोणत्याही संकटाचा समर्थपणे सामना करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

            कोरोनामुळे बिघडलेली अर्थव्यवस्था सावरत असून देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने अग्रेसर होत आहे असे सांगून ७२० बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार कीट देण्याच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या निर्णयाचे राज्यपालांनी कौतुक केले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते आमदार संजय केळकरआमदार कुमार आयलानीआमदारगणपत गायकवाडडॉ.गुरुमुख जगवाणीथंडाराम तोलानीरमेश बजाजदयाल हरजानीअनिला सुंदरकाजल चंदिरामाणीअजीत मन्यालडॉ.मनीष मिराणीमुरली अदनानीराजू खेतवानीदिनेश तहलियानीजीतू जगवानीप्रेम भारतीय व उल्हासनगरच्या सिंधी हेरीटेज फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

0000

 

Corona Warriors Felicitated

Governor presents Atmanirbhar Bharat Kits to unemployed youths

 

            Governor Bhagat Singh Koshyari presented Atmanirbhar Bharat 'Self Employment' Kits to youths at a function organized by the Sindhi Heritage Foundation at Raj Bhavan, Mumbai on Monday (27th Sept).

            The Governor also felicitated Corona Warriors on the occasion. MLA Sanjay Kelkar, Founder President of the Sindhi Heritage Foundation Narayan Bablani, International President Mukesh Bajaj and Divya Bajaj were present.

            The Governor felicitated Sanjay Kelkar, MLA, Kumar Ailani, MLA, Ganpat Gaikwad, MLA, Thadaram Tolani, Dr. Gurumukh Jagwani, Ramesh Bajaj, Dayal Harjani, Anila Sunder, Kajal Chandiramani, Dr. Ajeet Manyal, Dr. Manish Mirani, Murli Adnani, Raju Khetwani, Dinesh Tahliyani, Jeetu Jagwani, Prem Bhartiya and members of the Ulhasnagar team of Sindhi Heritage Foundation on the occasion.

0000

 पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून

जगभरातील पर्यटकांना आकर्षित करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

          मुंबईदि. 27 :- कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजेइतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे असे सांगतानामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटनाला असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल असे जाहीर केले. राज्यातील पर्यटनाचे वैभव जपाजोपासावाढवा आणि हे करीत असतानाच पर्यटन क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून जगभरातील पर्यटकांना आकर्षित कराअसे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जागतिक पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेपर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंहएमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोजपर्यटन संचालक मिलींद बोरीकर आदी उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री कु. अदिती तटकरे कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होत्या.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेकोविडचा सर्वाधिक फटका पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. तथापि या कालावधीत विभागाने कोविडनंतर पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठीचे धोरण आणि नियोजन केले. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. या निमित्ताने आजवर दुर्लक्षित असलेल्या विभागाचे महत्व अधोरेखित झाले आहे. आपण आपले वैभव जगासमोर आणत आहोत. नवीन पर्यटन स्थळेही विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या सुरू असलेल्या कामाच्या माध्यमातून महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जगासमोर येईलअसा विश्वास व्यक्त करून सरकार कायम चांगल्या योजनांच्या पाठिशी राहीलअसेही त्यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सर्वांगीण विकासासाठी पर्यटनहे घोषवाक्य सर्वार्थाने सार्थ ठरवणारी वाटचाल सुरू असल्याबद्दल पर्यटन विभागाचे कौतुक केले. श्री.पवार म्हणाले, राज्यात गड किल्लेकिनारपट्टीसाहसी पर्यटनधार्मिक स्थळेशैक्षणिक आणि वैद्यकीय पर्यटन अशा पर्यटनाच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य वापर करून पर्यटकांना आकर्षित करताना पर्यटन स्थळांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत असलेल्या चिपी विमानतळाचा कोकणातील पर्यटनाला निश्चितच फायदा होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटकांनी आधी महाराष्ट्र फिरावात्यानंतर इतरत्र जावेअसे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन विभागाला गरजेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे त्यांनी सांगितले.

            महसूलमंत्री श्री.थोरात यांनी पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यात पर्यटन विकासाच्या सर्व बाजूंचा विचार होत असल्याबद्दल विभागाचे कौतुक केले. इतर देशांपेक्षा आपल्याकडे खूप काही आहेहे जगाला दाखवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणापासून विदर्भापर्यंत असलेली विविधता जगासमोर आणताना स्थानिकांना विविध मार्गांनी रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्यातअसे आवाहन त्यांनी केले.

            पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोविड नंतर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या ८० वरून १० वर आणली१५ ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होती त्याऐवजी आता केवळ नऊ स्व-प्रमाणपत्र आवश्यक केले. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. चिपी विमानतळापाठोपाठ कोकणात जागतिक दर्जाचे हॉटेल व्यावसायिक येण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्य आहेते जपत पुढील काही वर्षात 'महा'राष्ट्र खऱ्या अर्थाने जगाला दाखवून देऊअसा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

            पर्यटन राज्यमंत्री कु.अदिती तटकरे यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे शुभेच्छा देताना सध्या विभागामार्फत आखलेल्या योजना आणि धोरणांचा भविष्यात पर्यटन विकासाला निश्चित लाभ होईलअसा विश्वास व्यक्त केला. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पर्यटन अधिकारी उपलब्ध असावेतअसेही त्यांनी नमूद केले.

            पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी विभागाच्या विविध प्रकल्पांची माहिती देऊन विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. महाराष्ट्र ही विविध संधींची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले.

            भारतातच नव्हे तर जगभरात पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिकआर्थिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा विकास होत आहे. यासंदर्भात जागृती निर्माण करत पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेतर्फे (UNWTO) ‘पर्यटनातून सर्वांगीण विकास’ हे घोषवाक्य जाहीर करण्यात आले आहे.

            आजच्या कार्यक्रमादरम्यान मुंबई उच्च न्यायालय व मुंबई विद्यापीठाच्या इमारतींची ऐतिहासिक वारसा सफर या उपक्रमाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करून याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यानुसारआता शनिवारी व रविवारी मुंबई उच्च न्यायालय तर सार्वजनिक सुट्या व सर्व रविवारी मुंबई विद्यापीठाच्या वास्तूत पर्यटकांना प्रवेश खुला केला जाणार आहे. ही संपूर्ण सहल टूर गाईड असोसिएशन प्रमाणित मार्गदर्शकांच्या सहकार्याने पार पडेल. 

संकेतस्थळ व ॲपचे उद्घाटन

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनाच्या सुधारित संकेतस्थळाचे व महाराष्ट्र टुरिझम या मोबाईल ॲपचेसुद्धा उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळाच्या सुधारित आवृत्तीत मराठी भाषेसह एकूण ९ विविध भाषांमध्ये पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तब्बल ३५० पर्यटनस्थळांची थीम नुसार वर्गीकृत करून माहिती देण्यात आली आहे.

            यावेळी पर्यटन संचालनालयाच्या कोकण पर्यटन विभागाच्या बेलापूरनवी मुंबई येथील नव्या कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील सहा विभागातील आकर्षक रंगछटांनी रंगवलेल्या सहा पर्यटन भिंतींचेही अनावरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांच्या मदतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात प्रत्येक प्रदेशातील पर्यटक आकर्षणेऐतिहासिक वारसास्थळेख्यात व्यक्तीकला आणि संस्कृतींचा मेळ घालणाऱ्या सुंदर कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते IITF (Incredible India Tourism Facilitator) अभ्यासक्रमांतर्गत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना तसेच फोटोग्राफी स्पर्धेतील व महाराष्ट्राचा मास्टरशेफ स्पर्धेतील विजेत्यांपैकी प्रत्येकी दोन विजेत्यांना प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर पर्यटन संचालनालयाचे सह संचालक डॉ. धनंजय सावळकर व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी मागील काळात आखलेल्या नवनवीन योजना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी तसेच पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध विकासकार्यांसाठी केलेल्या कामाचे विशेष कौतुक करत त्यांचाही सत्कार करण्यात आला.

            प्रारंभी पर्यटन संचालनालयाद्वारे ऑगस्ट महिन्यात जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त समाज माध्यमाद्वारे  आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र थ्रू माय लेन्स'  या फोटोग्राफी स्पर्धेतील स्पर्धकांच्या विजेत्या फोटो  प्रदर्शनास मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले.

            पर्यटन संचालक श्री.बोरीकर यांनी प्रास्ताविकाद्वारे पर्यटन संचालनालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर सह संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी आभार मानले.

 ठाण्यात अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित

·       ठाण्यातील वाहतूक कोंडीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

·       पोलीसमनपा अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक

·       पालकमंत्री बुधवारी करणार पाहणी

·       नवी मुंबईखारेगावशहापूरदापचारी येथे होणार पार्किंग लॉट

          ठाणेदि. 27 :  ठाणे शहरातील मुख्य महामार्ग व घोडबंदर रस्त्यावर सोमवारी पुन्हा झालेल्या वाहतूक कोंडीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली आणि अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले. श्री. शिंदे बुधवारी स्वतः नवी मुंबईखारेगावशहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहणी करणार आहेत.

            ठाणे शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डेशहरात चालू असलेली विकासकामे यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणे मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते. त्यातच सोमवारी मध्यरात्री टँकर उलटल्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाणे पोलिसवाहतूक पोलिसग्रामीण पोलिसठाणे महापालिका आदी यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीस ठाणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमानेठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विनय राठोडमीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागरठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रोडवर गायमुख येथे तेल वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे सोमवारी वाहतूक कोंडी झाल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

            रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्किंग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्या-टप्प्याने पुढे सोडण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसारबुधवारी या जागांची पालकमंत्री श्री. शिंदे पाहणी करणार आहेत. 

            जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने थांबवण्यासाठी खर्डी-सोनाळे-दापोडे येथेअहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे तर ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोल नाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या  टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतीलजेणेकरून वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल. पालकमंत्री शिंदे हे स्वतः या नियोजित पार्किंग लॉटच्या जागांची पहाणी करणार असून त्यानंतर या पार्किंगच्या जागावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

            ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल. त्यामुळे ठाणे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

००००

 मुंबई ते हैद्राबादपुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

·       जालनानांदेडनाशिकला मोठा फायदा

 

          मुंबई, दि. 27 : मुंबई नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला  गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

          मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात कीप्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेडमार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.

          याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिकलाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई नाशिक- औरंगाबाद हे एकमेकाना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैद्राबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीड ने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित  केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकांना जोडली जाऊन उद्योग व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.   

Featured post

Lakshvedhi